Author: Annant Ppangarkar
शुक्रवार दि. ५ एप्रिल, अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छापा टाकून पकडलेला ७३ लाख २४ हजार ५०० रुपयांपैकी ६९ लाख ४४ हजार ५०० रुपयांच्या रकमेचे योग्य स्पष्टीकरण न मिळाल्याने ही रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली असल्याची माहिती मुख्य लेखा वित्त अधिकारी तथा खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे. आयकर विभागाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे ही रक्कम सोपविण्यात आली तर उर्वरित ३ लाख ८० हजार रुपयांसंदर्भात योग्य स्पष्टीकरण मिळाल्याने हे रक्कम बोल्हेगाव (नगर) येथील संबंधित व्यक्ती विजय कृष्णा भगत यांना सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. यादरम्यान नगरच्या स्थानिक…
शुक्रवार दि. ५ एप्रिल लोकसभा निवडणुक प्रक्रिये दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी चार दिवस अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदार संघात चार दिवस कोरडा दिवस (ड्राय डे) पाळण्याचे आदेश दिले आहे. मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजेच ११ ते १३ मे या कालावधीत व मतमोजणीच्या दिवशी ४ जूनला पूर्ण दिवस कोरडा पाळण्याचा आदेश लागू राहणार आहे. जिल्ह्याच्या सीमेसह लगतच्या इतर जिल्ह्यातील पाच किलोमीटर पर्यंतच्या क्षेत्रासाठी हे आदेश लागू राहतील. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) अन्वये व मुंबई दारूबंदी कायदा, १९४९ चे कलम १४२ च्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश लागू केले आहे.…
शुक्रवार दि. ५ एप्रिल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात ठाकरेंच्या भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत मनसे भाजप युती होऊ शकते ही चर्चा अद्यापही कायम आहे. मात्र अद्यापही त्यासंदर्भात निर्णय होताना दिसत नाही. ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर नेमकं “काय घडलंय आणि काय घडतय” याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच आता राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या व मनसेच्या एक्स (X) हँडलवरून मनसैनिकांना साद घातली आहे. येत्या नऊ तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी दादर मधील शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या…
शुक्रवार दि. ५ एप्रिल आदिवासी कुटुंबातील १ वर्षाच्या चिमुरडीचे झोपेत झोळीतून अपहरण केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी अहमदनगरच्या अकोले पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी सुनील मेंगाळ असे अपहरण झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. आदिवासी समाजातील शेतमजूर असलेले सुनील मेंगाळ हे आपल्या कुटुंबीयांसह बेलापूर (ता. अकोले) येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाजवळ वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण उरकल्यानंतर त्यांच्या पत्नीने चिमुरड्या वैष्णवीस दूध पाजल्यानंतर घरात बांधलेल्या झोळीत तिला झोपविले होते. त्यानंतर मेंगाळ दांपत्यही झोपी गेले. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी उठलेल्या सुनील मेंगाळ यांना झोळीमध्ये वैष्णवी झोपलेली असल्याचे दिसून आले. तर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वैष्णवीला…
गुरुवार दि. ४ एप्रिल लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आले यात आणखी दोन उमेदवारांचा समावेश आहे. बीड मधून पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळण्याचे चिन्ह होती. मात्र जाहीर करण्यात आलेल्या यादीत बीडमधून मेटे यांच्या ऐवजी बजरंग सोनवणे यांना तर भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीडमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या ज्योती मेटे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेटे उमेदवार असतील अशी शक्यता होती. मात्र पवार यांच्या भेटीनंतर लगेचच…
गुरुवार दि. ४ एप्रिल दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील आरोपी असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्या पत्नी मुले आणि सुनांचा जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयापाठोपाठ आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादच्या खंडपीठाने देखील नाकारला आहे. त्यामुळे शकुंतला कुटेसह अन्य आरोपींच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. संगमनेरच्या प्रतिष्ठित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील चेअरमन भाऊसाहेब कुटेसह सतरा आरोपींचा ८१ कोटी रुपयांचा अपहार समोर आला आहे. मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटेने आपल्या घरातील कुटुंबीयांचा नातेवाईकांच्या मदतीने हा आर्थिक घोटाळा केल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे. मुख्य आरोपी असलेला कुटे आपल्या कुटुंबीयांसह गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून त्याच्यासह कुटुंबातील सदस्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व…
गुरूवार दि. ४ एप्रिल भ्रष्टाचारी नेते भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये स्वच्छ होत असतात. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा बंद पडतात. भाजप सरकारच्या कार्यकाळात गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोप करण्यात आलेल्या २५ नेत्यांनी भाजप प्रवेश केला आहे. यातील तिघांना तर पूर्णतः क्लीन चिट मिळाली तर २० जणांच्या चौकशा थांबल्या आहेत. पार्टी विथ डिफरन्स, न खाऊंगा न खाणे दूंगा! या भाजपाच्या भूमिकेचा बुरखा यामुळे फाटला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने भाजप प्रवेशानंतर स्वच्छ झालेल्या नेत्यांसंदर्भातील सविस्तर वृत्त दिले आहे. २०१४ मध्ये केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षातील विविध नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अनेक जण तुरुंगात देखील गेले. यातील महत्त्वाच्या ठरणाऱ्या विरोधी…
मंगळवार दि. २ एप्रिल संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या शिवाजीनगर येथे छापा टाकून अहमदनगर गुन्हे शाखा आणि संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने गांजा आणि गर्द (हेरॉईन) विक्री करणाऱ्या अटक केली आहे. नुकतीच पुणे पोलिसांनी संगमनेरमध्ये येऊन मोठी कारवाई करीत लाखो रुपयांचे बनावट ताडी करण्याचे साहित्य (केमिकल) छापा टाकून पकडले होते. त्यानंतर लगेचच अमली पदार्थांची ही दुसरी कारवाई संगमनेरात झाली आहे. सातत्याने होणाऱ्या या कारवायांमुळे संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे पितळ उघडे पडले असून नगर जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमुख केंद्र संगमनेर झाले असल्याचे दिसून येत आहे. अंबादास शांताराम शिंदे, (रा. शिवाजीनगर, ता. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून…
मंगळवार दि. २ एप्रिल संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दैनंदिन भाजीपाला लिलावासोबत टोमॅटोचे देखील सोमवारपासून (१ एप्रिल) लिलाव सुरू करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली आहे. पहिल्याच दिवशी या लिलावास शेतमाल निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. लिलावामुळे व्यापाऱ्यांमध्ये शेतीमाल खरेदी करण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या मालाला देखील चांगला भाव मिळत आहे. सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारामध्ये टोमॅटोचे लिलाव सुरू आहेत. प्रतवारी करून आपला शेतमाल विक्रीसाठी आणण्याचे आवाहन केल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. शेतकऱ्यांनी माल विक्री केल्यानंतर बाजार समितीकडून तात्काळ पक्की…
सोमवार दि. १ एप्रिल निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून महायुती व महाविकास आघाडीसह अन्य पक्षीयांच्यावतीने उमेदवारांची यादी जाहीर जाहीर केली जात असली तरी देखील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील काही जागांचा तिढा अद्यापही काही केल्या संपताना दिसत नाही. महायुतीच ९ तर मविआच १३ जागांवर अडलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ४८ जागांवर उमेदवार देण्याचे प्रक्रिया सर्वच पक्षांकडून सुरू आहे. यासाठी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित असला तरी काही जागांवर मात्र अद्यापही उमेदवार निश्चित होत नाहीये. त्यासाठी बैठकांचे सत्र सुरूच असून महायुतीचे अजूनही ९ जागांवरचे उमेदवार ठरलेले नाहीत. तर महाविकास आघाडीचे १३ जागांवरचे उमेदवार निश्चित होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सोबत युतीची…
रविवार दि. ३१ मार्च राज्यातील कोणत्याही ठिकाणच्या कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची किमान किंमत राज्य शासनाद्वारे ठरविली जाते, याला रेडी रेकनर दर म्हणतात. उद्या १ एप्रिल २०२४ पासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात या रेडी रेकनरच्या दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्कात कोणताही बदल होणार नाही. सरकारकडून दरवर्षी त्या-त्या भागातील म्हणजेच औद्योगिक, शेती, रहिवासी भागातील संबंधित बाबीच्या संशोधनावरून राज्य शासन हे दर निश्चित करत असते. गेल्या तीन वर्षात या दरात कोणताही बदल करण्यात न आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाकडून या दरात कोणती वाढ करण्यात न आल्याने सर्वसामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत…
रविवार दि. ३१ मार्च नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी उमेदवारी मिळताच मध्यरात्री संगमनेर गाठीत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. दीड तासाच्या या भेटीत लंके यांनी थोरात यांच्याशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून विजयाचा कानमंत्र घेत ते मतदार संघात परतले. राज्यातील महत्त्वाच्या लढतीमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला गेली आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातील आमदार निलेश लंके यांना येथून उमेदवारी दिली. त्यासाठी दोनच दिवसांपूर्वी डंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. निलेश…
रविवार दि. ३१ मार्च विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तनासाठी शिक्षण दिशादर्शक ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शाळा भौतिक व शैक्षणिकदृष्ट्या विकसित व्हायला हव्या, त्याकरिता शाळेला गावाचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान वाटला पाहिजे. धांदरफळच्या देशमुख मळा शाळेने उपक्रमशील शिक्षकांच्या उपक्रमांमधून आणि लोकसहभागातून केलेली प्रगती ही शिक्षण क्षेत्रात राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन संगमनेर डाएटचे अधिव्याख्याता अरुण भांगरे यांनी केले. “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमात द्वितीय क्रमांकाद्वारे दोन लाखाचे बक्षीस पटकावणाऱ्या जिल्हा परिषदेच्या देशमुख मळा येथील शाळेत उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना ३२ डिजिटल पाट्या वितरित केल्या, त्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. डिजिटल पाट्या मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे हरखून…
रविवार दि. ३१ मार्च ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा ससेमिरा मागे लागलेल्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला किंवा एनडीएत सहभागी झाले की त्यांच्या मागच्या सगळ्या चौकशा बंद होतात. हे नेते भाजपच्या ‘वाशिंग मशीन’मधून स्वच्छ होऊन निघतात. महाराष्ट्रासह देशभरात भाजपचे हे ‘वाशिंग मशीन’ जोरात सुरू असल्याचे दिसते. एकेकाळी ज्या नेत्यांवर भाजपने कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आरोप केले आता तेच नेते त्यांच्यासोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसत आहेत. यावरून विरोधी पक्ष सातत्याने भाजपवर हल्ला चढवत आहेत. विरोधकांकडून होणाऱ्या या आरोपांवर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी एका कार्यक्रमात उत्तर दिले. मात्र त्यांच्या उत्तरामुळे पक्षाची गोची झाली आहे. ‘निवडणुकीच्या तोंडावर दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आले. विरोधी पक्षांच्या…
असंख्य अटी घातल्या, ज्यांच्याबरोबर आघाडी करायची त्यांना शहाणपणा शिकवला, त्यांच्यावर टीका-टिपण्ण्या केल्या, दुषणांची बरसात केली आणि अखेर आघाडीला दूर करत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली मूळ भूमिका पुन्हा वठवली. आंबेडकर हे भाजपचे प्यादे आहेत, असा जो आरोप व्हायचा त्याला पुरक अशी भूमिका घेत भाजप विरोधकांची मतं फोडण्याचं पाप आंबेडकर हे करत आहेत. भाजप विरोधात आघाडी करायची म्हणून ज्या आघाडीला आंबेडकरांनी झुलवत ठेवलं. त्याच आघाडीतून बाहेर पडत आंबेडकर यांनी सार्या महाराष्ट्राचं दुषण घेतलं आहे. आघाडीची शक्यता वर्तवायची आणि हव्या तशा अटी टाकायचा हा खेळ आंबेडकरांनाच जमू शकतो, हे पुन्हा एकदा सिध्द झालं. देशात निर्माण झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीपासून महाराष्ट्राला वाचवण्याची…
शनिवार दि. ३० मार्च राज्यातील १८ लोकांना निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. त्यामुळे या १८ जणांना राज्यात कोठेही लोकसभेची निवडणूक लढवता येणार नाही. देशात लोकसभा निवडणुकीचे वारं वाहत असताना आयोगाने निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविलेल्या लोकांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे या लोकांना लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही. अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी… मोहम्मद मेहमूद सय्यद शाह : मुंबई उत्तर- मध्य विधानसभा मतदारसंघ गायकवाड दिनकर धारोजी : जिंतूर विधानसभा मतदारसंघ परभणी अमर शालिकराम पांढरे : आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया उमेशकुमार मुलचंद सरोटे : आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया दीपक चंद्रभान गाडे : अंबरनाथ…
शनिवार दि.३० मार्च शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीने आजी-माजी खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे या आजी-माजी खासदारात लढत निश्चित झाले असतानाच आता वंचितच्या रूपाने तिसरा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य व काँग्रेस नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतल्याने त्यांच्या उमेदवारीच्या चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या आहे. २०२४ च्या निवडणुकीत बौद्ध उमेदवार हवा असा मतप्रवाह गेल्या काही दिवसापासून सुरू होता. त्यादृष्टीने रूपवते यांनी या मतदारसंघात भेटीगाठी घेत मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न देखील केला. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री आमदार…
शनिवार दि. ३० मार्च राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने शनिवारी लोकसभेसाठीची आपली पहिली यादी जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या नगर दक्षिणमधून शुक्रवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेल्या निलेश लंके या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शिलेदाराला शरद पवारांनी संधी दिली आहे. राज्यातील महत्त्वपूर्ण लढतीमध्ये या नगर दक्षिणच्या लढतीचा समावेश आहे. पहिल्याच यादीत लंके यांचे नाव जाहीर झाल्याने नगरचा सामना देखील आता ठरला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभेसाठीची पहिली यादी जाहीर केली. अहमदनगरमधून निलेश लंके, बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, शिरूरमधून खासदार डॉ. अमोल कोल्हे, वर्ध्यातून अमर काळे तर दिंडोरीतून भास्कर भगरे…
शुक्रवार दि. २९ मार्च पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. कार्यकर्त्यांसमोर भूमिका स्पष्ट करताना लंके यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले यावेळी ते भावुक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार निलेश लंके नगर दक्षिणमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र सत्तेत सहभागी असलेल्या पवारांच्या गटाला हे जागा मिळाली नाही. भाजपने विद्यमान आमदार डॉ. सुजय विखे पाटील यांना या जागेवर संधी दिली. त्यामुळे लंके यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक घेत या बैठकीत सविस्तर भूमिका स्पष्ट केली. दिल्लीत लोकसभेत शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आपण जायला हवं. त्यामुळे मी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. मी माझा राजीनामा विधानसभा…
शुक्रवार दि. २८ मार्च, संगमनेर तिथीनुसार पारंपारिक शिवजयंती उत्सव मोठा जल्लोषात संगमनेरकर साजरा करत असतात. शिवजयंती उत्सव समिती, शहर शिवसेना प्रणित बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळ, रंगारगल्ली शिवसेना शाखेसह शहर व उपनगरात मोठा उत्साहात दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी संगमनेरमध्ये घडलेल्या तणावपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या मदतीने शिस्तीचे पालन करत शिवजयंती उत्सव साजरा केल्याबद्दल शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी सर्वांचे आभार मानले आहे. प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे केलेले नियोजन आणि संवेदनशील असलेले वातावरण पाहता शिवजयंती उत्सव समितीच्या बाईक रॅलीस आणि अमर कतारी संस्थापक अध्यक्ष असलेल्या हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाच्या पारंपरिक मिरवणुकीला अधिकृतपणे पोलीस प्रशासनाने परवानगी दिली होती. परवानगी…
