Author: अनंत पांगारकर

सोमवार, ३० सप्टेंबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संगमनेरमध्ये मंगळवारी (१ ऑक्टोंबर) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस शहर व तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संगमनेर शहराध्यक्ष कैलास कासार यांनी केले आहे. पडताणी कॉम्प्लेक्समध्ये दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होत असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर मतदार संघात या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा केली जाणार आहे. संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष शेळके, तालुका कार्याध्यक्ष विजूभाऊ खरात, शहराध्यक्ष कैलास कासार आदी पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. बैठकीसाठी युवक अध्यक्ष योगेश…

Read More

सोमवार, दि. ३० सप्टेंबर मेष- आज तुमचा आत्मविश्वास जास्त असेल, ज्यामुळे तुम्ही तुमची कामे वेगाने पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांचे कौतुक होईल. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहा, पण उत्पन्नात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. वृषभ- आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा तुम्हाला फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि नवीन योजना समोर येऊ शकेल. मिथुन- आजचा दिवस तुमच्यासाठी सर्जनशीलता आणि नवीन कल्पनांनी परिपूर्ण असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कलागुणांचे कौतुक केले जाईल आणि तुम्ही नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकता. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील, पण फालतू खर्च टाळा. कर्क- आज तुमच्यासाठी आत्मपरीक्षण करण्याचा आणि तुमच्या योजनांचे…

Read More

रविवार, २९ सप्टेंबर  एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रकार नगरच्या बोल्हेगावमधील गांधीनगरमध्ये समोर आला आहे. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन संतोष सरोदे (रा. नगर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी शालेय अभ्यासाविषयीच्या झेरॉक्स काढण्यासाठी घराबाहेर पडली होती. पीडित मुलगी घराबाहेर पडल्याची संधी साधत आरोपीने तिच्या पाठलाग केला. तसेच रस्त्यात तिला गाठत आपल्या दुचाकीवर बसण्याची जबरदस्ती देखील केली. मात्र पीडित मुलीने आरोपीच्या दुचाकीवर बसण्यास नकार दिल्याने आरोपीने तिला शिवीगाळ करत बळजबरीने दुचाकीवर बसवत बोल्हेगावच्या गांधीनगर परिसरात नेले. तेथे असलेल्या एका खोलीत नेत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर याबाबत कोणाला काही सांगू नको, कोणाला काही…

Read More

रविवार, २९ सप्टेंबर अहमदनगर – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने नाशिक विभागात माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत ४ नगर परिषदांनी व महानगरपालिकेने पुरस्कार मिळविल्याने पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने भूमी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पाचही घटकात चांगली कामगिरी केली. घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा उपयोग, एलईडी दिव्यांचा उपयोग, वृक्षारोपण, वॉटर ऑडिट, जल प्रदूषण कमी करणे, नागरिकांचा स्वच्छतेत सहभाग, वायू प्रदूषण मुक्ती, जनजागृती आदी क्षेत्रात विविध उपक्रम राबविले. नुकताच वसुंधरा अभियान ४.० चा निकाल जाहीर करण्यात आला. यात…

Read More

रविवार, २९ सप्टेंबर बदलापूर येथे बालवाडीच्या चार वर्षीय दोन चिमुरड्या मुलींच्या अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे जेलमध्ये होता, त्याच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराच्या केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याकरता तळोजा कारागृहातून त्याला वारंट घेऊन बदलापूरकडे नेण्यात येत होते. त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक घेऊन फायर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी स्वत:च्या बचावासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या त्या गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एनकाउंटरची बातमी मिडियावर प्रसिद्ध होताच संपूर्ण बदलापूरमध्ये लोकांनी फटाके वाजून दिवाळी साजरी केली, दुसरीकडे ज्या विरोधी पक्षांनी बदलापूर अत्याचार प्रकरणांत पोलीस यंत्रणेवर आरोप करून आरोपींला फाशीची तात्काळ शिक्षा दया, नाहीतर आरोपीला आमच्या…

Read More

रविवार, दि. २९ सप्टेंबर मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो, परंतु तुम्ही संयमाने आणि समजूतदारपणे काम केल्यास यश मिळेल. करिअरमध्ये प्रगतीची आशा आहे, परंतु त्याचवेळी जबाबदारीचे ओझेही वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळेल. आरोग्याची काळजी घ्या, तणावापासून दूर राहा. आज कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. प्रवासाची शक्यता आहे, परंतु सावधगिरी बाळगा. आर्थिक बाबतीत हुशारीने गुंतवणूक करा. आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. वृषभ –  आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. ऑफिसमध्ये कामाचा दबाव वाढू शकतो, पण मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. घरगुती प्रकरणांमध्ये शांतता राहील आणि तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट…

Read More

रविवार, २९ सप्टेंबर गुन्हा कुठलाही असो, २६/११ चा मुंबईवरील अतिरेकी हल्ला असो, की त्याआधी मुंबईत झालेले सिरियल बॉम्बस्फोट असोत किंवा गँगरेप असो, आरोपीला एक्सपोज करणं, त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळणं हे तपास यंत्रणेचं काम असतं. कोणत्याही गुन्ह्यात सामील असलेल्यांना लागलीच यमसदनी पाठवणं पोलिसांना अडचणीचं कधीच नसतं. मुंबई पोलिसांमधल्या जाँबाज चार अधिकार्‍यांना जिवे मारणार्‍या अजमल कसाब याला तर पोलिसांना जागीच ठार करता आलं असतं. पण या मागचा पाकिस्तानचा हात उघड झाला नसता. असे पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी खरं तर पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे. पण कधीकधी पोलीस होत्याचं नव्हतं करतात. बदलापूर घटनेतील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याला एका गोळीत संपवणार्‍या पोलिसांना कोणाला…

Read More

शनिवार, २८ सप्टेंबर मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ११ पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. शिवाय राज्यातल्या निवडणूक तयारीचा आढावाही घेतला. राज्यात २८८ विधानसभा मतदार संघ असून निवडणुकीला जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी आयोगाचे प्रयत्न असल्याचे सांगत शहरी भागात होत असलेल्या कमी मतदानाबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी चिंता व्यक्त केली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती मात्र, पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली नाही. निवडणुकीसंबंधी घोषणा लवकरच पत्रकार परिषदेतूनच करू असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात पुरुष मतदारांची…

Read More

शनिवार, २८ सप्टेंबर भारतीय जनता पक्षाचे नेते शेखर चंदेल यांचा मृतदेह छत्तीसगडच्या नाईला रेल्वे स्थानकाजवळ आढळून आला. यामुळे खळबळ उडाली असून ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंदेल हे माजी विरोधी पक्षनेते नारायण चंदेल यांचे धाकटे बंधू असून ते राजकारणात सक्रिय होते. चंदेल रात्री साडेआठ वाजता आपल्या राईस मिल मधून पायी निघून मोबाईलवर बोलत बोलत ते जात असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास छत्तीसगडच्या नाईला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि न्यायला केबिन दरम्यान अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.…

Read More

शनिवार, २८ सप्टेंबर पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यभरात राबविण्यात आलेल्या “माझी वसुंधरा अभियान ४.०”मध्ये संगमनेर शहरासह तालुक्याने दमदार कामगिरी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून संगमनेर नगर परिषदेने नगरपरिषद गटात राज्यस्तरावर उत्तेजनार्थ सहाव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. याशिवाय तालुक्यातील घुलेवाडी, गुंजाळवाडी, धांदरफळ बुद्रुक, खांडगाव, पेमगिरी, चिंचोली गुरव, लोहारे, तिगाव या नऊ ग्रामपंचायतींनी अभियानात आपला ठसा उमटविला आहे. राज्यात सर्वाधिक तब्बल साडेपाच कोटी रुपयांची बक्षिसे मिळविणारा संगमनेर एकमेव तालुका ठरला आहे. एप्रिल २०२३ ते मे २०२४ या कालावधीत पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित “माझी वसुंधरा अभियान ४.०”…

Read More