Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान तक्रारदारा विरोधात आणखी गुन्हे दाखल आहेत का याची चौकशी करून न्यायालयात अहवाल देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिविक्षा अधिकारी महेश अनंतराव पाटील यांना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. पाटील यांच्या विरोधात नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथील तक्रारदाराविरोधात २०२० मध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.न्यायालयाने या तक्रारदारा विरोधात आणखी काही गुन्हे दाखल आहेत का याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिविक्षा अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शहरालगतच्या समनापुर बायपासवर शहर पोलिसांनी एका संशयास्पद टेम्पोमधून सुमारे दोन लाखाचे गोमांस ताब्यात घेतले आहे. टेम्पो आणि गोमांस असा सुमारे नऊ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून ऐन दिवाळीतही शहरातील कत्तलखाने सर्रासपणे सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संगमनेरातील गोहत्या थांबणार कधी? असा प्रश्न गो प्रेमींनी उपस्थित केला आहे. गोवंश कत्तलीचे संगमनेर हे राज्यातील सर्वाधिक मोठे केंद्र म्हणून समोर येत आहे येथील बेकायदेशीर कत्तलखान्यांमध्ये सर्रासपणे जनावरांचे हत्या करून त्यांचे मांस राज्यासह देशाच्या विविध भागात पाठविले जाते. वारंवार होणाऱ्या पोलिसांच्या कारवाया आणि यातून बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात हाती लागणारा मुद्देमाल, यामुळे येथील कत्तलखाण्याची महती लक्षात येते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आता सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस केली तर त्यांना थेट सेवेतून डिसमिस केले जाणार आहे. प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी हा शेवटचा इशारा असेल, रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा आणि हेळसांड सहन केली जाणार नाही असे सांगत डॅशिंग आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.धडाकेबाज निर्णय आणि कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी डॅशिंग अधिकारी म्हणून नावलौकिक असलेल्या तुकाराम मुंढे यांनी आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा पदभार घेताच पुन्हा एकदा धडाकेबाज निर्णयांना सुरुवात केली आहे. याची प्रचिती त्यांच्या मराठवाड्यातील दौऱ्यात आली आहे. आरोग्य विभागाचा पदभार हाती घेतल्यानंतर मुंढे मराठवाड्यातील बीडच्या जिल्हा रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेस अध्यक्षपदी वर्णी लागतात मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसमध्ये धक्कादायक निर्णयांना सुरुवात केली आहे. पदभार हाती घेताच त्यांनी काँग्रेसचा आत्मा समजली जाणारी काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) बरखास्त करीत नवी सुकाणू समिती जाहीर केली. काँग्रेसच्या नव्या सुकाणू समितीत अनेक बड्या नेत्यांना दूर ठेवण्यात आले असल्याचे दिसते. नव्या वर्किंग कमिटीमध्ये महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता काँग्रेसमध्ये आहे. या समितीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा खासदार सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना स्थान देण्यात आले आहे. जोपर्यंत काँग्रेसची नवी कार्यकारिणी स्थापन होत नाही तोपर्यंत पक्षाचे कामकाज या सुकाणू समितीच्या माध्यमातून चालणार आहे. नवीन समिती सहजपणे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुस्तकांचं गाव भिलार (महाबळेश्वर) येथे शनिवारी (२९ ऑक्टोबर) होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते होणार असून अधिवेशनाच्या अध्यक्षपदी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील तर स्वागताध्यक्षपदी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, स्वागत कार्याध्यक्षपदी सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे उपस्थित राहणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक ,अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी संघटनेच्यावतीने राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिल्या जाणाऱ्या “महाराष्ट्र महागौरव” पुरस्कारांची घोषणा करण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सर्वत्र दीपावली पाडव्याच्या सण उत्साहात साजरा होत असताना संगमनेर तालुक्यातील साकुरमधून दुःखद घटना समोर आली आहे. सातपूर नजीक पिंपळगाव देपा गावात झालेल्या दुचाकी आणि छोटा हत्ती टेम्पोच्या अपघातात मोटरसायकलवरील दोघा तरुणांचा मृत्यू झाला.ओम राहूल पेंडभाजे (वय १९ वर्ष) व शुभम सदाश‍िव टेकुडे (वय १८ वर्ष, दोघे रा. देवगिरी वस्ती, साकूर, ता. संगमनेर) अशी अपघातात ठार झालेल्या दोघा तरूणांची नावे आहेत. घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास साकुरहून मोटार सायकलवर हे दोघे तरुण संगमनेरच्या दिशेने येत असताना संगमनेरकडून साकुरच्या दिशेने जाणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोने या तरुणांच्या दुचाकीला पिंपळगाव देपा गावाच्या शिवारात जोराची धडक दिली.अपघातानंतर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी फोनवर ‘वंदे मातरम’ म्हणावे, वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या पिस्क्रीप्शनवर ‘श्रीहरी’ लिहावे, अशा सरकारच्या फतव्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वेगळीच मागणी केली आहे. या मागणी संदर्भात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देणार आहेत. देशात सुख-समृद्धी हवी असेल तर भारतीय रुपयांवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी-गणेश यांचे छायाचित्र असायला हवे असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे. बुधवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी ही मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. केजरीवाल म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीतून जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे दिवसेंदिवस अवमूल्यन होत आहे. याचे परिणाम सर्वसामान्यांवर दिसू लागले आहेत. देशातील सामान्यांचे हाल होत असून हा देश समृद्ध…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेनेत उद्भवलेला पेच अद्यापही कायम आहे. आपल्या गटाला समर्थन असल्याचे सिद्ध करण्यासाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रापैकी तब्बल अडीच लाख प्रतिज्ञापत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने अवैध ठरविले आहे. तर उर्वरित प्रतिज्ञापत्र वैध असल्याचा निर्वळा आयोगाने दिला आहे.चार महिन्यांपूर्वी झालेल्या शिवसेना फुटीनंतर तात्पुरत्या स्वरूपात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढल्या असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा नवीन निर्णय समोर आला आहे. दरम्यान शिवसेना नावावर आणि धनुष्यबाण चिन्हावर ठाकरे आणि शिंदे दावा केल्यानंतर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला होता.त्यामुळे आपल्याच गटाला पदाधिकारी कार्यकर्त्यांचे समर्थन असल्याचे दावा करणारे प्रतिज्ञापत्रे ठाकरे-शिंदे गटातर्फे निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. ठाकरे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बालकांच्या हृदयरोगाबाबत झालेली जनजागृती आणि सर्वसामान्य रुग्णांच्या मागणीमुळे या महिन्यात पुन्हा एकदा एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये बालकांच्या हृदय उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महिन्यात तब्बल आठवडाभर बालकांवर मोफत हृदयउपचार करण्यात येणार आहेत.गेल्या दोन महिन्यांत आयोजित करण्यात आलेल्या बालकांवरील मोफत हृदयउपचार आरोग्य शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाला. तब्बल ८२ बालकांवर यशस्वी हृदय उपचार करण्यात आले. ठाणे, पालघर जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांचा या आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. आज २६ ऑक्टोंबरपासून या शिबिरास सुरुवात होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहन एसएमबीटी हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारांवरील उपचार होत आहेत. गंभीर आजारांवरील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विकृतपणाचा कळस गाठणारी आणि प्रत्येकाच्या मनात संताप निर्माण होईल अशी संतापजनक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्याच्या वारजे माळवाडी भागात तेरा महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ओळखीतल्या व्यक्तीनेच हे संताप आणणारे कृत्य केले आहे. पोलिसांकडील माहितीनुसार वारजे माळवाडी परिसरात मजुरी करणारे दांपत्य राहते. या दांपत्याला एक तेरा महिन्यांची चिमुकली आहे. चिमुकलीचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी आरोपीने, तुम्ही येईपर्यंत मी चिमुकलीचा सांभाळ करतो. तुम्ही बिनधास्त जा, असे सांगत चिमुकलेला आपल्या कडेवर उचलून घेतले. संबंधित व्यक्ती ही विश्वासातील आणि ओळखीचे असल्याने तो आपल्या चिमुकलीचा सांभाळ करेल, असा विश्वास…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्याचे महसूल मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल खात्याचा पदभार हाती घेतल्यानंतर वाळू संदर्भात निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांचे हे निर्णय राज्यासाठी नसून केवळ संगमनेर आणि पारनेर या दोन तालुक्यासाठीच असल्याची टीका मंत्री विखे यांच्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शिवसेनेची समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच औरंगाबाद दौरा करत अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. ठाकरे यांच्या या भेटीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली होती. या टीकेमुळे नाराज झालेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गेल्या वर्षी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करून चर्चेत आलेले आणि सत्तांतर झाल्यानंतर फारसे चर्चेत नसलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सदावर्ते यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपादक असलेल्या दैनिक ‘सामना’वर बंदीची मागणी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. अनेक दिवस अटकेत असलेल्या सदावर्ते यांनी नंतरच्या काळात मवाळ भूमिका घेतली.महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले त्यानंतर देखील जवळपास तीन महिने सदावर्ते शांत होते.अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकारने क्लीनचीट दिलेल्या व आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला यांच्याबद्दल दैनिक सामनातून येत असलेल्या बातम्यांचे कारण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शहराची सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणारा आणि पहाट गाणी ही संकल्पना संगमनेरमध्ये रुजविणारा दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम येत्या बुधवारी (दि.२६) पहाटे साडेपाच वाजता भंडारी मंगल कार्यालयात होणार आहे. संगमनेर इतिहास संशोधन मंडळ आणि स्वसंगम संगीत प्रसारक संस्था यांच्या वतीने सादर होणाऱ्या कार्यक्रमाला संगमनेरकर रसिकांनी नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले आहे. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम सादर केला जातो. या वर्षी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, ज्येष्ठ गायक भूपेन हजारिका, संगमनेरच्या भूषण गुलाबबाई संगमनेरकर हे महान कलाकार आपल्यातून गेल्याने, शाहीर साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांबाबत शेतकऱ्यांच्या दृष्टीने शासन स्तरावर निर्णय घेणार असून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून दिली जाईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पालकमंत्री विखे पाटील यांनी सोमवारी जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. खर्ड्याच्या सिताराम गड मध्ये आयोजित आढावा बैठकीत विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत कर्जत-जामखेडचे आमदार माजी मंत्री राम शिंदे आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले उपस्थित होते. विखे पाटील यांनी खर्डा परिसराश मोहरी तेलंगशी जायभाय वाडी येथील बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पाहणी केली. बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी यावेळी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगरच्या पालकमंत्र्यांनी वाळू तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन लोखंडी बोटी स्वतः पकडण्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच, नाशिकच्या पालकमंत्र्यांचे नवे धाडस समोर आले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी दरोड्याच्या उद्देशाने हातात पिस्तूल घेऊन बंगल्यात घुसलेल्या चोरट्याला पकडण्याचे धाडस दाखवले आहे. यामुळे बंगल्यातील तीन महिलांचे प्राण वाचले. मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागात घडलेल्या या घटनेची चर्चा राज्यभरात होत आहे. पालकमंत्री भुसे यांनी पकडलेल्या या संशयित चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती मिळाली. आज लक्ष्मीपूजन असल्याने बंगल्यात मोठ्या प्रमाणात रोकड, दाग दागिने असेल ते लुटून नेता येतील या उद्देशाने दुपारी साधारणता तीन वाजण्याच्या सुमारास एक चोरटा बंगल्यात घुसला.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दोन वर्षानंतर प्रथमत:च मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होत असली तरी जास्तीच्या झालेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी अडचणीत असताना सरकारने त्याच्या पाठीशी उभा राहण्याची गरज आहे. मात्र सध्याच्या सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस सुरू असून प्रत्यक्षात मदत मिळत नसल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री थोरात बोलत होते. राज्य साखर संघाचे संचालक आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, डॉ. हसमुख जैन, डॉ. जयश्री थोरात आदी यावेळी उपस्थित होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गुवाहाटीला जाऊन करोडो रुपये लाटले, असा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. या आरोपांवरुनच बच्चू कडू यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत रवी राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांमध्ये सुरू असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. या दोन आमदारांमधील वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आधी मंत्रिमंडळाचा रखडलेला शपथविधी, आता बहुचर्चित रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जाते. अशा पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यात सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयामुळे पक्षांतर्गत असलेली नाराजी समोर आलेली नव्हती. मात्र आता गुवाहाटी वरून झालेल्या आरोपामुळे आमदार बच्चू…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नेवासे तालुक्याच्या पाहणी दौऱ्यात राज्याच्या महसूलमंत्र्यांना प्रवरासंगम पासून काही अंतरावरील मंगळापूर गावात चक्क वाळू उपश्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन लोखंडी बोटी आढळून आल्या. मंत्र्यांच्या दौऱ्यातच वाळू तस्करीचा मुद्दा समोर आल्याने संतापलेल्या विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी बोटी जप्त करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. अहमदनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाचा पदभार स्वीकारताच वाळूतस्करी प्रश्नी लक्ष घातले. विखे पाटील यांच्या भूमिकेमुळे वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंत्री विखे जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसह नेवासे तालुक्यातील नुकसानीची पाहणी करत होते या पाहणे दरम्यान त्यांना प्रवरा संगम पासून काही अंतरावर असलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या आपल्या सहकारी तरुणीस पदोन्नतीचे अमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरात हा प्रकार घडला. कॉलेज रोड परिसरात असलेल्या एका नामांकित रेस्टॉरंटमधील वरिष्ठ सहकार्याने आपल्या कनिष्ठ सहकारी तरुणीस पदोन्नतीचे आमिष दाखवून हे कृत्य केले असल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून स्पष्ट झाले. गत बुधवारी पीडित तरुणी कामावर असताना आरोपीने तिला गाठून पदोन्नती मिळवून देण्याचे आमिष दाखवत पंचवटीत एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस स्थानकामध्ये आरोपी सागर मधुकर कदम (वय 29 वर्ष) याच्या विरोधात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अस्मानी संकट आल्यावर सरकारचे कर्तव्य असते की, शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचे नाही. मात्र आपल्याकडील निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आणि घोषणांची अतिवृष्टी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. शिवसेना फुटीनंतर रविवारी प्रथमतःच औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आणि बांधावरच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. आपल्या दौऱ्यात ठाकरे यांनी दहेगाव आणि पेंढापूर येथे जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना ठाकरे म्हणाले, राज्यात एकूणच घोषणांची अतिवृष्टी सुरू आहे. आणि अंमलबजावणीच नव्हे तर मी म्हणेल, या निर्दयी…

Read More