Author: अनंत पांगारकर

बुधवार १८ डिसेंबर  छत्रपती संभाजीनगर : आईसोबत शेतात गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा खेळताना कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल मंगळवारी (१७ डिसेंबर) पैठण तालुक्यातील रजापूर शिवारात घडली. गाळ्यात फसलेल्या चिमुकल्यांच मृतदेह अग्निशामक दलाच्या पथकाने बाहेर काढले. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. प्रणव कृष्णा फणसे (वय ६) आणि जय कृष्णा फणसे (वय ९, दोघेही रा. आडूळ ता. बुद्रुक पैठण) अशी मृत पावलेल्या दोन चिमुकल्यांची नावं आहेत. या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा विठ्ठल फणसे यांची रजापूर शिवारात गट क्रमांक २८ मध्ये दोन एकर शेती आहे. दरम्यान, काल मंगळवारी कृष्णा यांची पत्नी वर्षा या कामानिमित्त शेतात…

Read More

मंगळवार १७ डिसेंबर  संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले गावाच्या जवळ असलेल्या बेलसोंडावाडीमध्ये मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या घराला लागलेल्या आगीमध्ये घरातील संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान याची माहिती मिळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयाकडून संबंधित महिलेला संसारोपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लाईट नसल्याने मंगल सिताराम घुले या महिलेने आपल्या घरात तेलाचा दिवा लावला होता. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या घुले एकट्याच घरात राहावयास आहे. घरात तेलाचा दिवा लावून घुले शेजारी गेल्या असताना तेलाचा दिवा अचानकपणे खाली पडल्याने संपूर्ण घराणे हळूहळू पेट घेतला. हा प्रकार लक्षात येईपर्यंत आग मोठ्या प्रमाणात…

Read More

मंगळवार १७ डिसेंबर  संगमनेर – शहरामध्ये नगरपालिकेच्यावतीने सध्या गटारी आणि आणखी काही कामे सुरू आहे. मात्र या कामांसाठी अचानकपणे रस्ते बंद करण्यात आल्याने संगमनेरकर नागरिकांची मोठे गैरसोय होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित भागातील रस्ते, चौक बंद करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच संबंधित रस्ते किती कालावधीसाठी बंद राहणार आहे याची माहिती नागरिकांना देण्याची मागणी संगमनेर नगर परिषदेच्या पथ विक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंके यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मोमीनपुरा या परिसरात, कवी अनंत फंदी नाट्यगृहापाशी, बाजारपेठेत नगर परिषदेच्यावतीने काम सुरू आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहे. मात्र रस्ते बंद…

Read More

ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणावर दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडी आक्रमक. ‘वन नेशन, नो इलेक्शन’ हे विधेयक लोकशाही व्यवस्था संपवण्यासाठी. मंगळवार, १७ डिसेंबर ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपेरशन करुन दलित बांधवांवर अत्याचार केले. सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणी सरकारच्या भूमिकेवर तोफ डागत भाजपा युती सरकारला लोकांच्या भावनांशी काही देणेघेणे नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी…

Read More

मंगळवार १७ डिसेंबर | अनंत पांगारकर संगमनेर – संगमनेर शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. दोन तासाच्या अंतरात संगमनेर बस स्थानकावर दोन प्रवासी महिलांच्या जवळील दीडशे ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार सोमवारी संध्याकाळी समोर आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात लता शरद घुगे (रा. सायखेडा, निफाड) व शुभांगी रवींद्र कासार (रा. खराडी, पुणे) या दोन्ही महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दागिने चोरीचे स्वतंत्र दोन गुन्हे भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार नोंदविण्यात आले आहेत. संगमनेर शहरातील दागिने चोरीच्या घटना लक्षात घेता अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस…

Read More

सोमवार १६ डिसेंबर विशेष प्रतिनिधी | मुंबई  महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आल्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. गेल्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या अनेकांना डच्चू देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू आहे. मंत्रीपद न मिळाल्याने महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते नाराज आहे. या नाराजांची मनधरणी करून त्यांची समजूत कशी काढायची, त्यांना शांत कसे करायचे याचं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर आहे. नाराज असलेल्या या दिग्गज नेत्यांना अडीच वर्षानंतर खांदेपालट झाल्यावर संधी मिळणार की पक्षातील आणखी कुठली मोठी जबाबदारी मिळणार यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. महायुतीच्या…

Read More

सोमवार १६ डिसेंबर  अहिल्यानगर – गरजू महिलां व मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. योजने अंतर्गत महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि चालविण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी या योजनेच्या लाभासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्लॉट क्र.४/५/३, जिव्हाळा हाऊस, खोडदे यांची इमारत, वंदे मातरम कॉलनी, कल्याण रोड, अहिल्यानगर येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

Read More

सोमवार १६ डिसेंबर  अहिल्यानगर – जिल्ह्यात १९ ते २४ डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताहांतर्गत ‘प्रशासन गाव की ओर’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आदी उपस्थित होते. तर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. सालीमठ म्हणाले, कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करावे. विविध महामंडळांनी लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा. नाविन्यपूर्ण कल्पना वापरून नागरिकांना विविध सेवा सुलभपणे उपलब्ध करून द्याव्यात. गाव कचरामुक्त किंवा…

Read More

सोमवार १६ डिसेंबर  नागपूर – बीड, परभणी येथील घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत. या घटनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार अपेक्षित चर्चा सभागृहात झाली पाहिजे. संविधानाचा अपमान करणारा व्यक्ती मनोरुग्ण होता. विरोधी पक्षाने राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी चांगल्या सूचना मांडाव्यात, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्तावादरम्यान सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

बीड व परभणीच्या घटनांवर राज्यातील जनतेत तीव्र संताप, सरकारने उत्तर द्यावे… माजी मंत्री रविंद्र चव्हाणांच्या बंगल्यावर ९ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी तरुणाला किडनॅप करून अत्याचार. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधीपक्ष आक्रमक, ईव्हीएम व बीड, परभणीतील मुद्द्यांवर विधानभवनच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी. सोमवार १६ डिसेंबर नागपूर – अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परभणी व बीडमधील घटनांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संविधानाची विटंबना व सरपंचाची निघृण हत्या या दोन्ही घटना भाजपा सरकार आल्यानंतर घडल्या आहेत. परभणीत एका आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या घटना अत्यंत गंभीर असून आंबेडकरी अनुयायी व राज्यातील जनतेत प्रचंड संताप आहे. सरकारने या मुद्द्यांवर उत्तर द्यायची तयारी दाखवावी, अशी मागणी महाराष्ट्र…

Read More