Author: Annant Ppangarkar

शनिवार दि. २७ एप्रिल सध्या देशात आणि राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील, नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, अशा ‘त्रास देणाऱ्यांची दुरुस्ती पुढील काळात होणार आहे’ असा सज्जड इशारा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. अकोले (अहमदनगर) येथे शुक्रवारी महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, कॉ. डॉ. अजित नवले, अमित भांगरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप वर्पे, संभाजी ब्रिगेडचे संदीप कडलग, काँग्रेस पक्षाचे शिवाजी नेहे, जगदीश चौधरी, राजू पाटील, अशोक…

Read More

शनिवार दि.२७ एप्रिल देशाच्या सीमांवर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दहा वर्षात ज्या हजारो सैनिकांच्या हत्या झाल्या त्या सैनिकांच्या वीर पत्नी आणि वीर माता यांना देशासाठी मंगळसूत्र बलिदान कराव लागलं, त्या मंगळसूत्रांचा हिशेब कोण देणार? असा घनाघाती सवाल करत जो महिलांच्या मंगळसूत्राला हात घाल तो ‘भारतीय जनता पक्षच मंगळसूत्र चोरांची टोळी’ असल्याचा हल्लाबोल शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अकोले (अहमदनगर) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शुक्रवारी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, अमित भांगरे,…

Read More

अहमदनगर, शुक्रवार दि.२६ एप्रिल  शुक्रवारी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननी नंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ३६ उमेदवारांचे अर्ज करण्याची माहिती देण्यात आली आहे. तर प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांच्यासह सहा उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जांची छाननी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत पार पडली. छाननीमध्ये हनुमंत देविदास पावणे (अपक्ष), शरद बाबुराव माघाडे (अपक्ष), ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष), विश्वनाथ श्रीरंग शेळके (अपक्ष), छगन भिकाजी पानसरे (अपक्ष) व प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. तर छाननी नंतर निवडणूक रिंगणात राहिलेले उमेदवार पुढीलप्रमाणे… उमाशंकर श्यांमबाबु यादव (बहुजन…

Read More

शिर्डी, दि.२६ एप्रिल लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी (२६ एप्रिल) दाखल झालेल्या उमेदवारी अर्ज यांची छाननी करण्यात आली. यात ३१ उमेदवारांपैकी २२ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले तर ९ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज बाद ठरविण्यात आले. छाननी नंतर हे २२ उमेदवार निवडणूक रिंगणात… भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे), लोखंडे सदाशिव‌ किसन (शिवसेना), चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष), अभिजीत अशोकराव पोटे (अपक्ष), भारत संभाजी भोसले (समता पार्टी), नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी), बागुल गोरक्ष तान्हाजी (अपक्ष), अॅड. सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष) , अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सतिष भिवा पवार (अपक्ष), संजय पोपट भालेराव (अपक्ष), रामचंद्र…

Read More

शुक्रवार, दि.२६ एप्रिल  लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारणात कुठेही दिसणार नाही, फोन टॅपिंग प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटत होती, असे मोठे विधान करत पहिल्या दोन टप्प्यातील तेरा पैकी दहा जागा महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई दक्षिण मध्य मतदार संघातील उमेदवार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी राऊत बोलत होते. आतापर्यंत राज्यात दोन टप्प्यात मतदान पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात मतदान झाले तर आज आठ मतदारसंघात मतदान होत आहे. या दोन्ही…

Read More

शुक्रवार दि.२६ एप्रिल सध्या ऐरणीवर असलेल्या संगमनेरच्या गोवंश हत्या आणि कत्तलखाने पुन्हा एकदा गाजू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसात तीन ते चार वेळा या ठिकाणी छापे घालून गोवंश मांस व तस्करी करणारे पकडले आहेत. गुरुवारी रात्री पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने एका वाहनातून २८ गोवंश वासरे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्याला जेरबंद केले आहे. उपअधीक्षक वाघचौरे यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की, एका पिकअप गाडीमध्ये कत्तलीकरिता गोवंश जनावरे आणलेली आहेत. ती संगमनेरच्या कत्तलखान्यात दिली जाणार आहेत. ही गाडी संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड या परिसरात आहे. पथकाने सदर ठिकाणी पाहणी केली असता एक पांढऱ्या रंगाची पीकअप दिसून आली. पोलिसांना पिकअप…

Read More

अनंत पांगारकर | शुक्रवार, दि.२६ एप्रिल  शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अडचणीत आणण्यासाठी नवी खेळी खेळली गेली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नावाशी नामसाधर्म्य असलेले उमेदवार मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ही खेळी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडली आहे. ठाकरे गटाकडून या मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली. वाकचौरे यांच्या उमेदवारी विषयी मतदार संघात मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण असताना आता वाकचौरे यांच्या नावाशी मिळताजुळता उमेदवार शेवटच्या क्षणी मैदानात उतरला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्याबरोबर आता…

Read More

शिर्डी, गुरुवार दि.२५ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे प्राथमिक चित्र आज स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल ३१ उमेदवारांनी ४० अर्ज दाखल केले आहे. गुरुवारी १६ उमेदवारांनी २३ उमेदवारी अर्ज दाखल केले. सत्ताधारी महायुती, विरोधी महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख उमेदवारांसह अन्य काही प्रमुख पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे गडद झाली आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच ‘आपला विजय निश्चित या हवेत असलेल्या’ उमेदवारांचा फुगा देखील येत्या एक-दोन दिवसात फुटेल आणि त्यांना जनतेसमोर जावे लागणार आहे.…

Read More

अहमदनगर दि. २६ एप्रिल  अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी २७ उमेदवारांनी ३२ नामनिर्देशन पत्र दाखल केले असून आतापर्यंत या मतदारसंघात ४३ उमेदवारांनी ५५ नाम निर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती देण्यात आली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी गोरख दशरथ आळेकर (अपक्ष), डॉ. यो‍गिता प्रविण चोळके (अपक्ष), उमाशंकर श्यानमबाबु यादव (बहुजन समाजपार्टी), सुर्यभान दत्तात्रय लांबे (अपक्ष), जहीर युसुफ जकाते (अपक्ष), प्रा. सुनिलराव मोहनराव पाखरे (अपक्ष व भारतीय जनता पार्टी), शिवाजीराव वामन डमाळे (सैनिक समाज पार्टी), कलीराम बहिरु पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष), शितोळे सुदर्शन लक्ष्मण (अपक्ष व हिंदू एकता आंदोलन पार्टी), शेकटकर अनिल गणपत (अपक्ष), मुक्ता…

Read More

गुरुवार, दि.२५ एप्रिल  गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसने आमदार वर्षा गायकवाड यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यांच्या विरोधातील महायुतीचा विशेषतः भाजपाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला मुंबईतून अपेक्षित जागा मिळू न शकल्याने गायकवाड नाराज होत्या. मात्र आता ऐनवेळी काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर करत त्यांची नाराजी देखील दूर केल्याचे बोलले जाते. वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष असून शालेय शिक्षण मंत्री देखील राहिल्या आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात चर्चेतील लढत होणार आहे. आता महायुतीकडून त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी दिली जाते याकडे लक्ष लागले आहे.

Read More

अहमदनगर, बुधवार दि.२४ एप्रिल अहमदनगर लोकसभा मतदारसंघात बुधवारी सात उमेदवारांनी ११ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार प्राजक्त तनपुरे यांचा देखील समावेश आहे. याशिवाय अकरा इच्छुकांनी अठरा नामनिर्देशन पत्र नेल्याची माहिती देण्यात आली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये मदन कानिफनाथ सोनवणे (राईट टु रिकॉल पार्टी), रवींद्र लिलाचंद कोठारी (अपक्ष), अमोल विलास पाचुंदकर (अपक्ष), प्राजक्‍त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्‍ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), महेंद्र दादासाहेब शिंदे (वंचित बहुजन आघाडी व अपक्ष), मच्छिंद्र राधाकिसन गावडे (अपक्ष) व छगन भिकाजी पानसरे (अपक्ष) यांचा समावेश आहे. निवडणुकीतील दोन प्रमुख उमेदवार महायुतीचे डॉ. सुजय विखे व महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनी…

Read More

शिर्डी, बुधवार दि.२४ एप्रिल  शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस उरला आहे. तत्पूर्वी या मतदारसंघातून महाविकास आघाडी, महायुतीच्या उमेदवारांपाठोपाठ बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघातील तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. रूपवते यांच्यासह बुधवारी या मतदारसंघात नऊ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तर अन्य सात जणांनी आणखी चौदा नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने या मतदारसंघात नेमके किती अर्ज दाखल होत आहे स्पष्ट होईल. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित…

Read More

मंगळवार, दि.२२ एप्रिल गेल्या आठवड्यात अहमदनगर एलसीबीच्या पथकाने संगमनेरात कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात गोमांसासह सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्या पाठोपाठ सोमवारी रात्री अकरा वाजता संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने पुन्हा येथील बेकायदेशीर कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी जिवंत गोवंश जनावरांच्या केलेल्या कत्तलीचे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे अडीच हजार किलो गोमांस बाजारात विक्रीला जाण्यापूर्वीच पकडले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सलीम जान मोहम्मद कुरेशी (वय १९ वर्ष, सुभाष नगर, कोपरगाव हल्ली रा. मदिना नगर, संगमनेर) व कैश अशपाक कुरेशी (वय २२ वर्ष, रा. मदिना नगर, संगमनेर) दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना संगमनेरच्या न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली.…

Read More

मंगळवार, दि.२२ एप्रिल मंगळवारी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यासह पाच उमेदवारांनी सहा उमेदवारी अर्ज दाखल केले. तर १३ इच्छुकांना १५ नामनिर्देशन पत्रांचे वाटप केल्याची माहिती देण्यात आली. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. सोमवारपासून या मतदारसंघात उमेदवारांनी आपल्या अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांनी दोन, भाऊसाहेब बापूराव वाबळे (भारतीय जवान किसान पार्टी) यांनी एक नामनिर्देशनपत्र, नवशाद मुन्सीलाल शेख (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, दत्तात्रय आप्पा वाघमोडे ( राष्ट्रीय जनक्रांती पार्टी) एक नामनिर्देशनपत्र व गिरीश तुकाराम जाधव (अपक्ष) यांचा समावेश आहे.…

Read More

मंगळवार, दि.२३ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवार पर्यंत चार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर मंगळवारी त्यात आणखी दोघांची भर पडली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संख्या सहावर गेली. तर आणखी ११ जणांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नामनिर्देशन पत्र नेले असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी, महायुतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे या दोन प्रमुख उमेदवारांशिवाय चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष) व अभिजित अशोकराव पोटे (अपक्ष) यांनी देखील अर्ज दाखल केले होते. तर मंगळवारी भारत संभाजी भोसले (समता पार्टी) व नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी) या २ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा…

Read More

शिर्डी, मंगळवार दि.२३ एप्रिल  शिर्डी लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रक, प्रिंटर्सनी प्रचार साहित्य तसेच इतर छपाई बाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करावे. प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक असल्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले आहे. काय सांगतो कायदा… लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या ‘कलम १२७ अ’ द्वारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याकडे सर्व राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि मुद्रणालयांच्या चालक व मालकांचे लक्ष वेधण्यात येत आहे. हाताने नक्कल काढण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रक्रियेने छापण्यात किंवा अनेक…

Read More

मंगळवार, दि.२३ एप्रिल नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी संगमनेर मधील कर्जदार आरोपी उद्योजक अमित पंडित यांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर पंडित याची पत्नी सपना, मुलगा सात्विक आणि भागीदार सत्येन्द्र कुमार रावत यांना मात्र तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. नगर अर्बन २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील बडा ३३ कोटी रुपयांचा कर्जदार म्हणून आरोपी पंडित याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. पंडित गेल्या काही दिवसांपासून अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहे. तर पंडितची पत्नी सपना, मुलगा सात्विक आणि भागीदार रावत आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर होते. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अद्यापपर्यंत अटक केली नव्हती. दरम्यानच्या कालावधीत या…

Read More

सोमवार, दि.२२ एप्रिल अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात महायुतीचे सुजय विखे यांच्यासह चार उमेदवारांनी सोमवारी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केले. सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. विखे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले असून विखे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने डॉ. कैलाश निवृत्ती जाधव, समता पार्टीच्या वतीने भागवत धोंडीबा गायकवाड यांनी तर ॲड. महंमद जमीर शेख यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय सोमवारी पाच इच्छुकांनी बारा नामनिर्देशन पत्र नेले आहेत. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. शुक्रवारी…

Read More

सोमवार, दि.२२ एप्रिल राखीव शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवारी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासह दोघा अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यापूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सदाशिव लोखंडे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यांच्या समवेत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार वैभव पिचड आदींचा समावेश होता. लोखंडे यांनी शिवसेनेकडून तीन तर चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष) व अभिजित अशोकराव पोटे (अपक्ष) यांनी प्रत्येकी एकेक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामुळे आतापर्यंत या मतदारसंघात चार उमेदवारी अर्ज दाखल झाले असून वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यासह आणखी काही अर्ज शेवटच्या…

Read More

सोमवार, दि.२२ एप्रिल  उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत अखेर बिघाडी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू होता. त्यातच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत त्यांना पाठिंबा दर्शविला होता. महाविकास आघाडीतील जागा वाटपापूर्वीच सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. यामुळे काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण होते. शेवटच्या क्षणापर्यंत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला यावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र यात काँग्रेस नेत्यांना अपयश आले. विशाल पाटील यांनी या…

Read More