Author: Annant Ppangarkar
आश्वी (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कोल्हार-घोटी महामार्गावरील लगतच्या दोन गावांमधून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञातांनी पळून नेल्याचा प्रकार घडला. या संदर्भात दोन्ही मुलींच्या पालकांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिल्या घटनेत 16 मे रोजी 14 वर्षे 10 महिने वयाची अल्पवयीन मुलगी गावातील दुकानामध्ये मॅगी आणण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे घरातील व्यक्तींनी दुकानदाराकडे जाऊन चौकशी केली असता संबंधित मुलगी दुकानात मॅगी घेण्यासाठी आली नसल्याची माहिती त्यांना मिळाली. आजूबाजूला तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही, त्यामुळे तिच्या घरच्या व्यक्तींनी दिलेल्या…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) रात्रीच्या वेळी मोबाईल टॉवरवर आराम करण्यासाठी बसलेल्या विविध प्रकारच्या पक्षांना पकडण्यासाठी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो मोबाईल टॉवरवर चढला. मध्यरात्रीच्यावेळी टॉवरवर चढलेल्या या युवकाला टॉवरच्या उंचीचा अंदाज आला नाही. पक्षी पकडण्याच्या नादात टॉवरवरून तोल जाऊन खाली पडताना तो जीव गमावून बसला. संगमनेर तालुक्यातील अंभोरे या गावी रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. गणेश भास्कर गवळी (वय अंदाजे 27 वर्ष) असे या मृत झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. गवळी हा लहानपणापासून आणि लग्नानंतरदेखील पत्नी आणि दोन मुलींसह आपला मेव्हणा काळू बर्डे यांच्याकडे राहावयास होता. रविवारी गावात कार्यक्रम असल्याने गणेश गवळी याने मद्य प्राशन केल्याची माहिती…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – रविवारी झालेल्या आशीर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी आशीर्वाद विकास पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. सभासदांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर विश्वास दर्शवित विरोधी पॅनलचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. अनुसूचित जाती-जमाती राखीव प्रतिनिधी मतदारसंघातून सुनील पुनाजी दाभाडे तर विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून बाळासाहेब जगन्नाथ दासरी या सत्ताधारी गटाच्या दोन्ही उमेदवारांची निवड सुरुवातीलाच बिनविरोध झाली होती. विरोधी गटाने बहुतेक जागांवर उमेदवार उभे केल्याने उर्वरित तेरा जागांसाठी रविवारी मतदान झाले. या संस्थेच्या निवडणुकीकडे सभासदांचे लक्ष लागले होते. मतदानानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीनंतर विरोधी गटाच्या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्याचे दिसून आले. एकाही…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अज्ञात व्यक्तीने संगमनेरच्या बालगृहातून नऊ वर्षीय वयाच्या बालकाला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. संगमनेर शहरामध्ये बीएड कॉलेज जवळ बालगृह असून या बालगृहात असलेल्या नववर्षीय मुलाला काहीतरी फुस लावून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराच्या रखवालीतून पळवून नेण्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या दरम्यान घडला. या संदर्भात बालगृहाचे कर्मचारी बाळकृष्ण दिगंबर आंबरे यांनी रविवारी दुपारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस…
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजीव सोनवणे यांची राज्यपाल रमेश बैस यांनी नियुक्ती केली आहे. सोनवणे यांच्याकडे पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्र कुलगुरूपदाचा पदभार होता. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू असलेले डॉ. सोनवणे हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नववे कुलगुरू आहेत. कुलगुरूपदासाठी राज्यभरातील इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यपाल कार्यालयाकडून डॉ. सोनवणे यांची कुलगुरूपदी निवड करण्यात आली. डॉ. सोनवणे यांनी आतापर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख, मुक्त अध्ययन प्रशाळेचे प्रमुख आदी जबाबदार्या पार…
रविवार विशेष लेख विद्यमान राज्य सरकारच्या काळात सभ्य चेहर्याच्या खंडणीखोरांची चलती आहे. या खंडणीखोरांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला असेल, त्यांना आत टाकण्यासाठी मदत केली असेल, त्यांच्या सरकारला बदनाम केलं असेल तर अशा बदमाशांचं पुनर्वसन करण्याची या सरकारची तयारी दिसते आहे. सत्तेच्या विकृतीचा हा परिपाक होय. अशाच चेहर्यातील समीर वानखेडे यांचा उपद्व्याप आपण पाहातोच आहोत. या वानखेडेंविषयी आपण पुढे लिहिणारच आहोत. अशा सभ्य चेहर्यामागचा आणखी एक खंडणीखोर या राज्यात उजळ माथ्याने वावरत होता. परमवीर सिंग असं त्याचं नाव. असंख्य प्रकरणांमागचा मास्टरमाईंड असलेला आणि विविध गुन्ह्यांचा पाठिराखा म्हणून ओळखला जाणारा म्हणून परमवीर राज्याच्या पोलीस खात्यात कार्यरत होता, हेच या राज्याचं दुर्देवं…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरात आता बिबट्यांच्या अवयवाच्या तस्करीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघा तस्करांना पकडण्यात संगमनेरच्या वनविभागाला यश आले आहे. तर त्यांचा तिसरा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. संगमनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन एच. लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. शनिवारी (ता. १९ मे) नासिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ दुचाकीवरून येणारे काही लोक बिबट्याच्या दात सुळे नखे आणि मिशांची विक्री करणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजली होती. या माहितीच्या आधारे वनक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांनी या परिसरात आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. संशयित व्यक्ती या ठिकाणी आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून संशयतांसोबत बोलणी…
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) आज शनिवारी नाशिक दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यातील महत्वाचे मुद्दे : ✓ नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही हे मी पहिल्याच नोटबंदीच्या वेळेस म्हणालो होतो. तज्ज्ञांना विचारून नोटबंदी झाली असती तर हि वेळ आली नसती. ✓ २ हजार रु. च्या नोटा आणल्या तेव्हा त्या ATM मध्ये भरल्या पण जात नव्हत्या, म्हणजे साधी तपासणीही केली नव्हती. म्हणजे कोणताही पूर्वनियोजन नव्हतं. असं काय सरकार चालतं का? ✓ त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात वर्षानुवर्षे जी परंपरा सुरु आहे ती थांबविण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं-मशिदी आहेत कि जिथे वर्षानुवर्षे हिंदू-मुसलमान एकोपा आढळून येतो. ✓…
कोपरगाव (महाराष्ट्र संवाद न्यूज) वाळू वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराच्या वाहनावर महसूल विभागाने कोणतीही कारवाई करू नये यासाठी, कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांच्या सांगण्यावरून २० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या खासगी इसम गुरमीत सिंग दडियाल (वय ४० वर्ष, रा. कोपरगाव) याला नासिक एसीबीने रंगेहात पकडले. दडियाल आणि तहसीलदार विजय बोरुडे यांच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोपरगावमध्ये थेट तहसीलदारांवरच एसीबीचा ट्रॅप झाल्याने जिल्ह्यातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. कोपरगाव येथील तक्रारदार यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसूल विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये याकरीता, कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे (वय ४४ वर्षे, रा. कोपरगाव) यांनी वीस हजार रुपये लाचेची…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरच्या अर्थकारणातील महत्त्वाची संस्था म्हणून परिचित असलेल्या विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सुरुवातीलाच राखीव जागांवरील सहा उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर सर्वसाधारण गटातील उर्वरित अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. सुमारे 105 कोटी रुपयांच्या ठेवी असलेली ही संस्था वर्षभरात कोणतीही सुट्टी न घेता सलग सातही दिवस सुरू असते. महिला बचत गट आणि सामान्य नागरिकांना कर्ज पुरवठा करणारी संस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक राहिला आहे. बँकिंग क्षेत्रातील अनेक सामाजिक आणि शासकीय पुरस्कार प्राप्त संस्थेचा आर्थिक कारभार अन्य संस्थांसाठी दिशादर्शक राहिला आहे. संस्थेच्या संचालक मंडळासाठी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सुरुवातीलाच…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यातील आश्वीच्या शिबलापूरसह सर्व जागांवर आमदार थोरात समर्थकांनी मोठा विजय मिळवला आहे. यामुळे तालुक्यातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींवर पोट निवडणुकीच्या माध्यमातून आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवण्यात थोरात यशस्वी झाले आहे. तालुक्यातील शिबलापुर, पिंपळगाव देपा, पोखरी हवेली, नांदुरी दुमाला या गावांमधील पाच जागांकरता पोटनिवडणुका झाल्या. यामध्ये आश्वी गटातील शिबलापूर ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत आमदार थोरात गटाच्या गितांजली संदीप मुन्तोडे व करुणा सागर मुन्तोडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर पिंपळगाव देपामधून नाना बाळशीराम गांजवे, पोखरी हवेलीमधून घुले संचिता दिनकर व नांदुरी दुमाला येथून वैशाली अमोल कराळे विजयी झाले आहेत. हे…
नवी दिल्ली (महाराष्ट्र संवाद न्यूज) २ हजार रुपयांच्या नोटे संदर्भात आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. ही नोट चलनातून बाद करण्यात आली असून ३० सप्टेंबर पर्यंत नोटा बँकेत जमा करून दुसऱ्या चलनाद्वारे बदलून घ्याव्या लागणार आहे. नोटा बदलताना एकावेळी फक्त दहा नोटा बदलून मिळतील. यामुळे ऐन उन्हाळ्यात पुन्हा एकदा बँकांसमोर भल्या मोठ्या रांगा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट परत करण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. या नोटेची कायदेशीर निविदा राहील, परंतु ती चलनातून बाहेर काढली जाईल. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा जारी करणे तात्काळ थांबवण्याचा सल्ला दिला आहे.…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या 21 वर्षीय तरुणीचा सातत्याने पाठलाग करत गुरुवारी सकाळी भर रस्त्यात तिचा हात पकडत ‘मैं तुझसे प्यार करता हूं’ असे म्हणत तिने विरोध करताच तिला मारहाण व छेडछाड करणाऱ्या फरहान सय्यद याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात फरहान सय्यद याच्या विरोधात पीडित तरुणीने तक्रार दिली आहे. शहरात भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे गेल्या काही दिवसांपासून कुठेही दिसत नसलेले शहर पोलिसांचे दामिनी पथक पुन्हा कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे. संबंधित तरुणी एम.एस.सीचे शिक्षण घेत असून गेल्या महिनाभरापासून शहरातीलच फरहान सय्यद नावाचा तरुण तिचा वारंवार…
नवी दिल्लीः The Kerala Story चित्रपट काल्पनिक आहे. ३२ हजार मुलींनी मुस्लिम धर्म स्विकारला याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही, असं चित्रपटाच्या सुरुवातीलाच लिहा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निर्मात्यांना दिले. असे The Kerala Story चित्रपटाच्या सुरुवातीलाच सांगितले जाईल, असे निर्मात्यांच्यावतीने ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांनी न्यायालयात सांगितले. त्याची नोंद घेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड, न्या. पी. एस. नरसिम्हा व न्या. जे. बी. पारदीवाला यांच्या पूर्णपीठाने हे आदेश दिले. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने चित्रपटाला दिलेल्या प्रमाणपत्रालाही आव्हान देण्यात आले आहे. यावर न्यायालयाच्या सुट्टीनंतर सुनावणी होईल. ही सुनावणी घेण्याआधी आम्ही चित्रपट बघू, असेही न्यायालयाने नमूद केले.
मेव्हण्याच्या खून प्रकरणी न्यायालयाने दिला हा निर्णय… संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली येथील खून खटला
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – स्वतःच्याच मेव्हण्याचा खून केल्याच्या आरोपातून संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. अनैतिक संबंधातून खुनाचा हा प्रकार घडल्याचे सिद्ध करण्यात साक्षीदार आणि सरकार पक्षाला यश आले नाही. किरण नानाभाऊ दुशिंग असे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या आरोपीचे नाव आहे. १ नोव्हेंबर २०१३ रोजी घडलेल्या या खून प्रकरणी न्यायालयाने १३ मे २०२३ रोजी निकाल दिला आहे. घटनेची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, २ नोव्हेंबर २०१३ रोजी कोकणगाव परिसरातील सुकओहळाचे पाणी साठवलेल्या तलावामध्ये भाऊसाहेब दगडू गवांदे याचा मृतदेह आढळून आला होता. भाऊसाहेब याचा विवाह २८ ऑक्टोंबर २०१३ रोजी कोकणगाव येथील महादेव मंदिरात उंबरे ता. राहुरी येथील…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)- अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील एमबीएचे प्राचार्य डॉ. बी. एम. लोंढे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण व इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिव्हिल विभागाचे डॉ. जे. बी. गुरव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड झाली आहे. विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या विविध विभागांना एनबीएचे मानांकन मिळाले असून इंजिनिअरिंग कॉलेजला नॅकचा ‘अ’ दर्जा मिळाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील विविध विभाग हे उच्चतम गुणवत्तेमुळे अग्रमानांकित ठरले आहे. पुणे विद्यापीठातील ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट या व्यवस्थापन शाखेच्या अभ्यास मंडळावर एमबीएचे प्राचार्य डॉ. बी. एम. लोंढे यांची,…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – पुढील महिन्यात संगमनेरातील अर्थकारणात महत्त्वाच्या ठरलेल्या संगमनेर मर्चंट बँकेचे निवडणूक होत आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी गटाने प्रयत्न सुरू केले असून चार विरोधी उमेदवारांना सत्ताधाऱ्यांनी सामावून घेतल्यास बँकेच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करण्यास तयार असल्याचे बँकेचे विद्यमान संचालक ज्ञानेश्वर कर्पे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना म्हटले आहे. संगमनेर मर्चंट बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसानंतर राखीव जागेवर राजेंद्र वाकचौरे यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित 16 जागांसाठी 38 उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत. उद्योगपती राजेश मालपाणी यांचे प्राबल्य असलेल्या या बँकेच्या निवडणुकीत काही पारंपारिक विरोधक देखील आत्तापर्यंत सभासदांनी निवडून दिले आहे. संगमनेर मर्चंट…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या (MIDC) झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. निवडणुकीच्या सुरुवातीलाच शेतकरी विकास मंडळाच्या राखीव जागांवरील सहा उमेदवारांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या होत्या. त्यानंतर सर्वसाधारण गटात सात जागांसाठी तिघा अपक्षांसह दहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक निकालानंतर १३ पैकी १२ जागांवर शेतकरी विकास मंडळाने निर्विवाद वर्चस्व मिळविले तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. एमआयडीसीचे विद्यमान अध्यक्ष भाऊसाहेब एरंडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळाचे पॅनल निवडणुकीला सामोरे गेले. सुरुवातीलाच शेतकरी विकास मंडळाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात शांताराम गेनू…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी संगमनेरमधील वकील जनार्दन वाळुंज यांची निवड करण्यात आली आहे. वाळुंज यांनी यापूर्वीही विविध पदांवर काम केले असून 2008 पासून महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशनच्या माध्यमातून ते काम करत आहेत. ठाणे येथील राज्यस्तरीय नोटरी कॉन्फरन्समध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनंतराव जगताप यांच्या उपस्थितीत ॲड. वाळुंज यांची निवड करण्यात आली. जगताप व असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास तरटे यांनी वाळुंज यांची निवड जाहीर केली. वाळुंज यांच्याकडे नोटरी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार 26 मार्चपासून सोपविला गेला आहे. उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ॲड. वाळुंज यांचे महाराष्ट्र राज्य नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास तरटे (डोंबिवली), निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. अनंतराव जगताप…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरमधील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची आर्थिक कामधेनू म्हणून परिचित असलेल्या संगमनेर मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 17 जागांसाठी 39 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून नगरसेवक राजेंद्र वाकचौरे यांचा एकमेव अर्ज असल्याने सत्ताधारी गटाकडून त्यांनी पहिली विजय सलामी दिली असून त्यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिकता बाकी आहे. गुरुवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननी नंतर 16 जागांसाठी 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उद्यापासून (19 मे) 2 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, दोन पॅनलमध्ये सरळ लढत होते की सत्ताधारी गटाविरोधात काही अपक्ष निवडणूक मैदानात उतरतात…
