Author: Annant Ppangarkar
लोकसभेच्या ४८ मतदारसंघाचा विधानसभानिहाय आढावा घेणार. महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. हे नेते करणार नेतृत्व: गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले यांनी सांगितले की, राज्यातील सहा विभागात पदयात्रा काढण्यात येणार असून नागपूर विभागातील पदयात्रेचे…
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची राहणार उपस्थिती… महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – ११ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा शासनाचा महत्त्वकांक्षी उपक्रम होत आहे. पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करत समन्वयातून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी अहमदनगर येथील आढावा बैठकीत केले. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा मंत्री विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी हे होते उपस्थित: यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड, माजी…
महाराष्ट्र संवाद न्यूज प्रसिद्ध समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचा व त्याची सुनावणी संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. का गेले होते सुप्रीम कोर्टात: इंदुरीकर महाराज यांच्या वतीने औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं यामध्ये सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. संगमनेरच्या सत्र न्यायालयात इंदुरीकर यांना दिलासा मिळाल्यानंतर प्रकरण औरंगाबाद उच्च न्यायालयात पोहोचले होते. तेथे संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम करण्यात येऊन खटला चालविण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे इंदुरीकर यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – काही दिवसांपूर्वी कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरणात अडचणीत सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात उतरले आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी ट्विटर द्वारे केला आहे. कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणानंतर गेल्या काही दिवसांपासून राजकीय अज्ञातवासात असलेल्या सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच ते पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या सक्रिय होत विरोधकांचे आर्थिक घोटाळे समोर आणू लागले आहेत. मंगळवारी त्यांनी ट्विटरवर मुलुंड येथील कोविड सेंटरच्या शंभर कोटीच्या घोटाळ्याबद्दल आरोप केले आहेत. या माध्यमातून ते पुन्हा एकदा आपली तोफ विरोधकांवर डागू…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमध्ये आता टोमॅटो पाठोपाठ कांदाही वधारला आहे. संगमनेर बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून प्रतिक्विंटल 2600 रुपयांचा भाव मिळाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. असे मिळाले कांद्याला भाव: मंगळवारी (ता. 7 ऑगस्ट) झालेल्या कांदा लिलावामध्ये बाजार समितीत चांगल्या दर्जाच्या एक नंबर कांद्याला 2000 ते 2600 रुपयांचा भाव मिळाला. त्या पाठोपाठ दोन नंबर कांद्याला 1200 ते 1800 रुपये, तीन नंबर कांद्याला 800 ते 1100 रुपये इतका भाव मिळाला. तसेच गोल्टी कांदा 500 ते 700 रुपये भावाने विकला गेला. असा मिळाला टोमॅटोला बाजार: याशिवाय बाजार समितीत टोमँटोला 1000 ते 2500 रुपयांपर्यंतचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यानच्या काळात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याचे भारत सरकारने निश्चित केले आहे. यासाठी प्रत्येक टपाल कार्यालयात राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. हर घर तिरंगा या अभियानाला पाठबळ देण्यासाठी भारतीय टपाल कार्यालयातून राष्ट्रध्वजांची विक्री सुरु करण्यात आली असुन हे राष्ट्रध्वज प्रत्येकी २५ रुपयांप्रमाणे मिळणार आहे. स्थानिक टपाल कार्यालयातून नागरिकांना राष्ट्रध्वजाची खरेदी करता येईल. याशिवाय नागरिकांना टपाल खात्याच्या www.epostoffice.gov.in या संकेतस्थळावरही ई- टपाल सुविधेच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची खरेदी करता येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिक्षक डाकघर सुरेश एल. बनसोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – सध्या राज्यात सर्वत्र महसूल सप्ताह सुरू आहे. या महसूल सप्ताहात सोमवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत महसूल कर्मचाऱ्यांसाठी रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान नेत्रदान, अवयव दाना बाबत जागृती करण्यात येऊन कर्मचाऱ्यांकडून संमती पत्रे भरून घेण्यात आली. महसूल सप्ताह : लोकाभिमुख कामांचा करुया निपटारा चला करू ‘महसूल सप्ताह’ साजरा हे ब्रीदवाक्य घेऊन जिल्ह्यात महसूल सप्ताह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचे करण्यात आले आयोजन: या सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सोमवारी महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी रक्तदान,आरोग्य तपासणी शिबीर तसेच नेत्रदान व अवयव दान बाबत संमती…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दिला जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार यावर्षी पुन्हा संगमनेर महाविद्यालय जाहीर झाला आहे. महाविद्यालयाने यावर्षी तब्बल दहा पुरस्कार प्राप्त करत संगमनेरचा सन्मान वाढविला. असे आहेत पुरस्कार : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचेवतीने राष्ट्रीय सेवा योजना या विद्यार्थीभिमूख विविध उपक्रमांतर्गत सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविणा-या महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दिला जाणारा यावर्षीचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त झाला. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सचिन कदम यांना उत्कृष्ट जिल्हास्तरीय कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त झाला. डॉ. प्रताप फलफले यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक म्हणून उल्लेखनिय कार्य केल्याबदद्ल पुरस्कार प्रदान…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सहकारातील दीपस्तंभ थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती शताब्दी निमित्त वर्षभरात सहकार, कृषी व शैक्षणिक क्रांतीचा महोत्सव साजरा होणार असून या निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब थोरात यांचे छायाचित्र असलेल्या शताब्दी महोत्सवाचा लोगोचे अनावरण करण्यात आले आहे. यांनी केले अनावरण आणि यांची होती उपस्थिती: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, शंकर खेमनर, डॉ. जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, सोमेश्वर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – उच्च शिक्षणासाठी विदेशामध्ये जात असलेले संगमनेरचे विद्यार्थी आपल्या चमकदार कामगिरीने जगामध्ये देशाचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास उद्योगपती राजेश मालपाणी यांनी व्यक्त केला. संगमनेर मर्चंटस बँकेच्यावतीने अमेरिका आणि इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी जात असलेल्या दहा विद्यार्थ्यांचा सत्कार आणि निरोप समारंभ बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी मालपाणी बोलत होते. यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक जय मालपाणी, स्किनवेस्ट या ब्युटी ब्रँडच्या प्रणेत्या दिव्या मालपाणी, चेअरमन संतोष करवा, व्हाईस चेअरमन प्रकाश कलंत्री आदी उपस्थित होते. हे १० विद्यार्थी जाताहेत परदेशात : सिमरन अत्रे, जय गाडे, गंधार पानसरे, चिदंबर धापटकर, प्रणव पगडाल, तन्मय राठी, ओम कोळपकर, धनंजय सोनवणे, आयुष…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – केवळ सत्तेची लालसा आणि आमिषाला बळी पडून काही लोक मूळ शिवसेना सोडून गेले आहे. ग्रामीण भागातील शिवसैनिकांचे नाव शिवसेनेसोबत जोडलेली आहे. त्यामुळे पक्षाबाहेर जाणाऱ्यांची चिंता करू नका. पक्षाचे संघटन वाढवा, असा सल्ला शिवसेनेचे संगमनेर विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांनी शिवसैनिकांना दिला. संवाद : शिवसेनेच्या संगमनेर विधानसभा मतदार संघाच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर शिंदे शनिवारी संगमनेरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधला. यांची होती उपस्थिती : गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख नरेश माळवे, उत्तर नगर जिल्हा शिवसेनाप्रमुख मुजीब शेख, तालुकाप्रमुख संजय फड, ज्येष्ठ मार्गदर्शक रावसाहेब गुंजाळ, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेनेचे शहर प्रमुख…
रविवार विशेष | प्रवीण पुरो संभाजी भिडे ऊर्फ मनोहर भिडे याच्या उपद्रवाने सारा महाराष्ट्र ढवळून निघाला. शुक्रवारी संपलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा सर्वाधिक वेळ याच भिडेंच्या उपद्रवाने घेतला. विरोध करायचा त्यांनी विरोध केला पण आपल्या गृहमंत्र्यांनी राज्याची लाज रस्त्यावर आणली. भिडे हे आमच्यासाठी गुरुजीच असल्याचं सांगत गृहमंत्र्यांनी शिष्याचा निर्बुध्दपणा उघड केला. महाराष्ट्राला मान खाली घालायला लावली. देशातील महान व्यक्तींची अश्लाघ्य शब्दात अवहेलना करणार्या अर्धवट व्यक्तीची इतकी तळी आजवर कोणी उचलली नसेल. हे करून आपण भाजपला खड्ड्यात घालत आहोत याचीही जाण गृहमंत्रीपद सांभाळणार्या देवेंद्र फडणवीसांना राहिली नाही. एकीकडे सत्ता राखण्याचा व्याप सांभाळता सांभाळता दुर्बुध्द भिडेंसारख्याला गुरूचा दर्जा देऊन पक्षाला अधिक खायित टाकण्याचं…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – राज्यात एकीकडे महसूलमंत्र्यांच्या संकल्पनेतून प्रथमच महसूल सप्ताह पाळला जात असताना या सप्ताह काळातच नाशिकच्या तहसीलदारांची लाचखोरी समोर आली आहे. तब्बल 15 लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या तहसीलदारास एसीबीने रंगेहात पकडले. नरेशकुमार तुकाराम बहिरम (वय 44 वर्ष, रा. फ्लॅट नंबर 604, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक) असे एसीबीने पकडलेल्या लाचखोर तहसीलदाराचे नाव आहे. महसूल सप्ताहातच मोठा मासा एसीबीच्या गळाला लागला : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात महसूल विभाग लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी प्रथमच महसूल सप्ताह राबविण्यास सुरुवात केली आहे. या सप्ताहामध्ये महसूलच्या नायब तहसीलदारापाठोपाठ आता तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. दोन दिवसांपूर्वीच…
आपल्या गरजा मर्यादित ठेवायला शिका : प्राचार्य गायकवाड महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी माणसाने स्वतःशी तसेच इतरांशी संवादी राहण्याची आवश्यकता आहे. याच संवादाच्या माध्यमातून माणसाच्या आयुष्यातील ताणतणाव दूर होण्यास मदत होते, असे प्रतिपादन संगमनेर महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा. भगवान जोशी यांनी केले. ताण-तणाव कार्यशाळा : संगमनेर महाविद्यालयात शिक्षकेतर सहकाऱ्यांसाठी ताण-तणाव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते म्हणून जोशी बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड, कुलसचिव संतोष फापाळे आदी मान्यवर उपस्थित होते. …तर आयुष्यातील ताणतणाव दूर : जोशी म्हणाले, ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी संवाद फार महत्त्वाचा आहे. तो माणसाला निरोगी जगण्याचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – बुधवारी (दिनांक 9 ऑगस्ट) सकाळी क्रांती दिनानिमित्त संगमनेरमध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने पदयात्रा, भव्य रॅली काढण्यात येणार असून त्यानंतर यशोधन कार्यालयाच्या प्रांगणात भव्य आदिवासी जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यांनी दिली माहिती : यासंदर्भात आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, बाळकृष्ण गांडाळ व काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी माहिती दिली असून यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात उपस्थित राहणार आहे. असे आहे नियोजन : आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी क्रांती दिनानिमित्त सकाळी 8 वाजता नेहरू चौक…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – कोविड घोटाळा प्रकरणी कोणाला सोडणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी कालच विधानसभेत दिल्यानंतर आज शनिवारी मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना (ठाकरे) गटासाठी हा मोठा धक्का असून पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काय आहे आरोप : कोविड सेंटर कथीत घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आग्रापाडा पोलीस ठाण्यात पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल केला असून पेडणेकर महापौर असताना हा घोटाळा झाला होता. कोविड उपचाराच्या औषधांची खरेदी वाढीव दराने करण्यात आली होती. तसेच बॉडीबॅग खरेदीचाही घोटाळा झाला होता. दोन हजार रुपये किमतीची बॉडीबॅग सहा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महसूल प्रशासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, त्यासाठीचे अर्ज व विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे विविध दाखले आता ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध आहेत. या सर्व योजना समाजासोबत युवकांपर्यंत अधिकाधिक प्रमाणात पोहोचण्यासाठी युवा पिढी व महसूल विभाग यांच्यात सुसंवाद असला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कोठे बोलले : महसूल विभागाच्यावतीने राज्यात १ ऑगस्ट ते ८ऑगस्ट दरम्यान सप्ताहाचे आयोजन शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या सप्ताह अंतर्गत संगमनेर महाविद्यालयात आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. यांची होती उपस्थिती : शिर्डीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर -सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या स्थळ सीमेत सर्वत्र महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37(1) व 37(3) अन्वये 14 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. यासाठी असेल बंदी : या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. याचाही आहे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचे स्वलिखित आणि स्वचित्रित ‘सासू व्हर्सेस सून’ या पुस्तकास जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतीच या पुरस्काराची सुनील गोसावी यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. सासू आणि सुनेच्या नात्यातील विविध प्रकारचे कौटुंबिक विनोदाचे मजेशीर प्रसंग व्यंगचित्रातून आणि मार्मिक शब्दातून व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी या पुस्तकात मांडले आहेत. पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन लवकरच होणार असून त्यामध्ये पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. स्मृतिचिन्ह , सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. अरविंद गाडेकर यांची व्यंगचित्रे व्यंगचित्राच्या माध्यमातून दैनिक, साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंक, सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध होत असून आतापर्यंत त्यांनी अकरा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – जगातील अग्रगण्य वाईन ब्रँडमध्ये समावेश असलेल्या नाशिकच्या सुला विनयार्ड कंपनीला राज्य उत्पादक शुल्क मंत्र्यांनी नोटिस पाठवली असून ११६ कोटींचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या नोटिसला सुला विनयार्डस कंपनीकडून न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यापूर्वीही दिली होती नोटीस : सुला विनयार्ड कंपनीला अशीच नोटीस सन २०१८ मध्येही देण्यात आली होती. मात्र, त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानं राज्य सरकारनं स्थगिती दिली होती. मात्र आता हे स्थगिती उठवत उत्पादन शुल्कमंत्र्यांनी कंपनीला पुन्हा एकदा नोटीस पाठविली आहे. या आधारे बजावली नोटीस : राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी महाराष्ट्र बिअर आणि वाईन उत्पादन नियम 1966 नुसार सुला विनयार्ड…
