Author: Annant Ppangarkar

संगमनेरमध्ये विद्यार्थ्यांवर उपचार सुरू महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरकडे येणाऱ्या एसटी बसचा एक्सेल तुटल्याने एसटी बस पलटी झाली. या अपघातामध्ये साधारणता ४० विद्यार्थी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेरमध्ये आणण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस राहुरीहून सकाळी संगमनेरच्या दिशेने येत असताना पिंपरणे गावाच्या शिवारात हा अपघात झाला. या बसमध्ये बहुसंख्य विद्यार्थीच होते. हे सर्वजण संगमनेरला येत असताना मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक आणि यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मानवता हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे. सुख समाधान व शांतीसाठी सर्वांनी प्रेमाने एकत्र राहावे, हा संदेश देणारा नाताळ सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी करीत नाताळ व नवीन वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी ‘गाणी येशू जन्माची’ या कार्यक्रमानंतर शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, विश्वास मुर्तडक, प्रा. बाबा खरात, आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. बाबा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली जॉर्ज चोपडे, ॲड. अरविंद राठोड, सत्यानंद कसाब, विजय खंडीझोड, राजेंद्र सांगळे, स्वप्नील कसाब, भाऊसाहेब नेटके, डॉ. हेमलता राठोड, प्रतीक खरात, प्रांजल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  जिथे आपण सर्वजण एकत्र राहतो, एकमेकांना आधार देतो, सुखदुःखे वाटून घेतो. ती वास्तू फक्त आनंदी नसावी तर समाधानी असावी. आनंद हा भौतिक पातळीवर असतो आणि समाधान आत्मिक पातळीवर असते. साखर, लिंबू, मीठ हे सारे पदार्थ आपापल्या आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते एकमेकांत मिसळतात, तेंव्हाच विलक्षण मधुर चवीचे सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावे लागते तर मीठ व साखरेला पाण्यात विरघळून एकजीव व्हावे लागते. म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत. कारण गृहमंदिरात जर पती-पत्नी मनाने एकरूप झाले, तर चवदार सरबत नाही तर मधुर-अमृत तयार होईल. आपले आईबाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागताहेत हे बघून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – मैत्रिणींसह अकोले तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या सांदण दरीचे निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी आलेल्या मुंबईतील तरुणीचा दरीत कोसळून मृत्यू झाला. ऐश्वर्या खानविलकर (वय 24 वर्ष, रा. दहिसर, मुंबई) असे या तरुणीचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून राजुर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत या तरुणीचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठविला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. मुंबईतून काही मैत्रिणी भंडारदरा धरण परिसरासह सांदण दरी बघण्यासाठी आल्या होत्या. यावेळी यातील ऐश्वर्या खानविलकर हिचा खडकावरून पाय घसरल्याने ती खाली पडली. खडकावर पडल्याने डोक्याला मार लागून या तरुणीचा मृत्यू झाला. घटनेची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री, काँग्रेस नेते, आमदार सुनील केदार यांना न्यायालय पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर नागपूर पोलिसांनी विधीमंडळाला केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली. यासंबंधीचे न्यायालयाचे आदेश देखील विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवण्यात आले आहे. त्यानंतर केदार यांची २२ डिसेंबर पासून आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. २००१-२००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे खरेदी केले होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज प्रवीण पुरो @ 9869991868 प्रचंड तटबंदी असलेल्या लोकसभेच्या सभागृहात दोन तरुणांनी अनाहुत केलेल्या प्रवेशाने सारा देश अचंबित झाला. असुक्षित म्हणून ज्या जुन्या संसद भवनावर बोट दाखवणार्‍या सत्ताधार्‍यांनी उभ्या केलेल्या नव्या संसद भवनाचा तट ओलांडून थेट संसदेच्या सभागृहात उड्या मारत हल्ला करता येऊ शकतो, हे या तरुणांनी सार्‍या देशाला आणि जगाला दाखवून दिलं. नवं संसद भवन आणि त्याला असलेली सुरक्षा किती तकलादू आणि कामचलाऊ आहे, याचं प्रत्यंतर या घटनेने देशाला दिलं आहे.  आता या तरुणांचे पाठीराखे कोण याचा शोध घेऊन त्या घटनेशी काँग्रेस वा इतर विरोधकांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न होईल. लातूर आणि चेन्नईच्या नावामुळे त्या चर्चेला ऊत आला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एरव्ही त्याच्या दहशती आणि जीवघेण्या कृत्याबद्दल सर्वच ऐकून होते. शुक्रवारच्या सकाळीच त्याने नासिक-पुणे महामार्ग ओलांडत मालपाणी लॉन्समध्ये प्रवेश केला. थोडा वेळ तेथे रेंगाळल्यानंतर त्याने भिंतीवरून उडी घेत थेट मागच्या बाजूला असलेल्या पद्मनगर तेथून जवळच्याच आदर्श कॉलनीमध्ये प्रवेश केला. थांबण्यासाठी तेथे त्याला पत्र्याचे शेड दिसली आणि त्याने तेथेच काही काळ मुक्काम ठोकला. परिसरासह आसपास असलेल्या नागरिकांचे भीतीने गाळण उडाली आणि बघता बघता ही वार्ता शहरात पसरली. शुक्रवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास नाशिक पुणे हायवेलगत असलेल्या मालपाणी लॉन्स मध्ये एका बिबट्याने प्रवेश केला होता. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने लगेचच तेथील कर्मचाऱ्यांना याची माहिती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज धुळे – शालेय विद्यार्थी सनी साळवे यांच्या खून प्रकरणात धुळे न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर उर्वरित तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार झालेली ही जन्मठेपेची राज्यातील पहिलीच ऐतिहासिक घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. धुळ्यातील देवपूर भागात २०१८ मध्ये झालेल्या सशस्त्र हल्ल्यात सनी साळवे याचा खून करण्यात आला होता. देवपूरमधील नरसिंह बियर बार जवळ गाडीला कट मारल्याच्या कारणातून झालेल्या वादात सनी साळवे, सुमेध सूर्यवंशी आणि सागर साळवे यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोपींनी रुग्णालयातही जाऊन जखमींना धमकावण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – नगरपरिषद प्रशासनाने शहरातील घरांच्या संकलित करामध्ये दहा टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असून महागाई, बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणारी नाही. त्यामुळे प्रस्तावित करण्यात आलेली ही दरवाढ तातडीने रद्द करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केली. यामुळे वाढीव दरवाढीस स्थगिती मिळण्याची चिन्हे असून यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. या संदर्भात थोरात म्हणाले, संगमनेर नगर परिषद हद्दीत संकलित कर आकारणीबाबत चतुर्थ वार्षिक रिविजन पूर्ण झाली असून सन २०२३-२४ या वर्षासाठी प्राथमिक कर निर्धारण करण्यात आले आहेत. यात शहरातील घरांच्या संकलित करात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शालेय जिल्हास्तरीय रस्सीखेच क्रीडा स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल अव्वल ठरली. जिल्ह्यातील विविध शाळांच्या ३७ संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेत ध्रुवच्या १४, १७ व १९ वर्षांखालील रस्सीखेच खेळाडूंनी २७ सुवर्णसह १९ कांस्यपदकांची कमाई केली. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या ध्रुवच्या खेळाडूंची विभागीय रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने संगमनेरातील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्रांगणात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात खेळतांना ध्रुव ग्लोबल स्कूलच्या पूर्वा पवार, आर्या पाटील, श्रद्धा साठे, ज्ञानेश्‍वर देवकर, पालवी चुत्तर, कादंबरी, तन्वी ठोंबरे, वैष्णवी तनपुरे व स्वरा वलवे यांनी सुवर्ण पदके पटकाविली. तर, याच वयोगटातील मुलांमध्ये श्रेयस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज साखर कारखानदारीसाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने २०२४-२०२५ या गळीत हंगामात ऊस लागवड, खोडवा, निडवा पीक घेणाऱ्या ऊस उत्पादकांसाठी अमृत शक्ती दाणेदार सेंद्रिय खत ५० टक्के अनुदानावर सुरू करण्यात आल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी भावासोबतच ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कामगारांचे हित जोपासले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात वाढीसाठी कारखान्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतीमालासाठी सातत्याने रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीची उत्पादक क्षमता देखील कमी होत आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज प्रिय ददू,  अनेक आशीर्वाद ! या वर्षी तू आमदार झालास तेव्हापासून सतत कामानिमित्त दौऱ्यांवर किंवा फिरतीवर असतोस. या आधी तुला कधी पत्र लिहावं असं वाटलं नाही. पण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी यंदा तू पहिल्यांदाच आमदार म्हणून गेलास आणि मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या. विधान परिषदेतली तुझी कामगिरी आम्ही बघत आहोत. लोकांच्या मनाला भिडणारे अनेक प्रश्न तू सभागृहात मांडत आहेस. तुझ्या अभ्यासपूर्ण मांडणीचं कौतुक वाटतं. पण आजचं हे पत्र त्याबद्दल नाही. तू नागपूरला गेल्यापासून एक प्रसंग मला राहून राहून आठवतोय. कदाचित तुला आज त्याची आठवण नसेल. तू फक्त ६-७ वर्षांचा होतास. खूप वर्षं लोटली त्या गोष्टीला. ९० च्या विधानसभा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडून सुमारे पाच लाख रुपयांची रोकड लांबविली असल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम मशीन फोडले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक व उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे घटनास्थळी दाखल झाले होते. प्राथमिक माहितीनुसार या एटीएम मशीन मधून अज्ञात चोरट्यांनी चार लाख 84 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकाने नगरहून फिंगरप्रिंट व श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण केले आहे. संबंधित बँकेचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर या संदर्भात अधिक माहिती समोर येणार असून त्यानंतर संगमनेर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा करण्यात पोलीस यशस्वी झाले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले असून पोलिसांनी मृताच्या जावयासह आणखी एकाला अटक केली असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकुर जवळील घाटामध्ये १६ डिसेंबरला फॉरेस्ट जमिनीत बांधावर एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. त्यावेळी ही व्यक्ती कोण आहे याचा खुलासा झाला नव्हता. हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला होता. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यापासून खून करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली -हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत सुरक्षेच्या मुद्द्यावरून गोंधळ घातल्याच्या कारणावरून तब्बल 78 खासदारांचे निलंबन करण्यात आले. यात लोकसभेतील 33 तर राज्यसभेतील 45 खासदारांचा समावेश आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (18 डिसेंबर) 11 वा दिवस आहे. लोकसभेत सलग चौथ्या दिवशी सुरक्षेच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला. सभापती ओम बिर्ला यांनी गोंधळ घालणाऱ्या 33 खासदारांना निलंबित केले. यामध्ये नेते अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे 11 खासदार, तृणमूल काँग्रेसचे 9, द्रमुकचे 9 आणि इतर पक्षांच्या 4 खासदारांचा समावेश आहे. यानंतर राज्यसभेतही गदारोळ झाला. त्यामुळे सभापती जगदीप धनखड यांनी 45 विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी (22 डिसेंबरपर्यंत) निलंबित केले. यापूर्वी 14 डिसेंबर रोजी…

Read More

स्व. भास्कर गणपतराव देशमाने यांचे प्रथम पुण्यस्मरण संपन्न महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – भास्कर देशमाने यांनी कष्टातून आपले जीवन कार्य प्रगतीकडे नेत परिवाराला देखील तेवढेच प्रेम दिले. त्यांचे चिरंजीव स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने यांनी देखील सामाजिक कार्यात आपले नाव उंचावले असले तरी त्यांनी आई-वडिलांची सेवा केली. आई-वडिलांचे आशिर्वादाशिवाय आपली प्रगती नाही, असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी केले. धांदरफळ बुद्रुक येथे स्व. भास्कर देशमाने यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उद्योजक भाऊसाहेब डेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अशोक देशमुख, दिलीपराव शिंदे, माधवराव कानवडे आदी उपस्थित होते. देशमुख…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर – संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातातील जखमींना तात्काळ उपचार मिळावेत. यासाठी डोळासने येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अपघाताबाबत सरकारचे लक्ष वेधताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, शिर्डी येथून आळंदी वारीसाठी जात असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खंदरमाळ येथे नुकताच अपघात झाला असून यामध्ये चार वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दहा वारकरी जखमी झाले. घारगाव-संगमनेर दरम्यान डोळासने हे मध्यवर्ती सेंटर असून या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर सुरू केले असते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – प्रसिद्ध वकील शरिफखान पठाण यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर आता या गुन्ह्यातील जखमी आरोपीच्या तक्रारीवरून पठाण यांच्यासह आठ जणांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील लोकांविरोधात आता गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शरीफ पठाण, रिजवान पठाण, आसिफ पठाण, शफीक पठाण, फारुक पठाण, फरहान पठाण, आवेज मोमीन (तब्या) व तला शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी संध्याकाळी जुन्या भांडणाच्या कारणातून वकील शरीफ पठाण यांच्यासह त्यांच्या दोघा भावांवर हल्ल्याचा प्रकार घडला होता. आता या हल्ल्यातील विरोधी गटातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ प्रवीण पुरो राज्यातील पोलिसांनी गल्ले भरायला सुरुवात केलीय. त्यांना वसुलीचं टार्गेट दिलंय, असं काहीसं वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी एकच खळबळ उडवून दिली होती. कोल्हे यांनी राज्यातल्या तमाम पोलिसांचा अवमान केला, पोलीस प्रशासनाची अवहेलना केली, अधिकार्‍यांची आणि त्यांच्या एकूणच ‘कर्तव्या’चा मत्सर केला, अशा काहीशा प्रतिक्रिया त्यानंतर पाहायला मिळाल्या. काही उत्साही पोलीस अधिकार्‍यांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या वतीने स्वत:ची पाठ थोपटून घेताना अमोल कोल्हे कुठे चुकले हे सांगण्याचा प्रयत्न केला. नाक्यावर वाहतुकीच्या नियंत्रणासाठी पोस्टिंग दिलेल्या महिला पोलिसांकडून सरेआम वाहन चालकांची लूट होत असते, त्यांना दिवसाकाठी २५ हजार रुपयांचं टार्गेट दिल्याचं कोल्हे म्हणाले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – योगासनांच्या प्रचार-प्रसाराच्या कार्याचा भाग म्हणून देशभरात राबविल्या जाणार्‍या वेगवेगळ्या उपक्रमात महिलांसाठी होणार्‍या राज्यस्तरीय योगासन स्पर्धांचे विशेष आकर्षण असते. या स्पर्धांची घोषणा झाली असून येत्या २४ व २५ डिसेंबरला संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलात त्या पार पडणार आहेत. महिलांच्या दोन वयोगटात होणारी ही स्पर्धा योगासनांच्या चार प्रकारांमध्ये होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून विजयी स्पर्धकांना क्षेत्रीय स्पर्धेत जाण्याचीही संधी मिळेल, अशी माहिती महाराष्ट्र योगासन स्पोर्ट् असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी दिली. या स्पर्धेत अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट् असोसिएशनने ‘अस्मिता खेलो इंडिया अंतर्गत वुमेन्स लीग’ स्पर्धा आयोजित केली आहे.…

Read More