Author: अनंत पांगारकर
संगमनेर, दि. २५ फेब्रुवारी संगमनेर शहरालगत असलेल्या आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंजाळवाडी शिवारामध्ये गुरुवारी पुण्याच्या रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली होती. या कारवाईत संगमनेरमध्ये भारतीय चलनातील बनावट नोटा तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले होते. आता या प्रकरणी पोलिसांनी पकडलेला आरोपी ज्या ग्रामपंचायतमध्ये काम करत होता त्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांकडे बनावट नोटासंदर्भात चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. बनावट नोटांसाठी वापरण्यात येणारा कागद संगमनेरमध्ये कुरिअर मार्फत प्राप्त झाल्याची माहिती पुण्याच्या रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांना मिळाली होते. या अधिकाऱ्यांसह संगमनेरच्या स्थानिक पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकत कारवाई केली होती. या कारवाईत नोटा छापण्यासाठीचा मुद्देमाल…
ॲड. श्रेयस देशमुख, पुणे भारतात गेल्या काही वर्षांत डिजिटल क्रांती मोठ्या वेगाने घडत आहे. सरकारी योजनांपासून ते बँकिंग सेवांपर्यंत सर्वच क्षेत्रांत डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत देशाच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्याचे नाव आहे भारतपोल. हे पोर्टल म्हणजे भारत सरकारच्या अंतर्गत यंत्रणांना आणि पोलीस दलांना एका जागी आणणारी अत्याधुनिक डिजिटल प्रणाली आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या आणि भौगोलिक विस्तार असलेल्या देशात गुन्हेगारी नियंत्रणासाठी अशा एका केंद्रीकृत प्लॅटफॉर्मची गरज होती, जी भारतपोलच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने, विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, देशातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आधुनिक…
संगमनेर, दि. २४ प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यावर्षी देखील शिवाजी जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. यासाठी उत्सव समिती गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी गोविंद नागरे तर कार्याध्यक्षपदी बाळासाहेब घोडके यांची निवड करण्यात आली आहे. तिथीनुसार येत्या १७ मार्चला शिवजयंती उत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्याबद्दल चर्चा करण्यात आली. यासाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. शिवसेनेकडून दरवर्षी शिव जयंती उत्सव साजरा केला जातो. संध्याकाळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिवभक्त, नागरिक देखील या मिरवणुकीत सहभागी होत असतात. यावर्षी देखील ही मिरवणूक भव्यदिव्य स्वरूपात काढली जाणार…
संगमनेर – रोटरी क्लब ऑफ संगमनेर तर्फे आयोजित करण्यात आलेला ‘आनंदी रस्ते’ हा अनोखा उपक्रम रविवारी उत्साहात पार पडला. शहरातील आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाला प्रतिसाद दिला. रोटरी क्लबच्या आनंदी रस्ते या उपक्रमात नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्री थोरात तसेच संगमनेर शहरातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. यंदा या उपक्रमाचे नववे वर्ष होते आणि यामध्ये विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलने गायन, पथनाट्य, मल्लखांब तसेच वादनाचे कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण प्रयागराज कुंभमेळ्याच्या थीमवर आधारित आयोजन होते, ज्यामध्ये अघोरी साधू…
संगमनेर – संगमनेर तालुक्यात घरकुल वाटपात येथून मागे राजकारण झाले होते. परंतु येथून पुढे घरकुल वाटपाचे काम अत्यंत पारदशींपणे केले जाईल. ज्याला खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज आहे. अशा गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जाईल, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. तालुक्यातील ७,१४५ घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता ऑनलाइन जमा करण्यात आले असल्याचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना आमदार खताळ यांच्या हस्ते पंचायत समिती सभागृहात देण्यात आले. यावेळी संगमनेर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, रोहिदास गुंजाळ, सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे उपअभियंता गणेश गुंजाळ, लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता हितेंद्र गव्हाळे, कृषी अधिकारी वाळीबा उघडे व रामराव…
संगमनेर, दि. २३ फेब्रुवारी आधीच शेतमालाला भाव नाही त्यातच डाळिंबाच्या शेतातून चारशे ते पाचशे किलो डाळिंब चोरी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहरालगच्या सुकेवाडी येथे हा प्रकार घडला. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात संजय बबन सातपुते (वय ३०, धंदा शेती, रा. खांजापूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुकेवाडी येथील एका मुलाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, फिर्यादी संजय सातपुते यांचे सुकेवाडी (संगमनेर) येथे डाळिंबाचे शेत आहे. बुधवारी (१९ फेब्रुवारी) ते दुपारच्या वेळी शेतात आले असताना त्यांना गावातील मुलगा शेतातून त्यांच्या संमतीशिवाय डाळिंब तोडून घेऊन जात होता. फिर्यादीला बघून बांधावरून पळत असताना…
संगमनेर, दि. २३ फेब्रुवारी नगरपालिका हद्दीतील अवैध बांधकामे व अवैध कत्तलखान्यांविरोधात हाती घेण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये अतिक्रमण हटवितांना असे काही समोर आढळले की त्यामुळे पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी (२० फेब्रुवारी) संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्याचा प्रशासक रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील काही कत्तलखान्यांचे अतिक्रमण निष्काशीत करण्याची कारवाई करण्यात आली. नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, उपनगर अभियंता महेश गोर्डे, अल्ताफ शेख, भीमाशंकर वर्पे, जयराम मंडलिक, पंकज मुंगसे यांच्यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पथक व संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक संयुक्तरित्या अवैध बांधकामे व बेकायदेशीर कत्तलखान्याचे बांधकामे पाडण्याचे…
संगमनेर, दि. २३ फेब्रुवारी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेसचे राज्यातील मातब्बर नेते म्हणून बघितले जाते. अनेक जण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत थोरात यांचा पराभव झाल्याने आता काँग्रेसला गळती लागल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले अहिल्यानगरचे किरण काळे आज रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहे. तर पुण्याचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे देखील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असून त्याच्या दोन दिवसात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ते निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विचारांशी बांधिलकी सांगणारे…
हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवरायांचे आपणच जणू कर्तेधर्ते आहोत, अशा तोर्यात भाजपचे नेते छत्रपतींचे आज पोपटासारखे गुणगाण करत आहेत. शिवरायांवर आपलाच तेवढा अधिकार असल्याची भाजपची मस्ती अजून उतरलेली दिसत नाही. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ट्विटवर टीका करताना भाजपच्या नेत्यांनी कंबरेचंही सोडलं. आपल्या टीकेला जनाधार नाही, हे लक्षात असूनही त्या पक्षाचे नेते स्वत:ला आवरू शकत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी श्रध्दांजली अर्पण केल्याचं ट्विटचं निमित्त करत भाजपच्या काही नेत्यांनी जिभेवर येईल ती टीका केली. भाजपशी आणि त्या पक्षाची पालकसंस्था असलेल्या संघाशी अर्थाअर्थी संबंध नसलेले नेतेच बडबड करत होते. कोणी राहुल…
संगमनेर, दि. २२ फेब्रुवारी – दुचाकीस्वाराला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयटेन कारने जोराची धडक दिल्याने शेजारून जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून झालेल्या विचित्र अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. नासिक पुणे बाह्यवळण मार्गावर कृष्णा लॉन्स जवळ शनिवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदाम देवराम वर्पे (वय ४८ रा. चिकणी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या संदर्भात माहिती अशी, सुदाम वर्पे हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून (MH 17 M 9879) पुण्याच्या दिशेने जात असताना कृष्णा लॉन्स जवळ त्यांच्या दुचाकी ला मागून येणाऱ्या आयटेन कार चालकाने जोराची धडक दिली. कारची जोरात धडक बसल्याने वर्पे दुचाकी वरून…
