Author: अनंत पांगारकर
शुक्रवार, ०८ नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येऊ लागला असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी माजी मंत्री अमित देशमुख आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे रविवारी तळेगाव दिघे येथे युवक मेळाव्याच्या निमित्ताने येत आहे, अशी माहिती युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी दिली. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून नवव्यांदा निवडणूक लढविणाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ रविवारी तळेगाव दिघे येथे युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (१० नोव्हेंबर) संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या मेळाव्यासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. तळेगाव दिघे येथे हे दोन्ही नेते विरोधकांवर टीका करताना काय भाष्य करतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. आमदार बाळासाहेब थोरात हे…
शुक्रवार, ०८ नोव्हेंबर संगमनेर – कुटुंबीयांकडे बघून शिवीगाळ करणाऱ्या दारूच्या नशेतील तरुण आणि त्याच्या दहा-पंधरा साथीदारांनी कुटुंबीयांना मारहाण केल्याचा तसेच हाउसिंग सोसायटी मधील वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्याचा प्रकार गुरुवारी रात्री संगमनेरच्या घुलेवाडी शिवारातील एकता चौकात घडला आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात योगेश मदनलाल तिवारी (वय ४३ वर्ष, रा. कंचन कम्फर्ट हाऊसिंग सोसायटी, एकता चौक, घुलेवाडी, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सागर राऊत व त्याच्या दहा-पंधरा साथीदार मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, योगेश तिवारी यांचा गोंदेफाटा, सिन्नर जि. नाशिक येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तसेच ते शहरालगतच्या घुलेवाडी येथील एकता चौकातील कांचन…
यात्रेत दोन हजारावर तरुण-तरुणींचा सहभाग विधानसभा निवडणूक तालुक्याच्या अस्मिता आणि स्वाभिमानाची शुक्रवार, ०८ नोव्हेंबर संगमनेर – संगमनेर तालुका हा कायमच शांतताप्रिय आहे. परंतु या तालुक्यातील जर कोणी येथील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला यापुढील काळात जशास तसे उत्तर दिले जाईल. येथील विधानसभा निवडणूक संगमनेर तालुक्याच्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी केले. राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात नवव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यांच्या प्रचारार्थ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी संगमनेर शहरात युवा संवाद यात्रा काढण्यात आली होती. दिवसभर शहराच्या सर्वच भागात सुरू असलेल्या या यात्रेत दोन…
गुरुवार ०७ नोव्हेंबर विशेष प्रतिनिधी / मुंबई तेरा वर्षांपूर्वी हत्या झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रमोद महाजन पक्षाच्या राजकारणात वरचढ ठरू नये यासाठी त्यांचा घात करण्यात आला. यामागे गृहकलश असल्याच्या वावड्या उडवल्या जात होत्या. मात्र त्यात जराही सत्य नव्हतं. ते एक षडयंत्र असल्याचा खळबळजनक दावा प्रमोद महाजनांच्या कन्या पूनम महाजन यांनी केला आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांची २००६ साली त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. तेव्हा ही हत्या गृहकलहामधूनच झाल्याची त्यावेळी चर्चा केली जात होती. मात्र, प्रमोद महाजन यांची कन्या आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी वडिलांची हत्या ही कौटुंबिक विषय किंवा द्वेष…
गुरुवार, ७ नोव्हेंबर संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ईव्हीएम मशीन हाताळणी, मतदानासाठी यंत्र तयार करणे व मतमोजणी बाबतचे प्रशिक्षण गुरुवारी घेण्यात आले. संगमनेर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झालेल्या या प्रशिक्षणास निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज मांजरे, संतोष कोरे उपस्थित होते. प्रशिक्षणात विभाग प्रमुख व सहाय्यक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनच्या सिलिंग व सेटिंग, मतमोजणी प्रक्रिया, फेऱ्यानुसार व टेबलनुसार साहित्य हाताळणी, तसेच साहित्य वितरणाच्या पद्धतींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान ईव्हीएम यंत्राची तयारी व सीलबंद प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही घेण्यात आले. प्रशिक्षणामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेत आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास मदत मिळाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी…
गुरुवार, ७ नोव्हेंबर नाशिक – विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन हॅक करून उमेदवाराला निवडून आणतो असे सांगत त्याने ४२ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने नाशिक मधील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गिते यांना विधान सभा निवडणुकीत मशिन हॅक करून पाडण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या परप्रांतीयाला नाशिक पोलिसांनी शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत. भगवानसिंग नारायण चव्हाण (वय ३४ मुळ रा. अजमेर राजस्थान हल्ली विठू माऊली कॉलनी, मखमलाबाद, म्हसरूळ लिंकरोड) असे खंडणी मागत धमकी देणाऱ्या संशयिताचे नाव आहे. चव्हाण याला शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने अल्पावधीत संशयितास मखमलाबाद शिवारातून हुडकून काढले असून, त्यास मुंबईनाका पोलीसांच्या स्वाधिन…
संगमनेर – अनंत पांगारकर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या गावांमध्ये चार सभांच्या माध्यमातून विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत टायगर अभी जिंदा है! म्हणणारे माजी खासदार ‘दादा’ निवडणुकीत उभे राहण्याऐवजी मतदारसंघातूनच गायब झाले. त्यामुळे दादा प्रेमी कार्यकर्त्यांनी दादा हे वागणं बरं नव्हं… अशा शब्दात खाजगीत बोचरी टीका सुरू केली आहे. त्यामुळे टायगर जिंदा आहे म्हणत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करणारा टायगर आता नेमका कुठे गेला, यामागे काही गौड बंगाल आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर दादा उत्तरेत विशेषत: संगमनेर विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक…
गुरुवार, ०६ नोव्हेंबर संगमनेर – तुमचा आत्मविश्वास गेला आहे, तुम्ही भाषणाला घाबरू लागलात त्यामुळे आता आमच्या सभांमध्ये जॅमर बसविले जाऊ लागले आहे. लोकांना म्हणणं देखील ऐकू द्यायचं नाही, नाहीतरी आम्ही तुमच्या एवढे वाईट बोलत नाही, का घाबरताय तुम्ही? अशा झोंबणाऱ्या शब्दात राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता-पुत्रांवर टीका केली. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आश्वी खुर्द येथील सभेत थोरात बोलत होते. डॉ. जयश्री थोरात, प्रभावती घोगरे, शिवसेनेचे सचिन कोते, बाळासाहेब गायकवाड, सचिन चौगुले, सोनल जगताप, प्रतिभा जोंधळे, ॲड. रामदास शेजुळ आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. शिर्डी मतदार…
संगमनेरच्या प्रचार सभेत सत्ताधाऱ्यांवर घणाघात! गुरुवार, ७ नोव्हेंबर संगमनेर – येथे काही लोकांचा असा समज झाला आहे की, त्यांचा जन्म हा राज्य करायला, तुमच्या डोक्यावर बसायला, बँका, साखर कारखाने, लोकांच्या जमिनी, लोकांचे धंदे, दूध डेअरी, सहकार बँका स्वतःच्या खिशात टाकण्यासाठी झाला आहे. मात्र आता तुम्हाला हे ठरवावे लागेल तुमचा जन्म स्वतःला सिद्ध करण्यासाठी झाला की प्रस्थापितांच्या पोरांची मक्तेदारी चालविण्यासाठी, यांच्या सतरंज्या उचलण्यासाठी झाला आहे का? असा सवाल करत हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. इतके दिवस एकच खानावळ होती आता मात्र आपल्याला स्वतःची खानावळ सुरू करावी लागेल वंचितची खानावळ सुरू करण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर…
मुंबई | विशेष प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या आदेशाने बदली करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या जागी आणण्यात आलेल्या संजय वर्मा यांची नियुक्ती तात्पुरत्या काळासाठी करण्याचे आदेश काढत राज्य सरकारने निवडणूक आयोगालाही ठेंगा दाखवला आहे. शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून निवडणूक आयागाने संजय वर्मा यांना पोलीस संचालकपदी नियुक्त करताना काढलेल्या आदेशात तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नाही, तरीही राज्य सरकारच्या आदेशात मात्र तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख का करण्यात आला? या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. २४ तासाच्या आत संजय वर्मा यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचे आदेश काढा, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करु, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे…
