Author: अनंत पांगारकर

शिर्डी दि. १ – मंत्र्यांपाठोपाठ आता अधिकाऱ्यांनाही जनतेत जाऊन काम करावे लागणार आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकार्‍यांनी दर आठवड्याला गावभेटी देत शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. वेगवान कारभारासाठी महसूल विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाकडून ११ कलमी परिपत्रक जाहीर करण्यात आले असून या परिपत्रकातील ११ कलमी मुद्दे पुढील प्रमाणे सदर भेटी दरम्यान क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज यादृच्छिकरित्या व अचानक तंत्राचा वापर करुन तपासावे. सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या पार पडत आहे याची सकारात्मक खातरजमा करावी. यात केवळ औपचारिकता न ठेवता क्षेत्रीय यंत्रणेवर नियंत्रण राहील असे नियोजन करावे. दौऱ्यामध्ये सकारात्मक फलित निघेल…

Read More

संगमनेर दि. ३० – शुक्रवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत संगमनेरमध्ये वीज वितरण कंपनीच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. तब्बल तीन-चार तासांपासून गायब असलेली वीज रात्री उशिरापर्यंत न आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सध्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम अनेक घरांमधून सुरू आहे. त्यामुळे महिलांचे सायंकाळी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून ये-जा सुरू असल्याने व त्यातच शहरातील महावितरण लाईटच्या बत्या गुल केल्याने अंधारातच हे कार्यक्रम सुरू होते. दरम्यान गायब झालेल्या विजेचा परिणाम शहरात तसेच उपनगरात जाणवत असून अनेक नागरिकांनी या संदर्भात महावितरणच्या कार्यालयाकडे विचारणा करण्यासाठी दूरध्वनी केले असता नागरिकांचे दूरध्वनी घेण्याचे टाळण्यात आले. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर त्यांनी देखील फोन घेतले नाही. अंधाराचा…

Read More

संगमनेर दि. ३१- काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आश्वी येथे प्रस्तावित असलेल्या अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा असून त्यामुळे संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेसह भौगोलिक रचनेला धक्का लागणार असून जनतेची मोठी गैरसोय होणार असल्याने हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री बावनकुळे यांना पत्र दिले आहेत संतापाची लाट… संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे नवीन अपर तहसील कार्यालय प्रस्तावित असून यामध्ये संगमनेर शहरालगतच्या संगमनेर खुर्द, समनापुर या महसूल मंडळांचा देखील समावेश केला आहे. यामुळे शहरालगची गावे ही दूरवरच्या आश्वीला जोडली जाणार आहे. यातून नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याने संगमनेर तालुक्यामध्ये…

Read More

अहिल्यानगर दि. ३१- निवृत्ती वेतनधारकांचे निवृत्ती वेतन बंद झाले असून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर थकीत रक्कम मिळणार असल्याचा फसवा दूरध्वनी संदेश अज्ञात व्यक्तीकडून निवृत्ती वेतनधारकांना येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा कुठल्याही फसव्या संदेशाला निवृत्तीवेतनधारकांनी प्रतिसाद न देण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी जनार्धन हरी सहारे यांनी केले आहे. निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन विषयक लाभ प्रदान करताना कुठल्याही वसुली अथवा प्रदानाबाबत कोषागार कार्यालयामार्फत दूरध्वनी करुन संपर्क साधला जात नाही अथवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सांगितले जात नाही. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांनी अशा कुठल्याही प्रकारच्या संदेशाला प्रतिसाद देऊ नये. अशाप्रकारचे संदेश प्राप्त झाल्यास, शंका आल्यास अथवा कुठल्याही प्रकारचे व्यवहार करण्यापूर्वी त्याची माहिती कोषागार कार्यालयास द्यावी. निवृत्तीवेतनधारकांनी…

Read More

संगमनेर दि. ३१ –  संगमनेर तालुका हा मोठा असून शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार आश्वीला अपर तहसील कार्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र काही विरोधक जनतेत गैरसमज पसरवून राजकीय फायदा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. नागरिकांच्या सोयीसाठीच नविन बदल केला जात आहे, मात्र या संदर्भात अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही. जनतेच्या सुचना व मागणीचा आदर करूनच अपर तहसीलचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली असल्याचे माध्यमातील वृत्तांत म्हटले आहे. गेल्या काही दिवसापासून आश्वी बुद्रुक तहसील कार्यालयाबाबत जनतेत गैरसमज पसरविण्यात येत असून खुलासा करण्यासाठी गुरूवारी शासकिय विश्रामगृहामध्ये काही पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे अपर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर  अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हा विभाजनाची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असताना काही दिवसांपूर्वी राज्यातील २१ जिल्ह्यांच्या विभाजनाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्ट नंतर पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्हा विभाजनाच्या चर्चेला उधाण आले होते. या चर्चांना पूर्णविराम देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. दरम्यान तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशातून जिल्हा विभाजना ऐवजी शिर्डी लोकसभा मतदारसंघात तीन नवीन अपर तहसील कार्यालय सुरू केली जाणार आहेत. या योजनेला विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गती दिली आहे. संगमनेर, अकोले आणि नेवासे तालुक्याच्या तीनही तहसीलदारांनी…

Read More

अहिल्यानगर दि. ३१-  ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतागृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत सन २०२५ मधील पुढील नमूद १५ दिवसांसाठी ध्वनी प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत राखून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांच्या वापरास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आदेशाद्वारे परवानगी दिली आहे. हे आहेत ते दिवस… १९ फेब्रुवारी २०२५ शिवजयंती (तारखेनुसार शासकीय), १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे महाराष्ट्र दिन, २८ ऑगस्ट, १, २ व ६ सप्टेंबर गणपती उत्सव, ५ सप्टेंबर ईद-ए-मिलाद, २९ व ३० सप्टेंबर…

Read More

संगमनेर प्रतिनिधी – मोहसीन शेख गो शाळेच्या मॅनेजरने बजरंग दलाच्या तिघांच्या मदतीने जनावरांची चौकशी करण्यासाठी गो शाळेत गेलेल्या तिघा जणांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत तिघेजण जखमी झाल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाकडी दांडक्याने तसेच लाथा बुक्क्याने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या प्रकारामुळे रात्री रुग्णालय परिसरात व पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमा झाली होती. अधिक माहिती अशी, फिर्यादी रोहित खलील कुरेशी, त्याचा चुलत भाऊ अरबाज जलील कुरेशी व मित्र फैसल शेख हे तिघेजण गुरुवारी (३० जानेवारी) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सायखिंडी येथे…

Read More

अहिल्यानगर दि. ३१-  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची तसेच त्यांच्या शौर्याची चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात येणारी माहिती युवापिढीला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये (दूरदृष्यप्रणालीद्वारे) गुरुवारी (३० जानेवारी) उद्घाटन करण्यात आले. अहिल्यानगर पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सांस्कृतिक कार्य…

Read More

संगमनेर दि. ३० – सत्तेचा वापर करून जनतेची सोय बघितली पाहिजे. मात्र काही लोक संगमनेर मोडण्याचे षडयंत्र करत आहे. आश्वी बुद्रुक अपर तहसील निर्मितीचा प्रस्ताव हा संगमनेर सोबत झालेला विश्वासघात आहे. संगमनेरच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर याद राखा, असा सज्जड इशारा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला. संगमनेर तालुक्याचे विभाजन करत दोन तहसील कार्यालयांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या आश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालयाच्या कार्य कक्षेत संगमनेर शहरालगतची गावे राजकीय हेतूने जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यावरून संगमनेर तालुक्यात वाद निर्माण झाला आहे. नव्याने आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अपर तहसील कार्यालयात…

Read More