Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांची पदोन्नतीने बदली झाली असून ते आता अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी असतील. राज्यभरात तीसहून अधिक महसूलच्या अधिकाऱ्यांना शासनाने बढत्या दिल्या असल्याची माहिती समोर येत असून त्यात हिंगे यांचा समावेश आहे. हिंगे यांच्या रिक्त जागेवर अद्याप नवीन नियुक्ती करण्यात आली नसली तरी शासनाकडून बदल्यांचे आदेश अद्यापही सुरू असल्याने लवकरच संगमनेरच्या रिक्त जागेवर प्रांत अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असे संकेत मिळाले आहे. संगमनेरला येण्यापूर्वी हिंगे वाशीम येथे कार्यरत होते. लोकसभा, विधानसभा निवडणूक हिंगे यांच्या कार्यकाळात शांततेत पार पडली होती. सध्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी देखील ते निवडणूक निर्णय अधिकारी…
संगमनेर – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची राजकीय खेळी यशस्वी ठरली आहे. सोमवारी ६८ उमेदवारांनी माघार घेतल्याने २१ जागांपैकी २० जागा बिनविरोध झाल्या आहेत. धांदरफळ गटातील एका जागेचा निर्णय बाकी असून, तोही लवकरच होऊन कारखाना निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होण्याची शक्यता आहे. बुधवारी (दि. ९) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी (दि. १५) छाननीत २० अर्ज बाद झाले, तर चार उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे २१ जागांसाठी १०९ उमेदवार रिंगणात होते. मात्र, बाळासाहेब थोरात यांच्या आवाहनाला मान देत अनेक उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने २० जागा बिनविरोध झाल्या.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. या प्रकरणी डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत, तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच, धर्मादाय रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून अनामत रक्कम घेण्यास मनाई करणारी कायदेशीर तरतूद करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिसे प्रकरणानंतर धर्मादाय रुग्णालयांसाठीच्या नियमावलीत मोठे बदल प्रस्तावित करण्यात आले असून, याबाबतचे आदेश लवकरच जारी केले जातील. नवीन नियमांनुसार, धर्मादाय म्हणून नोंदणीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमधील रुग्णसेवा पूर्णपणे ऑनलाईन करावी लागेल. त्याचे…
अहिल्यानगर, दि. २१ – राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात अहिल्यानगर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल तीन पुरस्कार पटकावले आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले आणि राहाता येथील मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. याप्रसंगी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील अवैध गौण खनिज वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राज्य स्तरावर दखल घेण्यात आली. या उत्कृष्ट…
अहिल्यानगर पोलिस कारवाईतून सुटका व्हावी आणि अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी चक्क दोन लाख रुपये उकळणाऱ्या एका शिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. विजय बाबासाहेब गर्जे (वय ४८, रा. पाथर्डी) असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ४ एप्रिल रोजी पाथर्डी पोलिसांनी एका तक्रारदाराच्या टपरी व्यवसायासाठी लागणारी सुगंधी तंबाखू, सुपारी आणि मावा त्याच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमधून जप्त केला होता. ही कारवाई सुरू असतानाच तक्रारदाराला एका ओळखीच्या व्यक्तीने विजय गर्जे या शिक्षकाला भेटण्याचा सल्ला दिला. या भेटीत गर्जेने तक्रारदाराला सांगितले की, त्याच्या भावावर मोठ्या कलमांनुसार गुन्हा दाखल होऊ नये आणि तपासात मदत मिळावी यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षकांना…
संगमनेरात तरुणावर प्राणघातक हल्ला; डोक्यात दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न, परिसरात दहशतीचे वातावरण
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात शनिवारी (दि. १९) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका तरुणावर चार जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला चढवला. नीलेश सोमनाथ मंडलिक (वय ३६, रा. ढोलेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोरांनी त्यांना बेदम मारहाण करत डोक्यात दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अनिकेत मंडलिक (रा. माळीवाडा, संगमनेर), साई सूर्यवंशी, अक्षय चव्हाण (दोघेही रा. अकोले नाका) आणि एका अनोळखी व्यक्ती अशा चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन भाऊसाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पनवेल संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणात आज पनवेल सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेले इतर दोन आरोपी, कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर, यांना प्रत्येकी सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. मिरा रोड परिसरात २०१६ साली सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिंद्रे यांच्यामध्ये वैयक्तिक वाद होते, असा आरोप होता. हत्येनंतर आरोपींनी अश्विनी बिंद्रे यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर येथील डॉ. सौरभ श्रीकृष्ण गिते यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या MD (आयुर्वेद) या पदव्युत्तर परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. डॉ. सौरभ हे विधिज्ञ श्रीकृष्ण चांगदेव गिते आणि माणिक श्रीकृष्ण गिते यांचे सुपुत्र आहेत. तसेच, ते डॉ. सुशांत गिते यांचे बंधू आहेत. त्यांनी आपले बीएएमएस (BAMS) आणि एमडी (MD) पर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथील यशवंत आयुर्वेद महाविद्यालयातून पूर्ण केले. यापूर्वी, त्यांनी संगमनेरच्या दिगंबर गणेश सराफ विद्यालयात शालेय शिक्षण आणि सह्याद्री ज्युनियर कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. डॉ. सौरभ यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संगमनेर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, माजी आमदार वैभव पिचड, तहसीलदार धीरज मांजरे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, कैलास ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र मोठे असल्याने शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी मध्यप्रदेशातील मोहनपुरा आणि कुंडलिया जलाशयांप्रमाणे स्काडा प्रणालीचा वापर करून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर शहरातील मदिनानगर येथे गोवंश जनावरांची कत्तल केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुलाम साबेर कुरेशी याच्यासह एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीच्या शेडमधून सुमारे ९०० किलो रिट्स कार मधून ६०० किलो गोमांस आणि कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेली चार जनावरे जप्त केली आहेत. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना मदिनानगरमध्ये गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक राहुल डोके यांना कारवाईचे आदेश दिले. पोलीस अधीक्षकांच्या पथकातील राहुल सारबंदे आणि राहुल डोके यांनी रविवारी रात्रपाळीच्या गस्तीवर असलेल्या संगमनेर…
