Author: Annant Ppangarkar
बुधवार, दि.१७ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेल्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदाचा व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. रूपवते यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आपल्या राजीनामा पाठविला आहे. रुपवते-चौधरी कुटुंबातील तिसरी पिढी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना निस्वार्थीपणे अहोरात्र पक्षासाठी झटणाऱ्या माझ्यासारख्या युवा कार्यकर्तीला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतो याबद्दल पक्ष नेतृत्वाने विचार करण्याची गरज त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या महासचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्य…
बुधवार, दि.१७ एप्रिल धुळे, सातारा आदि महत्त्वाच्या मतदारसंघातील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात सर्वतोपरी प्रयत्न करत असताना त्यांचे भाचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी साताऱ्यामध्ये घेतलेल्या भूमिकेमुळे थोरातांची कोंडी झाली असल्याचे दिसते. तांबे यांनी विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्याचे आवाहन केले आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वाटेला गेली आहे. येथून शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. साताऱ्याच्या या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. संभाव्य बंडखोरी आणि काँग्रेस मधील अंतर्गत नाराजी दूर करण्याचे थोरात यांच्यासमोर आव्हान आहे. अशातच सांगलीच्या…
अहमदनगर, बुधवार दि.१७ एप्रिल नगर जिल्हयात जुन ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीत झालेली पर्जन्यमानातील तुट तसेच उपलब्ध असलेल्या भुजलाची कमतरता यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई, चारा टंचाई तसेच दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे टंचाई नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. या कक्षाचा दुरध्वनी क्र.1077 (टोल फ्री) व 0241-2323844 असा असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
बुधवार, दि. १७ एप्रिल संगमनेर तालुक्यातील साकुरमध्ये मंगळवारी रात्री चार चाकी वाहनात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मनोज गोविंद वाळुंज (रा. टाकळी ढोकेश्वर, पारनेर) असे या तरुणांचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. साकुरमधील गव्हाळीत एका झाडाखाली उभ्या असलेल्या चार चाकी वाहनामध्ये एक तरुण निपचित पडला असल्याची माहिती मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घारगाव पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मिळालेल्या माहितीत मनोज गोविंद वाळुंज असं या तरुणाचं नाव असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप समोर आले नसले तरी घारगाव पोलीस या संदर्भात पुढील तपास करत आहे.
शिर्डी लोकसभेत १७०८ मतदान केंद्र : १६ लाख ६० हजार मतदार : ८४२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया – निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांची माहिती मंगळवार, दि. १६ एप्रिल सर्व उमेदवार व पक्षांना समान संधी मिळण्याच्या दृष्टीने, त्याचप्रमाणे मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी व अनुसूचित पध्दतीच्या वापरावर निर्बंध आणण्याकरिता सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने व समन्वयाने काम करावे. निवडणूकी कामी नियुक्ती अधिकारी- कर्मचाऱ्यांनी अतिशय तत्पर व दक्ष राहत नि:पक्ष पध्दतीने कामकाज करावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी आज येथे केल्या. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विविध पथक प्रमुख (नोडल अधिकारी) यांची आज राहाता येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या…
मंगळवार, दि. १६ एप्रिल योग गुरु बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी एका आठवड्याच्या आत जनतेची माफी मागण्याचे निर्देश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. पतंजलीने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल १७ ऑगस्ट २०२२ पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधांनी काही आजार बरे होत असल्याचा दावा करण्यात आला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनने या दाव्यावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध करून ॲलोपॅथी औषधांवर टीका केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे. योग गुरु बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी मागितलेल्या बिनशर्त माफीची दखल घेताना सर्वोच्च न्यायालयाने…
मंगळवार दि. १६ एप्रिल अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा २२ जानेवारीला झाल्यानंतर आता संगमनेरात पुन्हा एकदा राम जन्मोत्सवाची व भव्य शोभायात्रेची जोरदार तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी (दि. १७) सायंकाळी पाच वाजता रामनवमी निमित्ताने भव्य शोभायात्रेला नवीन नगर रोड येथील राम मंदिर येथून प्रारंभ होवून बस स्थानक, छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळा, चावडी, मेनरोड, तेलीखुंट, नेहरू चौक व चंद्रशेखर चौक येथील राम मंदिर येथे महाआरती होवून सांगता होणार आहे. या मार्गात असणाऱ्या मंदिर व घरांवर विद्युत रोषणाई करून सडा- रांगोळी करावी, शोभा यात्रेवर पुष्पवृष्टी करावी. संगमनेर शहर व तालुक्यातील सर्वांनी या भव्य दिव्य शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग…
मंगळवार, दि. १६ एप्रिल संगमनेरच्या पोलीस निरीक्षकांवर एका महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले असतानाच आता पोलीस उपनिरीक्षकाचे नवे प्रकरण समोर आले आहे. ३३ वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून या पोलीस उपनिरीक्षकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातून समोर आलेल्या या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिल्याने तिला जामखेड मधील एका हॉस्पिटलमध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचे या युवतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण माणिक महामुनी (वय ३८, रा. नागपूर) असे…
सोमवार, दि. १५ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी रविवारी संगमनेर तालुक्यातील पेमरेवाडी व सतीची वाडी या मतदान केंद्राना अचानक भेट दिली. भेटीत त्यांनी गावातील मतदारांशी संपर्क साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पेमरेवाडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामाची अपर जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. संगमनेर तालुक्यापासून ४५ किलोमीटरवर असलेल्या भोजदरी गावाअंतर्गत पेमरेवाडी असून या वाडीत सुमारे तीनशे मतदार आहेत. पेमरेवाडी शिर्डी लोकसभा व अकोले विधानसभा मतदारसंघात येते. पेमरेवाडीतील नागरिकांनी रस्त्यांच्या मागणीसाठी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. २०२४ च्या निवडणूकीपूर्वी या गावाला जोडणाऱ्या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. अपर…
सोमवार, दि. १५ एप्रिल काही गट दबाव निर्माण करून, चुकीची माहिती पसरवून आणि सार्वजनिक अपमान करून न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. संकुचित राजकीय हितसंबंध आणि वैयक्तिक फायद्यासाठी प्रेरित होऊन काही घटक अशा प्रकारचे कृत्य करत आहे, यापासून न्यायव्यवस्था वाचविण्याची गरज असल्याच्या आशयाचे न्यायव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या समूहाने सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयातील चार आणि उच्च न्यायालयाच्या सतरा अशा २१ निवृत्त न्यायाधीशांच्या समूहाने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, न्यायव्यवस्थेवर येणारा दबाव थांबवायला हवा. न्यायव्यवस्थेला अवाजवी दबावापासून वाचविण्याची आवश्यकता आहे. राजकीय संबंध, वैयक्तिक फायद्यासाठी काही घटक न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास उडेल…
सोमवार, दि. १५ एप्रिल देशात लोकसभा निवडणूक आचारसंहिता १६ मार्चपासून सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अद्याप सुरुवात झाली नसली तरीदेखील आचारसंहिता भंगाच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत ११४ तक्रारी आल्याची व त्यातील बहुतांशी तक्रारीचे निराकरण केल्याची माहिती आचारसंहिता कक्षाकडून देण्यात आली आहे. सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता नियंत्रण कक्षाकडे आलेल्या शंभर टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तर ई-मेल आणि प्रत्यक्ष कार्यालयात येऊन दिलेल्या तक्रारींपैकी ९० टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार किरण देवतरसे यांनी दिली. अहमदनगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी निवडणूक होत आहे. सत्ताधारी महायुती आणि…
गबरूच्या देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू आहे. गबरूच्या अंगातही निवडणुकीचे वारे संचारले आहे. त्यामुळे रात्री उशिराने झोपलेला गबरू सकाळी जरा उशिराच उठला मात्र त्याचा आळस रात्रीच्या जागरणामुळे दूर झाला नव्हता. तशाही अवस्थेत गबरूने आपला मोबाईल हातात घेत त्याचं इंटरनेट चालू केलं. आणि व्हाट्सअप मेसेज वाचू लागला. व्हाट्सअप ग्रुपवरचा एक मेसेज पाहिला आणि गबरूच्या अंगात पुन्हा निवडणुकीचे वार संचारलं. त्यामुळे गबरू घाईघाईनं अंथरुणातून दूर झाला आणि आपले सकाळचे विधी आवरू लागला. त्याची आंघोळ होऊन कपडे घालून तो हॉलमध्ये येईपर्यंत त्याच्या आईने त्याच्यासमोर नाश्ता आणून ठेवला. मात्र आईने आणलेला नाश्ता न घेताच दहा वाजल्याने तो घाई घाईने घराबाहेर पडला. गबरूच्या गावात…
रविवार, दि. १४ एप्रिल रोज काही ना काही घटना घडणाऱ्या संगमनेर मध्ये शनिवारी दाखल झालेल्या गुन्ह्यातून नवीन प्रकार समोर आला आहे. शहरातील एका महिलेने एका सलूनमध्ये आपला विनयभंग करण्यात आल्याची तक्रार केली तर सलून चालकाने सदर महिलेने आपल्या दुकानात गोंधळ घालून धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. दोन्ही तक्रारीवरून शहर पोलिसांनी विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर शहरामध्ये जावेद हबीब सलून या दुकानाची फ्रेंचाईजी आहे. या दुकानांमध्ये कृष्णा सारडा नावाची एक महिला स्वतःचे केस वॉश करण्यासाठी गेली होती. सदर महिलेला तेथील स्टाफमध्ये काम करणाऱ्या एका शाकिब नावाच्या मुस्लिम कर्मचाऱ्याने हेअर वॉशच्या वेळी मॅडम…
प्रवीण पुरो “न खाऊंगा, ना खाने दुंगा” या टॅगलाईनवर देशाला आणि देशातल्या जनतेला खोट्यात पाडणार्या देशाच्या पंतप्रधानांच्या साथीदारांनी, त्यांच्या पक्ष प्रमुखांनी आणि शिलेदारांनी इलेक्ट्रोल बॉण्डच्या माध्यमातून जमवलेल्या मायेचा थोडासा जरी हिशोब दिला तरी मोदी हे देशातल्या भ्रष्टाचाराचे खरे कर्दनकाळ आहेत, असं मानायला हरकत नाही. आजवर त्यांच्यावर, त्यांच्या सरकारवर आणि त्यांच्या पक्षावर झालेल्या आरोपाला साधं उत्तर देण्याचं दायित्व जी व्यक्ती पार पाडत नाही, तिला इतरांना उपदेश देण्याचा अधिकार नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजवर झाला नाही इतका मोठा भ्रष्ट कारभार भाजपच्या सरकारने आणि त्या पक्षाने केला. इलेक्ट्रोल बॉण्ड म्हणजे निवडणूक रोख्यांच्या रुपात कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवणारे त्याचा जेव्हा हिशोब नाकारतात तेव्हा त्यात…
शनिवार, दि. १३ एप्रिल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईसत्र पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. गेल्या दोन दिवसात २५ जणांवर हद्दपारची कारवाई केल्यानंतर शनिवारी पुन्हा आणखी एका गुन्हेगारावर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. सिद्धार्थ उर्फ सिद्धांत दीपक मावस (रा. चत्तर हॉस्पिटलजवळ, संगमनेर खुर्द, संगमनेर) असे हद्दपार करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मावस याला नगर जिल्ह्यासह लगतच्या सिन्नर व जुन्नर तालुक्यातून देखील हद्दपार करण्यात आले असल्याचे आदेश संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. मावस याच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चोरीसह शरीरा विरुद्ध व माला विरुद्ध गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे…
शनिवार, दि. १३ एप्रिल अवैधरित्या वाळु वाहतुक करण्यासाठी, कारवाई न करण्यासाठी ३५ हजाराची लाच स्वीकारताना सिंदखेडराजाचे तहसीलदार सचिन शंकरलाल जैस्वाल, शिपाई पंजाब ताठे, चालक मंगेश कुलथे यांना ३५ हजारांची लाच स्वीकारताना शुक्रवारी पकडण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी लाचखोर तहसीलदार जैस्वाल याच्या घराची झडती घेतली असता घरातील नोटांचे ढीग बघून अधिकारीही चक्रावले. जैस्वालच्या बंगला आणि निवासस्थानामध्ये घेतलेल्या झडतीत तब्बल ४७ लाखांची रोकड सापडल्याचे खळबळजनक वृत्त आहे. ३५ हजाराची लाच घेताना तहसीलदाराला पकडल्यानंतर बुलढाणा लाच लुचपत विभागाच्या पथकाने वेगाने कारवाई करत जैस्वाल यांच्या सिंदखेडराजा स्थित शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेतली. तिथे नोटांचे ढीगच पथकाच्या हाती लागले. त्याठिकाणी तब्बल ३७ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम…
शनिवार, दि. १३ एप्रिल तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केली होती. त्या पाठोपाठ आज शनिवारी त्यांनी एका पत्रकार परिषदेत मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची माहिती दिली आहे. ठाकरे यांनी मुंबईत आज एमआयजी क्लबमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महायुतीला प्रचारात सहकार्य करायचे की नाही, यासंदर्भातील बैठक घेतली. या बैठकीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचारात सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. एका बाजूला कडबोळे आणि एका बाजूला खंबीर नेतृत्व अशावेळी पुन्हा त्यांना एकदा संधी देणे आवश्यक आहे वाटले. म्हणून…
शनिवार, दि. १३ एप्रिल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया सुरू केल्या आहेत. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशावरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवर असलेल्या आरोपीकडे पोलिसांना लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन राऊंड आढळले. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (१२ एप्रिल) पोलिसांनी राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान आकाश उर्फ पप्पू बाबासाहेब गडाख (रा. पारेगाव बुद्रुक ता. संगमनेर) याच्या घर झडतीत पोलिसांना हे पिस्तूल आणि दोन राऊंड आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी आकाश गडाख याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३, ५,…
शुक्रवार, दि. १२ एप्रिल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस रेकॉर्डवर असलेल्या संगमनेरमधील दोघा गुन्हेगारांना नगर जिल्ह्यासह लगतच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी काढले आहेत. कासिम असद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) व इस्माईल निसार पठाण (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) अशी हद्दपार करण्यात आलेल्या दोघांची नावे असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी महाराष्ट्र संवाद न्यूजला दिली. कासिम कुरेशी याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात घातक शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जबर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अल्पवयीन मुलीस पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळून नेणे, प्राण्यांना निर्दयतेने वागविणे, त्यांची कत्तल करणे…
विश्लेषण | अनंत पांगारकर शुक्रवार, दि. १२ एप्रिल अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात मी आणि माझा पक्ष योग्य हे सांगताना समोरचा उमेदवार आणि त्याचा पक्ष किती वाईट यावर प्रचारातून टीकास्त्र सोडण्याचे काम सुरू आहे. मात्र वास्तवता या दोन्ही मतदारसंघात एकमेकांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपल्या विरोधातील पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर टीका करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. ज्या पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर आपण टीका करतो त्याच घरात काही काळ आपण देखील सत्तेचा उपयोग घेतला, हे या मतदारसंघातील प्रमुख उमेदवार विसरले आहेत. नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थितीतील प्रमुख चारही उमेदवारांना पक्ष बदलाचा दांडगा अनुभव आहे. ज्या पक्षातून आपण आता सत्तेसाठी दुसऱ्या…
