Author: Annant Ppangarkar
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) खरीपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन केले आहे. राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात निविष्ठा उपलब्धता, तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली असून १५ भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचणी असल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षांची जबाबदारी…
निवडणूक विश्लेषण | अनंत पांगारकर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपेक्षेप्रमाणे राज्याचे माजी मंत्री काँग्रेस नेते विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने सर्वच्या सर्व जागांवर यश मिळविले आहे. थोराताना शह देण्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाच्या नाकातोंडात पाणी गेले. थोरात यांच्या सैन्याने सेनापतीविना असलेल्या विखेंच्या सगळ्याच सोंगट्या मारल्या. शेतकरी मंडळाला एकही जागा मिळून न देणाऱ्या बुद्धिबळाच्या निवडणुकीत थोरात अखेर बाजीगर ठरले. बिनविरोध निवडीची परंपरा मोडीत काढत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जनसेवा मंडळाचे उमेदवारी करत निवडणुकीत रंगत आणली होती. सर्वच्या सर्व…
महाराष्ट्र संवाद ◇ रविवार विशेष लेख कोणतीही सत्ता असो ती माणसाला अहंकारी बनवत असते. सत्ता डोक्यात भिनली की ती कोणालाच जुमानत नाही. मोदींच्या नेतृत्वातील मध्यवर्ती सरकारचं सध्या असंच काहीसं सुरू आहे. अहंकाराने सत्ताधारी इतके मदमस्त झालेत की आसपास काय बोललं जातं याचीही तमा ते करत नाहीत. असंख्य आरोपांची राळ उठली असतानाही त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. साधेसुधे आरोप झाले असते तर एकवेळ ते दुर्लक्षित करता आले असते. पण देशाच्या सार्वभौमत्वाला हात घालणारे आरोप होऊनही जेव्हा सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा त्यांना अहंकाराने पछाडल्याचाच प्रत्यय असतो. केंद्रातल्या मोदी सरकारचा कारभार अशाच अहंकारात सुरू आहे. असंख्य आरोप जे देशाच्या अस्तित्वालाच हात घालणारे…
महाराष्ट्र संवाद न्यूज मित्राचा खून केल्याच्या कारणावरून न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला भा.द.वि. कलम 304 (पार्ट सेकंड) खाली दोषी ठरवत वीस हजार रुपये दंडासह दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शंकर लहानू साळुंखे, रा. कळस, ता. अकोले, जि. अहमदनगर असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 3 फेब्रुवारी 2022 रोजी देवठाण रोड अकोले येथे खुनाची घटना घडली होती. सुतार व्यवसाय करणाऱ्या सरबजीत ओमप्रकाश चौहान (रा. उत्तर प्रदेश) याच्या खून प्रकरणी राजू जगधारी राजभर याच्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यात आरोपी शंकर लहानु साळुंखे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात अधिक माहिती अशी, 3…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अपेक्षेप्रमाणे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचेच वर्चस्व कायम राहिले आहे. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत त्यांच्या जनसेवा मंडळाचा साफ धुव्वा उडाला आहे. त्यांच्या अधिपत्याखालील एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. एका जागेवर थोरात समर्थक अपक्ष उमेदवाराचा व शेतकरी विकास मंडळाचे सतरा उमेदवार विजयी झाले आहेत. बाजार समितीच्या 18 जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. निवडणूक मैदानामध्ये थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळ आणि विखे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळात सरळ लढत झाली. शुक्रवारी मतपेटीत 45 उमेदवारांचे भवितव्य बंद झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून सोसायटी गटाच्या जागांची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून शेतकरी विकास मंडळाचे शंकर खेमनर, कैलास पानसरे, मनीष गोपाळे, सुरेश कान्हेरे, गीताराम गायकवाड, सतीश खताळ व विजय सातपुते विजयी झाले आहेत. या विजयामुळे शेतकरी विकास मंडळाने संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ यामुळे 17 वर गेले असून अपक्ष म्हणून निवडून आलेला उमेदवार देखील थोरात समर्थक असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समर्थकांना चंचू प्रवेशही करता आलेला नाही. सोसायटी मतदार संघ…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येत असून महिला राखीव गटाची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून शेतकरी विकास मंडळाच्या दिपाली वरपे आणि रुक्मिणी साकोरे या दोन्ही महिला उमेदवारांनी विजय मिळविला आहे. त्यांनी जनसेवा मंडळाच्या अंजना दिघे आणि रोहिणी निघते यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ 8 वरून 10 वर गेले आहे तर थोरात समर्थक असलेले अपक्ष सचिन करपे देखील निवडून आले. राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा मंडळाला या निवडणुकीत अद्यापही खाते खोलता आलेले नाही. सोसायटी मतदार संघ महिला राखीव:- अंजनाबाई पुंजा…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येत असून इतर मागासवर्गीय व सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती या गटाची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून शेतकरी विकास मंडळाच्या दोन्ही उमेदवारांनी विजय मिळविला आहे. सुधाकर ताजने आणि अनिल घुगे यांचा विजयी उमेदवारात समावेश असून त्यांनी जनसेवा मंडळाच्या शरद गोर्डे आणि संदीप घुगे यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ 6 वरून 8 वर गेले आहे तर अपक्ष सचिन करपे निवडून आले. राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा मंडळाला या निवडणुकीत अद्यापही खाते खोलता आलेले नाही. सोसायटी…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येत असून ग्रामपंचायत सर्वसाधारण या गटाची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून शेतकरी विकास मंडळाच्या दोन्ही उमेदवारांनी विजय मिळविला आहे. अरुण वाघ आणि सखाहरी शरमाळे यांचा विजयी उमेदवारास समावेश असून त्यांनी जनसेवा मंडळाच्या जनार्दन आहेर आणि संदीप देशमुख यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ चार वरून 6 वर गेले आहे तर अपक्ष म्हणून निवडून आलेले सचिन करपे थोरात यांच्या समर्थक मानले जातात. विशेष म्हणजे निवडणूक प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा मंडळाला या निवडणुकीत अद्यापही…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येत असून हमाल मापारी या गटाची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून अपक्ष सचिन कर्पे यांनी विजय मिळविला आहे. विजयी झालेल्या कर्पे यांनी शेतकरी विकास मंडळाच्या महेंद्र गुंजाळ आणि जनसेवा मंडळाच्या सोमनाथ दिघे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. कर्पे हे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे समर्थक असल्याने ते शेतकरी विकास मंडळ सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ 5 वर गेले असून विरोधी राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज शुक्रवारी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. अपेक्षेप्रमाणे व्यापारी गटातून शेतकरी विकास मंडळाचे मनसुख भंडारी निसार ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटातून निलेश कडलग, अनुसूचित जाती जमाती मधून संजय खरात, ग्रामपंचायत गटातून संजय खरात आणि निलेश कडलग मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. बाजार समितीच्या 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात कृषी पतसंस्था मतदारसंघातून सर्वसाधारण गटात 18, महिला राखीव गटात 4, इतर मागास प्रवर्ग गटामध्ये 2, विमुक्त जाती भटक्या जमाती गटामध्ये 2, ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण जागेवर 6, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून 2, दुर्बल घटक प्रवर्गातून 2, व्यापारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज शुक्रवारी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले. शांततेत आणि उत्साहात झालेल्या या निवडणुकीत 97.12 टक्के मतदान झाले. संगमनेरच्या जनता नगर मधील राजमाता जिजाऊ शाळेमध्ये शुक्रवारी सकाळी मतदानाला प्रारंभ झाला सायंकाळी चार वाजता मतदान संपले इतर शनिवारी सकाळी याच शाळेमध्ये मतमोजणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकूण 3614 मतदारांपैकी 3510 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास मंडळ आणि राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळामध्ये सरळ लढत झाली. कृषी उत्पन्न…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरासह परिसरात शुक्रवारी (ता.२८) दुपारी अवकाळी पावसासह तुरळक गारा पडल्या. वादळी वाऱ्याने गुंजाळवाडीच्या आरगडेमळा येथील भाऊसाहेब सोमनाथ आरगडे यांच्या दोन खोल्यांचे पत्रे उडून मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी छोटे वृक्ष छोटे वृक्ष उन्मळून पडले तर फ्लेक्स बोर्ड फाटले होते. साकुरमध्ये सकाळी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. संगमनेर तालुक्याच्या बहुतांशी भागात शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तुरळक गाराही पडल्या. त्यानंतर वादळी वाऱ्याला सुरूवात झाली आणि काही क्षणातच वाऱ्याचा वेग प्रचंड वाढल्याने अनेक ठिकाणी छोटे वृक्ष उन्मळून पडले. वादळामुळे फ्लेक्स देखील अस्ताव्यस्त होऊन फाटले होते. शहरालगतच्या गुंजाळवाडी येथे भाऊसाहेब आरगडे यांच्या दोन खोल्यांचे पत्रे थेट उडून हजार…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरच्या पेटलेल्या वाळू तस्करीमुळे जर महसूल खाते बदनाम होणार असेल तर मला तुमच्यावर कारवाई करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, अशा स्पष्ट शब्दात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमधील तलाठी, ग्रामसेवकांना इशारा दिला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल मंत्रीपदाचा पदभार हाती घेतल्यानंतर संगमनेरच्या अवैध वाळू तस्करीकडे आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे येथील वाळू तस्करीला काही अंशी लगाम बसला. तसेच राज्यभरातील वाळू तस्करी लक्षात घेत त्यांनी वाळू संदर्भात नवीन धोरण आणले आहे नव्या धोरणाची अंमलबजावणी येत्या महाराष्ट्र दिनापासून (१ मे) करण्यात येणार आहे. असे असले तरी संगमनेर शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू…
महाराष्ट्र संवाद न्यूज तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणे केल्याच्या तक्रारी मोठ्या प्राप्त झाल्या आहेत. या सर्व प्रकरणांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा बैठकीत दिली. मंत्री विखे यांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात होते. बैठकीत घुलेवाडी, संगमनेर खुर्द या जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये सुरु असलेल्या शासकीय योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. उपस्थित ग्रामस्थ आणि पदाधिका-यांनी केलेल्या विविध प्रश्नांबाबत गांभिर्याने दखल घेण्याच्या सुचना मंत्र्यांनी दिल्या. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, गटविकास आधिकारी अनिल नागणे यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे आधिकारी, वसंतराव देशमुख, गुलाबराव सांगळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, शहराध्यक्ष श्रीराम…
महाराष्ट्र संवाद न्यूज वर्दळीच्या नवीन नगर रोड परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून एका दुकानात काम करणाऱ्या मुलीचा सलग दोन दिवस पाठलाग करत तिची छेड काढणाऱ्या तरुणाविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी रात्री पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमान शब्बीर सय्यद (कब्रस्थान जवळ, नाईकवाडपुरा, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. सर्वत्र लव्ह जिहादचे प्रकार समोर येत असताना संगमनेरातील अशा वाढत्या घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत माहिती अशी, नुकतेच बारावीचे पेपर दिलेली साडे सतरा वर्षाची मुलगी गेल्या चार-पाच दिवसांपासून नवीन नगर रोड परिसरातील एका दुकानांमध्ये काम करत असून बुधवारी डोक्यात मुस्लिम समाजात घातली जाते तशी पांढरी टोपी…
महाराष्ट्र संवाद न्यूज तब्बल तीन मंत्री, प्रमुख अधिकाऱ्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महसूलमंत्र्यांच्या लोणीच्या दिशेने निघालेले लाल वादळ अखेर संगमनेरच्या सीमेवर थांबले आहे. सरकार आंदोलकासोबत असल्याचा विश्वास आंदोलकांना दाखविण्यात आला. मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले. संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर यासंबंधीची घोषणा तीनही मंत्र्यांनी आंदोलन स्थळी केली. शेतकरी, आदिवासी आणि कामगारांचे विविध प्रश्न घेत राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर महा मुक्कामासाठी अकोल्याहून किसान सदस्य विविध संलग्न संस्थांनी बुधवारी पायी मोर्चा सुरू केला होता. शनिवारी मोर्चा धांदरफळमध्ये (संगमनेर) मुक्कामाला होता. मोर्चा अकोल्यातून सुरू होण्यापूर्वी महसूल तथा पालकमंत्री विखे पाटील यांनी मोर्चेकर्यांना सकारात्मक…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यातील सरकार बदललेले आहे याची जाणीव ठेवून तलाठी ग्रामसेवकांनी सामान्य माणसाच्या हिताचा विचार करावा. ठेकेदारांच्या चिंता करू नका. सरकारी योजनेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा आढळल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार असल्याचे सूतोवाच राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तळेगाव दिघे येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. समस्यांचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या. संगमनेर अकोल्याचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विखे म्हणाले, १ मे पासून ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन जिल्ह्यात करण्यात येणार आहे. यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रकरणं मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या लाल वादळाच्या शिष्टमंडळासमवेत राज्याचे आदिवासी मंत्री विजयकुमार गवित, कामगार कल्याण मंत्री सुरेश खाडे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये बैठक सुरू आहे. बैठकीत काय निर्णय होतात हे लवकरच पुढे येणार आहे. नैसर्गिक आपत्ती व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मुलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे व विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला फेकले गेले आहेत. पक्ष फोडण्याची राजकीय आमिषे व तुरुंगाची भीती दाखवून सत्ता मिळविण्यात बहुतांश प्रस्थापित राजकीय नेते व पक्ष मशगुल झाले असल्याने, अखेर पुन्हा एकदा जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज देशातील औद्योगिक क्षेत्राकडून समाजाच्या हितासाठी राबविल्या जाणार्या सामाजिक उपक्रमांमध्ये संगमनेरच्या मालपाणी उद्योग समुहाचा ठसा उमटला आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत मालपाणी उद्योग समुहाला यावर्षीच्या ‘सीएसआर हिरो’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवनात शानदार सोहळ्यात उद्योग समुहाचे संचालक आशीष मालपाणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी – सीएसआर) विविध समाजोपयोगी उपक्रम यशस्वीरित्या आणि सातत्याने राबवून कर्तव्यपूर्ती केल्याबद्दल मालपाणी उद्योग समुहाला गौरवान्वित करण्यात आले. एका माध्यम समुहाने आयोजित केलेल्या या सोहळ्यावेळी विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवभारत समुहाचे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी आदींसह…
