Author: Annant Ppangarkar

गुरुवार, दि. ३० मे महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात आंदोलनादरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला संगमनेरात जोडे मारो आंदोलन करत निषेध करण्यात आला. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ज्या मनुस्मृतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळले तीच मनुस्मृती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाडमध्ये जाळली, मात्र मनुस्मृती दहन करण्याच्या नादात अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्रदेखील त्यांच्याकडून फाडले गेले. हा प्रकार लक्षात येतात जितेंद्र आव्हाड यांनी झाल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली. मात्र याचे पडसाद सर्वत्र उमटत आहे. संगमनेरमध्ये या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी महायुतीच्यावतीने…

Read More

बुधवार, दि. २९ मे  संगमनेर तालुक्यात मागील काही वर्षात औद्योगिकीकरणाच्या नावाखाली खरेदी झालेल्या वन जमीनींच्या व्यवहारांची सखोल चौकशी करावी, या जमीनींवर उद्योग उभारणी झाली नसल्यास या जमीनी तातडीने ताब्यात घ्याव्यात, जमीनी खरेदी करताना मुद्रांक शुल्कामध्ये घेतलेल्या सवलतींची पायमल्ली झाली असल्यास त्याची भरपाई संबंधीतांकडून वसूल करण्यात यावी अशा मागण्या एका निवेदनाद्वारे भाजपच्यावतीने प्रांताधिकार्‍यांकडे बुधवारी करण्यात आल्या. भारतीय जनता पक्षाच्यावतीने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वनजमीनींच्या खरेदीविक्री व्यवहारातील अनागोंदी कारभाराबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. पंधरा दिवसांत या वनजमीनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची चौकशी न झाल्यास प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही या शिष्टमंडळाने दिला. शिष्टमंडळात ॲड. श्रीराम गणपुले,…

Read More

बुधवार, दि. २९ मे | अनंत पांगारकर तब्बल नऊ महिने फरार राहिलेला दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपल्यानंतर त्याला संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने १३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. कुटेला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याच्याकडून जामीन अर्ज दाखल होण्याची शक्यता निर्माण झाल्याने ठेवीदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दूधगंगा पतसंस्थेचा संस्थापक चेअरमन असलेल्या भाऊसाहेब कुटेसह २१ जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ८१ कोटीच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कुटे फरार होता. याच गुन्ह्यात त्याच्या कुटुंबियांना थेट सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर २४ मे रोजी कुटे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याला पाच…

Read More

संगमनेरच्या हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावरील वाहतूक तासभर धरली रोखून! ६ जून पर्यंत तपासासाठी दिली डेडलाइन, पुढचे आंदोलन पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर बुधवार, दि. २९ मे १७ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून रितेश सारंग पावसे व प्रणव सारंग पावसे या दोन सख्या भावांचा मृत्यू झाला होता. हा अकस्मात मृत्यूचा प्रकार नसून घातपाताचा असल्याचा संशय ग्रामस्थांना असल्याने याप्रकरणी पुढे कोणताही तपास न झाल्याने, चौकशी करून आरोपींवर कारवाई करावी यासाठी बुधवारी (दि. २९ मे) नाशिक पुणे महामार्गावर हिवरगाव पावसातील टोल नाक्यावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. ६ जून पर्यंत पोलीस प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करत संबंधितांवर कारवाई…

Read More

बुधवार, दि. २९ मे  पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालाच्या आधारे खासदार राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार नोटीस बजावली जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी तपास अहवाल न्यायालयात सादर केला आहे. सावरकर यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात म्हटले आहे. या आधारे हे नोटीस बजावली जाणार आहे. खासदार राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात गांधी…

Read More

बुधवार, दि. १९ मे  लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावरील दगडफेक प्रकरणातील आरोपींचा पोलिसांना अद्यापही शोध लागलेला नाही. घटनेला महिन्याचा कालावधी उलटत असून अद्यापही आरोपी मोकाट आहे. राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत सरस वाढले होती. तिरंगी झालेल्या या लढतीत कोण बाजी मारतो हे चार जूनला समोर येणार आहे. एकीकडे निवडणुकीचा निकाल तोंडावर असताना दुसरीकडे मात्र महिनाभरापूर्वी झालेल्या उमेदवाराच्या वाहनावरील दगडफेक प्रकरणातील आरोपी शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ८ मे रोजी रात्री प्रचार संपवून घरी परतत असताना रुपवते यांच्या वाहनावर चितळवेढे येथे…

Read More

बुधवार, दि. २९ मे ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या त्रिकूटाला पोलिसांनी पकडले असून आणखी एकाचा शोध सुरू आहे. शेजारच्याच सिन्नरमधील एका हॉटेलमध्ये संशयित आरोपींकडून तयार केल्या जात होत्या. संगमनेरमध्ये देखील या नोटा आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकच्या अंबड पोलिसांनी ही कारवाई केली. संशयित अशोक अण्णा पगार (वय ४५ वर्ष, रा. मेंढी, ता. सिन्नर) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीत हा प्रकार समोर आला. पोलिसांनी या प्रकरणी हेमंत लक्ष्मण कोल्हे (वय ३२ वर्ष, रा. वाशी, नवी मुंबई) याला नाशिकमधून व नंदकुमार तुकाराम मुरकुटे (वय ५२ वर्ष, रा. सिन्नर) याला सिन्नरमध्ये सापळा रचून अटक केली असून…

Read More

मंगळवार, दि. २८ मे  गेल्याच आठवड्यात व्हाट्सअपवर करण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंवरील वादग्रस्त पोस्ट प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यापाठोपाठ आज पुन्हा एकदा याच ग्रुपच्या ॲडमिनवर वादग्रस्त पोस्ट टाकल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी संगमनेर शहर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये तेढ निर्माण होईल, दोन धर्मियांच्या भावना दुखावतील अशा प्रकारच्या पोस्ट काही विघ्न संतोषी लोकांकडून जाणीवपूर्वक समाज माध्यमांवर टाकल्या जातात. संगमनेरमधील माध्यमही यात मागे नाही. बऱ्याच व्हाट्सअप ग्रुपवर अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत असल्याने शहरातील शांततेला गालबोट लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पोलीस व प्रशासनाकडून अशा प्रकारच्या…

Read More

संगमनेर तालुक्यातील कासारे शिवारात कारवाई, दोघांना पकडले कार्यकर्त्यांच्या प्रखर भूमिकेमुळे वजन केल्यावर गोमांस भरले १३ टन मंगळवार, दि. २८ मे गोवंश हत्या बंदी कायद्यानंतर शेकड्याने कारवाया, आंदोलने करून देखील देशाच्या अनेक भागात, काना कोपऱ्यात गोमांस पुरविणारे संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने सुरूच आहे. कोणत्याही कायद्याचा धाक येथील कसायांना राहायला नसल्याने पोलीस दलाच्या नाकावर टिच्चुन किंबहुना त्यांच्याच काही लोकांच्या आशीर्वादाने हे कत्तलखाने सुरू असल्याचा आरोप संगमनेरकर नागरिकांमधून नेहमी होतो. मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल करून गोमांस वाहतूक होत असलेला एक आयशर ट्रक (MH17 BY7824) बजरंग दलाच्या श्याम प्रसाद थोरात, शाम रावबा नाईकवाडी, सुरेश मनोजकुमार कालडा यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासारे…

Read More

मंगळवार, दि. २८ मे पुण्यासह देशाला हादरवून सोडणाऱ्या पोर्शे कार अपघातानंतर आता पुन्हा दुसरी धक्कादायक बातमी समोर आली आहे. नगर रस्त्यावर खराडी जकात नाका येथे भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना दिलेल्या धडकेत तिघांपैकी दोघा महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मालवाहतूक ट्रक वाघोलीतून पुण्याच्या दिशेने जात असताना खराडी येथील जकात नाका चौकात हा अपघात झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून श्यामबाबू रामफळ गौतम असे या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक गौतम हा ट्रक (MH12 VF6441) घेऊन चंदन नगरच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. जकात नाका…

Read More

सोमवार, दि. २७ मे संगमनेरमधील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांच्या कारवाया सातत्याने सुरू आहे. रविवारी रात्री देखील पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात कत्तल केलेल्या गोवंश जनावरांचे ६०० किलो गोमांस आढळून आले आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. उपअधीक्षक वाघचौरे यांना शहरातील जुना जोर्वे रोड लगत असलेल्या मदिना नगर मध्ये एका पांढऱ्या रंगाच्या (MH17 BD4182) बोलेरोमध्ये गोवंश जनावरांचे कत्तल केलेले नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी याची माहिती आपल्या पथकातील पोलीस कर्मचारी राहुल डोके व राहुल सारबंदे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी यांच्यासह पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीच्या…

Read More

मौलानासोबत मुलीचा विवाह करून देण्यास पित्याने दिला होता नकार साथीदारांच्या मदतीने खून करत मौलानाने घेतला बदला अकस्मात मृत्यू म्हणून नोंदल्या गेलेल्या प्रकरणाची महिनाभरात पोलिसांनी केली उकल सोमवार, दि. २७ मे गेल्या महिन्यात संगमनेर तालुक्यातील मालदाड गावच्या शिवारात असलेल्या जंगलामध्ये मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटविल्यानंतर पोलीस दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र हा मृत्यू अकस्मात नसून संबंधित व्यक्तीचा घातपात झाल्याचे समोर आले असून याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून मौलानासह त्याला मदत करणाऱ्या दोघांपैकी एकाला अटक केली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीचा मुलगा जुनेद आहातेशाम अन्सारी याने दिलेल्या फिर्यादीवरून आहतेशाम इलियास अन्सारी यांचा खून केल्याप्रकरणी मौलाना…

Read More

सोमवार, दि. २७ मे नासिक पुणे महामार्ग लगत भर वस्तीत असलेल्या मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या चार जणांना पोलिसांनी पकडले. ही कारवाई रविवारी (दि. २६) दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील शक्तिमान टॉवर परिसरात करण्यात आली. राजू कचरू मिसाळ (वय ४७, रा. गल्ली क्रमांक १५, गणेशनगर, संगमनेर), नितीन सुंदरलाल ठाणेकर ( वय ४५, रा. वाडेकर गल्ली, संगमनेर), राजेंद्र जिजाबा फटांगरे (वय ४७, रा. गल्ली क्रमांक ३, जनतानगर, संगमनेर) व नीलेश चंद्रकांत अष्टेकर (वय ५०, रा. डेरे शाळेच्या पाठीमागे, रहाणे मळा, संगमनेर) अशी पोलिसांनी पकडलेल्या जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी या चौघा जणांकडून जुगाराचे साहित्य, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ३६ हजार रुपयांचा…

Read More

सोमवार, दि. २७ मे संगमनेरमध्ये कंटेनर चालकाने कोल्हार-घोटी राज्य मार्गावर संगमनेरनजीक बुलेटस्वारांना दिलेल्या धडकेत बुलेटवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक कंटेनर घेऊन फरार झाला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत रवींद्र भुजबळ (वय ३३ वर्ष) व गोरख सयाजी पर्वत (वय ४० वर्ष, दोघे रा. निंबाळे, ता. संगमनेर) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. रविवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील मृतक त्यांच्या ताब्यातील बुलेट मोटरसायकलवरून (एम. एच. १४ एच. टी. ५००६) कोल्हार-घोटी राज्य मार्गाने संगमनेर-लोणी रोडने घरी जात असताना लोणी रस्त्यावर फ्लॉवर मार्केटजवळ अज्ञात कंटेनर चालकाने बुलेटस्वारांना पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातातील…

Read More

सोमवार, दि. २७ मे व्हाट्सअप ग्रुपवर लोकमत न्यूजमधील व्हिडिओ टाकत त्याखाली टाकलेल्या एका मेसेजमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने मेसेज टाकणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अमोल चंद्रभान पेरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयुब लालखान पठाण (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) याच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठाण याने गावातील एका व्हाट्सअप ग्रुप वर लोकमत न्यूजमधील सुमारे दोन मिनिटांचा व्हिडिओ टाकत त्याखाली “अखेर डाव साधलाच. केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातील खाजगीकरण केलय. रद्द केलेला जीआर पुन्हा काढण्यात आला आहे.…

Read More

रविवार, दि. २५ मे अपघातातील जखमीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन येणारी रुग्णवाहिका आणि एसटी बसचा संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोंची शिवारात अपघात झाल्याची माहिती मिळाल्याने येथील कुटे रुग्णालयाची रुग्णवाहिका (विंगर एम.एच. – १७ ए-जी ८००२) घटनास्थळी जखमींना आणण्याकरिता गेली होती. अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन येत असताना या रुग्णवाहिकेचा आणि एसटी बसचा (एम. एच. १४ बी.टी. ३८०३) कोकणगाव शिवारात अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहे. जखमीत रुग्णवाहिकेच्या चालकाचाही समावेश आहे.…

Read More

संडे स्पेशल फिनलँड हा उत्तर युरोपातला एक देश आहे. या देशाची लोकसंख्या फक्त पंचावन्न लाख आहे. इथली शिक्षणव्यवस्था निव्वळ जगावेगळी नसून ती जगातील सर्वात चांगली मानली जाते. फिनलँड शंभर टक्के साक्षर देश आहे. इथले विद्यार्थी जगात सर्वात जास्त हुशार विद्यार्थी म्हणून गणले जातात. पीआयएसए (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट) म्हणजे “पिसा” नावाची संस्था जगातल्या पंधरा वर्षांच्या शिकणाऱ्या मुलांचं गणित, विज्ञान आणि इतर विषयांच्या अनुषंगानं परीक्षण करते, त्या संस्थेच्या परीक्षेत फिनलँडचे विद्यार्थी कायम सर्वोच्च स्थानी असतात. या देशात शिक्षण पूर्णपणे मोफत असून ते सर्वांसाठी ते उपलब्ध आणि अनिवार्यसुद्धा आहे. या देशातील प्रत्येक विद्यार्थी आपलं संपूर्ण शिक्षण फुकट घेतो. त्यासाठी त्याला एकही…

Read More

रविवार, दि. २६ मे | अनंत पांगारकर खचल्यानंतर तब्बल दीड वर्ष नव्या निर्मितीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाजत गाजत केलेल्या भूमिपूजनानंतरही दीर्घकाळ रेंगाळलेला म्हाळुंगी नदीवरील पूल पाडण्यास अखेर मुहूर्त सापडला आहे. शनिवारपासून खचलेला पूल पूर्णतः नामशेष करण्यास सुरुवात झाली. यामुळे दीर्घकाळ गैरसोयीला सामोरे जाणाऱ्या संगमनेरकरांना नव्या पुलाच्या निर्मितीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.  दरम्यान खचलेला हा पूल गेल्या दीड वर्षांपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद होता. पुलाचा विषय राजकीय श्रेयवादात अडकल्याने संगमनेरकर यातून भेटीला धरले गेले होते. यासाठी म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्या माध्यमातून एकवटलेल्या संगमनेरकरांना अखेर न्याय मिळाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आलेल्या मागणीमुळे केवळ हाच पूल…

Read More

संडे स्पेशल! पुण्यात झालेल्या ‘हिट अँड रन’ केसमध्ये एका बिल्डर व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने नशेत दीड ते दोन कोटी रुपयांच्या अतिशय महागड्या परदेशी बनावटीच्या कारने दोघांना चिरडले. त्यांचा अत्यंत दुर्दैवी पद्धतीने अंत झाला. घटनेतील दोषीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोप असलेल्या बालगुन्हेगाराला (विधी संघर्षित बालक) ताब्यात घेऊन पोलिसांनी जुव्हेनाईल जस्टीस बोर्डासमोर हजर केले. त्याला बोर्डाच्या सदस्यांनी तात्काळ जामीन पुढील अटीवर दिला, अट ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची, मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेण्याची, १५ दिवस वाहतुकीचे धडे गिरवण्याची शिक्षा देऊन जामिनावर मोकळे केले. आरोपीला पोलिसांनी तसेच स्थानिक आमदारांनी मदत केली, असे आरोप करण्यात आले. ज्याने दोघांना चिरडलं, दोन कुटुंब उद्ध्वस्त केली, अशा प्रवृत्तीला ताब्यात घेतल्यावर…

Read More

ईडीच्या अधिकार्‍यांनी देशभर मांडलेल्या उच्छादाला सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याने चांगलंच उताणं पाडलंय. सत्ताधार्‍यांची मर्जी राखण्यासाठी लोकशाहीची उघड थट्टा उडवणार्‍या या विभागातल्या अधिकार्‍यांना आणि सत्तेसाठी निरपराधांवर खोटे गुन्हे लादणार्‍या सत्ताधार्‍यांच्या मस्तीला जमिनीवर आणणार्‍या सर्वोच्च न्यायालयाचे मानावेत तितके आभार कमी आहेत. असे निवाडे देताना संबंधितांच्या कृतीची चिकित्सा करण्याचं फर्मान न्यायालय काढतं. मात्र यावेळी ते निघाले नाहीत. ते निघाले असते तर गब्बर झालेल्या ईडी अधिकार्‍यांच्या लुटीचे सारे फेरे बाहेर आले असते. या विभागात आल्यापासून कोण किती श्रीमंत झाला ते जगापुढे आलं असतं.   सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्याला धरून आला असल्याने व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार्‍यांनी किती कमाई केली, याचा लेखाजोखा बाहेर आणला…

Read More