Author: अनंत पांगारकर

गुरुवार, २५ जुलै  नागरिकांना मूलभूत गरजांची पूर्तता करून देणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य काम आहे. मात्र शहरालगत असलेल्या घुलेवाडीतील कानिफनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नवश्याचा मळा येथील ग्रामस्थांना वेगळाच अनुभव येत असून मूलभूत गरजांसाठी त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. या भागातील नागरिक केल्या वीस वर्षापासून सातत्याने ग्रामपंचायतीकडे रस्ता पाणी आणि वीज या संदर्भात पाठपुरावा करत आहे. ग्रामपंचायत या नागरिकांकडून आवश्यक कर घेत असली तरी त्यांना सुविधा देण्यास मात्र असमर्थ ठरली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता ग्रामपंचायत प्रशासनाला शेवटचा इशारा देत एक महिन्याची मुदत दिली आहे. या मुदतीत जर ग्रामपंचायतीने काम हाती घेतले नाही तर संघर्ष सेवा समितीच्या माध्यमातून आंदोलन उभे…

Read More

गुरुवार, २५ जुलै  नुकत्याच निवडून आलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांवरील नवनिर्वाचित सदस्यांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे रविवारी (२८ जुलै) शपथ देणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव यांचा समावेश आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले होते. निवडून आलेल्या या सर्व सदस्यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शपथ दिली जाणार आहे. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये रविवारी सकाळी ११ वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

Read More

गुरुवार, २५ जुलै विवाहित महिलेचा विनयभंग करणे चांगलेच अंगलट आले आहे. संगमनेरच्या न्यायालयाने याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवत दोन वर्ष सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनिल संभाजी साबळे (रा. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात पीडित महिलेच्या तक्रारीवरून २००९ मध्ये आरोपी अनिल साबळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव यांनी तपास करत संगमनेर न्यायालयात आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. फौजदारी कनिष्ठ स्तर न्यायाधीश प्राची पालवे यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज सुरू होते. या खटल्यात सरकारी वकील राहुल शेळके यांनी पाच साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर…

Read More

हप्तेखोर एलसीबी दरमहा करतेय २७ कोटी ६० लाखाची हप्ते वसुली! दोन टक्के हप्तेखोरांमुळे जिल्हा पोलीस दलाची नाचक्की, जिल्हा पोलीस प्रमुख गप्प का?  गुरुवार, २५ जुलै  जिल्हा पोलीस प्रशासनाविरोधात विशेषत: अहमदनगर एलसीबीच्या हप्तेखोरी विरोधात उपोषणास बसलेल्या खासदार निलेश लंके यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नगरचे पोलीस वसूल करत असलेल्या हप्त्याचे रेटकार्डच जाहीर केले. नगर एलसीबीकडून तब्बल २७ कोटी ६० लाख रुपयांचे हप्ते दरमहा गोळा केले जात असल्याची धक्कादायक माहिती खासदार लंके यांनी दिली. खासदार लंके यांनी दिलेली माहिती कोणत्याही सामान्य नागरिकाचे डोळे पांढरे होतील अशी धक्कादायक आहे. कोणत्या व्यवसायातून किती रुपयांच्या हप्ते नगरच्या वादग्रस्त एलसीबीकडून गोळा केले जातात याची सविस्तर…

Read More

गुरुवार, २५ जुलै  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू झाल्यापासून संगमनेर तालुक्यात फक्त ५०% महिलांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात गुरुवार व शुक्रवारी (२४ व २५ जुलै) सकाळी ९ ते ४ या वेळेत प्रत्येक गावामध्ये विशेष मोहीमेअंतर्गत राहिलेल्या सर्व पात्र महिलांची नोंदणी करून घेतली जाणार आहे, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी दिली. महिला सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्ष असलेल्या महिला भगिनींसाठी दरमहा दीड हजार रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेतला आहे. या…

Read More

बुधवार, २४ जुलै एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करत अहमदनगरचे खासदार निलेश लंके उपोषणाला बसले आहे. दरम्यान पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याचा अधिकार मला नसून मी फक्त अहवाल पाठवू शकतो. कारवाईचा अधिकार वरिष्ठांना असल्याचे अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेल्या एलसीबीच्या पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून खासदार निलेश लंके यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणादरम्यान खासदार लंके यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. खासदार लंके यांच्या उपोषणा संदर्भात बोलताना पोलीस अधीक्षक ओला म्हणाले, पोलीस निरीक्षकांविरुद्ध ज्या काही तक्रारी आहेत त्या मला लेखी स्वरूपात द्याव्यात. आंदोलकांचा जर अधिकाऱ्यांवर…

Read More

बुधवार, २४ जुलै  आधीच जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेल्या आणि त्या विरोधात खासदार निलेश लंके यांनी उपोषण सुरू केलेल्या नगर एलसीबीच्या तत्कालीन पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध लाच लुचपत विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक संदीप चव्हाण असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून त्याची तत्कालीन नेमणूक अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत करण्यात आली होती. चव्हाण सध्या नगरच्या दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत आहे. लाच लुचपतच्या नासिक पथकाने ही कारवाई केली असून लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे. लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या हॉटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंगमध्ये झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यामध्ये फिर्यादीच्या भावाला अटक न करण्यासाठी व…

Read More

बुधवार, २४ जुलै चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीने लोणीच्या पीएमटी रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर अल्पवयीन मातेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात बलात्कार, पोक्सोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागात राहणाऱ्या अल्पवयीन मातेने या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे (वय ३६, रा. तळेगाव दिघे, संगमनेर) याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३७६(२)(N), ३७६(३) सह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी…

Read More

बुधवार, २४ जुलै  राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती राज्याचे पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. या योजनेमुळे मेंढीपालन व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल आणि धनगर व तत्सम समाजाला आर्थिक बळकटी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०१७ साली सुरू झालेल्या या योजनेची फलश्रुती लक्षात घेता तिची व्याप्ती वाढवून अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा आणि भटक्या प्रवर्गातील समाजात आर्थिक सुबत्ता वाढावी, या उद्देशाने पशुसंवर्धन मंत्री विखे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावास काही बदलासह मंजुरी…

Read More

बुधवार, २४ जुलै डाक चौपाल हा टपाल विभागाचा अभिनव उपक्रमा असून संगमनेर नगरपरिषद पोस्ट विभागाच्या जनकल्याणकारी योजना शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मदत करेल. डाक विभागाची नाळ सामान्य माणसांपर्यंत जोडलेली असल्याने पोस्टाच्या फायदेशीर योजनांचा सर्वांनी लाभ घ्यायला हवा, असे आवाहन संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले. संगमनेर मुख्य डाकघर आणि संगमनेर नगरपालिका यांच्या विद्यमाने संगमनेरमध्ये प्रथमच डाक चौपाल या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरपालिकेच्या रामकृष्ण सभागृहात या डाक चौपाल या उपक्रमाचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, उपमुख्याधिकारी संजय पेखळे, कार्यालयीन निरीक्षक राजेश गुंजाळ, श्रीरामपूर डाक विभागाचे अधीक्षक हेमंत खडकीकर, सहायक अधीक्षक मुख्यालय संतोष…

Read More