Author: Annant Ppangarkar
विशेष प्रतिनिधी | मुंबई पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभाग घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या मुकेश अंबानींच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यासाठी आल्या होत्या. त्यांनी आघाडीचे नेते उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीनंतर देशातील वातावरण बदलले असून विरोधी पक्षातील सदस्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. इंडिया आघाडीबरोबर असलेल्या आणि भारतीय जनता पक्षाला सातत्यानं टक्कर देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्तान मुंबईत आल्या आहेत. विवाह सोहळ्याचं निमित्त असलं तरी या दौऱ्यात राजकीय…
विशेष प्रतिनिधी | मुंबई राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं शुक्रवारी सूप वाजलं. येत्या तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असल्याने विरोधकांनी यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. काल शेवटच्या दिवशी विधान परिषदेत २६० अनव्ये प्रस्ताव आणि अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्रातील गुन्हेगारीवरून सरकारवर परखड टीका केली. अंबादास दानवे म्हणाले, देशात एकूण ३५ लाख ६१ हजार ३७९ गुन्हे दाखल झाले असून त्यातील ३ लाख ७४ हजार ३८ गुन्हे एकट्या महाराष्ट्रात नोंदविले गेले आहेत. हा दर १०.२ टक्के इतका असून महाराष्ट्र देशात गुन्हेगारीत क्रमांक दोनवर आहे. देशात स्त्री अत्याचाराचे ४ लाख ४५ हजार…
मुंबई | प्रवीण पुरो विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीत १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानने चुरस वाढली होती. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी जय्यत तयारी केली होती. अंतिम निकालात महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले असून महाविकास आघाडीत कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला आहे. विजयी उमेदवारात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, प्रज्ञा सातव, राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे , भावना गवळी, कृपाल तुमाने आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. तर अकराव्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात चुरस झाली. यात शेवटच्या फेरीत जयंत पाटील पराभूत झाले. ठाकरे गटाकडून…
शुक्रवार १२ जुलै सुसंस्कृत संगमनेरला अवैध धंद्यांचा लागलेला कलंक पुसण्यात स्थानिक पोलिसांपासून जिल्हा पोलीस दलापर्यंतची पोलीस यंत्रणा अयशस्वी ठरली आहे. शहरातील शांततामय वातावरणाला गालबोट लागू शकेल अशी गंभीर घटना घडण्याची पोलीस वाट बघत आहे की त्यांना अवैध धंदे सुरू असलेल्या शक्तिमान टॉवरचा पत्ता सापडत नाही, असा संशय निर्माण झाला आहे. चार दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने संगमनेर शहराच्या मध्यवस्तीतील महापुरुषांच्या स्मारकाजवळ सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर प्रकाश टाकत हॉटस्पॉट बनलेल्या या ठिकाणी गंभीर घटना घडण्याची चिन्हे असल्याचा संशय वर्तविला होता. त्यानंतर पोलिसांकडून या अवैध व्यवसायांवर कारवाई होईल, अशी अपेक्षा फोल ठरल्याने पोलिस आणि अवैध व्यावसायिकांमधील मधुर अर्थपूर्ण संबंधांच्या चर्चांना अप्रत्यक्षरीत्या दुजोरा मिळू…
शुक्रवार १२ जुलै केंद्र सरकारने २५ जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. त्यात केंद्राने म्हटले आहे की, २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्यामुळे आता भारत सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस १९७५ च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले आहे. https://x.com/AmitShah/status/1811710314901307552?s=19 आपल्या ट्विटमध्ये शहा यांनी म्हटले आहे की, ‘२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत…
शुक्रवार १२ जुलै अहमदनगर जिल्हा परिषदेने तिघा बांधकाम ठेकेदारांचा परवाना एक वर्षासाठी निलंबित केला असून त्यांची सुरक्षा ठेवदेखील जप्त करण्यात आली तर बारा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. विकास कामे प्रलंबित ठेवल्याच्या कारणावरून ही कारवाई केली असल्याचे सांगितले जाते. बांधकाम ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे संगणमत असल्याने विविध योजनांच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असतो. मात्र प्रथमत:च जिल्हा परिषद ॲक्शन मोडवर आली असून कारवाई सत्र सुरू केले आहे. २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात विकास कामे प्रलंबित ठेवणाऱ्या ठेकेदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकामच्या उत्तर विभागामार्फत संगमनेर व नेवासा तालुक्यातील बारा प्रलंबित कामांसाठी तीन ठेकेदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या…
गुरुवार ११ जुलै गुजराती भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून परदेशात स्थायिक होत आहेत. पासपोर्ट जमा करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतीय तरुणांच्या या पावलामागे अनेक आश्चर्यकारक कारणे समोर आली आहेत. भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या एका वर्षात दुप्पट झाली आहे… भारतीय पासपोर्ट सोडण्याचा गुजरातींचा कल वाढत आहे. २०२१ पासून आतापर्यंत ११८७ गुजरातींनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला आहे आणि ते इतर देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. कॅनडा गुजरातींची पहिली पसंती ठरत आहे. अशी अनेक प्रकरणे आहेत जी कॅनडाकडे गुजरातींचा कल दर्शवतात. कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेलेले अनेक गुजराती कॅनडामध्ये स्थायिक झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरातचे तरुण कॅनडामध्ये शिक्षणासाठी जात आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आपलं करिअर घडवण्यात…
गुरुवार ११ जुलै काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील सहा रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी १७ कोटी ५८ लाख ९१ हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावच्या विकासासाठी सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. तालुका विस्ताराने मोठा असूनही प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर विविध शासकीय योजनाच्या माध्यमातून रस्ते, आरोग्य, पाणी यांसह नागरिकांना मूलभूत सुख सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. यामुळे संगमनेर तालुका हा विकासातून वैभवाकडे वाटचाल करत आहे. या रस्त्यांचा…
गुरुवार ११ जुलै पश्चिमी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे नगर जिल्ह्यात वळवून या माध्यमातून जिरायती भागातील पाण्याची गरज भागवली जाऊ शकते. प्रवरा खोऱ्यात आणखी साडेनऊ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, यासाठी शिर्डी लोकसभेचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नाशिक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांची भेट घेतली हा प्रश्न त्यांच्या समोर मांडला. बुधवारी वाकचौरे यांनी मिसाळ यांची भेट घेत या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करत अधिक माहिती घेतली. यावेळी रोहित वाकचौरे उपस्थित होते. पश्चिम भागाकडे जाणारे पाणी पूर्व भागात आणल्यास पिण्याचे पाणी, सिंचन व उद्योगाचे विषय मार्गी लागणार आहेत. यावेळी त्यांनी नद्यांचे रेखांकन, धरणातील गाळ, सिंचन…
गुरुवार ११ जुलै | संगमनेर ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी ज्येष्ठ नेते, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियाना अंतर्गत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने तालुक्यातील चंदनापुरी घाटामध्ये पाच हजार वृक्षांचे रोपन करण्यात आले आहे. याशिवाय गावागावात, तालुक्यातील तीन घाटांमध्ये व ११ विविध डोंगरांवर सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संगोपन केले जात असल्याची माहिती अभियानाच्या प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली. कारखान्याच्या वृक्षारोपणावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, रमेश गुंजाळ, प्रा. बाबा खरात, शांताराम कढणे, विजय राहणे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, सामाजिक…
गुरुवार, ११ जुलै, अहमदनगर राज्यात कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था आणि गटांना विविध पुरस्कार राज्य शासनाकडून देण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्कारासाठी शासनाने शेतकऱ्यांसह संस्था आणि गटाकडून प्रस्ताव मागविले आहे. यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती कृषीभूषण पुरस्कार, उद्यान पंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारांचा समावेश आहे. २०२३ या वर्षासाठी हे अर्ज (प्रस्ताव) मागविण्यात आले असून शेतकरी, गट आणि संस्थेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत २५ जुलै पर्यंत आहे. यासाठी संबंधितांनी आपल्या…
गुरुवार,११ जुलै गांजा तस्करी प्रकरणात शिवसेनेच्या (शिंदे गट) माजी उपजिल्हाप्रमुख राहिलेल्या महिला पदाधिकाऱ्यास तेलंगणा पोलिसांनी नाशिकच्या पंचवटी परिसरातून अटक केली आहे. नाशिक पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी बुधवारी ही कारवाई केली. या कारवाईमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. लक्ष्मी ताठे असे या माजी महिला पदाधिकाऱ्याचे नाव आहे. तेलंगणाच्या दामेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गेल्या महिन्यात ०८ जूनला १९० किलो गांजा पकडला होता, याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातच बीड आणि अहमदनगरच्या दोघा तस्करांना अटक करण्यात आली होती. दरम्यान जून २०२३ मध्ये शिंदे गटाच्या महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाले होते. पक्षातील काही पदांवरील नियुक्तीवरून लक्ष्मी ताठे आणि शोभा…
गुरुवार, ११ जुलै संगमनेरच्या दर्शन रोटरी नेत्र रुग्णालयात जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक अल्कॉन कंपनीची अमेरिकन तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी मशिनरी बसविण्यात आली असून या मशीनवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया व्हावी यासाठी बाहेरगावी जावे लागत असे. आता मात्र या शस्त्रक्रियेसाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही. प्रसिद्ध उद्योजक व मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी यांच्या हस्ते या मशिनरीचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. यावेळी दर्शन रोटरीशी संबंधित मान्यवर उपस्थित होते. संगमनेर-अकोले तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील रुग्णांसाठी दर्शन रुग्णालयाने आतापर्यंत अतिशय उच्च दर्जाची सेवा दिली आहे. रुग्णालयामार्फत आतापर्यंत सुमारे २७ हजार मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून याचा लाभ समाजातील गोरगरीब वर्ग, तसेच दुर्गम भागातील रुग्णांनी…
बुधवार, १० जुलै | संगमनेर दीड वर्षाच्या चिमुकलीला शेताच्या बांधावर ठेवत चारा कापणीचे काम करणाऱ्या मातेच्या डोळ्यादेखत बिबट्याने चिमुकलीवर हल्ला चढवत तिला ठार करण्याची घटना संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा गावात बुधवारी संध्याकाळी घडली. ओवी सचिन गडाख (रा. हिवरगाव पावसा, संगमनेर) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. बिबट्याने चिमुकलीची मान आपल्या जबड्यात पकडत जवळच्या गिन्नी गवतात धाव घेतली. चिमुकलीचा प्रतिकार अयशस्वी ठरला. जखमी अवस्थेत चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पंचक्रोशीत दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी करत वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष…
बुधवार, १० जुलै फसवणुकीतील रक्कम मिळवून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागत तडजोडीअंती ३५ हजार रुपये स्वीकारताना टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक बागुल (वय ५६ वर्ष) लाच लुचपतच्या जाळ्यात अडकले आहे. लाच लुचपतच्या पथकाने सोमवारी ही कारवाई केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या परिचित महिलेने क्रेडिट सोसायटीत पैसे दुप्पट करून देण्याचे सांगून तक्रारदाराकडून सुमारे २७ लाख ५० हजार रुपये घेतले होते. त्यापैकी १७ लाख ५० हजार रुपये तक्रारदाराला परत करण्यात आले होते. उर्वरित दहा लाख रुपयांची रक्कम देण्यास संबंधित महिलेने टाळाटाळ केली. तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीने सदर महिलेच्या क्रेडिट सोसायटीत जाऊन पैशाचे विचारणा केले तेव्हा महिलेने तक्रारदाराविरोधातच टिळक…
बुधवार, १० जुलै न्यायालयीन कोठडीत असताना सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांनी जातीवाचक टिपण्णी करत दहा कोटी रुपये खंडणीची मागणी केल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. कदम यांच्या तक्रारीवरून कुलाबा पोलीस ठाण्यात चव्हाण यांच्याविरुद्ध मंगळवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कुलाबा पोलीस पुढील तपास करत आहे. माजी आमदार रमेश नागनाथ कदम यांच्या तक्रारी नुसार २०१४ ते २०१९ यादरम्यान दहिसर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह लाच लुचपत प्रतिबंध कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात कदम यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना पोलीस बंदोबस्तात न्यायालयीन सुनावणीसाठी कदम यांना सत्र न्यायालयात आणण्यात येत असताना २१ जानेवारी २०१६ रोजी…
अनंत पांगारकर बुधवार, १० जुलै | संगमनेर महावितरण कंपनीकडून सध्या वीज ग्राहकांची विज बिल आकारणीमध्ये मोठ्या प्रमाणात लूटमार सुरू आहे. अशातच संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या महावितरणच्या अंतर्गत चाळीस गावांचा कारभार रामभरोसे सुरू आहे. महावितरणच्या आशीर्वादाने कर्जुलेपठार अंतर्गत येणाऱ्या वीज उपकेंद्रात मोडणारी गावे दोन दिवसांपासून अंधारात आहे. या संदर्भात या भागातील नागरिक आणि संगमनेरमधील पत्रकार बाबासाहेब कडू यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास वस्तुस्थिती आणून दिल्यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम या भागातील कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांनी दाखवत आपल्या बेजबाबदारीचे दर्शन घडविले आहे. वीज उपकेंद्र अंतर्गत मोडणारी गावे अंधारात असताना थोरात यांनी आपले दोन्ही मोबाईल स्विच ऑफ ठेवत जबाबदारी…
विशेष प्रतिनिधी | मुंबई गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेले विधान परिषदेचे सभापती तात्काळ भरण्यासाठी निवडणूक घेण्याच्या मागणी करिता राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची मंगळवारी भेट घेतली. विधान परिषदेतील उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या विरोधातील वाढत्या तक्रारीची दाखल घेत विधान परिषदेसाठी सभापतींची निवड घेण्यात यावी, या मागणीसाठी ही भेट घेण्यात आली, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांना दिली. राज्यपालांची भेट घेताना दानवे यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे, भाई जगताप, शशिकांत शिंदे, सतेज (बंटी) पाटील, रमेश कोरगांवर, जयंत पाटील हे उपस्थित होते. राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीनंतर मविआच्या नेत्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विधान…
मंगळवार, ०९ जुलै | मुंबई पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याची आवश्यक परवानगी नसताना राज्यात अनधिकृत लॅब सुरू असल्याचे सभागृहात समोर आल्याने या अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासन लवकरच कडक कायदा आणेल. यामध्ये विना नोंदणी लॅब सुरू असतील, तर त्यांना शिक्षेची तरतूद या कायद्यात असेल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. आमदार सुनील राणे यांनी या संदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. यावर मंत्री सामंत यांनी उत्तर घेताना ही माहिती दिली. सामंत म्हणाले, जिल्हास्तरावर बोगस डॉक्टर शोध मोहिमेप्रमाणेच बोगस लॅब शोध मोहीम हाती घेण्यात येईल. राज्यभरात भरारी पथक नेमून अशा बोगस लॅब शोधण्याची कार्यवाही केली जाईल. राज्यात…
विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील विरोधकांच्या कुरबुरी सतत वाढत आहेत. परिणामी उपसभापतींना विचारलेल्या जाबानंतर त्यांनी चक्क माघार घेत स्वतःच केलेली शेरेबाजी तपासून ती कामकाजातून काढून घेण्याचा शब्द विरोधकांना द्यावा लागण्याचे घटना सोमवारी सभागृहात घडली. उपसभापती गोऱ्हे या सभागृहात विरोधकांना बोलू देत नाहीत, असा आरोप अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधी नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. आठवड्याभरापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन झाले होते, तेव्हा त्यांनीही असाच आरोप केला होता. सत्ताधाऱ्यांना बोलू दिले जाते, मात्र विरोधकांना बोलण्याची संधी मिळत नाही, असं दानवे यांनी सभागृहात म्हटले होते. अशातच सोमवारी विधानपरिषदेचे ठाकरे…
