Author: अनंत पांगारकर

अहिल्यानगर / संगमनेर – प्रतिनिधी  संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी येथील एका कृषी सेवा केंद्रात झालेल्या धाडसी घरफोडीचा अखेर उलगडा झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने अत्यंत गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या घरफोडीतील तीन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून सुमारे ८.५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंप्रीलौकी येथील व्यापारी संदीप पोपट गिते यांच्या कृषी सेवा केंद्राचे पत्रे उचकटून चोरट्यांनी दुकानातील शेती उपयोगी साहित्य आणि रसायने चोरून नेली होती. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आश्वी पोलीस या प्रकरणी तपास करत होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी संगमनेरला सध्या अनियमित वीजपुरवठ्याच्या समस्येने ग्रासले आहे. मागील काही दिवसांपासून महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून ती कधीही येते आणि कधीही जाते, अशी परिस्थिती उद्भवल्याने याचाच परिणाम म्हणून आज (गुरुवारी) काँग्रेससह शहरात नागरिकांनी महावितरण कार्यालयाला घेराव घालून निवेदन दिले. यावेळी आठ दिवसात सुधारणा करा अन्यथा आंदोलन करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. विजेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा महावितरणवर संताप, यांनी दिले निवेदन… संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी सोमेश्वर दिवटे, गजेंद्र अभंग, किशोर टोकसे, नूरमोहम्मद शेख, नितीन अभंग, संतोष मुर्तडक, जावेद पठाण, सुषमा भालेराव, वैशाली बर्गे, रामदास सोनवणे, तुषार अरगडे, श्रावणी…

Read More

मुंबई – विशेष प्रतिनिधी राज्य सरकारकडून राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. गुरुवारी गृह विभागाने राज्याच्या पोलिस दलात मोठे फेरबदल केले असून २२ पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा समावेश असून त्यांच्या रिक्त जागेवर रायगड येथून सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे घार्गे आता अहिल्यानगर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक असतील. बदल्या करण्यात आलेल्या २२ अधिकाऱ्यांपैकी २१ अधिकाऱ्यांना नव्या नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले असून संजय वाघ यांना अद्याप नियुक्तीचे नवे ठिकाण देण्यात आलेले नाही. या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या….

Read More

संगमनेर-  संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी येथील अनिल गंगाधर राऊत यांच्या घराजवळ लावलेली टेम्पो ट्रॅव्हलर आणि टाटा विंगर अशी सुमारे १० लाख रुपये किमतीची दोन चारचाकी वाहने अज्ञात व्यक्तींनी जाळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल गंगाधर राऊत (वय ४६, रा. घुलेवाडी) यांचा ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीची टाटा विंगर (क्र. एमएच ०८ आर ८८०४, किंमत २ लाख ९८ हजार रुपये) आणि टेम्पो ट्रॅव्हलर (क्र. एमएच ०४ जीपी ३३३२, किंमत ६ लाख ९५ हजार रुपये) ही दोन वाहने त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री घरासमोर पार्क केली होती. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात…

Read More

अहिल्यानगर- अहिल्यानगर जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या आणि अपहरण, खून, चोरी, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या एका कुख्यात टोळीवर तोफखाना पोलिसांनी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मकोका) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. ११ जणांच्या या टोळीच्या अटकेमुळे अहिल्यानगरमध्ये पसरलेल्या भीतीला चाप बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवनागापूर आणि आसपासच्या परिसरात या टोळीने गुन्हेगारीचा कळस गाठला होता. चोरी, खंडणी, मारामारी यांसारख्या कृत्यांसोबतच एका व्यक्तीचे अपहरण करून निर्घृण खून करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक दहशतीखाली होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत तोफखाना पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले. कसून तपास करत या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, त्यांच्यावर ‘मकोका’ कायद्यान्वये…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी  संगमनेर शहरातील सागर वाईन्स या देशी दारू दुकानाचे स्थलांतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शासकीय जागेवर झाल्याने तो आदेश संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकरणी सध्याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून योग्य कारवाईची अपेक्षा मूळ तक्रारदार बानोबी शेख यांनी व्यक्त केली आहे. नेमके प्रकरण काय आहे?… दिल्ली नाका परिसरात असलेले सागर वाईन्स हे देशी दारू दुकान अनेक वर्षांपासून खोटी कागदपत्रे वापरून नगरपालिका आणि उत्पादन शुल्क विभागाची दिशाभूल करत सुरू असल्याचा आरोप बानोबी शेख यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी वारंवार पाठपुरावा केला, परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने २० जानेवारी २०२५ रोजी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाला स्थानिक नागरिक,…

Read More

संगमनेर, दि. २१ मे २०२५ संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या माहितीनंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संगमनेर शहरात दरोड्याचा कट उधळून लावला आहे. २१ मे २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सावजी हॉटेलसमोरील पुणे-नाशिक हायवे ब्रीजखाली दरोड्याच्या तयारीत असलेल्या ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई सुरेश बाळू मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ४६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४), ३१० (५) सह शस्त्र अधिनियम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रोहन अनिल अभंग (वय…

Read More

नांदेड –  बीड जिल्ह्यात सातत्याने घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरून काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मराठवाडा दौऱ्यावर असताना नांदेड येथे माध्यमांशी बोलताना थोरात यांनी, “बीडमधील घटना दुर्दैवाने महाराष्ट्राला लाज वाटाव्या अशा आहेत. सरकार यावर काय करतेय?” असा संतप्त सवाल विचारला. थोरात म्हणाले की, बीडमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि दुर्दैवी आहे. या गुन्हेगारीचा संसर्ग इतर जिल्ह्यांमध्ये पसरतो की काय, अशी भीती वाटत असताना सरकारची निष्क्रियता हा मोठा प्रश्न आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर राज्याचे आणि देशाचे भवितव्य काय, अशी मोठी काळजी त्यांना वाटत असल्याचे थोरात यांनी सांगितले. सरन्यायाधीश भूषण गवई…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत युवक काँग्रेसने प्रशासनाला निवेदन दिले असून, २३ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी या मार्गावरील वाढत्या अपघातांवर चिंता व्यक्त केली आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून त्यांच्या कार्यकाळात नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण यापूर्वीच पूर्ण झाले होते. आता नव्याने सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे, यामुळे चंदनापुरी घाटात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. जयश्री थोरात…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर नगरपरिषद हद्दीतील मालमत्ताधारकांवरील शास्तीकर माफीच्या निर्णयावरून आता स्थानिक राजकारण तापले आहे. माजी उपनगराध्यक्ष नितीन अभंग यांनी नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अपुऱ्या माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. तर, आमदार सत्यजीत तांबे हे शास्तीकर माफीसाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी ठळकपणे सांगितले. या संदर्भातील प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर शहरातील नागरिकांनी घरपट्टी वेळेत न भरल्यास आकारण्यात येणारा २% शास्तीकर आणि अनाधिकृत बांधकामांवरील शास्तीकर माफ करावा, ही संगमनेरमधील नागरिकांची प्रमुख मागणी आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने…

Read More