Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज – कराड  विधानसभेत आम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. त्यामुळे विधिमंडळात फार मोठे लढाई होणार नसली तरी लोकांचे प्रश्न पत्रकार परिषद आणि बैठकांच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. राज्यात महायुती सरकारला स्पष्ट जनादेश मिळाला – तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते पद मिळेल एवढी आमदार संख्या देखील महाविकास आघाडीतील एकही पक्षाला मिळालेली नाही. विरोधी पक्षनेते पदासाठी सभागृहाच्या एकूण संख्याबळाच्या एक दशांश सदस्य असणे आवश्यक असते. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी २९ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक असून ते कोणत्याच पक्षाकडे नाही. महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २०, काँग्रेस १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद…

Read More

रविवार, २४ नोव्हेंबर – संगमनेर  शनिवारी संगमनेर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी १०५६० मतांनी पराभव केला. मतदार संघातील सर्वच गावांमध्ये खताळ यांना थोरात यांच्यापेक्षा निर्णायक आघाडी मिळाली. टपाली मतदानामध्ये खताळ यांना ८९१ तर थोरात यांना २१८३ मते मिळाली. या निवडणुकीत अमोल खताळ यांना १,१२,३८६ तर थोरात यांना १,०१,८२६ मते मिळाली. थोरात आणि खताळ यांना मतदान केंद्र आणि गाव निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे… इमेज झूम करून बघा..

Read More

रविवार, २३ नोव्हेंबर लोकसभा निवडणुकीवेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाची परिणती आपसातील हाय व्होल्टेज लढतींवर झाली होती. काही मतदारसंघात कौटुंबिक लढती रंगल्या होत्या. बारामतीमध्ये थेट सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत रंगली होते. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना पुतण्या युगेंद्र पवार यांच्याशी सामना करावा लागला. राज्यात विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आल्यानंतर प्रत्येक जण आपापल्यापरीने कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार जिंकला, किती मितं मिळाली, कोणता उमेदवार पडला, बलाढ्य उमेदवारांचं काय झालं, कौटुंबिक लढतींचं काय झालं, हाय व्होल्टेज लढतींचं काय झालं? या मागची कारण शोधत त्यावर विश्लेषण करत आहे. मात्र अशाच एका लढतीची उत्सुकता अजित पवार यांच्या विधानामुळे…

Read More

रविवार, २४ नोव्हेंबर  राज्यातील जनतेचा स्पष्ट कौल मिळाल्यानंतर महायुतीने सरकार स्थापन करण्याचा हालचाली सुरू केल्या आहे. राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून २६ नोव्हेंबर पूर्वी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा येत्या काही तासात होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागते याच्या देखील चर्चा सुरू झाल्या आहे. सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पाऊले टाकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर पार पडली आहे. या बैठकीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी…

Read More

रविवार, २४ नोव्हेंबर – मुंबई  राज्यात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत दिसणार आहे. दरम्यान महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार आणि मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सुरू असून राज्यातील जनतेची उत्सुकता वाढीस लागली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार नव्या सरकारचा उद्या सोमवारी (२५ नोव्हेंबर) वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे प्रमुख जे. पी. नड्डा यांच्यासह केंद्रातील काही दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता असून नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागते तसेच मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळते यावर सध्या तर्कवितर्क सुरू आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आहे. शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून राज्यात २८८ पैकी २३५ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे तर ४९ जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले असून अन्य ०४ जागांवर इतरांचा विजय झाला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला १४५ सदस्यांचा आकडा गाठण्यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येत असून मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्राचे हे आहे २८८ नवे आमदार 1) अक्कलकुवा- आमश्या पाडवी (शिवसेना) 2) शहादा-राजेश पाडवी (भाजपा) 3) नंदुरबार-विजयकुमार गावीत (भाजपा) 4) नवापुर-शिरीषकुमार नाईक (काँग्रेस) 5) साक्री-मंजुळा गावीत (शिवसेना) 6) धुळे ग्रामीण-राघवेंद्र पाटील(भाजपा)…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्य विधान सभेच्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागून महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा जबर झटका बसला आहे. आघाडीचे आगामी मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं होतं त्या संगमनेरचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव काँग्रेस पक्षाच्या चांगलाच जिव्हारी लागला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही पराभव झाला. हा निकालही आश्चर्यकारक मानला जातो. मुंबई माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांनाही पराभव पत्करावा लागला. भाजपने अमित यांना पाठिंबा देऊनही त्यांचा पराभव झाल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरलं आहे. तिकडे वरळी मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे विजयी झाले. त्यांनी माजी मंत्री मिलिंद…

Read More

शनिवार २३ नोव्हेंबर – मुंबई विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. पाठोपाठ राज्यात महायुती सरकारने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. अहमदनगर जिल्ह्यातही महायुतीच्या दिशेने कल हेच धक्कादायक निकाल समोर आले आहे. जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने प्रत्येकी चार-चार तर शिवसेना शिंदे गटाने दोन जागांवर विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या दोन्ही जागांवर दिलेले भाजपचे उमेदवार निवडून आले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला प्रत्येकी एकेका जागेवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जिल्ह्यात एकही जागा मिळू शकली नाही. निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोल मध्ये देखील महायुती सत्ता…

Read More

शनिवार, २३ नोव्हेंबर – संगमनेर  अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचे निकाल समोर आले आहे. समोर आलेल्या निकालामध्ये महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना प्रत्येकी चार-चार तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहे. तर महाविकास आघाडी मधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला केवळ एकेका जागेवर समाधान मानावे लागले आहे. अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष काळे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले असून त्यांना तब्बल १,२४,६२४ एवढे मताधिक्य मिळाले आहे. त्या पाठोपाठ भाजप नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ७०२८२ एवढ्या मताधिक्याने आणि भाजपाचे विक्रम पाचपुते ३६८२७ एवढ्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहे. …

Read More

संगमनेर – प्रतिनिधी  विधानसभा निवडणूक मतमोजणीनंतर उमेदवारांच्या समर्थकांनी काढलेल्या मिरवणुकीत बस स्थानक चौकात गर्दीतून वाहन चालकांना वाट काढून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला वाहनाचा धक्का लागल्याने ते गंभीर जखमी होऊन पायाला इजा झाली आहे. जखमी पोलीस अधिकाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. संगमनेर बस स्थानक चौकात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केल्याने वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे (आर्थिक गुन्हे शाखा) हे बस स्थानक चौकात बंदोबस्त करीत असताना गर्दीत एका वाहन चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाच्या धडकेत त्यांच्या पायाला इजा झाली आहे. दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास बस स्थानकासमोर हा प्रकार घडला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश…

Read More