Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी परिवाराच्या पुढाकाराने व महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा आणि संगमनेरमधील माहेश्वरी समाज यांच्या सहकार्याने आयोजित केले जाणारे विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलन मागील दहा वर्षांपासून माहेश्वरी समाजाला वरदान ठरले आहे. हे संमेलन म्हणजे व्यवस्थापन कौशल्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण असल्याचे गौरवोद्गार प्रसिध्द व्यवस्थापन गुरु डॉ. वसंत बंग यांनी काढले. अखिल भारतीय माहेश्वरी विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलनाचा उद्घाटनावेळी ते बोलत होते. राजस्थान मंडळाचे अध्यक्ष मनिष मालपाणी, स्वागताध्यक्ष राजेश मालपाणी, उद्योजक विजय आसावा, अजय लाहोटी, मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित मणियार, प्रकल्प प्रमुख ओम इंदाणी, उपाध्यक्ष सम्राट भंडारी, संगमनेर तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अतुल झंवर, कोषाध्यक्ष उमेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : मानवी जीवनात विज्ञानाचे मोठे महत्त्व आहे. मानवाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचे काम विज्ञान करत असते. त्यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी विज्ञानाची कास धरणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते हिरालाल पगडाल यांनी केले. ४७ वे संगमनेर तालुका विज्ञान गणित प्रदर्शन ५ ते ७ जानेवारी दरम्यान तालुक्यातील चिखली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात पार पडले. प्रदर्शनाचे उद्घाटन पगडाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे होते. गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष सोपान सहाने, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख नंदकुमार हासे आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी नागणे म्हणाले,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षण झाल्यानंतर आपल्याकडे मराठी माणूस नोकरीला प्राधान्य देतो. व्यवसाय करण्याचे धाडस तो दाखवत नाही. असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये ते बोलत होते. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार, पी. डी. पाटील, संमेलनाध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे आधी व्यासपीठावर उपस्थित होते. मराठी टक्का आणि मराठी माणसाविषयी चिंता व्यक्त करत पाटील म्हणाले, राजकारणात मराठी माणूस येण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. निवडणुकांमध्ये उमेदवारी देऊ नका, असं मराठी माणूस म्हणू लागला आहे. विश्लेषकांमध्ये देखील मराठी नाव फारसे सापडत नाही. यात अमराठी व्यक्ती अधिक संख्येने आहेत. मराठी माणसाची ही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : शुक्रवारी मध्यरात्री तीन बिबट्यांनी एकत्रित पोल्ट्री फार्ममध्ये धुमाकूळ घालत सुमारे चारशेहून अधिक कोंबड्या फस्त केल्या तर अनेक कोंबड्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील मेहेंदुरी येथील शेतकरी सुधीर दगडू बंगाळ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये ही घटना घडली आहे. अनेक कोंबड्या भयभीत झाल्याने आणखी काही कोंबड्या दगावण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील मेहेंदुरी परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांचा या परिसरात नेहमीच वावर असतो. बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून हा भाग परिचित आहे. त्यामुळे या परिसरात अनेक बिबटे दिवस-रात्र संचार करीत आहेत. यातून मानवांवर हल्ल्याचे प्रकार देखील घडले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री १…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : धांदरफळच्या देशमुख मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका वृषाली सुनील कडलग यांच्या प्रदूषण विरहित सिग्नल झोन या उपकरणास प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. संगमनेर तालुक्यातील चिखली येथे ५ ते ७ जानेवारी दरम्यान झालेल्या ४७ व्या तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन पार पडले. इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी असे दोन गट त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक गट, माध्यमिक शिक्षक गट, परिचर गट अशा विविध गटांमधून शालेय साहित्यांची स्पर्धा झाली. संगमनेर तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थी शिक्षक परिचारक यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला. प्राथमिक शिक्षक गटात “कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे सिग्नल परिसरातील नियंत्रण” या विषयावरील मॉडेलला प्रथम…

Read More

विकास प्रक्रियेत माध्यमांचा सहभाग आवश्यक महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लोणी : जिल्‍ह्याकडे आजपर्यंत फक्‍त राजकीय दृष्‍टीकोनातून पाहिले गेले. पालकमंत्री बाहेरचेच देण्‍यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्‍न झाल्‍यामुळेच जिल्‍ह्याच्‍या विकासाचा आराखडा कधी मांडला गेला नाही. ही परिस्थिती सर्वांच्‍या सहकार्याने बदलविण्‍याचा आपला प्रयत्‍न आहे. पर्यटनाबरोबरच औद्योगिक विकासासाठी हा जिल्‍हा आता सर्वांना साद घालत आहे. माध्‍यमांनी सुध्‍दा या विकास प्रक्रीयेत सहभागी होवून मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. पत्रकार दिनाचे औचित्‍य साधून प्रवरा परिवाराच्‍यावतीने माध्‍यम प्रतिनिधींशी स्‍नेह संवादाचे आयोजन करण्‍यात आले होते. जिल्‍ह्याच्‍या विकासाच्‍या संदर्भात पत्रकारांनी उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नांवर मंत्री विखे पाटील यांनी सविस्‍तर भाष्‍य करुन, जिल्‍ह्याच्‍या तयार करण्‍यात…

Read More

रविवार विशेष 🔸 प्रवीण पुरो राज्य विधिमंडळाच्या नागपूरमध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजांना स्वराज्यरक्षक म्हणून संबोधल्याच्या कारणास्तव भारतीय जनता पक्षाने राज्यभर त्यांचा निदर्शनं करून निषेध केला. झोपी गेलेला जागा झाला, असाच हा आंदोलनाचा प्रकार होता. स्वराज्यरक्षक अशी उपाधी दिल्याने अजित पवार यांनी संभाजी राजांचा जणू अवमानच केला असा प्रचार भाजपच्या धर्माभिमान्यांनी सुरू केला. वास्तविक पवार यांनी ते राज्याचे अर्थमंत्री असताना संभाजी राजांचा स्वराज्यरक्षक असा उल्लेख मागल्यावर्षी अर्थसंकल्प मांडताना जवळपास १० वेळा केला. राज्याच्या अर्थसंकल्पाची पूर्वतयारी ही वित्तमंत्रालयाच्या संबंधित अधिकार्‍यांकडून होत असते. अर्थसंकल्प जाहीर झाला त्यातील संभाजी राजांविषयीची टिपण्णं ही अधिकार्‍यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : गोवंश जनावरांच्या कत्तलीस बंदी असली तरी संगमनेरात मात्र या कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन सुरूच आहे. शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून येथील सुरू असलेल्या एका कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीचे गोवंश जनावराचे मांस ताब्यात घेत नष्ट केले. संगमनेर शहरातील मोगलपुरा भागातील खाटीक गल्लीमध्ये गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा टाकला असता तेथे पोलिसांना मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे तेथे आढळलेल्या मांसावरून निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे साडेआठशे किलो मांस ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिसांची छाप्याची कारवाई सुरू असताना सालेम साटम कुरेशी…

Read More

खोके सरकार, बोके सरकार आणि द्वेषाने वागणाऱ्या महसूलमंत्र्यांमुळे आमची उपासमार महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : आपण अनेक वर्ष महसूल मंत्रीपद उपभोगले आहे. मात्र आपण कधीही अशा प्रकारचे राजकारण केले नाही. प्रत्येकाला मदत करण्याची भूमिका होती. मात्र काही लोक आता आपल्या तालुक्याचे नुकसान करायला निघाले आहे. त्यांना येथील विकास बघवत नाही. तालुक्याचा विकास थांबविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. दहशतीचे राजकारण त्यांना आपल्या तालुक्यात व जिल्ह्यात करावयाचे आहे. मात्र संगमनेर तालुका आणि नगर जिल्हा हे कदापिही होऊ देणार नाही. असा थेट इशारा माजी महसूल मंत्री व काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ४ व ५ जानेवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत विविध उद्योजकांची भेट घेतली. या उद्योजकांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी डावोसला जात असल्याने यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. रोहित पवार यांनी एका ट्विट द्वारे सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले आणि ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन गेले. पण महाराष्ट्रात सगळ्या पायाभूत सुविधा असतानाही गुंतवणूकदारांना भेटून त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करायला लावावी,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : विधान परिषद पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक नियमांचा व कायद्याचा बारकाईने अभ्यास करून ही निवडणूक मुक्त, निर्भय, निष्पक्ष व अत्यंत शिस्तबद्धरीतीने पार पाडावी. तसेच या निवडणुकीच्या कामात कुठल्याही प्रकारचा कसूर खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी भोसले यांच्या उपस्थितीत पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोसले बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, राज्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेची संगमनेर तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली असून अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे शेखर पानसरे, उपाध्यक्षपदी दैनिक सकाळचे आनंद गायकवाड आणि दैनिक सार्वमतचे राजू नरवडे यांची तर कार्याध्यक्षपदी गोरक्ष नेहे यांची निवड करण्यात आल्याची माहिती उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली. मराठी पत्रकार परिषदेची संगमनेर तालुक्याची अन्य कार्यकारिणी पुढीप्रमाणे:-  चिटणीस संदीप इटप (लोकमंथन), सहचिटणीस मंगेश सालपे (नगर सह्याद्री), खजिनदार सुनील महाले (सायं.आनंद), संपर्क प्रमुख संजय अहिरे (युवावार्ता) व नीलिमा घाडगे (केसरी), प्रसिद्धी प्रमुख भारत रेघाटे (दैनिक भास्कर), संघटक धिरज ठाकूर (प्रवरातीर), मार्गदर्शक किसनभाऊ हासे, राजेंद्रसिंह चौहान, शिवपाल ठाकूर, कार्यकारिणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून सुरू झालेला साकुरमधील वाद नववर्षाच्या सुरुवातीपासूनच उफाळून आलेला असताना आता थेट घरातील व्यक्तीवर हल्ले करून विनयभंग करण्यापर्यंत पोहोचला आहे. या संदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात विनयभंग, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमाद्वारे सुमारे १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष बाजीराव खेमनर (निवृत्त कृषी अधिकारी), बुवाजी भागा खेमनर, किशोर बाजीराव खेमनर, इसाक अब्दुल पटेल, विश्वजीत सुभाष खेमनर, बबलु ऊर्फ आदिक बाळासाहेब शेंडगे, सद्दाम मन्सुर चौगुले यांच्यासह आणखी दहा जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून गुरुवारी दुपारी घारगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : तरुणीच्या श्वासनलिकेत अडकलेली कानातील सोन्याची रिंग दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करत काढण्यात आणि तरुणीचे प्राण वाचविण्यात संगमनेरमधील डॉक्टरांना यश आले आहे. श्वसन विकार व छाती रोग तज्ञ डॉ. अमेय अनिल देशमुख यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. फुफ्फुसाच्या संसर्गाने अत्यवस्थ असलेल्या तरुणीला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे तिला उपचारासाठी येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तरुणीची प्रकृती खालावत चालल्याने हॉस्पिटल प्रशासनाने येथील श्वसन विकार व छाती रोग तज्ञ अमेय देशमुख यांना संपर्क केला होता. देशमुख यांनी रुग्णालयात रुग्णाची प्राथमिक तपासणी केली. मात्र त्यातून निदान होत नसल्याने सिटीस्कॅन तपासणी करण्याचे ठरले. तपासणीअंती रुग्णाच्या उजव्या फुफ्फुसामध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात मागील वर्षी अंगणवाडी, प्राथमिक शाळा खोल्या विविध रस्ते यांसह विविध विकास कामांच्या केलेल्या मागणीतून व पाठपुराव्यातून जिल्हा विकास नियोजनमधून या कामांना ६ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तत्कालीन सरकारमध्ये मंत्री असलेल्या थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून घेत ही कामे रात्रंदिवस सुरू ठेवली होती. याचबरोबर तालुक्यातील रस्ते, अंगणवाडी, प्राथमिक शाळा खोल्या व विविध विकास कामांसाठी देखील मोठ्या निधीची मागणी केली होती. मात्र सत्ता बदल झाला आणि अनेक विकास कामांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयांमध्ये आंतरशालेय विज्ञान-गणित प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या ७२ उपकरणांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. आजच्या प्रगतीच्या, धावपळीच्या विज्ञान युगात तसेच स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकून राहायचे असेल तरं त्यांच्यामध्ये विज्ञानवादी दृष्टीकोन विकसित होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने देवगड विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणजे नुकतेच पार पडलेले विज्ञान गणित प्रदर्शन होय. विद्यार्थ्यांमधील सुप्त विज्ञानवादी विचारांना चालना मिळण्यासाठी, त्यांच्यातही एक शास्रज्ञ लपलेला आहे याची त्यांना जाणीव करून देण्याच्या अनुषंगाने प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनाचा शुभारंभ देवगड विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : पावसाळ्यात झालेल्या जास्तीच्या पावसामुळे स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिराकडे जाणाऱ्या पुलाच्या पायाच्या स्लॅबचा राफ्ट तुटल्यामुळे म्हाळुंगी नदीवरील पूल खचला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी या पुलाच्या नवीन उभारणीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांच्या माध्यमातून लवकरच या पुलाची उभारणी केली जाणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी दिली. विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरात अनेक मोठमोठे विकास कामे मार्गी लागली असून गेल्या काही वर्षात या शहराने जलदरीत्या विकासाचे शिखर गाठले आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरात अनेक विकासाच्या योजना राबवल्या गेल्या. मोठमोठ्या वैभवशाली इमारतींसह हायटेक बसस्थानक हे शहराचे वैशिष्ट्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : स्नेहालय संचलित रेडिओ नगर ९०.४ एफएमचा १३ जानेवारीला१२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्या निमित्ताने रेडिओ उद्धघोषक स्पर्धा (RJ कॉन्टेस्ट) आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तीन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ९०११११२३९० या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावयाचा आहे. स्पर्धकांना रेडिओ नगर केंद्रावर आल्यानंतर दोन ते तीन मिनिटात स्क्रिप्टचे वाचन सादर करावयाचे आहे. स्पर्धेचा निकाल १३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार असून विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. विजेत्यांसाठी रेडिओवर स्पेशल शो आयोजित करण्यात येईल.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर शहरातील मंगेश सुरेश घुले या वाळूतस्कराला एक वर्षासाठी प्रांताधिकारी नगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. तसे आदेश प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी काढले आहे. यापूर्वी प्रांताधिकार्‍यांनी दोघा तस्करांचे हद्दपारीचे आदेश काढले होते, त्यात आणखी एकाची भर पडली आहे. मंगेश घुले यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. वाळू तस्करी करणाऱ्या घुले याच्या विरोधात शहर पोलिसांमार्फत हद्दपारचा प्रस्ताव प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. प्राथमिक चौकशीसाठी प्रांताधिकार्‍यांनी पोलीस उपाधीक्षकांना आदेश दिले होते. पोलीस उपाधीक्षकांनी आपला चौकशी अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे सादर करत घुले याला दोन वर्षासाठी नगर, नाशिक व पुणे या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : चोऱ्या, घरफोडी, दरोडे आणि खुनापाठोपाठ आता संगमनेरमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमधील डिझेलची देखील चोरी सुरू झाली आहे. नासिक-पुणे महामार्गावर सायखिंडी शिवारात उभ्या असलेल्या एका ट्रकच्या डिझेल टाकीतून अडीचशे लिटर डिझेल अज्ञात चोरट्याने काढून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात अमोल भाऊसाहेब गायकवाड राहणार सायखिंडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध गुन्ह्यांचा तपास लावण्यात अपयशी ठरलेल्या शहर पोलिसांना नव्या वर्षात आता वाहनांतील डिझेल चोरांचा देखील शोध घ्यावा लागणार आहे. गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी (४ जानेवारी) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास नासिक-पुणे महामार्गावरील…

Read More