Author: अनंत पांगारकर

संगमनेर दि. २० फेब्रुवारी – अनंत पांगारकर मृत्यूनंतर माणसाचा शेवटचा प्रवास किमान सुखकर व्हावा अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते. मात्र मृत्यूनंतर त्याचे क्रिया कर्म करण्यासाठी जाणाऱ्यांना देखील मोठी कसरत करावे लागत असल्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला आहे. परिसरातील नागरिकांना दशक्रिया विधीसाठी प्रवरा संगमावर असलेल्या शांती घाटावर जाण्यासाठी गटारगंगा ओलांडून जावे लागत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  प्रवरा आणि म्हाळुंगी नदीच्या संगमावर संगमनेर नगर परिषदेने दशक्रिया विधीसाठी शांती घाट बांधला आहे. शहरालगतच्या सुकेवाडी, पावबाकी, पोखरी हवेली, खांजापूर, समनापुर आदी ग्रामीण भागातून येथे नागरिक मोठ्या प्रमाणात दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी येत असतात. नगरपरिषदेने बांधलेल्या शांती घाटावर दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही…

Read More

गुरुवार, दि. २० फेब्रुवारी राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात नासिक जिल्हा न्यायालयाने गुरुवारी दोन वर्ष कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर मात्र अवघ्या दोन तासातच न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे मंत्रीपद आणि आमदारकीचे संकट तूर्तास तळले आहे.  मंत्री कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुधीर कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून दिला जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज देऊन लाटल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. तर या खटल्यातील दोघांची न्यायालयाने मुक्तता केली. गुरुवारी न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर कोकाटे यांचे मंत्रीपद आणि आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. निकालानंतर कोकाटे यांनी जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता.  कोकाटे…

Read More

संगमनेर, दि. २० फेब्रुवारी – संगमनेर शहरांनाजीक असलेल्या गुंजाळवाडी शिवारामध्ये बनावट नोटांची छपाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी थेट दिल्लीच्या गुप्तचर विभागाच्या आदेशाने पुणे गुप्तचर विभाग आणि संगमनेर पोलिसांनी कारवाई केली असून काही साहित्यासह एकाला ताब्यात घेतले आहे.  संगमनेर मधील गुंजाळवाडी परिसरात एका घरात नोटा छापल्या जात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. यासंदर्भात दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी पुणे गुप्तचर विभागाला माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पुण्याच्या अधिकाऱ्यांनी संगमनेर मध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित ठिकाणी छापा टाकला.  या छाप्यात बनावट नोटा बनविण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर कागद आणि चलनातील काही बनावट नोटा ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. …

Read More

नाशिक, दि. २० फेब्रुवारी  कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याच्या आरोपात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तब्बल २९ वर्षांनी या खटल्यचा निकाल लागला आहे. १९९५ मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटेंच्या मंत्रीपदासह आमदारकीवर टांगती तलवार आली आहे. तर या खटल्यातील अन्य दोन आरोपींना न्यायालयाने कोणत्याही स्वरूपाची शिक्षा ठोठावली नाही. खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी १९९५ मध्ये सदनिकांच्या घोटाळ्या संबंधाने माणिकराव…

Read More

महाराष्ट्र संवादसाठी लंडनहून विशेष वृत्त | अनुराग फुटाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे प्रेरणास्थान ठरले आहे. महाराष्ट्राच्या या राज्याची जयंती साता समुद्रा पार लंडनमध्ये देखील मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. लंडनमध्ये मराठी युवकांनी साजरी केलेल्या या सोहळ्याला वेलविन हटफिल्ड बॉरो कौन्सिलचे महापौर फ्रॅंक मार्श यांनी आवर्जून उपस्थिती लावली आणि तमाम भारतीयांना शुभेच्छा दिल्या.   युनिव्हरसिटी ऑफ हार्डफोर्टशायरमध्ये गर्जा महाराष्ट्र मंडळाने यासाठी पुढाकार घेतला होता. मार्श यांच्यासह हटफिल्डचे नगरसेवक कार्तिक बंकर हेही शिवजयंतीच्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.  छत्रपती शिवरायांना मराठी, हिंदी, राजस्थानी, गुजराती विद्यार्थ्यांनी यावेळी अभिवादन केलं. विद्यार्थ्यांनी मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, तानाजी मालुसरे यांची रूपं रेखाटली…

Read More

संगमनेर, दि. २० फेब्रुवारी – आयशर टेम्पो चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या घराची भिंत तोडून घरात घुसला. घरात घुसलेल्या टेम्पोमुळे मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेले अख्खे कुटुंबीय बचावले असले तरी गंभीर जखमी झाले आहे. जखमी कुटुंबीयांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  मंगळवारी मध्यरात्री बारा वाजेच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर ही अपघाताची घटना घडली. मनोहर विठ्ठल थोरात (वय ९९), राजू मनोहर थोरात (वय ५८), जुली राजू थोरात (वय ४८), सायली राजू थोरात (वय १९) व सॅम्युवेल राजू थोरात (वय १७) अशी जखमींची नावे आहेत.  मध्यरात्रीच्या वेळी आयशर चालक त्याच्या ताब्यातील आयशरवरील (MH 17 CV 1110)…

Read More

बुधवार, दि. १९ फेब्रुवारी मळीचा टँकर मागे घेत असताना चाकाखाली सापडून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर शहरानजीच्या रायतेवाडी शिवारात घडली. रवींद्र आबासाहेब कालेकर (वय ३७ वर्ष, रा. रांजणगाव बुद्रुक, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी टँकर चालक सुभाष पांडुरंग बोर्डे (रा. रांजणगाव बुद्रुक, ता. राहाता) यांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासानंतर फिर्यादीने फिर्याद दिल्यावर टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुभाष बोर्डे हे त्यांच्या ताब्यातील…

Read More

बुधवार, दि. १९ फेब्रुवारी –  लोकशाहीची मूल्य रुजवणारा आदर्श राजा, उत्तम प्रशासन, दूरदृष्टीचे नेतृत्व, शूरता आणि उत्तम व्यवस्थापन असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र हे प्रत्येकासाठी यशाचे पैलू निर्माण करून देणारे असून अपयशावर मात करण्यासाठी शिवचरित्र अभ्यासणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी केले आहे. मालपाणी लॉन्स येथे एकविरा फाउंडेशन व छत्रपती प्रतिष्ठान यांच्यावतीने राजे शिवछत्रपती यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. व्यासपीठावर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, छत्रपती प्रतिष्ठानचे सचिन आहेर, गणेश मादास, तेजस गोरडे, शैलेश आहेर, ऋषी काकड,…

Read More

संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी – लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली वैभवशाली ठरलेल्या संगमनेर संगमनेर शहरात येणाऱ्या वर्षाच्या आतच प्रत्येकाची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बस स्थानकासमोर उभा करून पुढील वर्षीची जयंती येथे साजरी करू असा विश्वास नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला. बुधवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर तांबे बोलत होते. यावेळी सोमेश्वर दिवटे, किशोर पवार, सतीश आहेर, अंबादास आडेप आदीसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते. तांबे म्हणाले, लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये बस स्थानकासमोर भव्य अश्वारूढ पुतळा वर्षभराच्या आतच उभा राहणार आहे. या पुतळ्यासाठी नगरपरिषदेने…

Read More

संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी – संगमनेर शहरातील बस स्थानकाच्या परिसरात अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व अहिल्यानगरचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू होणार असून एक वर्षाच्या आत हा पुतळा बसस्थानक परिसरातच उभा राहणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरकरांना दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने लहान व मोठ्या मुला-मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवचरित्राचे अभ्यासक चंद्रशेखर कानडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष कोथमीरे, भाजपचे…

Read More