Author: अनंत पांगारकर
शुक्रवार, ०२ ऑगस्ट पोलीस ठाण्यात असलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून नील अहवाल पाठविण्यासाठी तसेच भविष्यात तक्रार झालेला त्रास न होण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय ३६) या सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध पुण्याच्या लोणीकंद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत प्रथम पाच लाख व तडजोडीनंतर एक लाख रुपये लाचेची मागणी केल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक लाख सत्तर हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्याच्या पोलिस हवालदारावर कारवाई होत नाही तोच सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे प्रकरण समोर आले आहे. तब्बल लाखाच्या पटीत लाच मागणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वरकमाईची चटक लागल्याचे…
शुक्रवार, ०२ ऑगस्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नगर जिल्ह्यातून सात लाख महिलांचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले आहे. प्राप्त झालेल्या या अर्जांची छाननी करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून प्रभारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या कक्षाला भेट दिल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी मनोज ससे यांनी दिली आहे. नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा दैनंदिन आढावा, तालुकास्तरावर अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियोजन यामुळे सात लाख महिलांचे अर्ज भरून घेण्यात यश आले आहे. अर्जाच्या छाननी साठी स्वतंत्र कक्ष……
शुक्रवार, ०२ ऑगस्ट संगमनेर नगर परिषदेच्या नाशिक-पुणे मार्गावरील आझाद सांस्कृतिक भवन व पै. नूरमहमद शेख शॉपिंग सेंटरची दुरवस्था झाली असून देशाचे पहिले शिक्षण मंत्री, स्वातंत्र्य सेनानी मौलाना अब्दुल कलाम आझाद व संगमनेर नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष पै. नूरमहमद शेख यांची अवहेलना होत असल्याची तक्रार करत मुख्याधिकाऱ्यांनी या प्रश्न तातडीने लक्ष घालण्याची मागणी ॲड. सैफुद्दीन शेख यांनी केली आहे. ॲड. शेख यांनी यासंदर्भात मुख्याधिकारी राहुल वाघ यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संगमनेर नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून हे सांस्कृतिक भवन व शॉपिंग सेंटर बांधले आहे. मात्र गेल्या एक-दोन वर्षांपासून या इमारतीची दुरवस्था झाली असून तेथे मोठ्या…
शुक्रवार, ०२ ऑगस्ट तक्रार अर्जावरून बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करून तक्रारदाराला योग्य ती मदत करण्यासाठी तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागणारा पोलीस हवालदार १ लाख ७० हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. अमोल दशरथ जाधव असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दिघी पोलीस ठाण्यात त्याची नेमणूक आहे. जाधव याच्या विरोधात लाच मागणी आणि लाच स्वीकारल्याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, लाच लुचपतकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराने चोविसावाडी, चऱ्होली येथे बिल्डरकडून फ्लॅट खरेदी केला होता. बिल्डरने तक्रारदाराच्या परवानगीशिवाय परस्पर या फ्लॅटची दुसऱ्या व्यक्तीस विक्री केली. त्यामुळे तक्रारदाराने बिल्डर विरोधात फौजदारी गुन्हा…
विशेष प्रतिनिधी / उरण राज्यभर चर्चेत असलेल्या उरणच्या यशश्री हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून दररोज नवनवी माहिती समोर येत असून या हत्याकांडात लव्ह ट्रायअँगल आहे की नाही, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. उरणमधील पोलिसांनी हत्येच्या घटनेनंतर विविध बाजूंनी तपासाला सुरुवात केली.अनेक पथके नेमण्यात आली होती. या तपासातून २९ जुलै रोजी आरोपीला बंगळुरुतून अटक करण्यात आली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मुलीच्या अंगावर गोंदण्यात आलेल्या दोन टॅटूंवरुन लव्ह ट्रायअँगलचा शोध घेतला जात आहे. आता, टॅटू आर्टीस्ट पोलिसांच्या रडावर आहे. दाऊद आणि यशश्री हे १० वी पर्यंत एकत्र शाळेत शिकले आहेत. दरम्यान, आरोपी दाऊदने तिचा विनयभंग केला होता, त्यामुळे मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन दाऊदवर…
प्रवीण पुरो | मुंबई लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. खास करून भाजपा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये २८८ विधानसभा जागांपैकी पक्षाला केवळ ५५ ते ६५ जागाच मिळू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भाजपाला लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर जागा कमी मिळाल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीतही भाजपाला मोठा फटका बसण्याची घोषणा शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात अद्याप कुठलेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नसले तरी भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेतून ही बाब स्पष्ट होत आहे. या सर्व्हेत आता असलेल्या १०५ जागा टिकणं अजिबात शक्य नसल्याचं अनुमान काढण्यात आलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार,…
गुरुवार, ०१ ऑगस्ट | अनंत पांगारकर गेल्या काही दिवसापासून संगमनेरमधील अवैध धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसागणिक ही संख्या वाढत चालल्याने शहराच्या शांततेला लवकरच गालबोट लागण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. ज्यांनी या अवैध धंद्यांवर नियंत्रण आणायचे तेच अवैध धंद्यातील भागीदार बनल्याने संगमनेरमध्ये पोलिसांचा धाक संपल्याचे दिसत आहे. बहुचर्चित शक्तिमान टॉवरसह संगमनेरच्या अनेक भागात मटका, गुटखा, जुगार, गांजा विक्री, बनावट दारू, लोटो, बिंगो, अवैध कॅफे हाऊस, भंगार दुकाने, गोवंश कत्तलखाने, दुचाकी चोऱ्या, मंगळसूत्र गंठण, दागिने, चोऱ्या, बेकायदा प्रवासी वाहतूक पोलिसांच्या वरदहस्ताने सुरूच आहे. त्यामुळे कोणी कितीही आवाज उठवा आमचे कोणीच काही करू शकत नाही, या अविर्भावात आता अवैध धंदे चालक-मालकांची…
गुरुवार, ०१ ऑगस्ट अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार खासदार निलेश लंके यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांना आता विधानसभा निवडणूक लढविण्याचे वेध लागले आहे. यासाठी शेजारच्या संगमनेर अथवा राहुरीतून आपण इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर दुसरीकडे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उमेदवारीला भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी विरोध केला आहे. शेजारच्या संगमनेर अथवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी बाबत समन्वय होणार नसेल आणि संधी मिळाली तर निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगत श्रीरामपूर राखीव असल्याने व शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील हेच उमेदवार असल्याने आपल्यासमोर या दोन मतदारसंघांचा पर्याय असल्याचे डॉ. विखे यांनी म्हटले…
गुरुवार, ०१ ऑगस्ट महाभारतामध्ये जसा अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसत होता, तसाच आपल्याला पक्षाने दिलेला कार्यक्रम दिसायला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. डॉ. गोऱ्हे छत्रपती संभाजी नगर जिल्हा दौऱ्यावर असून बुधवारी सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. संभाजीनगर जिल्ह्यातील मध्यपूर्व, पश्चिम, गंगापूर, वैजापूर, कन्नड विधानसभा क्षेत्रातील, नांदेड, बीड आणि लातूर जिल्ह्यातील महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एसटी बस मध्ये महिलांना पन्नास टक्के प्रवास सवलत, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना,…
गुरुवार, ०१ ऑगस्ट बुधवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे दिल्ली बरोबरच संसदेच्या बाहेर आणि संसदेच्या आत पाणीच पाणी दिसून आले. करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या संसदेच्या इमारतीला गळती लागली आहे. या गळतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून संदीप चौधरी यांनी देखील आपल्या एक्स अकाउंट वर हा व्हिडिओ टाकला आहे. https://x.com/newsSChaudhry/status/1818842541829112180?s=19 करोडो मे बने इस नई वाली संसद का हाल देखिये, बहार पेपर लीक हो गया, अंदर पाणी का लिकेज! अशा आशियाखाली टाकलेला हा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होताना दिसत आहे. नव्या संसद भवनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे २०२३ रोजी थाटामाटात उद्घाटन झालं. मात्र वर्षभरातच या संसद भवनाच्या इमारतीला…
