Author: Annant Ppangarkar
अकोले (महाराष्ट्र संवाद न्यूज) पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कळस बुद्रुकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २० विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. शिष्यवृती परीक्षा २०२३ मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे कंसात मिळालेले गुण: शौर्य सुहास शिंदे (236), कावेरी राजेंद्र खताळ (232), आरुष अंकुश वाकचौरे (220), तनुजा रमेश ढगे (194), आदिती किसन मेंगाळ (190), दर्शन संतोष कातोरे (190), श्रेया माधव कोल्हाळ (190), सनती संदीप ढगे (190), ध्रुव ज्ञानदेव ढगे (180), दिव्या सुखदेव वाकचौरे (180), चैतन्य अरविंद पवार (174), सार्थक सुरेश मेंगाळ (162), साई संतोष ढगे (162), आदिती सुरेश वाकचौरे (162), अक्षरा सुनील शिर्के (154), स्वाती काशिनाथ डोके (146), भाग्यश्री संजय काळे…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीत देशात लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी नवे स्वातंत्र्य युद्ध सुरु आहे. यामध्ये पवार यांचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याने त्यांना बाजूला जाऊन चालणार नाही, असं महत्त्वाचं विधान काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर थोरात यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, देश सध्या ज्या परिस्थितीतून जातो आहे. अशा अडचणीच्या काळात लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी नवे स्वातंत्र्ययुद्ध सुरू आहे. यामध्ये पवार साहेबांचे मोठे महत्त्व आहे. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे लढाई करत…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) एम्पथी फाउंडेशन, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि अधिकारी यांच्या योगदानातून मिशन आपुलकी योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सारोळे पठारला सुंदर इमारत उभी राहिली आहे. गुणवत्तेबरोबरच शाळेच्या भौतिक विकासाचे येथील हे मॉडेल राज्याला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव विजय चौधरी यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे पठार व धादवडवाडीतर्फे रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वार्षिक स्नेहसंमेलन व मिशन आपुलकी कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या संस्थापिका सुनीता काकड होत्या. मंत्रालय शिक्षण विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल भोर, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजय फटांगरे,…
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची मोठे घोषणा केली आहे. तसेच या सोबत कोणतीही निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला असून सामाजिक कार्यात मात्र व्यस्त राहणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली. पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या या निर्णयाला जोरदार विरोध करत पवार जोपर्यंत आपला निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत सभागृह न सोडण्याचा पवित्रा…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अनेकांनी हुतात्मे पत्करले. मुंबईसह महाराष्ट्र राज्याचा निर्मितीला मोठा इतिहास आहे. देशाच्या विकासामध्ये आपल्या राज्याचा वाटा सर्वाधिक असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त थोरात यांच्या हस्ते संगमनेरमध्ये शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, नायब तहसीलदार गणेश तळेकर, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. थोरात म्हणाले, विविध परंपरेने नटलेल्या महाराष्ट्राचा विकासातील अग्रगण्य राज्य म्हणून देशात लौकिक आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे आपण 75 वे तर राज्याच्या निर्मितीचे 63 वे वर्ष साजरे करीत आहोत. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि नवनिर्मित महाराष्ट्राचे…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कोवीड संकटानंतर अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकरी, कष्टकरी मेटाकुटीला आला होता. सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने सामान्य माणसांचा हिताचे अनेक निर्णय घेतले असल्याचे सांगत राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या निर्णयाची जंत्रीच वाचून दाखवली. महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन व वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण श्रीरामपूर तालुक्यातील नायगांव येथे महसूलमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मंत्री विखे यांच्या समवेत यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,…
आळेफाटा, पुणे (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून एक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला आळेफाटा पोलिसानी रविवारी ( ता. ३० एप्रिल) रोजी पिंपळवंडी परिसरात पकडले आहे. त्यानंतर आरोपीला घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नवनाथ आनंदा चव्हाण (वय ४० वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, घारगाव शिवारात एका अल्पवयीन मुलीवर नवनाथ आनंदा चव्हाण (रा. खैरदरा कोठे बुद्रुक) याने २३ एप्रिल २०२२ रोजी अत्याचार केला होता. त्यामुळे घारगाव पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोक्सो), अनुसूचित जाती जमाती कायदा आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर…
शिर्डी (महाराष्ट्र संवाद न्यूज) ‘‘सर्वसामान्य जनतेला आता ६०० रुपये ब्रासने घरपोच वाळू मिळणार आहे. राज्यातील या निर्णयाची सुरुवात आज महाराष्ट्र दिनी अहमदनगर जिल्ह्यातून होत आहे. सर्वसामान्यांचे हितासाठी शासनाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आहे.’’ असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन व वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण श्रीरामपूर तालुक्यातील नायगांव येथे महसूलमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, नायगांवचे सरपंच राजाराम राशीनकर, दीपक पठारे आदी उपस्थित…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यात महाराष्ट्र दिनापासून मोठ्या थाटामाटात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. एकीकडे ही तयारी सुरू असतानाच दुसरीकडे मात्र महसूलमंत्र्यांचे खास लक्ष असलेल्या संगमनेरात मात्र नव्या धोरण लागू होण्यापूर्वीच जेसीबीद्वारे वाळू तस्करी होत असून मोठ्या प्रमाणात वाळू साठे तयार करण्यात आल्याचे महसूलच्या कारवाईत समोर आले आहे. संगमनेरात विद्यमान महसूलमंत्र्यांनी वाळू तस्करांचे कंबरडे मोडल्याचे सांगितले जात असले तरी हा दावा महसूलनेच केलेल्या कारवाईमुळे खोटा ठरला आहे. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे रविवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई मध्ये महसूलच्या पथकाने पाठलाग करत जेसीबी ताब्यात घेतला तसेच काही अंतरावर पथकाला मोठ्या…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) डिजेमुक्त लग्न, दारूमुक्त वरात, वेळेवर लग्नविधी वेळेवर व्हावेत व विधवेची हेटाळणी टाळण्यासाठी गाव पातळीवर महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभामध्ये ठराव घेण्यासाठी येथील जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिनींनी पुढे सरसावल्या आहे. चुकीच्या प्रथांविरोधात त्यांनी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना निवेदन दिले. त्या संदर्भात तातडीने कार्यवाहीचे आश्वासन त्यांनी महिलांच्या शिष्टमंडळाला दिले. लग्न समारंभातील होणाऱ्या खर्चावर तसेच मृत्युनंतर करण्यात येणाऱ्या अनिष्ठ रूढी परंपरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणीमध्ये वृषाली कडलग, ॲड. सीमा सातपुते, स्नेहलता कडलग, माधुरी शेवाळे, डॉ. नीलम शिंदे, डॉ. श्रद्धा वाणी, सुधा नवले, कस्तुरी शेवाळे आदींचा समावेश होता. निवेदनात…
विश्लेषण ☆ अनंत पांगारकर संगमनेरच्या म्हाळुंगी नदीवरील पुलावरून चालू असलेल्या राजकीय कलगीतुऱ्यातून संगमनेरकर पुरते गोंधळून गेले. थोरात-विखे यांच्या पत्रोपचारामुळे या खचलेल्या पुलाखालून बरेच पाणी वाहून जात आहे. थोरात-विखे समर्थकातील पुराव्यांच्या शीतयुद्धामुळे पूल होण्यास नेमके कोण आडकाठी आणत आहेत हेही आश्चर्यकारकरीत्या लोकांसमोर आले असताना जनतेचे मूलभूत प्रश्न आणि विकास कामांच्या सोडवणुकीमध्ये तरी किमान राजकारण आणू नये, अशी सर्वसामान्य जनतेची रास्त अपेक्षा आहे. थोरात-विखे यांच्यातील संघर्ष अलीकडे अधिक टोकदार झाला असून त्याचा परिणाम विकास कामांवर होऊन जनता भरडली तर जाणार नाही ना ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या पावसाळ्यात म्हाळुंगी नदीवर स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यान असलेल्या पक्क्या…
राहाता (महाराष्ट्र संवाद न्यूज) राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने सर्वच्या सर्व 18 जागांवर मोठा नेत्रदीपक विजय मिळविला आहे. त्यामुळे या बाजार समितीवर त्यांचे वर्चस्व कायम राहिले. संगमनेर आणि राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजी-माजी महसूल मंत्र्यांनी एकमेकांविरोधात आपले पॅनल उभे केले होते. निवडणूक निकालानंतर दोघांनीही आपापल्या बाजार समित्या कायम राखल्या आहेत. संगमनेरमध्ये थोरात यांच्या तर राहत्या मध्ये विखे यांच्या नेतृत्वाखालील मंडळांनी सर्वच्या सर्व जागांवर यश मिळविल्याने दोन्ही सामने बरोबरीत सुटले आहे. राहाता बाजार समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरुवातीलाच तीन जागा बिनविरोध झाल्यानंतर मंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळ…
शिर्डी (महाराष्ट्र संवाद न्यूज) सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी राज्यात गतिमान करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी दिले. महसूल मंत्री विखे पाटील यांनी लोणीयेथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितिन करीर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. विखे म्हणाले, राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित वाळू धोरण राज्य शासनामार्फत…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) खरीपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन केले आहे. राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात निविष्ठा उपलब्धता, तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली असून १५ भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचणी असल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षांची जबाबदारी…
निवडणूक विश्लेषण | अनंत पांगारकर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपेक्षेप्रमाणे राज्याचे माजी मंत्री काँग्रेस नेते विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने सर्वच्या सर्व जागांवर यश मिळविले आहे. थोराताना शह देण्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाच्या नाकातोंडात पाणी गेले. थोरात यांच्या सैन्याने सेनापतीविना असलेल्या विखेंच्या सगळ्याच सोंगट्या मारल्या. शेतकरी मंडळाला एकही जागा मिळून न देणाऱ्या बुद्धिबळाच्या निवडणुकीत थोरात अखेर बाजीगर ठरले. बिनविरोध निवडीची परंपरा मोडीत काढत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जनसेवा मंडळाचे उमेदवारी करत निवडणुकीत रंगत आणली होती. सर्वच्या सर्व…
महाराष्ट्र संवाद ◇ रविवार विशेष लेख कोणतीही सत्ता असो ती माणसाला अहंकारी बनवत असते. सत्ता डोक्यात भिनली की ती कोणालाच जुमानत नाही. मोदींच्या नेतृत्वातील मध्यवर्ती सरकारचं सध्या असंच काहीसं सुरू आहे. अहंकाराने सत्ताधारी इतके मदमस्त झालेत की आसपास काय बोललं जातं याचीही तमा ते करत नाहीत. असंख्य आरोपांची राळ उठली असतानाही त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. साधेसुधे आरोप झाले असते तर एकवेळ ते दुर्लक्षित करता आले असते. पण देशाच्या सार्वभौमत्वाला हात घालणारे आरोप होऊनही जेव्हा सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा त्यांना अहंकाराने पछाडल्याचाच प्रत्यय असतो. केंद्रातल्या मोदी सरकारचा कारभार अशाच अहंकारात सुरू आहे. असंख्य आरोप जे देशाच्या अस्तित्वालाच हात घालणारे…
महाराष्ट्र संवाद न्यूज मित्राचा खून केल्याच्या कारणावरून न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला भा.द.वि. कलम 304 (पार्ट सेकंड) खाली दोषी ठरवत वीस हजार रुपये दंडासह दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शंकर लहानू साळुंखे, रा. कळस, ता. अकोले, जि. अहमदनगर असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 3 फेब्रुवारी 2022 रोजी देवठाण रोड अकोले येथे खुनाची घटना घडली होती. सुतार व्यवसाय करणाऱ्या सरबजीत ओमप्रकाश चौहान (रा. उत्तर प्रदेश) याच्या खून प्रकरणी राजू जगधारी राजभर याच्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यात आरोपी शंकर लहानु साळुंखे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात अधिक माहिती अशी, 3…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अपेक्षेप्रमाणे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचेच वर्चस्व कायम राहिले आहे. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत त्यांच्या जनसेवा मंडळाचा साफ धुव्वा उडाला आहे. त्यांच्या अधिपत्याखालील एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. एका जागेवर थोरात समर्थक अपक्ष उमेदवाराचा व शेतकरी विकास मंडळाचे सतरा उमेदवार विजयी झाले आहेत. बाजार समितीच्या 18 जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. निवडणूक मैदानामध्ये थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळ आणि विखे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळात सरळ लढत झाली. शुक्रवारी मतपेटीत 45 उमेदवारांचे भवितव्य बंद झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून सोसायटी गटाच्या जागांची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून शेतकरी विकास मंडळाचे शंकर खेमनर, कैलास पानसरे, मनीष गोपाळे, सुरेश कान्हेरे, गीताराम गायकवाड, सतीश खताळ व विजय सातपुते विजयी झाले आहेत. या विजयामुळे शेतकरी विकास मंडळाने संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ यामुळे 17 वर गेले असून अपक्ष म्हणून निवडून आलेला उमेदवार देखील थोरात समर्थक असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समर्थकांना चंचू प्रवेशही करता आलेला नाही. सोसायटी मतदार संघ…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येत असून महिला राखीव गटाची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून शेतकरी विकास मंडळाच्या दिपाली वरपे आणि रुक्मिणी साकोरे या दोन्ही महिला उमेदवारांनी विजय मिळविला आहे. त्यांनी जनसेवा मंडळाच्या अंजना दिघे आणि रोहिणी निघते यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ 8 वरून 10 वर गेले आहे तर थोरात समर्थक असलेले अपक्ष सचिन करपे देखील निवडून आले. राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा मंडळाला या निवडणुकीत अद्यापही खाते खोलता आलेले नाही. सोसायटी मतदार संघ महिला राखीव:- अंजनाबाई पुंजा…
