Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज स्‍वत:च्‍या नावाने व्‍यापारी संकुल उभारण्‍याचा घाट घालण्‍यापेक्षा म्‍हाळुंगी नदीच्‍या पुलाकरीता निधी आणण्‍याचे प्रयत्‍न केले असते तर, आपले अपयश उघडे झाले नसते. परंतू आता आपल्‍याला निधीही आणता येत नाही हे सर्व जनतेला कळाल्‍यानेच आपल्‍या अपयशाचे खापर दुस-यांवर फोडण्‍याचा आ. बाळासाहेब थोरात यांचा प्रयत्‍न म्‍हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असाच असल्‍याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्‍या पदाधिका-यांनी केला आहे. म्‍हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्‍या नेतृत्‍वावर आ. थोरात यांनी केलेल्‍या आरोपांना भाजपाचे शहर अध्‍यक्ष श्रीराम गणपुले, माजी उपनगराध्‍यक्ष जावेद जहागिरदार, अमोल खताळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. म्‍हाळुंगी नदीवरील पुल कुणामुळे खचला याची संपूर्ण कल्‍पना संगमनेरच्‍या जनतेला आहे. परंतू सत्‍ता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज एखाद्या मंत्र्याच्या घरावर मोर्चा नेणं माझ्या मनाला पटत नाही, खरंतर असा मोर्चा प्रांताधिकारी अथवा कलेक्टर कचेरीवर काढायला हवा या मताचा मी आहे. डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट पार्टीचा हा मोर्चा आहे. मोर्चेकरांच्या प्रश्नासोबत आम्ही आहोत, अशी भूमिका काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली आहे. किसान सभेसह विविध संघटनांचा अकोलेपासून महसूल मंत्र्यांच्या लोणीतील कार्यालयावर पायी मोर्चा बुधवारी निघत असून तीन दिवस हा मोर्चा चालणार आहे. नैसर्गिक आपत्ती व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मुलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे व विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज नगर मनमाड महामार्गाची काळजी करणा-या माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वर्षानुवर्षे सर्व सत्‍तास्‍थानं हातात असतानाही वीस वर्षांपासून रखडलेल्‍या कुप्रसिध्‍द संगमनेर – कुरण – पोखरी हवेली रस्‍त्याच्‍या कामाकडे दुर्लक्ष का केले? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्‍या अल्‍पसंख्‍याक आघाडीचे सरचिटणीस हाफीज हैदर शेख यांनी उपस्थित केला आहे. शेख यांनी म्‍हटले की, संगमनेर पोखरी हवेली हा रस्‍ता अतिशय दयनिय झाला आहे. परंतू विकासाच्‍या गप्‍पा मारणा-यांना बाहेरच्‍या रस्‍त्‍यांची काळजी करुन बोलायला वेळ आहे. परंतू संगमनेर शहरानजीक असणा-या रस्‍त्‍यांवर बोलायला सवड सापडत नाही याचे आश्‍चर्य वाटते. संगमनेर शहराच्‍या बाजारपेठेत कुरण, देवकौठे, पारेगाव खुर्द, बुद्रूक, आशापिरबाबा, तळेगाव, नान्‍नज, पोखरी हवेली…

Read More

अनंत पांगारकर • महाराष्ट्र संवाद न्यूज नगरपालिका निवडणुका होईपर्यंत म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम होऊ नये, यासाठी भाजपचेच काही नेते मुंबईत मुख्यमंत्री अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांनी गेल्या काही दिवसापासून बहुचर्चित ठरलेल्या म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलासंदर्भात महत्त्वाचे विधान करताना भारतीय जनता पक्षातील वजनदार नेत्यावर शरसंधान साधले आहे. थोरात म्हणाले, स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर या दरम्यान असलेला म्हाळुंगी नदीवरील पूल दुर्दैवाने पडला आहे. पाण्याचा लोंडा मोठा असल्याने पूल पडल्याने अनेक नागरिकांची अडचण झाली आहे, ही बाब…

Read More

राहाता | महाराष्ट्र संवाद न्यूज ज्‍यांना केंद्रात संधी होती त्‍यांनी कधीच सहकार मंत्रालय सुरु करण्‍याबाबतचा विचार केला नाही. सहकार चळवळीचे खासगीकरण कसे होईल, असेच प्रयत्‍न त्‍यांच्‍याकडून झाले. स्‍वातंत्र्यानंतर आता देशात प्रथमच सहकार मंत्रालय स्‍थापन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार चळवळीला भक्‍कम पाठबळ दिले आहे. सहकार मंत्रालयातून होत असलेल्‍या निर्णयांमुळे या चळवळीच्‍या प्रगतीचा मार्ग अधिक व्‍यापक होत आहे, असा विश्‍वास महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. अहमदनगर जिल्‍हा शिक्षक सहकारी बॅकेंच्‍या शताब्‍दी वर्षाच्‍या निमित्‍ताने आयोजित सहकार परिषदेचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत झाले. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, बॅंकेचे अध्‍यक्ष गणेश शिंदे,…

Read More

अकोले | महाराष्ट्र संवाद न्यूज नैसर्गिक आपत्ती व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मुलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे व विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला फेकले गेले आहेत. पक्ष फोडण्याची राजकीय आमिषे व तुरुंगाची भीती दाखवून  सत्ता मिळविण्यात बहुतांश प्रस्थापित राजकीय नेते व पक्ष मशगुल झाले असल्याने, अखेर पुन्हा एकदा जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणे अनिवार्य झाले आहे. किसान सभेच्या पुढाकाराने या पार्श्वभूमीवर दिनांक २६, २७, २८ एप्रिल २०२३ रोजी अकोले ते लोणी असा जबरदस्त राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येत आहे. अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज चौदा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर केलेले मेसेज अठरा वर्षे वयाच्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात पोलिसांनी अपहरणासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. अमन सलीम मोमीन असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते. अमन मोमीन याने पीडित तरुणीच्या वडिलांच्या मोबाईलवर असलेल्या इंस्टाग्रामवर मेसेज करून तिला बस स्थानकावर बोलावून तेथून तिचे अपहरण केले होते. काही नागरिकांना ही अल्पवयीन मुलगी आणि तिच्यासोबत असलेला अमन मोमीन हा गंगामाई घाटावर आढळून आला. पीडित मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर असलेल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आरोपी मेसेज करत होता. वडिलांच्या मोबाईलवर सुरू असलेले हे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज वडदरा (बोटा) येथे शनिवारी (22 एप्रिल) रात्री उत्तम बाळाजी कुऱ्हाडे (वय 62 वर्ष) यांचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्यामुळे घरात घुसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात होते मात्र कुऱ्हाडे यांच्या शवाविच्छेदन अहवालानंतर त्यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मृत्यू प्रकरणाला वेगळ वळण मिळाला असून कुऱ्हाडे यांचा खून करण्यात आला असल्याच्या शक्यतेने पोलीस तपास करण्यात येत आहे. नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव या महत्त्वाच्या गावालगत असलेल्या बोटा गावांतर्गत येणाऱ्या वडदरा येथे शनिवारी रात्री वृद्ध आई समवेत घरात असलेल्या उत्तम बाळाजी कुऱ्हाडे यांच्यावर घरात घुसलेल्या बिबट्याने हल्ला केला.…

Read More

अहमदनगर | महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेतील 35 लाख रुपये किमतीचा अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या गदेचा मानकरी महेंद्र गायकवाड ठरला आहे. अहमदनगरचा वाडिया पार्कमध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील अंतिम सामना महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाला. या सामन्यात गायकवाड विजेता तर राक्षे उपविजेता ठरला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून हजारावर स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते,…

Read More

अहमदनगर | महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगरमधील वाडिया पार्क येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. रविवारी (23 एप्रिल) अहमदनगरच्या वाडीया पार्क येथील माळीवाडा जिल्हा क्रीडा‌ संकुल येथे छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी फडणवीस बोलत होते‌. व्यासपीठावर राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी मान्यवर तसेच कुस्ती पंच, विविध क्षेत्रातील पदाधिकारी व जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी…

Read More

श्रीरामपूर | महाराष्ट्र संवाद न्यूज भारत ही जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्था असल्याचा परिपक्व विश्वास किरकोळ गुंतवणूकदारांनी दाखविल्याने म्युच्युअल फंड सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) मासिक चलनाने मार्चमध्ये प्रथमच बाजारात अस्थिरता असूनही १४,००० कोटींचा टप्पा ओलांडल्याचे प्रतिपादन एमएफडी सुनील कडलग यांनी केले. माऊली कृषी उद्योग फाउंडेशनतर्फे आयोजित आरंभ या कृषी व्यावसायिक मित्रांच्या परिषदेत ते ‘नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी माऊली कृषी उद्योगाचे संचालक ज्ञानेश्वर उंडे उपस्थित होते. कडलग म्हणाले, सद्यस्थितीत भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. येत्या पाच ते सहा वर्षातच ती तिसऱ्या क्रमांकावर जाईल. बाजारातील अस्थिरता ही कधीही कायमस्वरूपी नसते. गुंतवणुकीची नवी संधी ती निर्माण करते,त्याचा लाभ गुंतवणूकारांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ‘पंचवीस वर्षांपासून मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने आयोजित केला जाणारा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सर्व धर्मीयांसाठी एक आदर्श उपक्रम आहे. जनहिताच्या या उपक्रमाचे अनुकरण सर्वत्र झाले पाहिजे. साधेपणाने लग्न समारंभ करण्याचा संदेश सर्वांनी मनावर घेतला तर कर्जबाजारीपणातून होणाऱ्या आत्महत्या होणार नाहीत’, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी येथे केले. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने मालपाणी लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आमदार तांबे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, कामगार नेते कॉम्रेड कारभारी उगले, कॉम्रेड माधवराव नेहे, कॉम्रेड ॲड. ज्ञानदेव सहाणे, मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, डॉ. संजय…

Read More

रविवार विशेष लेख महाराष्ट्र भूषण पुरस्काराची गरीमा रविवारच्या सोहळ्याने पुरती लोप पावली. खारघरमध्ये पार घडलेल्या या सोहळ्यानंतरच्या हादस्याने महाराष्ट्र शरमिंदा झाला. या सुधारलेल्या राज्याची देशभर छी-थू झाली. सरकार गाढवासारखं वागल्यावर वाट्याला निंदेशिवाय काय येणार? सारा देश ज्या राज्याच्याकडे आदर्शवत म्हणून पाहतो त्या राज्यात भूषण पुरस्कारात 14 जण मरतात हे लांच्छन कधीच पुसणारं नाही. पुरस्कारानंतर बाहेर येत असलेल्या क्लिप्स पाहिल्या की खारघरच्या मैदानावर मेंढरांचा बाजार भरला होता की काय या समजाला अधिक बळकटी येते. सरकारच बुध्दू असेल तर मैदानात बोलवलेल्यांची गत काय असू शकते? स्वत:ची पाठ थोपटण्यासाठी असले इव्हेंट करायचे आणि दुसर्‍याला राजकारण करू नका म्हणून शहाणपण शिकवायचा उद्योग सरकारमधल्या मंत्र्यांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अचानकपणे घराच्या उघड्या दरवाजातून आत आलेल्या बिबट्याने घरात टीव्ही पाहत असलेल्या 62 वर्षीय व्यक्तीवर हल्ला चढविला. अनपेक्षित झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात संगमनेर तालुक्यातील वडदरा (बोटा) येथील उत्तम बाळाजी कुऱ्हाडे यांचा मृत्यू झाला. शनिवारी संगमनेर तालुक्यातील घारगाव नजीकच्या वडदरा बोटा येथे रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर तालुक्यात मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. मानवी वस्तीत घुसलेले बिबटे मानवावर हल्ला करत आहेत. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घराच्या उघड्या दरवाज्यातून आत आलेल्या बिबट्याने समोर टीव्ही पाहत असलेल्या उत्तम कुऱ्हाडे यांच्यावर त्यांना काही समजण्यापूर्वीच हल्ला चढविला. गंभीर जखमी झालेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्य सरकारने नुकताच गेलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि पुरस्काराची रक्कम डॉ. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी सरकारला परत करणार आहेत. तसेच त्यांनी या पत्राद्वारे इथून पुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान न करण्याचे आवाहन श्री सेवकांना केले आहे. या अनुषंगाने धर्माधिकारी यांचे पत्र समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. मात्र हे पत्र बनावट असल्याचे धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणा दरम्यान श्री सदस्यांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यूवरून राजकारण तापले असतानाच आता महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने शनिवारी समाज माध्यमांमध्ये एक पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या पत्रात राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज तब्बल सात महिने उलटून गेल्यानंतर देखील स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिराला जोडणाऱ्या म्हाळुंगी नदीतील खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रशासन अद्यापही करू शकले नाही. पालिकेत सुरू असलेला प्रशासकीय कारभार आणि राजकीय श्रेय वादाच्या टोलवाटोलवीमध्ये या फुलाचा प्रश्न अडकला असल्याने आता या प्रश्नी स्थानिक नागरिक आणि संगमनेरकरांनी आपली वज्रमुठ आवळली असून आता आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (२४ एप्रिल) म्हाळुंगी नदीवरील पडलेल्या पुलाच्या दुरुस्ती करता आंदोलन करण्यात येणार असून तशा आशयाचे निवेदन तब्बल दीडशे लोकांनी प्रशासकीय अधिकारी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. या प्रश्नी संगमनेरकरांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या असल्याचे दिसते. या पुलावरून दररोज हजारो व्यक्तींची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रमजान ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम समाजातील दोन गटात झालेल्या दंगलीमुळे ईदच्या सणाला संगमनेरमध्ये गालबोट लागले आहे. शहर पोलिसांनी नगरसेवकासह निष्पन्न झालेल्या आठ जणांसह 28 जणांविरोधात दंगल, विनयभंग आणि शस्त्राचा वापर आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील एकास अटक केल्याची माहिती समोर येत आहे. दोन गटातील वादाची परिणती प्राणघातक हल्ल्यात झाली. शहरातील नाईकवाडपुरा भागात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. हाणामारीमध्ये तलवार, चाकू, हॉकी स्टिकचा वापर करण्यात आल्याने चार जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रात्री नाईकवाडपुरा भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी रमजान ईदच्या पवित्र सणाला…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून देण्याच्या मोबदल्यात तब्बल चाळीस हजाराची लाच मागणारा तलाठी आणि त्या तलाठ्यासाठी छत्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारणारा खासगी एजंट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. धनराज नरसिंग राठोड (वय ४० वर्ष) असे लाचखोर तलाठ्याचे तर योगेश विठ्ठल काशीद (वय ३३ रा. घुलेवाडी फाटा, ता. संगमनेर) असे लाचखोर खासगी एजंटचे नाव आहे. संगमनेर मध्ये शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळापुर येथील बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा उतारा तसेच त्यावर वडील व इतर ११ जणांची नावे असलेला हा उतारा तक्रारदार व्यक्तीला हवा होता. त्यासाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज समाजामध्ये महिला बालकांवर होणारे अन्याय अत्याचार तसेच बालविवाहासारख्या चुकीच्या प्रथांवर प्रतिबंध आणणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी प्रशासन व सर्व समाज घटकांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी केले. संगमनेर तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व मुख्य प्रशासकीय विभागांच्या प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या. नायब तहसीलदार गणेश तळेकर व राजेश पऊल, शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे, संगमनेर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी गोर्डे, ॲड. रंजना गवांदे आदी उपस्थित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले तालुक्यातील आंभोळ गावचे सुपुत्र असलेल्या विजय चौधरी यांना राज्याच्या नगर विकास मंत्रालयातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अभियंता पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईत प्रदान करण्यात आला. मुंबईत नरिमन पॉईंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयात उपसचिव म्हणून कार्यरत असलेले विजय चौधरी यांनी नागरी जमीन कमाल धारणा कायदा निरसिद्ध झाल्यानंतर शासन देय क्षेत्रापोटी सन २०१९ ते २०२३ या कालावधीत योजना धारकांकडून सुमारे अकराशे कोटींचा महसूल राज्य शासनाला मिळवून देण्यामध्ये मोलाचे योगदान दिले. संचालक नगर…

Read More