Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – वाढत्या गुन्हेगारीला पायबंध घालण्यासाठी संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. जून-जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे (superintendent of police) तब्बल 48 गुन्हेगारी व्यक्तींच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. का केली कारवाई: प्रस्तावित प्रस्तावानुसार आगामी काळामध्ये येणारे सण उत्सव शांततेमध्ये पार पडावे. त्याचप्रमाणे संगमनेर पोलीस उपविभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या, सुरक्षेच्या दृष्टीने संगमनेर पोलीस उपविभागाकडून कायदा सुव्यवस्था राखली जावी यासाठी रेकॉर्डवरील या सर्व गुन्हेगारांविरोधात विविध कारवाया करण्यात येत आहेत. त्यापैकी ही एक मोठी कारवाई मानली जात आहे. प्रत्येकाच्या नावावर पाच पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद: संगमनेर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याला तातडीने अटक करावी, अशी मागणी करत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस व विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने भिडे गुरुजीच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. संगमनेर बस स्थानक येथे संभाजी भिडे विरोधात काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सौ. दुर्गाताई तांबे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, आर. बी. रहाणे, रामहरी कातोरे, निखिल पापडेजा, नितीन अभंग, दिलीप जोशी, गजेंद्र अभंग, सुरेश थोरात, जावेद शेख, पद्मा थोरात, अर्चना…

Read More

इंडियन ओव्हरसीज बँकेचा गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश म्हसेने ‘शहाणे’सह दहा खातेदारांच्या नावे केली बोगस सोनेतारण प्रकरणे, मिलीभगत आली समोर महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आधीच चार बँकांना गंडविणाऱ्या गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणेसह इंडियन ओव्हरसीज बँकेचा गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश म्हसेचा नवा फ्रॉड समोर आला आहे. आरोपींमध्ये म्हसे, शहाणे या दोघा सोनारांसह पाच जणांचा समावेश आहे. बँकेचे शाखाधिकारी निवृत्ती काळू नव्हाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 27 जुलैला आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 120 B, 34, 420, 465, 467, 474 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये यांचा आहे समावेश: जगदीश सुभाष म्हसे (रा. घुलेवाडी, संगमनेर), उत्तम विश्वनाथ पानसरे (रा. वाघापूर,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी महात्मा गांधी यांच्या विषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यामळे चांगलेच वादात सापडले असताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला जाणीवपूर्वक राजकीय रंग न देण्याचे आवाहन करताना संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून महात्मा गांधी असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असो कोणाच्याही विरोधात बोललेलं आम्ही खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काय म्हणाले फडणवीस: महात्मा गांधी या देशाचे राष्ट्रपिता आहेत देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा महानायकाबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे अनुचित आहे. भिडे गुरुजींनी नव्हे तर कोणीही अशा प्रकारचे वक्तव्य करू नये. अशा वक्तव्यांमुळे करोडो लोकांमध्ये संताप…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – कारमधून येत-जात असल्याचे भासवत तिघेजण रस्त्यावरील प्रवाशांना अडवून त्यांच्याकडील मोबाईल, दुचाकीची चोरी करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पकडलेले तिघेही आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आहेत. हे आहेत आरोपी: शुक्रवारी (दि. 28 जुलै) रात्री पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरात पोलिसांनी पकडलेल्या या टोळीकडून मोबाईल आणि त्यांच्या ताब्यातील कार (एम.एच. 15 जी.एफ. 7288) जप्त केली आहे. प्रशांत अण्णासाहेब जाधव (वय 23 वर्ष) सचिन जयराम पवार (वय 30 वर्ष) व शिवतेज चंद्रहर्ष नेहे (वय 26 वर्ष, तिघेही रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि. अहमदनगर) अशी पोलिसांनी मोबाईल चोरीत पकडलेल्या तिघांची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संभाजी भिडे ह्या विकृत व्यक्तीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अतिशय चुकीचे व बेताल वक्तव्य केले आहे. या अगोदरही महात्मा फुले व अनेक महापुरुषांबद्दल जाणूनबुजून सातत्याने वक्तव्य केले असल्याने भिडेंना तात्काळ अटक करावी अशी मागणी छात्र भारती विद्यार्थी संघटनेने गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ज्या महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.अश्या राष्ट्रपिताबद्दल हा माणूस बेताल वक्तव्य करत आहे. हा देशाचा अपमान आहे. समाजात अशा वक्तव्याद्वारे चुकीची माहिती पसरविली जात असून असे निंदनीय प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ भिडेंवर अटकेची कारवाई करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांकडील मागणीचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – कोरोना रुग्णाला मेडिक्लेम नाकारणाऱ्या स्टार हेल्थ कंपनीला विमा लोकपालचे अध्यक्ष तथा न्यायाधीश यांनी रुग्णाला पॉलिसी क्लेमची रक्कम एक महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिले. कंपनीने एक महिन्यात जर रक्कम दिली नाही तर, केस दाखल केल्यापासून दोन टक्के व्याजासहित तक्रारदाराला कंपनीला रक्कम द्यावी लागणार आहे. काय घडले होते: संगमनेर तालुक्यात 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात कोविड 19 चे संक्रमण झाले होते. या काळात तालुक्यात रुग्णसंख्या मोठी असल्याने रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नव्हते. त्यामुळे कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वाधिकार असलेल्या संगमनेरचे तत्कालीन तहसीलदार अमोल निकम यांनी चंदनापुरी गावातील मुळगंगा रुग्णालयाचे डॉ. विशाल सातपुते यांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | प्रवीण पुरो सत्ताधारी विचारांच्या लोकांची मानसिकता सत्तेची दहा वर्षं पूर्ण होत असतानाही बदलायचं नाव घेत नाहीए. ऐरागैरा कोणीही कशावरही बोलत असतो. कधी कंगनासारखी अभिनेत्री स्वातंत्र्य 2014 ला मिळाल्याचं वक्तव्यं करते तर कधी कोणी देशाला गांडू लोकांचा देश संबोधतो. कोणी जवाहरलाल नेहरूंच्या नावाने शिविगाळ करतो तर कोणी महात्माजींच्या नावाला दोष लावतो. या दोन व्यक्तींना नाव ठेवलं की त्या व्यक्तीचं सत्ताधारी मंडळी पुनर्वसन करत असतात अशी एक प्रतिमा केंद्रातल्या मोदी सरकारची आणि राज्यातल्या महायुती सरकारची झालेली आहे. या सरकारांचे पाठीराखे असलेले मनोहर कुलकर्णी नामक भिडे गुरुजींनी तोडलेले तारे लक्षात घेता त्यांना आता कशाचीच भीती उरलेली नाही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – “लोकाभिमुख कामांचा करूनी निपटारा, चला करूया महसूल सप्ताह साजरा” या ब्रीदवाक्याने महसूल सप्ताहाचा शुभारंभ केला जाणार असून महसूल खात्याशी संबंधित सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि अर्जासंदर्भात काल मर्यादेत निपटारा व्हावा, जनतेला दर्जेदार व चांगली सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 1ऑगस्टच्या महसूल दिनापासून राज्यात महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक: दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महसूल सप्ताहाच्या नियोजनासाठी मंत्री विखे पाटील यांनी घेतलेल्या बैठकीला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त, प्रांताधिकारी उपस्थित होते. बैठकीत त्यांनी नियोजनाचा आढावा घेतला. विखे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – बदली झालेल्‍या ठिकाणी हजर न होणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर आता कारवाई करून त्‍यांची सेवा खंडीत करण्‍यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. बदलीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागाने घेतली दखल: स्थानिक प्रसार माध्‍यमांशी संवाद साधताना विखे पाटील म्‍हणाले, महसूल विभागातील बदल्‍यांची प्रक्रिया केव्‍हाच संपली आहे. त्‍यामुळे बदली झालेल्‍या ठिकाणी अनेक अधिकारी अद्याप हजर होत नसल्‍याच्‍या तक्रारी प्राप्‍त होत आहेत. याची गंभीर दखल आता महसूल विभागाने घेतली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील ७० टक्‍के जागा यापूर्वी रिक्‍त होत्‍या, त्‍या सर्व जागांवर आता अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. अधिकाऱ्यांना दिल्या निलंबनाच्या नोटीस: परंतू काही ठिकाणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – संगमनेरमधील उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांना गुरुवारी (ता.27 जुलै) नवी दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. कडलग संगमनेर तालुक्यातील धांदरफळच्या देशमुख मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. माजी राष्ट्रपती स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त झालेल्या ‘भारताला जी २० चे अध्यक्षपद कसे मिळाले आणि त्याचे सुवर्ण नियम काय असतील’ या विषयावरील राष्ट्रीय कॉन्क्लेव्हमध्ये सामजिक न्याय मंत्री खा. रामदास आठवले, दिल्लीच्या महापौर शैलजा ओबेरॉय, खा. मोहम्मद इम्रान हुसेन, खा. रामनिवास गोयल, मोहम्मद झाकीर, डॉ. शमीम खान यांच्या उपस्थितीत त्यांना अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अमरनाथवरुन परतणारी भाविकांची बस आणि नागपूरवरुन नाशिकला जाणाऱ्या खासगी बसची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही बसचा चुराडा झाला. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून तब्बल 25 प्रवासी जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावर मलकापूर हायवे क्रमांक सहावर लक्ष्मी नगर जवळील उड्डाण पुलावर घडली. या दोन्ही खासगी प्रवासी बस असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. भीषण अपघातात सहा प्रवासी ठार : हिंगोलीच्या दिशेने जाणारी एम एच 08. 9458 ही ट्रॅव्हल्स बस अमरनाथ येथून तीर्थयात्रा करून परत येत होती. या ट्रॅव्हल्स बसमध्ये 35 ते 40 भाविक होते. तर नागपूरवरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या गाडी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे, मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात पुढे म्हणाले, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो?…

Read More

कृषी सेवकांचे मानधन देखील सहा हजार रुपयांवरून 16 हजार रुपये  महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ एवढ्या पुरते आमच्या सरकार काम करत नसून आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत, आमचे वर्क फ्रॉम होम नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये इर्शाळवाडी येथील घटने संदर्भात माहिती देताना सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. शिंदे म्हणाले, इर्शाळवाडी दरडग्रस्तांची कंटेनरमध्ये व्यवस्था केली आहे. भूखंड बघितला असून त्यांची कायम सोय करण्यात येणार आहे सिडकोद्वारे त्यांना आम्ही घर बांधून देणार आहोत.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्ताने शुक्रवारी (ता. 28 जुलै) तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आम्ही हिवरगावकर मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण व वृक्ष वाटप करण्यात आले. “झाडे लावा, झाडे जगवा” वृक्षारोपणाचे महत्त्व, पर्यावरणाचा समतोल याबाबत जनजागृती करून गावात वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्षांचे वाटप करण्यात आले. वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रमावेळी आम्ही हिवरगावकर मित्र मंडळाचे पदाधिकारी सहदेव कोळगे, माधवराव ठुबे, ज्येष्ठ नागरिक राजाराम बोंबले, संदीप वाकचौरे, ज्ञानेश्वर रेवगडे, अंकुश वाकचौरे, गोरख कदम, शौकत शेख, शैलेश रेवगडे, दत्ता रेवगडे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगावचे मुख्याध्यापक विजय आंबरे, बंडू वाकचौरे, अस्मिता ठुबे, मीनल बिडवे, शेख मॅडम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी उपस्थित राहणे हा एक संकेत आहे मात्र सध्याच्या सरकारकडून हा संकेत पाळला जात नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या सभागृहातील अनुपस्थितीवरून बाळासाहेब थोरातांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्याला अद्याप विरोधी पक्ष नेता मिळालेला नाही. त्यातच विरोधी पक्षनेते विना विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात विरोधी पक्षाचा आवाज बुलंद करण्याचे काम राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात करत असल्याचे दिसते. थोरात दररोज सभागृहात सत्ताधारी पक्षाची कोंडी करताना दिसत आहे. मुख्यमंत्री मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधिमंडळात बोलताना थोरात म्हणाले, प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणे हा या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये जनसेवा कॅम्पच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या विविध प्रकारचे कार्ड लाभार्थ्यांना काढून देण्यात आले. याशिवाय शिवसेना आणि पक्षप्रमुख ठाकरे यांची भूमिका मुलाखतीच्या माध्यमातून विषद करणाऱ्या ‘दैनिक सामना’च्या अंकाचेही यावेळी वाटप करण्यात आले. संगमनेर शिवसेनेच्यावतीने वाढदिवसाचे औचित्य साधून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना कार्यालयात घेण्यात आलेल्या या जनसेवा कॅम्पमध्ये लाभार्थ्यांना आभा कार्ड, आधार कार्ड, नवीन पॅन कार्ड, पॅन कार्ड अपडेट करणे, लहान मुलांचे आधार कार्ड हाताचे ठसे, ई श्रम कार्ड असे विविध कार्ड व शासनाच्या योजनांचा लाभ मोफत मिळवून देण्यात आला. लाभाच्या योजनांचे…

Read More

रायगडच्या पेणमध्ये झालेल्या दुर्घटनेचे विधानसभेत पडसाद प्रगत म्हणून घेण्याचा आपल्याला खरंच अधिकार आहे का? महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : पेण मधील बारा वर्षीय सारा ठाकूर या मुलीचा सर्पदंशामुळे झालेला दुर्दैवी अंत हा सरकारी अनास्थेचा बळी आहे, सर्पदंशावरील औषध उपजिल्हा रुग्णालयात सक्तीचे असतानाही, पेनच्या रूग्णालयात ते उपलब्ध का नव्हते याची चौकशी करून सरकार जबाबदारी निश्चित करणार आहे का? दोषींवर कठोर कारवाई करणार आहे का? राज्यभर या औषधांचा काळाबाजार कुणाच्या आशिर्वादाने सुरु आहे? असे सवाल उपस्थित करून आ. थोरात यांनी सरकारला धारेवर धरले. थोरात म्हणाले, पेणमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. या घटनेचा थेट संबंध शासन व शासकीय यंत्रणेशी आहे. आपण पुरोगामी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या (BJP) वाट्याला 6, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) 3 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) 3 जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा फॉर्म्युला ठरला असला तरी प्रत्येकाच्या ठरलेल्या कोठ्यातून कोणाला संधी द्यायची याचा निर्णय अधिवेशनानंतर होणार आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची चर्चा झाल्यानंतर संभाव्य आमदारांची यादी राज्यपालांना पाठविली जाईल. तत्कालीन मविआ सरकारच्या कार्यकाळात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ‘कीस करायचा आहे, माझ्यासोबत हॉटेलवर चल’ म्हणत विकृताने 23 वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना संगमनेर शहरात बसस्थानकावर घडली आहे. मुळच्या मनमाड येथील व हल्ली नाशिक येथे राहत असलेल्या पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बुधवारी लोणी येथील किरण किसन आहेर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुकून हाय केल्या गेलेल्या व्हाट्सअप मेसेजचा गैरफायदा घेत दररोज हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड नाईट करत आरोपीने पिडितेशी संपर्क वाढवला. पीडित महिलेने देखील आरोपीकडे लोणी गावामध्ये असलेल्या कॉलेजवर नोकरी भेटेल का अशी विचारणा केली असता आरोपी किरण आहेर याने पीडित महिलेला संगमनेरमध्ये माझे डॉक्टर…

Read More