Author: अनंत पांगारकर
बुधवार, दि. ०४ सप्टेंबर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेमुळे सातत्याने वादात सापडणाऱ्या शांतता समितीच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शांतता समितीचे नेमके सदस्य कोण असा प्रश्न उपस्थित करत या बैठकीला जाणीवपूर्वक डावल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी केला आहे. मंगळवारी (ता. ३ सप्टेंबर) यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या सभागृहात पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. यावर्षी संगमनेर शहराची, येथील सण उत्सवाची कोणतीही पार्श्वभूमी माहीत नसलेल्या अधिकाऱ्यांच्या (बढतीवर बदली झालेल्या पोलीस उपअधीक्षकांचा अपवाद वगळता) हातात गणेशोत्सवाची सूत्रे गेल्याने काही ठराविक लोकांनाच त्या बैठकीचे निमंत्रण दिले गेले. अचानक तणावात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस खात्याचे अधिकारी समाजातील…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागीय, जिल्हा प्रशासनाला सूचना बुधवार, दि. ०४ सप्टेंबर मुंबई : विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, यासंदर्भात त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी. विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन…
असा असेल आजचा आपला दिवस… मेष – बाहेरगावी जाण्याचे योग. आर्थिक लाभ होण्याचा दिवस. पोटाचे आजार संभवतील. वृषभ – रागावर नियंत्रण ठेवा. आज तुमची कामे संथ गतीने होतील. वाहन चोरीची शक्यता, वाहन सांभाळा. मिथुन – जितका लाभाचा तितकाच खर्चाचा दिवस. चिडचिड, संतापावर नियंत्रण ठेवा. कर्क – आजचा दिवस अतिशय फायदेशीर असा आहे. जिथे जाल तिथे तुमचा सन्मान केला जाईल. मात्र भाऊबंदकीपासून चार हात दूर राहा. सिंह – अतिशय प्रेमळ आणि आपुलकी जपणारी व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात येत आहे, तिला मान द्या. पैसा जास्त खर्च करू नका. कन्या – रडका आणि रडविणारा असा आजचा दिवस आहे. आज मित्रांपासून सावध राहा. कोणतेही…
मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर विशेष प्रतिनिधी / मुंबई ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्य परीवहन महामंडळ म्हणजेच एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा पहिलाच दिवस असून याचा एसटीच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. संपामुळे अंदाजे १४ ते १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच ४८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी…
महिलांना मानसिक व आर्थिक सक्षम करणारा महोत्सव मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर संगमनेर : भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये विकृत मानसिकता वाढली आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज महिला, चिमुकल्या सुरक्षित नाही. महिलांवरील अत्याचार वाढले असून बदलापूर घटनेनंतर पोलीस पीडीतेचा एफआयआरदेखील दाखल करून घेत नव्हते. दिल्लीत कुस्तीपटूंवर झालेल्या अन्यायाची कोणी दखल घेत नाहीत अशा परिस्थितीत भ्रष्टाचार देखील वाढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेला होता भ्रष्टाचाराच प्रतीक असल्याचा खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटल आहे. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर एकविरा फाउंडेशन आणि अमृत उद्योग समूहाच्या पुढाकारातून पंधरा हजार महिलांच्या उपस्थितीत आयोजित ‘इंदिरा महोत्सव’ शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे बोलत होत्या.…
ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा मुंबईत शुभारंभ मंगळवार, दि. ३ सप्टेंबर मुंबई : ई गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचे माध्यम आहे. यामुळे पारदर्शकता येत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनावर विश्वास निर्माण होतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याची रक्कम अतिशय कमी वेळेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात केवळ ई गव्हर्नन्समुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा आयोजन मुंबई येथे मंगळवारी करण्यात आले होते. “विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण” अशी संकल्पना असलेल्या या दोन दिवसीय परिषदेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते…
मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर मुंबई / संगमनेर : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा मागण्या विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी मान्य कराव्या, असा इशारा देत एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूरसह राज्याच्या अनेक भागातील कर्मचारी संपात उतरल्याने आता ऐन गणेशोत्सवात लालपरीची चाके थांबलेली दिसत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी कामगारांच्या आर्थिक मुद्द्यांची सोडवणूक तातडीने व्हावी, यासाठी सोमवारी राज्यभर तीव्र निदर्शने करण्यात आली, तर मंगळवारपासून संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. सोमवारी दुपारी १.३० वाजता मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्यावतीने निदर्शने व द्वारसभा आयोजित करण्यात आली होती, त्याचवेळी सरकारला संपावर जाण्याचा…
मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संगमनेरमधील वकील शरीफ पठाण आणि त्यांच्या भावावर प्राणघातक हल्ल्याचा प्रकार घडला होता. हल्ल्याच्या घटनेपासून फरार असलेल्या आरोपींना संगमनेरच्या न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आता औरंगाबाद खंडपीठातही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आले आहे. ॲड. पठाण यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा ते मागे घेत नाहीत, या कारणावरून अशपाक इब्राहिम पटेल (रा. साकुर), सादिक रज्जाक शेख, आयाज रज्जाक शेख, आयान सादीक शेख, जुनेद सादीक शेख, कदीर नुरमोहम्मद उर्फ लतिफ शेख, इमरान बशीर शेख (सर्व रा. संगमनेर) यांनी वकील शरीफ शेख आणि त्यांच्या भावाला शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाजवळ कोयता, गज, दांडके, हॉकी स्टिकच्या…
मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना आता ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. महिला आणि बालविकास विभागाने सोमवारी (२ सप्टेंबर) यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. राज्य सरकराने जून महिन्यात राज्याचा सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात महिना १ हजार ५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने १ जुलै २०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी…
आजचे राशीभविष्य मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर २०२४ मेष – जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला. आज कोणावरही विसंबून राहू नका. आळस करू नका. भाग्य तुमच्या पाठीशी आहे. वृषभ – आज अचानक धनलाभ संभवतो. शुभ दिवस परंतु अतिशय खर्चिक असा दिवस. आज शक्यतो प्रवास करू नका. मिथुन – संतती आज आपल्याला खुश ठेवेल. संध्याकाळ नंतर आर्थिक समस्या सुटतील. कर्क – आज घरी बसा, आराम करा. आनंदी दिवस. मध्यांनी मात्र मानसन्मानाची आणि होण्याची शक्यता. सिंह – प्रेमी युवकांसाठी आनंदाची बातमी. आजचा दिवस भाग्यशाली. आज जे मागाल ते मिळेल. कन्या – आईकडच्या नातलगाकडून, मामा कडून आर्थिक फायदा संभवतो. मान सन्मानात वाढ होईल. तुळ…
