Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या आरोपांना उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ज्यांच्या व्हाट्सअपचे स्क्रीन शॉट माध्यमांना पत्रकार परिषदेत दाखविले त्या सचिन गुंजाळ यांनी आपली भूमिका एका पत्राद्वारे ट्विटरवर व्यक्त केली आहे. ‘महाराष्ट्र संवाद’च्या वाचकांसाठी या पत्राचा तपशील आणि अधिक माहिती देत आहोत. सन्माननीय अतुल लोंढेजी, आपण प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आहात. आपण माहिती घेऊन बोलले पाहिजे. अगदीच पत्रकार परिषद घेण्या अगोदर आपण माझ्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला असता, तरीही मी वास्तविकता सांगितली असती. आपण चुकीची माहिती देऊ नये ही अपेक्षा आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ एबी फॉर्म वाटपासंदर्भात जे घडले ते आपणास सांगतो. सर्वात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले जलजीवन मिशन हे एक क्रांतीकारी पाऊल असून तालुक्यात या योजनेसाठी ७५१ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. जलजीवन मिशन अंतर्गत आश्वी बुद्रुक येथील सुमारे १ कोटी ९९ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कैलास तांबे, भगवानराव इलग, पोपटराव वाणी, दिनकर गायकवाड, मच्छिंद्र थेटे, रोहीणी निघुते, कांचन मांढरे, गुलाबराव…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज सत्यजित तांबेंची बंडखोरी, तांबे भाजपच्या वाटेवर आदी प्रकारच्या अनेक बातम्यांनी गेल्या महिनाभरातील वातावरण ढवळून निघाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी शनिवारी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर पक्षांतर्गत वादाचा माध्यमांनी फुगवलेला फुगा अखेरीस फुटला आहे. पत्रकार परिषदेत तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षातील नेत्यांवर टीका करत थोरात तांबे परिवारा विरोधात पक्षातूनच षडयंत्र रचल्याचे सांगत आपण अपक्ष म्हणून यापुढे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी अखेरीस शनिवारी सर्वच राजकीय घडामोडींवर शनिवारी आपली भूमिका स्पष्ट करत सर्वच वादांवर पडदा टाकला आहे. तांबे यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे ते भाजप…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक पदवीधर निवडणुकीत निवडून आलेल्या सत्यजित तांबे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शुभांगी पाटील यांनी शनिवारी अधिकृतरित्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. याचबरोबर त्यांनी आपला धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केल्यानंतर शिवसेनेने पाटील यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला. तांबे यांच्या विरोधात कडवे झुंज देताना पाटील यांनी या मतदारसंघात सुमारे 40 हजार मते मिळविली. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या पाटील यांना भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी मातोश्रीचे दरवाजे ठोठावत शिवसेनेचा पाठिंबा मिळविला होता. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरमध्ये गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून चोऱ्या, घरफोड्या, हाणामाऱ्या ही नित्याची बाब झाली आहे. गुन्हेगारीचा बिमोड करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे संगमनेर व्यापारी असोसिएशनने पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. संगमनेरचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांना या पार्श्वभूमीवर निवेदन देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात स्थानिक पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला असून गुन्हेगारांनी संगमनेरात आपले हातपाय पसरले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या खून प्रकरणाचा आणि त्या पाठोपाठ शहरात व परिसरात झालेल्या दरोडेच्या घटना चोऱ्या यांची उकल करण्यात पोलीस अयशस्वी ठरले आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे हैराण झालेल्या संगमनेरकरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क रात्रीच्या वेळी घराच्या पडवीमध्ये जेवण करत असताना घराचे छत अंगावर पडल्याने चुलत्याचा व पुतणीचा मृत्यू झाला आहे. याशिवाय वृद्ध महिला गंभीर जखमी झाले असून तिच्यावर रुग्णालयात उच्चार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. लक्ष्मण चंद्रभान सोनवणे (वय 42 वर्ष) व सानिका एकनाथ सोनवणे (वय 8 वर्ष) असे मृत झालेल्या चुलत्या-पुतणीचे नाव आहे. तर मृत लक्ष्मण सोनवणे यांची आई वैजयंतीबाई चंद्रकांत सोनवणे (वय 65 वर्ष) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.वेल्हाळे येथे शुक्रवारी रात्री सोनवणे कुटुंबीय आपल्या बंगल्याशेजारी असलेल्या पत्र्याच्या पडवीमध्ये रात्री जेवण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत सत्यजीत तांबे विजयी झाले आहेत. कॉग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विजयानंतर त्यांची पुढील वाटचाल कशी असेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतांनाच एकीकडे भारतीय जनता पक्षाने त्यांना थेट पक्षात येण्याची ऑफर दिली असतांनाच दुसरीकडे कॉग्रेसचेही दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सत्यजीत तांबेंना एक महत्वाचा राजकीय सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले, इतके दिवस चेंडू कॉग्रेसच्या कोर्टात होता. सत्यजीत अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्याला कॉग्रेस, भाजपा त्यांच्याकडे बोलाविण्याचा प्रयत्न करणार. आता पुढे त्याला बरीच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवीन आमदार म्हणून निवडून आले आहेत. या मतदारसंघावर सलग चौथ्या निवडणुकीतही तांबे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. सत्यजित तांबे यांनी अपेक्षित मतांचा कोठा पूर्ण केला. त्यांनी महाविकास आघाडीने परस्पर केलेल्या शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे. राजकीय घडामोडींमुळे रंगतदार ठरलेल्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात कोण गुलाल उधळणार याविषयी आता राजकीय चर्चांना जोर आला होता. महाविकास आघाडीची उमेदवारी मिळून देखील आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजित तांबे याचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुदतीत एबी फॉर्म न मिळाल्याने तांबे यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विधान परिषदेच्या औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचा निकाल जाहीर झाला असून या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांचा विजय झाला आहे. त्यामुळे औरंगाबादवर राष्ट्रवादी काँग्रेसने तर नागपूरवर काँग्रेसने विजय मिळवत आपले खाते उघडले आहे. भाजपला कोकणातून विजय मिळाला आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या निकालामध्ये महाविकास आघाडीला दोन जागा तर भारतीय जनता पार्टीला एक जागा मिळाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी एकेका जागेवर विजय मिळविला असून चुरशीच्या ठरलेल्या नाशिकच्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे दुसऱ्या फेरी अखेर आघाडी घेऊन असले तरी अद्याप तीन फेऱ्या बाकी आहेत. औरंगाबादच्या लढतीकडे राज्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिक पदवीधर मतदार संघाची मतमोजणी सुरू असून दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे दुसऱ्या फेरी अखेर 15000 पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहे. दुसऱ्या फेरीनंतर तांबे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केले असल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मतमोजणी परिसरात मोठा जल्लोष सुरू केला आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत दिसत आहे. असे असले तरी या पदवीधर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पदवीधरांनी आपली मते बाद केली आहेत. बाद मतांचे प्रमाण लक्षात घेता पदवीधरांनी असे का केले असावे अशी शंका निर्माण होते. दुसऱ्या फेरी अखेर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कोकण शिक्षक मतदार संघातून भाजपने विजयी सलामी दिल्यानंतर त्या पाठोपाठ सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वपूर्ण असलेला फडणवीस-गडकरी यांचा बालेकिल्ला नागपूरचा गड मात्र महाविकास आघाडीने आपल्या ताब्यात घेतला आहे. नागपूर शिक्षक मतदार संघातून काँग्रेसचे सुधाकर आडबाले मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करणाऱ्या सुधाकर आडबाले यांच्या विजयाची घोषणा करण्यात आले असून महाविकास आघाडीचा पहिला विजयी उमेदवार जाहीर झाला आहे. सुधाकर आडबाले यांनी भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार नागो गाणार यांचा पराभव केला. नागपूर मतदार संघ हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हक्काचा बालेकिल्ला मानला जातो या बालेकिल्लातून काँग्रेसचा पर्यायाने महाविकास आघाडीचा उमेदवार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी महसूल मंत्री, लोकनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (5 फेब्रुवारी) सायंकाळी साडेसात वाजता जाणता राजा मैदान येथे आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शिंदेशाही बाणा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हे गोरगरीब व सर्वसामान्यांचे नेते असून महाराष्ट्रातील सुसंस्कृत नेतृत्व म्हणून लोकप्रिय आहेत. महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक सलग आठ वेळा निवडून येत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण ,पाटबंधारे ,रोजगार हमी योजना, खारजमीन, राजशिष्टाचार, जलसंधारण या विभागांची खाती सांभाळली आहेत. महसूल विभागाला हायटेक बनवताना लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून शालेय शिक्षण विभाग…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विधान परिषद निवडणुकीतील निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून कोकण विभागीय शिक्षक मतदार संघातील पहिला कल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आला आहे. या मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजय झाले असून त्यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. 30 जानेवारीला नाशिक अमरावती पदवीधरसह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक झाली. पदवीधर मतदार संघाच्या पाचही जागांसाठी गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरुवात झाली असून नाशिक पदवीधर मतदार संघाच्या प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात होण्यास दुपार उजाडली होती. नाशिकचे मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच कोकण विभागीय शिक्षक मतदार संघाचा पहिला निकाल समोर आला आहे. कोकण विभागीय शिक्षक मतदार संघातील मतदानाची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लोणी : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्‍या अर्थसंकल्‍पातून ग्रामीण भारताच्‍या विकासाचा नवा मार्ग दृष्‍टीक्षेपात आला आहे. सहकारी साखर कारखान्‍यांच्‍या कराबाबत घेतलेला महत्‍वपूर्ण निर्णय हा सहकार चळवळीच्‍या आर्थिक स्‍थैर्यासाठी मिळालेले मोठा पाठबळ असल्‍याची प्रतिक्रीया महसूल, पंशुसंवर्धन आणि दूग्‍धविकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. अर्थसंकल्‍पावर भाष्‍य करताना विखे पाटील म्‍हणाले की, सादर करण्‍यात आलेल्‍या या अर्थसंकल्‍पामध्‍ये विकासाचे सात प्राधान्‍यक्रम निश्चित करण्‍यात आल्‍यामुळे शहरी आणि ग्रामीण भागाच्‍या विकासाचा नवा रोडमॅप आता स्‍पष्‍ट झाला आहे. ग्रामीण भागात कृषि क्षेत्राला पाठबळ देतानाच सेंद्रीय शेतीला या अर्थसंकल्‍पामध्‍ये दिलेला प्राधान्‍यक्रम हा निश्चितच महत्‍वचा असल्‍याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक / अहमदनगर नाशिक पदवीधर मतदार संघाची मतमोजणी गुरुवारी (ता. 2 फेब्रुवारी) नाशिकच्या सय्यद पिंपरी येथे होत आहे. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे मतमोजणी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून 28 टेबलवर मतमोजणी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. सय्यद पिंप्री येथील गोदामात मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून गुरुवारी सकाळी मतमोजणी केली जाणार आहे. अशी आहे मतमोजणी प्रकिया नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण 1 लाख 29 हजार 456 मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणी सय्यद पिंप्री येथील गोदामात 28 टेबलवर होणार आहे. एका टेबलावर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : अपघातामध्ये वडिलांचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या वाहन चालकाचा शोध घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर मोटार अपघातामध्ये वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणारा पोलीस नाईक संतोष चंद्रकांत काकडे लाचेच्या सापळ्यात अडकला आहे. संतोष काकडे हा जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्यात पोलीस नाईक असून काही दिवसांपूर्वी तक्रारदाराच्या वडिलांच्या अपघातातील मोटार वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदाराकडे वीस हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने आरोपी लोकसेवक काकडे यांच्या विरोधात नाशिकच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची तपासणी केली असता आरोपी काकडे याने १३…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२०२४ साठीचा अर्थसंकल्प सभागृहात मांडताना सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या आहेत. नव्या आर्थिक वर्षात सात लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणा करत मध्यमवर्गीय, नोकरदार वर्गास त्यांनी दिलासा दिला आहे. २०२४ मध्ये देशभरात सार्वत्रिक निवडणुका होत आहे. या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला महत्त्व प्राप्त झाले आहे. Budget Highlights (बजेट 2023-24) • मोफत अन्न योजनेसाठी दोन लाख कोटींचा खर्च. • गरिबांना 2024 पर्यंत मोफत रेशन मिळणार. • आत्तापर्यंत मोफत रेशनचा 80 कोटी लोकांना फायदा. • पीएम अन्नपूर्णा कौशल्य योजनेची सुरुवात होणार. • बजेटमध्ये सरकारकडून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज़ नेटवर्क नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतदानाची प्रक्रीया 30 जानेवारी रोजी सुरळीतपणे पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी 2 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा निवडणूक शाखेने स्वमालकीचे उभारलेल्या ईव्हीएम गोदाम, सय्यद प्रिंप्री, नाशिक येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सय्यद प्रिंप्री येथील मतमोजणी केंद्राची पाहणी केली असून मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त उन्मेष महाजन, तहसीलदार साहेबराव सोनवणे, सहायक संचालक (लेखा) विजय सोनवणे, तहसीलदार राजेंद्र नजन, नायब तहसीलदार राजेश अहिरे व इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. यावर्षी प्रथमच जिल्हा निवडणूक शाखेच्या सय्यद प्रिंप्री येथील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर ¤ शेतात गवत कापणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे मंगळवारी घडली. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेला प्राथमिक उपचारानंतर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मंगळवारी (३१ जानेवारी) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे ही घटना घडली असून शकुंतला शंकर मैड (वय ५५ वर्ष) असे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मैड जनावरांसाठी चारा आणण्याकरिता घराजवळील शिवाजी देवराम शेजवळ यांच्या शेतात गेल्या होत्या. बांधाच्या कडेला गवत कापत होत्या. या दरम्यान शेतात डबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या आपल्यावरील हल्ल्यामुळे मैड घाबरून गेल्या. बिबट्याने त्यांच्या हाताला…

Read More

अनंत पांगारकर ¤ महाराष्ट्र संवाद न्यूज‌‌‌‍‌‍‌‍ संगमनेर शहर आणि तालुक्यात दररोज सुरू असलेल्या चोऱ्या, घरफोड्यांमुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून गुन्हेगारांचा शोध लावण्यास अपयशी ठरणाऱ्या पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवरील धाक संपल्याने संगमनेरकर चोर, भामट्यांच्या दहशतीखाली वावरत आहे. त्यातच पोलीस उपअधीक्षकांसह शहर पोलीस ठाण्यातील प्रभारी राज मुळे विविध गुन्ह्यांचा तपास अधांतरी लटकत असल्याने पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना कधी जेरबंद करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालण्याची मागणी संगमनेरकर करत आहे. चोऱ्या, घरफोड्यांची मालिका सोमवारी देखील कायम होती. प्रजासत्ताक दिनी मावळतेला झालेली दरोड्याची घटना, डिसेंबरमधील संकेत नवले खून प्रकरण, दररोजच्या होणाऱ्या दुचाकी चोऱ्या आदी…

Read More