Author: Annant Ppangarkar

रविवार विशेष लेख @ प्रवीण पुरो  महाराष्ट्र संवाद न्यूज भारतीय लोकशाहीचे चार खांब केव्हाच निखळले आहेत. अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय मिळेलच यावर जसा न्यायालयावर भरवसा राहिलेला नाही तसं प्रशासन मागणीप्रमाणे हलेल यावरही कोणाचा विश्‍वास राहिलेला नाही. सरकार मतलबी झाल्यावर शासनाकडूनही न्यायची अपेक्षा करण्यात अर्थ राहत नाही. एका स्तंभाकडून या अपेक्षा पूर्ण होतील, अशी धारणा होती त्या पत्रकारितेत घुसलेल्या अपप्रवृत्तीने लोकशाहीचे धिंडवडे उडवलेत. अखेरचं अस्त्र म्हणून लोकं माध्यमांकडे अपेक्षेने पाहत होती. पण काही अपवाद वगळता या माध्यमांची लेखणीही म्यान झालेली पाहण्याचं दुर्भाग्य आपल्या नशिबी आलंय. लोकशाहीची पावलोपावली टर उडवणार्‍या सत्तेच्या विरोधात तर माध्यमांनी अधिक जबाबदारीने आपली लेखणी चालवणं अपेक्षित असताना ज्यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गणेशनगर – प्रवरा कारखान्याचा गणेश कारखान्यासोबत असलेला आठ वर्षांचा करार जून २०२२ ला संपल्यानंतर विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने कारखाना चालविला. त्या काळात संचालक मंडळांने आर्थिक व्यवहार करण्याकरता सह्यांचे अधिकार खासदार सुजय विखे पाटील यांना दिले. खासदार विखे पाटील हे गणेश कारखान्याचे सभासद किंवा संचालक नसतानाही त्यांना सह्यांचे अधिकार का दिले गेले? गणेश कारखान्याचे जिल्हा बँक आणि सेंट्रल बँकेत नियमित अकाउंट असतानाही प्रवरा बँकेत नवीन खाते उघडून तिथूनच का व्यवहार करण्यात आला? गणेशच्या कारभारात जो सावळा गोंधळ झाला त्याची जबाबदारी खासदार सुजय विखे पाटील घेणार का? असा सवाल गणेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तालुक्यातील वरवंडी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र रामेश्वर मठ येथे ब्रह्मलीन माणिकगिरी,बिरोबा महाराज फिरत्या नारळी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती येथील गुरुवर्य महंत दत्तगिरी महाराज यांनी दिली. येथील रामेश्वर मंदिराच्या सभामंडपात सप्ताह संदर्भात नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी बैठकीस गावातील अनेक गावकरी भाविक, पुढारी आदी सर्व जण उपस्थित होते. दत्तगिरी महाराज म्हणाले, वरवंडी पंचक्रोशीतील ह्या सर्वात मोठ्या ब्रह्मलीन माणिकगिरी, बिरोबा महाराज ह्या फिरत्या नारळी म्हणजे महासप्ताचे आयोजन रविवारी (दि.१७ डिसेबर २०२३) केले असून या अखंड हरिनाम सप्ताहसाठी सर्व गावकरी तालुक्यातील भाविक भक्तांनी तन्मयतेने सामील व्हावे. यावेळी वरवंडी गावातील सर्व लोकांनी या सप्ताहाची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर:- तालुक्यातील सावरगावतळ येथे शुक्रवारी (ता. 22 सप्टेंबर) रात्री गोठ्यावर वीज पडून एक गाय ठार झाली आहे. गाईचा मृत्यू: गेल्या महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी तालुक्यात दमदार सुरुवात केली आहे. रात्री संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथेही विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यात गावातील आण्णासाहेब बाबुराव नेहे यांच्या गोठ्यावर वीज पडून एक गाय ठार झाली असून गोठ्यातील गव्हाच्या भुश्यानेही पेट घेतला होता. दुर्घटना टळली: या दुर्घटनेत सुदैवानं इतर फार मोठी जीवीत हानी झाली नसली तरी नेहे यांना यामुळे आपली गाय गमवावी लागले आहे. वरिष्ठांकडून पाहणी:  ही माहिती आण्णासाहेब नेहे यांनी गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना कळविली असता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – क्षणाक्षणाला पडणार्‍या टाळ्या.. त्याला मिळणारी शिट्ट्यांची साथ.. उपस्थितांतून होणारा जल्लोष आणि गणपती बाप्पांचा जयजयकार आणि सोबतीला मुसळधार पाऊस अशा जल्लोशपूर्ण वातावरणात संगमनेर फेस्टिव्हलचा तिसरा दिवस गाजला. विजेता: मुंबईच्या आरडी वॉरिअर्स नृत्य संघाने सादर केलेल्या महाभारतावर आधारित हिपहॉप नृत्याने मालपाणी लॉन्सचा परिसर अक्षरशः भारावून गेला. हे नृत्य इतके बहारदार होते की त्याच्या सादरीकरणातच या संघाने पहिले पारितोषिक पटकाविल्याचे आडाखे बांधले गेले. कनिष्ठ गटातही मुंबईच्याच इंडियन आर्मी नृत्य संघाने सर्जीकल स्ट्राईकच्या पार्श्‍वभूमीवर अप्रतिम नृत्य सादर करीत उपस्थितांना देशभक्तीत चिंब केले. राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा: राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या आजच्या तिसर्‍या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरात विनापरवाना गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली आहे. वास्तविक या मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांकडून ऑनलाईन अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र बहुतांशी गणेश मंडळांनी अशा प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांच्या भेटीत समोर आले आहे. पोलीस ठाण्यात करा अर्ज: सध्या गणेशोत्सव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. गणेश मंडळांनी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक असून वेळोवेळी सूचना देऊन देखील संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बऱ्याच सार्वजनिक व खाजगी गणेश मंडळांनी अद्याप पावतो पोलीस ठाण्यातून गणेश उत्सव साजरा करण्यासंबंधी अर्ज केलेला नाही. परवानगी घ्या: या संदर्भात पोलीस निरीक्षक भगवान…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या दुचाकी, शेती औजारांच्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसांनी शुक्रवारी एकाच वेळी चौदा भंगार दुकान, गोडाऊनची एकाच वेळी झाडाझडती घेतली. या तपासणीत पोलिसांना काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. तक्रारी: संगमनेर पोलीस उपविभागातील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी, राजुर आणि अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटर सायकल चोरी, शेतकऱ्यांची शेती औजारे, शेती पंप, केबल, बॅटरी चोरीचे गुन्हे सातत्याने वाढत असून त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढत आहे. 14 छापे: गेल्या काही महिन्यांमध्ये शेतकऱ्याचे स्प्रिंकलर पाईप, ठिबक सिंचन पाईप तसेच सबमर्सिबल पंप चोरी झाल्याबाबतचे काही गुन्हे देखील विविध पोलीस स्टेशनला दाखल आहे. चोरट्यांकडून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – मनामनात दरवळणारी गाणी.. सुमधूर आवाजातून सादर होणार्‍या एकामागून एक सुरेल रचना.. हिंदी, चित्रपटगीतांपासून ते अलिकडच्या काळात तरुणाईत प्रचंड गाजलेली सुफी गाणी व रिमिक्स.. निवेदकाचे समयोचित निवेदन आणि बहारदार संगीताने संगमनेर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस गाजला. विविध दूरचित्र वाहिन्यांवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या कलाकारांच्या सुमधूर आवाजातील गाण्यांनी सजलेल्या मैफीलीने संगमनेरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. गणेश आरतीचा यांना मिळाला मान: राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या दुसर्‍या दिवशी फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनिष मालपाणी, सीए कैलास सोमाणी, राणीप्रसाद मुंदडा, सोनु राजपाल, नवनीत कोठारी, सत्यम वारे, राजकुमार गांधी, अजित भोत आदींच्या हस्ते गणरायांची आरती करण्यात आली. प्रेक्षकांना…

Read More

दराडे कुटुंबावर काळाचा घाला, एकाच कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषाचा मृत्यू  महाराष्ट्र संवाद न्यूज आश्वी – संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी अझमपुर गावात नुकतीच मन हेलवणारी व मनाला सुन्न करणारी घटना घडली. १० दिवसापुर्वी येथील मितभाषी व जुन्या पिढीतील पदवीधर लक्ष्मण कारभारी दराडे यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते. गुरुवारी (२१ सप्टेंबर) त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडत असतांना काकस्पर्श होण्याआधीचं त्यांचा मोठा मुलगा दिलीप (वय ४०) याचादेखील ह्रदय विकाराने मृत्यू झाल्यामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. दशक्रिया विधीतच घडली घटना: पिप्रींलौकी अजमपूर येथे दहा दिवसांपूर्वी लक्ष्मण कारभारी दराडे यांचे उपचारादरम्यान एका खाजगी रुग्णालयात निधन झाले होते. गुरुवारी त्यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच हिंदुस्तान फीड्स पशुखाद्य या कंपनीच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पांडुरंग वर्पे होते. शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा कविता संपत भोसले, सदस्या प्रमिला भोसले, प्रमोद शिंदे, रेवणनाथ वर्पे, मच्छिंद्र वर्पे, प्रवरेचे प्राचार्य जगदीश मुंतोडे, रोहिदास वाडेकर, ऋषीकेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सावली सर्विसेसचे अधिकृत विक्रेते सत्यजित वाडेकर यांनी विशेष प्रयत्न केले. हिंदुस्तान फिड्स पशुखाद्य कंपनीतर्फे रविंद्र पवार, नितीन ननवरे, डॉ. केतन पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. रविंद्र पवार यांनी दुधाचे अन्नातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – बहुजन उद्धारक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ३७० गड किल्ल्यांपैकी २९६ गड किल्यांवर केरळ येथील शिवप्रेमी पर्यटकाने सायकल परिक्रमा केल्याने महाराष्ट्रातील गिर्यारोहक आणि पर्यटन प्रेमीमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. केरळ येथील एस. के. हमराज तथा शिवराज गायकवाड हे १ मे २०२२ रोजी केरळ येथुन सायकलवर महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाले. उद्देश एकच फक्त शिव विचारांची प्रेरणा त्यांनी आतापर्यंत २९६ गड किल्ले सर केले आहेत. घनदाट जंगल-झाडी, कडे-कपारीतून वाट काढत ते किल्ल्यांवर पोहोचतात छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आणि दातृत्व फार मोठे असल्याचा अनुभव यावेळी त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात प्रवासात अनेक जण आस्थेवाईकपणे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल होऊन महिनाभराचा कालावधी उलटला आहे. मात्र मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याच्यासह सर्वच आरोपी अद्यापही बाहेरच असल्याने या प्रकरणात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी ठेवीदारांनी केली आहे. यांनी दिले निवेदन: महसूल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी संगमनेरमध्ये आले होते. यावेळी दूधगंगा खातेदार-ठेवीदार संघर्ष समितीच्यावतीने मोहन लांडगे, पोपट आगलावे, कैलास देशमुख, प्रभाकर रहाणे, सुनील सातपुते, मोरेश्वर जगताप, अनिल जोंधळे, चंद्रभान लांडगे, विकास सहाने, पुंजाहरी जोर्वेकर, शिवाजी कोल्हे, भारत सातपुते आदींनी त्यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एखादा उपक्रम सातत्याने पंधरा वर्ष राबवणं आणि त्याद्वारे एकाहून एक सरस कार्यक्रमांचे आयोजन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाने याही पुढे जावून समाजासाठी नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंडळाने यावर्षी ‘संगमनेरचा राजा’ म्हणून संबोधल्या गेलेल्या श्रींच्या देखण्या मूर्तीचा आगमन सोहळा आयोजित करुन वेगळा पायंडाही घातला आहे. याशिवाय संगमनेर फेस्टिव्हलच्या मंचावर शहर व तालुक्यात देदीप्यमान यश मिळवणार्‍या कलाकार, खेळाडू व व्यक्तिंचा गौरव होणं ही अतिशय प्रेरणादायी बाब असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या पंधराव्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज कौटुंबिक वादातून पत्नीने संगमनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीचा राग मनात धरून पतीने सासुरवाडीला जात पत्नीसह मेव्हणा आणि आजी सासूची निर्घून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर सासू सासरा आणि मेहुणी यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिर्डीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने मुख्य आरोपीला नाशिक मधून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. शिर्डीत घडले हत्याकांड: शिर्डीच्या सावळीविहीर गावात विलासनगरमध्ये बुधवारी रात्री अकरा वाजता हे हत्याकांड घडले. या घटनेने अहमदनगर जिल्हा हादरला असून वर्षा सुरेश निकम (वय 24 वर्ष), रोहित चांगदेव गायकवाड (वय 25 वर्ष) व हिराबाई धृपद गायकवाड (वय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – व्यवसाय कर रद्द करून देण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांचे लाच घेताना नाशिकमध्ये महिला अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. स्नेहल सुनील ठाकूर असे या महिला व्यवसाय कर अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचेचे कारण: दोन वर्षांपासून बंद असलेल्या कल्पदीप इंडस्ट्रियल सिक्युरिटी सर्विसेस या कंपनीचा व्यवसाय कर रद्द व्हावा, यासाठी तक्रारदाराने 13 सप्टेंबरला व्यवसाय कर अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. हा व्यवसाय कर रद्द करून द्यायच्या मोबदल्यात व्यवसाय कर अधिकारी स्नेहल ठाकूर (वय 52, रा. ग्रँड अश्विन हॉटेल जवळ, ASM 26/26 अश्विन संकुल रो हाऊस नंबर 4, अश्विन नगर, नाशिक) यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – जिल्ह्यातील जनतेला न्याय देण्यासाठी शासन कटीबध्द आहे. अनेक वर्षे सता असूनही ज्यांना तालुक्याला पाणी देता आले नाही त्यांनी आम्हाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये. पालकत्व कसे निभावयाचे ते आम्हांला चांगले कळते. तुम्हीच आमच्याकडून काही शिका, अशी खोचक टिका महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केली. संगमनेर येथील शासन आपल्या दारी’ या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर दहशत करण्यापेक्षा दुष्काळाकडे गांभीर्याने बघा, दहशत करून किंवा धमक्या देऊन संगमनेरचा विकास तुम्ही रोखू शकत नाही. थोडे लक्ष राहाता तालुक्यातही घाला. तेथील जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून आपली अधिक आवश्यकता आहे. पालकमंत्री म्हणून राहा, मालक असल्यासारखे वागू नका, असा सल्ला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री विखे यांना दिला. थोरात म्हणाले, पालकमंत्री पालकाची भूमिका विसरून मालकाच्या भूमिकेत आलेले दिसतात. संगमनेरमध्ये येऊन अधिकारी कर्मचार्‍यांसह विकास कामे पूर्णत्वाकडे नेणार्‍या कंत्राटदारांना धमक्या दिल्या जातात, त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमनेरचा विकास त्यांना बघवत नसल्याने, त्यांचा राग मी समजू शकतो. धाकदपटशा आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – जिल्ह्यात यंदा दुर्दैवाने अद्यापपर्यंत पुरेशा पाऊस झाला नाही. त्यामुळे टंचाईची परिस्थिती आहे. हे मान्य करावे लागेल. ‌टंचाईत पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण यांनी आज येथे दिल्या. संगमनेर तालुका टंचाई आढावा बैठक महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराडे, गटविकास अधिकारी‌…

Read More

पोलिसांच्या नावाने टीका होत असताना बस स्थानकावरील सुरक्षारक्षक नेमके करतात काय? एसटी प्रशासनच चोरीच्या घटनांना कारणीभूत… महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्यातील सर्वात मोठ्या आणि एअरपोर्टचा लूक असलेले संगमनेरचे बसस्थानक दागिने आणि रोकड चोरांसाठी सॉफ्ट टारगेट ठरले आहे. बस स्थानकावरील सातत्याने घडणाऱ्या दागिने, रोकड चोरीच्या घटनांमुळे बस स्थानक प्रशासन आणि येथील सुरक्षारक्षक नेमके करतात काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चोरीच्या या घटनांना एसटी प्रशासनच कारणीभूत असल्याचे बोलले जाते. सर्वाधिक घटना बस स्थानकात: दागिने चोरीच्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक घटना बस स्थानकामध्ये घडल्या आहेत. रविवारीदेखील (17 सप्टेंबर) बस स्थानकामध्ये दागिने आणि रोकड चोरीच्या दोन घटना घडल्या. विशेष म्हणजे एकाचवेळी सायंकाळी चारच्या…

Read More

संगमनेर महाविद्यालयात ‘युवा ही दुवा’ या राज्यस्तरीय उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – आजचा युवक उपक्रमशील आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या बदलत्या गोष्टी तो जलदपणे आत्मसात करतो. युवकांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी यापुढे प्रत्येक महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र चालविण्याचे धोरण आणण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी संगमनेर येथे केले. यांची उपस्थिती: महसूल विभागाच्यावतीने संगमनेर महाविद्यालयात आयोजित ‘युवा ही दुवा’ या राज्यस्तरीय उपक्रमाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.‌ यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शिक्षण…

Read More