Author: Annant Ppangarkar

अहमदनगर, दि. २६ फेब्रुवारी ८० हजार कोटी रुपयांचा सुरत ते दक्षिणेतील राज्यांना जोडणारा नवीन रस्ता व पुणे ते छत्रपती संभाजी नगर रस्ता महाराष्ट्राचे भविष्य बदलविणारा रस्ता ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. अहमदनगर शहरातील द्वारका लॉन्स येथे ९६१ कोटी रुपये किंमतीच्या अहमदनगर शहर बाह्यवळण रस्ता, ९८० कोटी रुपये किंमतीच्या अहमदनगर-मिरजगाव-करमाळा-टेंभुर्णी पॅकेज (एक) अहमदनगर ते घोगरगाव, व पॅकेज (दोन) घोगरगाव ते चापडगाव या १०३२ कोटी रुपये किंमतीच्या रस्त्यांचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील,…

Read More

संगमनेर, दि. २६ राज्यातील वाळू तस्करीला लगाम लावण्यासाठी महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी नवे वाळू धोरण देखील आणले, मात्र वाळू तस्करांकडून बेकायदा वाळू उपसा सुरूच आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका झेनॉन गाडीला भगवा ध्वज लावून वाळू तस्करी सुरू असल्याचे समोर आले. नगर एलसीबीने दोन दिवसांपूर्वीच संगमनेर मधील वाळू तस्करांवर कारवाई केली, याला काही तासांचा अवधी उलटत नाही तोच तालुका पोलिसांनी महसूलमंत्र्यांच्याच मतदारसंघातील पिंपरणे-जोर्वे रस्त्यावर केलेली कारवाई समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली असून संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, टाटा कंपनीच्या एम. एच. ४२ बी ४०२६ या…

Read More

संगमनेर, दि. २६ कोल्हार-घोटी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास जात आहे. मात्र याच मार्गाचा भाग असलेल्या आणि शहरातून जाणाऱ्या तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतच्या मार्गाचे मजबुतीकरण, डांबरीकरणासह अपूर्ण काम तातडीने करण्याची मागणी संगमनेर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र वाकचौरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधितांकडे केली आहे. तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतचा बहुतांशी भाग वाकचौरे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये मोडतो. संगमनेरमध्ये कोल्हार घोटी मार्गाच्या पूर्णत्वाचे काम बहुतांशी झाले असल्याने या कामातून तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतचा म्हणजेच मेनरोडचे काम झाले नसल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या या रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरणाचे…

Read More

अजय अनिता दोघे ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघेही हुषार. त्यामुळे त्यांना लगेचच चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. हेही त्यांच्या लक्षात आले की They are in love. तेंव्हा त्यांनी लग्न करायचे ठरविले. दोघांच्या घरी एकमेकांची माहिती होतीच, त्यामुळे लगेचच दोन्ही घरचे भेटले व लग्न ठरलं. अनिताने मात्र सर्वांसमोर एक अट ठेवली. ती म्हणाली, मी एकत्र कुटुंबात राहणार नाही. हे ऐकून अजय व त्याचे आई-वडील तर चकित झालेच, बरोबर अनिताचे आई-वडील पण अनिताकडे आश्चर्याने बघू लागले. लगेचच अजयचे बाबा म्हणाले, ठीक आहे. मला अनिताचे कौतुक वाटतं की, तिने हे लग्नाआधी सर्वांसमोर सांगितले. थोडा वेळ द्या आम्हाला. आपण उद्या पुन्हा भेटू व पूढचे ठरवू,…

Read More

नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढचे तीन महिने पंतप्रधान नरेंद्र मोदी “मन की बात” करणार नाही. असे पंतप्रधान मोदी यांनी आज ११० व्या कार्यक्रमात देशाला संबोधित करताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा ११० वा भाग रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित करण्यात आला, यावेळी त्यांनी ही घोषणा केली. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी “मन की बात” करत असतात ऑल इंडिया रेडिओच्या ५०० हून अधिक प्रसारण केंद्रांद्वारे हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. या कार्यक्रमाची सुरुवात ३ ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आली होती. भारतीय समाजातील महिला, वृद्ध आणि तरुणांना समाविष्ट करून विविध घटकांशी जोडणे हा…

Read More

नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन असलेल्या तीन महत्त्वाच्या कायद्यात बदल करून नवे फौजदारी कायदे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याची अंमलबजावणी देशात एक जुलैपासून सुरू होईल. २० नव्या गुन्ह्यामध्ये आणि त्यासाठीच्या शिक्षेतही मोठा बदल करण्यात आला आहे. त्यासाठी नव्या कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवीन फौजदारी कायदे अनुक्रमे भारतीय दंड संहिता (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) आणि भारतीय पुरावा कायदा डिसेंबर २०२३ मध्ये लोकसभेने पारित केला होता.याशिवाय सामूहिक बलात्कारात दोषी आढळल्यास २० वर्षांचा कारावास किंवा दोषी जिवंत असेपर्यंत तुरुंगवास अशी शिक्षा देण्यात येईल.…

Read More

प्रवीण पुरो – भारतीय जनता पक्षाला आता लोकसभेत ४०० चा पल्ला गाठायचा आहे. आजवर सत्ताधार्‍यांना मिळाला नसेल, अगदी इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या हत्तेनंतरच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळाला नसेल असा जनाधार त्या पक्षाला हवा आहे. यासाठी माती सुपिक करण्याची तळमळ सुरू आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे खासदारकीचं सर्वात मोठं राज्य. यामुळे या राज्याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष आहे. भाजप तर सत्तेसाठी काहीही करायला तयार असल्याने त्या पक्षाने महाराष्ट्राला सर्वाधिक महत्व दिलंय. थोडासाही हयगयपणा पल्ला गाठण्यात नाकाम ठरू शकतो. यामुळेच जेवढं शक्य आहे तितकं करण्याचा आणि अशक्य आहे ते रेटून नेण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. एका ‘इंडिया’ संज्ञेने त्यांची पळता भूई झाली आहे.…

Read More

संगमनेर, दि. २४ बेकायदेशीर वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्याचे महसूल, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवे वाळू धरण आणले असले तरी या धोरणाचा फज्ज्या उडविण्याचे काम त्यांच्याच सरकारमधील सहकारी पक्षाचे कार्यकर्ते करत असल्याचे समोर आले आहे. नगरच्या गुन्हे शाखेच्या पथकाने खांडगाव शिवारात दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत पाच आरोपीवर चोरीच्या गुन्ह्यासह पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत निष्पन्न झालेले पाचही आरोपी फरार झाले असल्याचे माहिती पोलिसांकडून देण्यात आली. संगमनेरच्या गौण खनिज उत्खननात आणि वाळू तस्करीमध्ये राजकीय पक्षाचेच पदाधिकारी अग्रेसर असल्याचे सातत्याने पुढे आले आहे. त्यामुळे महसूल विभागाकडून देखील नेहमीच त्यांच्यावर कारवाईसाठी हात आखडता घेतला जातो. शनिवारी (ता. २४)…

Read More

संगमनेर, दि. २२ फेब्रुवारी तालुक्यातील घुलेवाडी येथील आनंदवन विद्यालयाचा विद्यार्थी सोहम मनोज कडलग याने स्टुडंट टॅलेंट परीक्षेत २१२ गुण प्राप्त करत तालुक्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे. अहमदनगर येथील हिंद सेवा मंडळ आयोजित स्टुडंट टॅलेंट परीक्षेत कडलग याच्यासह दिगंबर गणेश सराफ विद्यालयाच्या कौस्तुभ गोरक्ष सरोदेने द्वितीय तर गगन संदीप शिंदेने तालुक्यात तृतीय क्रमांकाने यश मिळविले आहे.    जिल्ह्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी हिंद सेवा मंडळामार्फत या परीक्षेचे आयोजन केले जाते. सोहम कडलग यास वर्ग शिक्षिका भारती केकाने-चौधर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे कडलगचे मुख्याध्यापक विलास शिरोळे, प्रकाश भागवत, मनीषा देशमुख, अनिल कडलग, दिलीप शेटे, वडील मनोज कडलग व आई उमा…

Read More

शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन करून दिल्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील धन्वंतरी हॉस्पिटलचे दोन संचालक डॉक्टर लाच लुचपतच्या जाळ्यात अडकले आहे. डॉ. महेश प्रल्हाद परदेशी व डॉ. महेश रामविलास बुब अशी धन्वंतरी हॉस्पिटलच्या दोघा संचालक डॉक्टरांची नावे असून या दोन्ही डॅाक्टरांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                                                              शुक्रवारी (ता. २३ फेब्रुवारी) करण्यात आलेल्या या कारवाईबाबत माहिती अशी…

Read More

शेअर मार्केट ट्रेडिंगमधून चांगल्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकास तब्बल ३ कोटी ७० लाखांना गंडा घालण्यात आला आहे. शेअर मार्केटचे आमिष नाशिकच्या व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले असून या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सायबर भामट्यांनी नाशिक येथील एका व्यावसायिकास गेल्या महिन्याभरापासून व्हॉटसॲपवर एका ग्रुपमध्ये ॲड केले होते. त्यावर शेअर मार्केट ट्रेडिंगविषयी अधिकृत वाटेल अशी माहिती दिली जात होती. शेअर ट्रेडिंगमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास मोठा परताव्याचे आमिष या व्यावसायिकाला दाखवण्यात आले होते. व्यावसायिकाला संशयितांनी साडेतीन कोटी गुंतवल्यास तुम्हाला थेट साडेसात कोटी मिळतील, अशी स्कीम सांगितली. आम्हीही असेच पैसे गुंतविले…

Read More

मुंबई, दि. २३ राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी (वय ८७ वर्ष) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. जोशी यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्यात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली होती. तत्कालीन युती सरकारचे ते पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात राज्याच्या विकासासाठी विविध योजनांची सुरुवात झाली. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या अतिशय विश्वासातील असलेले जोशी यांचा नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष असा मोठा राजकीय प्रवास…

Read More

मुंबई, दि. २२ फेब्रुवारी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रीतपणे सामोरे जाणार आहे. महाविकास आघाडीची सातत्याने चर्चा होत असून जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे. राज्य निवड मंडळाच्या बैठकीआधी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले, महाराष्ट्रात मविआ आघाडी मजबूत आहे, आम्ही एकत्रपणे निवडणुका लढवत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व मित्र पक्षांशी सातत्याने चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा…

Read More

संगमनेर – सत्तेसाठी वारंवार पक्ष बदलणाऱ्या विखे घराण्याचा पक्ष बदलांचा इतिहास मोठा आहे. त्यामुळे दल बदलून प्रसिद्ध असलेल्या मंत्री विखे यांनी पक्षनिष्ठेबाबत इतरांना न शिकविता स्वतः आत्मपरीक्षण करावे. आत्तापर्यंत काँग्रेसच्या जिवावर मोठ्या झालेल्या विखेंनी ज्या आईने वाढविले तिला शिव्या देण्यासारखे काम केले असल्याचे टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे. दिवटे म्हणाले, काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, भाजपा असा वेगवेगळ्या पक्षांचा प्रवास करणाऱ्या विखेंनी पक्षनिष्ठा किंवा विचार याबाबत राज्यात कुठेही बोलू नये. कारण पक्षबदलूमध्ये राज्यात पहिला क्रमांक हा विखे घराण्याचा लागतो. २०१९ पर्यंत भाजपा व मोदी यांच्यावर विखे टीका करत होते मात्र असा त्यांना कोणता साक्षात्कार झाला की आज…

Read More

संगमनेर – तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे श्रीक्षेत्र देवगड यात्रे निमित्ताने शनिवारी (ता. २४ फेब्रुवारी) सारंगखेडा नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा अश्व बाजार, अश्व प्रदर्शन व अश्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती अश्वप्रेमी असोसिएशनचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली. देशमुख म्हणाले, सारंगखेडापाठोपाठ संगमनेरमध्ये होत असलेले हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अश्वप्रदर्शन आणि अश्व बाजार आहे. प्रदर्शनाचे हे सातवे वर्ष असून या कार्यक्रमासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात, कर्नाटक राज्याचे माजी मंत्री आमदार विनय कुलकर्णी, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जयहिंदचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत थोरात, हिवरगाव…

Read More

एका शिक्षकाने आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला एक-एक छानस चॉकलेट दिले आणि नंतर एक विचित्र अट घातली. मुलांनो! मी दहा मिनिटांत प्राचार्यांना भेटून परत येतो. तोपर्यंत तुम्ही तुमची चाॅकलेटस् खायची नाहीत, असे सांगून ते शिक्षक वर्गातून बाहेर गेले. नंतर वर्गात काही क्षण शांतता होती. प्रत्येक मुल त्याच्या हातातल्या चाँकलेटकडे पहात होते आणि प्रत्येक क्षणी स्वत:ला चॉकलेट खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत होते. दहा मिनिटे संपली आणि शिक्षकाने वर्गात प्रवेश केला. आणि आपण वर्गात वाटलेल्या चॉकलेटचा आढावा घेतला. संपूर्ण वर्गात अशी सात मुले होती, की ज्यांच्या हातात चाॅकलेट जसेच्या तसे होते, तर इतर सर्व मुले चाॅकलेट खात होती आणि त्याच्या रंग आणि चवीबदल भाष्य करीत…

Read More

मुंबई :- नासिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या रेखांकनात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून यामुळे या मार्गाच्या अंतरात देखील मोठी वाढ होणार आहे. संगमनेर मार्गे जाणारी ही रेल्वे आता शिर्डीहून जाणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या रेखांकनात कोणत्याही स्वरूपाचा बदल नको. रेल्वे मार्ग प्रस्तावित असल्याप्रमाणेच संगमनेर मधील मेला जावा अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली. गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या या प्रश्नात तांबे यांनी लक्ष घातले आहे. हाय स्पीड रेल्वेचे घोंगडे गेल्या अनेक वर्षापासून भिजत पडले असून आता या मार्गात सत्ताधाऱ्यांकडून नव्यानेच पुन्हा बदल सुचवत ही हायस्पीड…

Read More

संगमनेर – राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज बुधवारी (ता. २१ फेब्रुवारी) विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेर दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्या दरम्यान विखे यांच्या हस्ते म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पूलाच्या कामासाठी भूमिपूजन होत आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या या पुलाचे काम सुरू व्हावे या मागणीसाठी म्हाळुंगी पूल बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे उपोषणकर्त्यांवर प्रशासनाकडून दडपशाही सुरू असून उपोषणकर्त्यांचा मंडप हटविण्यात आला आहे. पूलासाठी आवश्यक निधीची उपलब्धता न करता सुरू असलेल्या विकास कामांचा निधी संबंधित काम बंद करून या पुलासाठी वर्ग करण्यात आला आहे. पूलासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे श्रेय घेणाऱ्या भारतीय जनता…

Read More

अहमदनगर – सोनईजवळ चर्चच्या धर्मगुरूने दोन अल्पवयीन मुलींच्या अंगात सैतान आल्याचे सांगत या मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते यांनी मंगळवारी पीडित अल्पवयीन मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच सोनई पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना पुढील तपासा संदर्भात सूचना केल्या. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रूपवते यांनी बालिका आणि महिलांवर होणारे अशा प्रकारचे आघात संतापजनक असल्याचे सांगत अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या व झाल्या प्रकाराने हादरलेल्या पीडित गरीब दोन्ही अल्पवयीन मुलींना लवकरात लवकर जिल्हा बालकल्याण समिती पुढे नेण्याचे व संरक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले.…

Read More

नाशिक – पोलीस निरीक्षकाने पोलीस ठाण्यातच स्वतःच्या डोक्यात सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. अशोक नजन (वय ४० वर्ष) असे आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकांचे नाव असून नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. गोळी झाडून घेतल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. नजन काल रात्री शिवजयंतीचा बंदोबस्त करून उशिरा घरी परतले होते. सकाळी साडेनऊ वाजता अंबड पोलीस ठाण्यात आलेल्या नजन यांनी आपल्या केबिनमध्ये स्वतःच्या सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार त्यांच्या केबिनमध्ये गेलेल्या हजेरी मास्टरच्या लक्षात आला. नजन…

Read More