Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने पाठ फिरविल्याने राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरीही अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळाची परिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्य सरकारने मंत्रालयातील सातव्या मजल्यावर दुष्काळ नियंत्रण वॅार रुम बनवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. वॅार रूममधून हे कामकाज होणार: राज्यातील दुष्काळाच्या छायेत असलेली गावे, तालुके, जिल्हा, विभाग या सर्वांवर या दुष्काळ नियंत्रण वॅार रुमच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. तसेच या सर्वांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहे. या वॅार रुममधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतील. पाणीसाठ्याचे आरक्षण…

Read More

जनतेला दिलासा देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करावे के.के. रेंज व अहमदनगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापराबरोबरच उपलब्ध संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. यांच्या उपस्थितीत झाली बैठक: सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, आमदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – साखर कारखानदारीत सहकारासाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने स्वच्छ व गुणवत्तेच्या पेट्रोलबरोबर आता नव्याने गरजेचा असलेल्या पर्यावरण पूरक सीएनजी पंप कार्यान्वित केला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या सीएनजी पंपाचा शुभारंभ करण्यात आला. यांची होती उपस्थिती: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ येथे हा सीएनजी पंप सुरू करण्यात आला असून यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, रामहरी कातोरे, बीपीसीचे गोविंद जागीर, संचालक गणपतराव सांगळे, संपतराव गोडगे, मीनानाथ वर्पे, विनोद हासे, माणिकराव यादव, ॲड. दादासाहेब हजारे, तानाजी आहेर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरातील बहुचर्चित ठरलेल्या आणि सहकारी चळवळीवर आधारित असलेल्या पतसंस्था विश्वातील सर्वात मोठ्या 81 कोटीच्या अपहार प्रकरणी अटकेत असलेल्या पाचही आरोपींना न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी दिली आहे.  आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग: दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा प्राथमिक तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केला होता. मात्र गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता अपहाराची रक्कम मोठी असल्याने, गुन्हा गुंतागुंतीचा क्लिष्ट व किचकट स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची संख्या देखील मोठी असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हा गुन्हा शहर पोलिसांकडून काढून अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोमवारी वर्ग केला आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा पुढील तपास आता आर्थिक गुन्हे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर – चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात पत्नीस लोखंडी पहारीने मारहाण करीत तिचा खून करणाऱ्या आणि तिला सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या व्यक्तीला मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या आरोपीला झाली शिक्षा: बाळासाहेब तुळशीराम फटांगरे (रा. लक्ष्मी नगर, संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरोधात पोलिसांनी खून आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने आरोपीला सदोष मनुष्य वधाच्या तसेच घातक हत्याराने दुखापत करण्याच्या आरोपात दोषी ठरविले आहे. संगमनेरचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी घेण्यासाठी खूप घासाघीस करत असलेली श्रीमंत घरातली ती महिला एका मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात आपल्या दोन जुन्या साड्या दारावर भांडी विकायला आलेल्या त्या भांडेवाल्यास द्यायला शेवटी कशीबशी तयार झाली. “नाय ताई ! मला न्हाय परवडत. एवढ्या मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या बदल्यात मला तुमच्याकडून कमीत कमी तीन तरी साड्या पायजेत.” म्हणत भांडेवाल्याने ते भांडे त्या बाईंच्या हातातून अदबीने काढून आपल्या हाती परत घेतले. अरे भाऊ, फक्त एकदाच नेसलेल्या साड्या आहेत या दोन्ही. बघ अगदी नवीन असल्यासारख्याच आहेत! तुझ्या या स्टीलच्या पातेल्यासाठी या दोन साड्या तशा तर फार जास्त होतात. मी म्हणून तुला दोन साड्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन इंदोरी फाटा (अकोले) येथे लिकेज झाली आहे. लिकेज झालेल्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सोमवारी सकाळी संगमनेर शहर व उपनगरात होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. कधी होणार नियमित पाणीपुरवठा: पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून याचा परिणाम सोमवारी होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होणार आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर संगमनेर शहराला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. आवाहन: तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने निळवंडे धरणात पाण्याची नवीन आवक होत असून पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून, गाळून थंड करून…

Read More

शासन आपल्या दारी, थापा मारते लय भारी; उद्धव ठाकरेंचा हिंगोलीत हल्लाबोल “मी फडतूस म्हणणार नाही, कलंक म्हणणार नाही, थापाड्याही…”; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं महाराष्ट्र संवाद न्यूज हिंगोली – भाजपमध्ये सगळे आता आयाराम आहेत. अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी आयुष्य खर्ची घातले आहे. परंतु ते आता फक्त सतरंज्या उचलण्यापुरते उरले असून शासन आपल्या दारी थापा मारते लय भारी अशा शब्दात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्ला चढविला. हिंगोलीत निर्धार सभा: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रविवारी हिंगोलीतील रामलीला मैदानावर निर्धार सभा झाली. सभेत ठाकरेंनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली. जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी…

Read More

आम्ही एक झटका दिला आणि त्यांना ऑनलाईनवरुन थेट लाईनवर आणलं… काही लोक पाटण्यात जमले आणि द्वेषाची खिचडी शिजवू लागले अजित पवारच सरकारमध्ये आले आणि सरकार आणखी मजबूत झाले महाराष्ट्र संवाद न्यूज परभणी – “तुमचा भोंगा हा कायम शिव्या शाप देण्यासाठी वाजतो पण आमचा भोंगा हा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांसाठी वाजतो.” ‘काही लोक पाटण्यात जमले आणि द्वेषाची खिचडी शिजवू लागले’, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी सांगत रविवारी विरोधकांवर निशाणा साधला. शासन आपल्या दारी: रविवारी परभणीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज उन्हं उतरायला लागली होती. मी आणि माझी मैत्रीण घरी परतत होते. मी रोज तिला वाटेत तिच्या बस स्टाॅपवर सोडते. आणि मग पुढे जाते. बसस्टाॅपच्या आधी गाडी थांबवून आम्ही जरा वेळ शिळोप्याच्या गप्पा मारतो, आणि मग आपापल्या दिशेने जातो. गेले काही दिवस त्या स्टाॅपच्या आधाराने एक कुटूंब रहायला आलंय. भिकारीच असावेत. तिथेच फुटपाथवर चूल मांडलीय. नवरा, बायको, दोन तीन लहान मुलं. एक कुत्र्याचं पिल्लू. कधीच कसली भांडाभांडी न करता अगदी मजेत रहाताना दिसतात ते. रोज बघून बघून मी आता त्यांना ओळखायला लागले. त्यातलं सगळ्यात छोटं मूल एकदमच गोड हालचाली करत फिरत असतं. असेल जेमतेम दोन अडीच वर्षाचं. बसस्टाॅपच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष @ प्रवीण पुरो महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी जे-जे कारण ठरले त्यांच्याशी आघाडीतील घटक पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी किती जवळीक साधावी याला काही मर्यादा असायला हवी. सारं काही हातातून हिसकावून घेणार्‍या अशा बदमाशांना त्यांची जागा दाखवण्याची शिकस्त आघाडीतल्या प्रत्येक नेत्यामध्ये असायला हवी. पण दुर्देवाने अशांविषयी आघाडीतले घटकपक्ष आणि त्यांचे नेते बेरजेचं राजकारण करताना दिसतात तेव्हा त्यांनाही सत्तेची लालसा आहे की काय असं वाटतं. या संशयाने जनसामान्यांमध्येही अशा व्यक्ती आणि त्यांच्या पक्षाविषयीची सहानुभूती आपोआप लोप पावत असते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे प्रमुख, देशातील धुरंधर राजकारणी शरद पवार यांच्याविषयी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – संगमनेरच्या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाची सेंट्रलाइज ऑक्सिजन पाईपलाईन व टर्मिनल तोडून साडेबारा लाखाच्या तांब्याच्या पाईपची चोरी करणारी सहा जणांची आख्खी टोळीच पकडण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याशिवाय हे पाईप भंगारमध्ये विकत घेणाऱ्या दोन भंगार व्यावसायिकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. काय होती घटना: ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या ऑक्सीजन प्लांटमधून साडेबारा लाख रुपयांच्या तांब्याच्या पाईप चोरीचा प्रकार गेल्या सोमवारी समोर आला होता. या संदर्भात रुग्णालयातील परिसेविका शकुंतला पालवे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला संगमनेर शहर पोलिसांसोबत नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस यासंदर्भात समांतर तपास करत होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – सिंचनासाठी शेतकऱ्याला पाटबंधारे विभागामार्फत देण्यात येणारे पाणी अविरत चालू राहू देण्यासाठी शेतकऱ्याकडे 85 हजार रुपयांची मागणी करून चाळीस हजार रुपयांवर तडजोड तडजोड करत दोघा खाजगी व्यक्तींच्या मध्यस्थीने लाचखोरी करणाऱ्या कालवा निरीक्षकासह तिघांना अहमदनगरच्या अँटी करप्शनने पकडले आहे. श्रीरामपूर पोलीस ठाण्यात या तीन लाचखोराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. हे आहेत लाचखोर: अंकुश सुभाष कडलग (वय ४२ वर्ष) हा संगमनेर शहरालगतच्या बटवाल मळा, सावित्रीबाई फुले नगर, ढोलेवाडीमधील रहिवासी असून सध्या तो श्रीरामपूरमध्ये वडाळा उपविभागाअंतर्गत नॉर्दन ब्रांच येथील सिंचन शाखेत कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. कडलग याने अनिस सुलेमान शेख, (वय- ३४ वर्ष, धंदा-शेती, (खाजगी इसम)…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज देशातील व विशेषतः महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचा इतिहास उज्वल आहे. सामाजिक सुधारणांचा स्त्रोत जिथे सुरू झाला आणि तिथे महाराष्ट्र शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांनी ज्या गतीने पुढे नेला त्या महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीकडे मोठ्या आशेने पाहिले जाते. अभिमानास्पद उत्तम भविष्यासाठी पोषक आणि चिकित्सक वातावरण महाराष्ट्र भुमीने नेहमी दिले आहे, पण सद्य राजकारणात महाराष्ट्राला नेहमी डावलले जाते आणि अभ्यासू, तत्वज्ञानी उमेदवारांना महाराष्ट्रातील, देशातील खरे शासक संसदेत पोहचू देत नाही. आजही मतदारांना आपल्या देशातील खऱ्या शासकांचा पत्ता देखील लागलेला दिसत नाही. पुर्वी मतपत्रिकेत घोळ होत आता ई.व्हि.एम‌.मध्ये छेडछाड करुन निकालच बदलले जाऊ शकतात. लोकशाहीची व्याख्या राज्यशास्त्र वेत्ते, लेखक, समाजशास्त्र आणि इतर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शुक्रवारी मध्यरात्री नासिक-पुणे महामार्गावर संगमनेरनजीक कऱ्हे घाटाजवळ एका संशयास्पद वाहनातून मुंबईच्या दिशेने जाणारे गोमांस पकडण्यात तालुका पोलिसांना यश मिळाले आहे. साडेसहा लाखाचा मुद्देमाल: या कारवाईत पोलिसांनी एका टाटा कंपनीच्या वाहनासह तब्बल साडेसहा लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. यात अडीच लाख रुपये किमतीच्या एक हजार किलो गोवंश जनावरांची कत्तल केलेल्या गोमांसाचा समावेश असून पोलिसांनी या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. यांना पकडले: मुज्जफ्फर जाकीर हुसेन कुरेशी (वय २८ वर्ष, रा. दादामिया इस्लामी चाळ, कुरेशीनगर, कुर्ला (पूर्व) मुंबई) आणि असलान अस्लम कुरेशी (वय २२वर्ष, रा. अल्ताफ बिल्डिंग,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तालुक्यातील नान्नज दुमाला येथील जयवंत विलास कडवे (वय २२) या तरुण सलून व्यावसायिकाने शुक्रवारी (ता. १८ ऑगस्ट) आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली. मात्र, त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या आईसह नातेवाईकांनी केला असून, या संदर्भात चौकशी व्हावी यासाठी संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे (DYSP) निवेदन देण्यात आले आहे. काय झाले: नान्नज दुमाला येथे जयवंत विलास कडवे हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. शुक्रवारी त्याने राहत्या घरातील अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. याची माहिती संतोष सुखदेव वाघ यांनी कडवे यांच्या मामास रवींद्र भाऊसाहेब वाघ यांना फोनवरुन कळविली. त्यानंतर वाघ तात्काळ संगमनेर बसस्थानकावरुन घरी परतले. त्यानंतर त्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जगातील सर्वच क्षेत्रात आज स्पर्धा वाढली आहे, अशावेळी शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद राहिलेले नाही. धावपळीच्या जीवनात जगताना शरीरस्वास्थाकडेही तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरज असते. विद्यार्थ्यांनी तर लहान वयापासूनच योगासनांची सवय लावली पाहिजे. कारण आपण बुद्धीने कितीही तेज असलो तरीही आपले स्वास्थ उत्तम नसेल तर आपल्यातली पूर्ण क्षमता आपण सिद्ध करु शकत नाही. आता तर केंद्र सरकारने योगासनांचे महत्व लक्षात घेवून त्याला खेळाचा दर्जा दिल्याने विद्यार्थ्यांना त्यातूनही करिअर करण्याची संधी मिळाल्याचे प्रतिपादन गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले. योग सोपान उपक्रमाचा संकल्पपूर्ती सोहळा: गीता परिवार व अखिल भारतीय माहेश्‍वरी महिला संघटनच्या संस्कार सिद्धा समितीने राबविलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी अटकेत असलेल्या पाचही आरोपींच्या पोलीस कोठडीत संगमनेरच्या अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयाने वाढ केली आहे. या आरोपींना 28 ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. एक मुख्य आणि चार सहकार्य करणाऱ्यांचा अटकेतील आरोपीत समावेश: दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच रात्रीतून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुख्य 17 आरोपींना सहकार्य करणाऱ्या तीन तत्कालीन रोखपालांसह एका लेखापरीक्षकाला अटक केली होती. त्यानंतर पतसंस्थेच्या व्यवस्थापकालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. एवढे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरच्या आर्थिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल 81 कोटीचा अपहार करणाऱ्या चेअरमन मास्टरमाईंड भाऊसाहेब कुटे याच्यासह अन्य आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. शहर पोलिसांनी या गुन्ह्यांमध्ये आता नव्याने MPID चे कलम तीन वाढविले आहे. आत्तापर्यंत पाच आरोपी अटकेत: दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था अपहार प्रकरणी संस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, चीफ अकाउंट भाऊसाहेब संतू गायकवाड यांच्यासह 21 जणांविरोधात आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रीतून चार जणांना अटक केली होती. त्या पाठोपाठ बँकेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ याला देखील अटक केली होती. मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आपल्या कुटुंबीयासह तसेच अन्य आरोपी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – लोकशाही प्रणालीमध्ये मतदान हा अत्यंत पवित्र व महत्त्वाचा अधिकार असून वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व युवक व युवतींनी 8055987777 या नंबरवर मिस कॉल देऊन नवीन मतदार नोंदणी अभियानात जास्तीत जास्त सक्रिय सहभाग घेऊन आपली मतदार नोंदणी करावी असे आवाहन युवा नेत्या कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय राज्यघटना दिली. लोकशाही व राज्यघटनेमध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. वयाच्या अठराव्या वर्षी प्रत्येक युवकाला मतदान करण्याचा पवित्र अधिकार मिळाला आहे. लोकशाही व राज्यघटना मजबूत करण्यासाठी…

Read More