Author: Annant Ppangarkar
मंगळवार, दि. ७ मे शुक्रवारी (दिनांक १० मे) सायंकाळी सहा वाजता अहमदनगरच्या झोपडी कॅन्टीन जवळील माऊली सभागृहात “निर्भय बनो, नागरिकांशी संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निर्भय बनो, सकल भारतीय समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सभेत ॲड. असीम सरोदे, ॲड. निशा शिवूरकर, डॉ. विश्वंभर चौधरी अहमदनगरकर नागरिकांशी संवाद साधणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘जागे व्हा, धोक्याची घंटा वाजली आहे’ या टॅगलाईन खाली होत असलेल्या या सभेसाठी अहमदनगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. ७ मे संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या वडगाव पान येथील उप बाजारामध्ये मंगळवार गुरुवार आणि शुक्रवारी कांदा लिलाव सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांसाठी यामुळे कांदा विक्रीची मोठी सोय झाली आहे. राज्याचे माजी कृषिमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगाव पान उपबाजारात मंगळवारी कांदा लिलावास प्रारंभ झाला. यावेळी सभापती शंकर खेमनर, सहकार महर्षी थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, उपसभापती गीताराम गायकवाड, संचालक कैलास पानसरे, मनीष गोपाळे, सुरेश कान्होरे, सतीश खताळ, विजय सातपुते, रुक्मिणी साकुरे, दिपाली वर्पे, सुधाकर ताजणे, अनिल…
मंगळवार, दि. ७ मे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या वाहनावर सोमवारी रात्री दगडफेक करत रुपवते यांच्यावर हल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोले तालुक्यातील चितळवेढे गावात ही घटना घडली. या हल्ल्यात रूपवते सुदैवाने बचावल्या आहेत. राज्यात मंगळवारी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान रूपवते यांनी आपण हल्ल्यातून बचावला असून सुरक्षित असल्याचे सांगितले आहे मिळालेल्या माहितीनुसार उत्कर्षा रुपवते अकोले तालुक्यातील प्रचार दौरा आटोपून सोमवारी रात्री परतत होत्या. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्या प्रचार सभा आटोपून अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ आले असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक करत रुपवते यांच्यावर हल्ल्याचा…
सोमवार, दि. ६ मे नगर अर्बन बँकेसंदर्भातील एका महत्त्वाच्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने सोमवारी निर्णय दिला. हा निर्णय येताच बँक बचाव समिती व ठेवीदारांनी जल्लोष केला आहे. नगर अर्बन बँकेसंदर्भात माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीनुसार दाखल झालेला गुन्हा कायम राहील तसेच या गुन्ह्यात लावलेले महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण (एमपीआयडी) कायद्याचे कलमही कायम असेल, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सोमवारी दिला. खंडपीठाच्या या निकालाने नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या संचालकांना दणका बसला असून बसला असून त्यांना आता पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे सांगितले जाते. दरम्यान नगर अर्बन बँकेचे ठेवेदार व बँक बचाव समितीचे समर्थक…
सोमवार, दि. ६ मे नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी माघारी संदर्भात चांगलेच महानाट्य रंगले होते. शेवटच्या मिनिटाला अर्ज मागे घेण्यासाठी एका उमेदवाराची चांगलीच धावपळ उडाली होती. या दरम्यान बहुचर्चित ठरलेल्या शांतिगिरी महाराज यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेकडून भरलेला उमेदवारी अर्ज छाननी बाद झाल्यानंतर त्यांचा अपक्षाच्या रूपाने दुसरा अर्ज निवडणुकीत कायम होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ते आपली उमेदवारी मागे घेतील असा अनेकांचा कयास होता. मात्र निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर महाराज ठाम राहिले. यामुळे त्यांच्या उमेदवारीचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार असल्याचे बोलले जात आहे. नासिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात…
सोमवार, दि. ६ मे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या छाप्यात झारखंड सरकारमधील एका मंत्राच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरी अधिकाऱ्यांना नोटांचे घबाड सापडले आहे. कारवाईत कोट्यावधीची रोकड जप्त करण्यात आले असून पैसे मोजण्यासाठी मशीन्स मागविण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणूक सुरु असतानाच ईडीने केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे झारखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. झारखंडमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तब्बल ९ ठिकाणी छापे टाकले आहेत. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी तसेच काही अभियंत्यांच्या घरीही ईडीने छापेमारी केली असल्याची माहिती समोर येत आहे. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी तब्बल…
उद्धव ठाकरेंना धक्का… सोबतचा शिलेदार शिंदेंच्या शिवसेनेत, मुख्यमंत्री शिंदेंनी दिली ही मोठी जबाबदारी
सोमवार, दि. ६ मे नासिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असलेले शिवसेनेचे विजय करंजकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पाठोपाठ शिंदे यांनी त्यांच्यावर उपनेते आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर उबाठा शिवसेना गटाला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करत असताना नासिक लोकसभा मतदारसंघात रविवारी मोठ्या घडामोडी घडल्या. रविवारी विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुंबईमध्ये शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. नासिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले…
अहमदनगर दि. ५ मे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशांनुसार अहमदनगर व शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हा मतदार दूत डॉ. अमोल बागुल यांच्या संकल्पनेतून मतदानाला जाण्याअगोदरच मतदान केंद्राच्या आतील रचना व मतदान प्रक्रियेचा क्रम समजण्यास सुलभ व्हावा म्हणून व्ही आर बॉक्स डोळ्याला लावत घरी बसून मतदान केंद्रामध्ये फिरता येणार आहे. अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या मतदान प्रक्रियेत व्हर्चुअल रियालिटी म्हणजे आभासी वास्तविकता तंत्रज्ञानाच्या प्रयोगाचे राज्य व देश पातळीवर कौतुक होत आहे. मतदान केंद्राचा एक मिनिटाचा थ्रीडी व्हिडिओ गुगल मायक्रोसॉफ्ट व ॲपल टीचर डॉ. बागुल यांनी तयार केला असून तो मोबाईलमध्ये लावून व्ही आर बॉक्स व…
रविवार, दि. ५ मे महायुतीचे आपले सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवत आहोत. जिथे जातो तिथे जनता बाळासाहेबांच्या विचारांना आणि विकासाला मत देणार असल्याचे सांगते. त्यामुळे येथेदेखील धनुष्यबाणाच्या खटक्यावर बटन दाबून जनता उबाठाचा टांगा पलटी घोडे फरार करेल, निवडणुकीत मशालीची चिलीम होईल अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शनिवारी मुख्यमंत्री कोल्हापूरमधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, धनुष्यबाणाशी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही माफ करणार का? बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारांना माफ करणार का? विकास करताना जातीभेद केला नाही. या राज्यातील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत. कोल्हापुरातील टोल बंद…
रविवार, दि. ५ मे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना सत्ता बदलाचे वारे लवकर कळतात, असा टोला लगावत ‘त्यांना पक्षात घेताना निश्चितपणे मला विचारले जाईल’, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाथर्डी (अहमदनगर) मधील एका सभेत शनिवारी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे पुत्र सुजय विखे दोन वेळा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्याचा तारीख आणि वेळेनिशी दाखला देत बाळासाहेब थोरात यांच्यासाठी ही वॉर्निंग बेल असल्याचे व थोरात यांचा आता तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता बळावली असल्याचे म्हटले होते. या संदर्भात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नगरमध्ये आलेल्या थोरात…
रविवार, दि. ५ मे प्रत्येकाच्या बँक खात्यावर पंधरा लाख, दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या, अच्छे दिन असे खोटी आश्वासने देत सत्तेवर आलेल्या भाजपने आश्वासने न पाळता देशात महागाई, बेरोजगारी, महिला असुरक्षिततेसह अनेक प्रश्न निर्माण केल्याचा आरोप करत देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातील महिलांना वार्षिक एक लाख रुपये देणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेत्या डॉ. जयश्री थोरात यांनी केले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी थोरात तालुक्यात निमज, चिकणी, राजापूर, निमगाव भोजापूर, खांडगाव, रायते या गावांमध्ये वाड्या-वस्त्यांवर घोंगडी बैठका घेत प्रचार करत आहे. गावोगावी झालेल्या बैठकांमध्ये त्या म्हणाल्या, सध्या देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती साडेचारशे रुपयावरून बाराशे…
रविवार, दि. ५ मे असंख्य कारवायानंतर देखील संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच आहे. शहरात मदिना नगर भागात संगमनेर अकोल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत शनिवारी दुपारी तीन लाख रुपये किमतीचे दीड हजार किलो गोमांस पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक राहुल कचरू डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहील इजराइल कुरेशी (वय २० वर्षे रा. मदिनानगर) व हाश्मी नशीर कुरेशी उर्फ बुड्डी (वय ३२ वर्षे रा. मदिनानगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिक माहिती अशी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना शनिवारी शहरातील मदिना नगर भागात असलेल्या गौसिया मज्जिद शेजारी…
अंतिम भाग | प्रवीण पुरो देशाचा चौकीदार म्हणून स्वत:ची पाठ थोपटणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक नुकसान कोणाचं केलं असेल तर ते महाराष्ट्राचं. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला गेल्या दहा वर्षांत बसलेला विविध मार्गातील फटका लक्षात घेतला तर या राज्याने, राज्यातल्या जनतेने विशेषत: बेरोजगारांनी मोदी नावाच्या चौकीदाराला कदापि माफ करायला नको. दुर्देवाने सुर्याजी पिसाळांच्या अवलादी याच महाराष्ट्रात जन्मल्याने चौकीदार शांत बसेलच याची खात्री देता येत नाही. सत्ता हा त्यांचा मतलब राहिला आणि चौकीदाराने केलेली लूट या पिसाळांनी राज्यातल्या जनतेच्या बोकांडी मारली. देशावर नोटबंदी लादताना चौकीदाराने सारी थोतांडं हातोहात पुढे केली. भ्रष्टाचार थांबेल, दहशतवाद संपेल, काळापैसा बाहेर येईल आणि रोजगाराला चालना मिळेल, असल्या…
शनिवार, दि. ४ मे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत, गेल्या दहा वर्षात १७ लाख हिंदू कुटुंबीयांनी देश सोडत दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले आहे. ख्रिश्चन मुसलमानांपेक्षा जास्त अन्याय हिंदूंवर झाले. राज्यसभेत समोर आलेली ही माहिती छापण्याची गोदी मीडियाची हिम्मत नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर शनिवारी श्रीरामपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वंचितचे पदाधिकारी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, पंतप्रधानांचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असायला हवं, मात्र ते मानवतेच न राहता वसुलीच कार्यालय झाल आहे. मोदींनी इन्कम टॅक्स,…
शनिवार, दि. ४ मे गेल्या दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाला आर्थिक संकटामध्ये नेण्याचे पाप केल आहे. १० वर्षात मोदींनी काढलेले कर्ज कुठे गेले? त्याचा वापर कोणी केला? हे आता त्यांनी सांगावे, देश टिकविण्यासाठी आता आपल्याला या बाबींचा विचार करावाच लागेल असे सांगत भाजपाचे राधाकृष्ण विखे उघडपणे काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला जातात, ही काँग्रेसचे आमदार थोरात यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ आंबेडकर नगरमध्ये झालेल्या सभेत बोलत होते. यावेळी वंचितचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदींचा राजकारण हे अतिशय भयानक असून काँग्रेस पक्षाने त्यांना २०१२ मध्ये…
शनिवार, दि. ४ मे | अनंत पांगारकर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नऊ दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र प्रमुख उमेदवारांचा प्रचार अद्यापही थंडच आहे. अपवाद वगळता पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही निरुत्साह दिसत असून उमेदवारांच्या भूमिका मतदारांसह कार्यकर्त्यांना देखील संभ्रमात पाडणाऱ्या आहे. निवडून जाणारा आणि पराभूत होणारा उमेदवार आता तरी आहे त्या पक्षात एकनिष्ठ राहत दिल्या घरी सुखी राहणार की पुन्हा पदाच्या लालसेने पक्ष बदलणार याची गॅरंटी मात्र कोणीही देताना दिसत नाही. आजी-माजी खासदारांसह या मतदारसंघात प्रथमताच प्रमुख महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या महिला उमेदवारामुळे सुरुवातीची दुरंगी वाटणारी लढत आता तिरंगी बनली आहे. यामुळे सुरुवातीपासूनच विजयाच्या हवेत असलेल्या आजी-माजी खासदारांचे भवितव्य टांगणीला…
शुक्रवार, दि. ०३ मे गेल्या काही दिवसांपूर्वी पोट व यकृत (लिव्हर) संबंधित आजार असलेल्या रुग्णांना इतरत्र जाऊन उपचार घ्यावे लागत होते. रुग्णसंख्येचा वाढता आलेख यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नुकताच एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ पोटविकार विभाग सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी एन्डोस्कोपी, कोलोनोस्कोपी व ईआरसीपी प्रक्रियांना सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोटविकार विभागाची बाह्यरुग्ण सेवा आठवड्यातून दोन दिवस नाशिक येथील क्लिनिकमध्येही सुरु करण्यात आली असून याठिकाणी रुग्णांना उपचार घेता येणार आहेत. याबाबतची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील धामणगाव-घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये नाशिकसह जळगाव, भुसावळ, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बुलढाणा, जालना, भंडारा गोंदियासोबतच ठाणे, पालघर व मुंबईच्या…
शुक्रवार, दि. ३ मे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त सुरू असलेल्या छबिना मिरवणुकीत तरुणावर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. नगर जिल्ह्यातील शेवगावमधील शहर टाकळी येथे गुरुवारी (दि. २) रात्री ही घटना घडली. अक्षय संजय आपशेटे (वय २४ वर्ष, रा. शहर टाकळी, शेवगाव) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. यासंदर्भात मृत तरुणाचा भाऊ संकेत संजय आपशेटे याने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात अजय दावीद कोल्हे, किरण उत्तम चव्हाण, पंकज लक्ष्मण कोल्हे, अविनाश साईनाथ पवार व विकास संजय कोल्हे या पाच आरोपींविरुद्ध खुनासह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत आपशेटे ज्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २ मे रोजी रात्री…
शुक्रवार, दि. ३ मे नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणानंतर या प्रकरणातील पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी नग्नावस्थेत रात्रभर स्मशानभूमीत बसविल्याने आरोपीच्या चुलत भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली केली यामुळे पुन्हा एकदा राज्य हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कोपर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन पैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेने राज्य हादरले होते. या अत्याचाराच्या घटनेने देश पातळीवर प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विठ्ठल उर्फ नितीन शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे…
शुक्रवार, दि. ३ मे पोटगीपोटी शेतजमिनीचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात दावा करणाऱ्या पत्नीचा न्यायालयाच्या परिसरात चाकूने भोसकून खून करणाऱ्या पतीसह चार जणांना वैजापूर न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोयिऊद्दीन एम. ए. यांनी हा निकाल दिला. ३ ऑक्टोबर २०२० मध्ये घडलेल्या या खुनाच्या घटनेत केशरबाई कारभारी गवळी (८०) रा. भिंगी बोरसर या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी कारभारी किसन गवळी (८०), त्याची दोन मुले भारत कारभारी गवळी (४७), अतुल कारभारी गवळी (२१) सर्व रा. घायगाव ता. वैजापूर व त्यांचा नातेवाईक रघुनाथ जगन्नाथ सरोवर (३०) रा. गारज यांना…
