Author: अनंत पांगारकर
राज्यातील महायुतीचं सरकार सत्तेवर बसून महिना उलटत नाही, त्याआधीच सरकारपुढच्या अडचणी वाढत आहेत. एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी होणार्या आंदोलनांनी सरकार बॅकफूटवर असताना आता नितेश राणेंसारख्या मंत्र्यांमुळे सरकारच्या नाकातली नथ जणू जड होऊ लागली आहे. निवडणुकीला सामोरं जाताना नाकीनऊ आलेल्या युतीला मोठ्या फरकाने विजय मिळाला खरा, पण तो आनंद फारकाळ टिकला नाही. मंत्रिपदाचं वाटप, त्यानंतर खातेवाटप, पुढे बंगले वाटप या वाटपांनी होता तो आनंदही झोकाळून गेला. सरकार मोठया फरकाने सत्तेवर आल्यावर यापुढे बदला नव्हे तर बदल घडवणारं सरकार देणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कधी नव्हे ती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि त्यांच्या चिरंजिवांनी फडणवीसांची भेट घेऊन आणि…
स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना लहानपणापासूनच स्वातंत्र्य प्रेमाची व समाजकार्याची आवड होती. त्यावेळेस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाचे वातावरण स्वातंत्र्य प्रेमाने भारावून गेले होते. देश स्वतंत्र्यलढ्यासाठी एकवटला होता. सर्वच तरुण देश प्रेमाने आणि देशासाठी त्याग करण्याच्या उद्देशाने भारावून गेले होते. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात भाऊसाहेबांनी भाग घेतला त्यावेळेस त्यांचे वय अवघे १८ वर्षे होते. अत्यंत साहसी व धाडसी वृत्तीने त्यांनी या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. मात्र आजच्या तरुणांना असे वाटते आहे की राजकारण हे आपले क्षेत्र नाही परंतु असे नाही चांगल्या समाज निर्मितीसाठी चांगले राजकारण गरजेचे असते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भाऊसाहेबांनी डावी व साम्यवादी विचारसरणी जोपासत…
अहिल्यानगर – शेअर ट्रेडिंग व्यवसायामध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शिर्डी येथील सेवानिवृत्त व्यक्तीची ‘कांचन’ नावाच्या महिलेने सुमारे पन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात अहिल्यानगरच्या सायबर पोलीस ठाण्यात कांचन नावाच्या महिलेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४१९, ४२० सह आयटी ॲक्ट कलम ६६(ड) नुसार गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. फिर्यादीमध्ये संबंधित कांचन नावाच्या महिलेचा व्हाट्सअप नंबर नमूद करण्यात आला आहे. समाज माध्यमातील शेअर ट्रेडिंगच्या माहितीवरून संपर्कात आलेल्या अनोळखी महिलेने ही फसवणूक केली आहे. फिर्यादी महावितरण विभागातून सेवानिवृत्त झाले असून शिर्डीतील रहिवासी आहे. फसवणुकीचा हा प्रकार १२ एप्रिल २०२४…
अहिल्यानगर – युवतीला वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधून शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करणाऱ्या तरूणासह त्याला मदत करणाऱ्या पती-पत्नीविरोधात अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात या संदर्भात नगर शहरातील पीडित युवतीने फिर्याद दिली आहे. रोहिदास तुपे (रा. मातुलठाण, ता. श्रीरामपूर), हर्षदा तुपे व अभिषेक कानडे (दोघे रा. वळणपिंप्री ता. राहुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हर्षदा व अभिषेक पती-पत्नी असून त्यांनी फिर्यादी युवतीची रोहिदाससोबत ओळख करून दिली होती. तेव्हापासून तो फिर्यादीला वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. रोहिदास वारंवार फिर्यादी युवतीला त्रास देत होता. पोलीस यासंदर्भात पुढील तपास करत आहे.
विशेष प्रतिनिधी / मुंबई खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या प्रयत्नानंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उडी घेतली आहे. यामुळे पोलीस आणि सीआयडी तपासाची सारी माहिती राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला द्यावी लागणार आहे. खा. बजरंग सोनावणे यांनी दिल्ली येथे आयुक्तांची भेट घेऊन मस्साजोग येथील घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. संतोष देशमुख कुटुंबीयांना मदत मिळवून देणेबाबत आयोगाला त्यांनी विनंती केली. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोश देशमुख यांची महिन्याभरापूर्वी म्हणजेच ९ डिसेंबरला अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरिता राज्यभरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे सुद्धा आपल्या पद्धतीने सर्व…
पुणे – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर आल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. खटल्याच्या सुनावणीसाठी राहूल गांधींनी उपस्थित रहावे यासाठी त्यांना न्यायालयाकडून वारंवार समन्स बजावण्यात आले होते. अखेर आज राहूल गांधी या खटल्याच्या सुनावणीवेळी व्हिडीओ कॉन्फरीन्सींग द्वारे न्यायालयासमोर आले. या खटल्याची पुढची सुनावणी १८ फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा वाद सातत्याने माध्यमांत चर्चिला जातो. राहुल गांधींनी माफीवीर असे म्हणत सावरकर यांचा…
शिर्डी, दि.१० – भंडारदारा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळ्याचे तीन आणि रब्बीचे एक आवर्तन करण्यावर जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. निळवंडे कालव्यांना १५ जानेवारी पासून पाणी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. भंडारदारा प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक लोणी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात झाली. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे संगमनेरचे आमदार अमोल खताळ, श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, नाशिक विभाग मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, स्वप्निल काळे, निळवंडे प्रकल्पाचे अभियंता बाळासाहेब शेटे, कैलास ठाकरे आदी उपस्थित होते.…
संगमनेर – स्वार्थ विरहीत सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ संगमनेरने नुकतेच दिव्यांग शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरामध्ये २२८ दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली, त्यातील १३६ व्यक्तींना आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या साहित्याचे वाटप करण्यात आले. सोमवारी (६ जानेवारी) रोटरी आय केअर हॉस्पिटल येथे रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले. या शिबीरामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यांमधून १३६ दिव्यांग व्यक्तींना १६२ प्रकारचे साहित्य वाटण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या साहित्यामध्ये आरएनसीटी अत्याधुनिक पाय, एल एन ४ प्रोस्थेटिक हात, जयपुर फुट, कुबडी आदि साहित्याचे वाटप करण्यात आले, या साहित्याची अंदाजीत रक्कम सुमारे १…
मुंबई – उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यासाठी महत्वाच्या असलेल्या अनेक विषयांवर गेले अनेक दिवस विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे पाठपुरावा करत आहे. यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत, अनेक प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर तांबे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करत निवेदन दिले. संगमनेरसह राज्यातील विविध प्रश्नांसाठी आमदार तांबे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत. संबंधित मंत्र्यांकडून विविध विषयांचा पाठपुरावा त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केला आहे. आपल्या कामाचे प्रगती पुस्तक मांडणारे ते राज्यातील एकमेव आमदार आहेत. सभागृहात आणि सभागृहाबाहेर केलेल्या कामांचा आढावा ते आपल्या मतदारांना समाज…
संगमनेर – थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरीत क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त रविवारी (१२जानेवारी) दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी यशोधन शेजारील मैदानावर सुरू असून या तयारीची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहणी केली. यशोधन जनसंपर्क कार्यालयाशेजारील मैदानावर प्रेरणा दिनानिमित्त होणाऱ्या जयंती महोत्सव कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचा जयंती महोत्सव हा उत्तर महाराष्ट्रातील मोठा सांस्कृतिक महोत्सव असतो. यानिमित्त भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यासह दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी रविवारी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज व विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या…
