Author: अनंत पांगारकर

आपण वाटेला जात नाही आणि गेलो तर पुरता कार्यक्रम करू खांडेश्वर महादेव मंदिरात जल्लोषात आमदार थोरात यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवार ०५ नोव्हेंबर संगमनेर – यावेळची विधानसभा निवडणूक अनेक कारणांनी गाजत आहे. जनतेचा आशीर्वाद आणि पक्ष नेतृत्वाचा विश्वास या बळावर आपण सर्वोच्च पदावर असताना काही लोक जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. मागील अडीच वर्षात त्यांनी तालुक्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. चांगली घडी विस्कटित करण्यासाठी प्रयत्न केले, सभा घेतल्या. आता तालुक्यातील जनतेला त्रास देणाऱ्या खबऱ्यांना आणि त्यांच्या मागे असलेल्यांना त्यांची जागा दाखवून द्या. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही, आणि गेलो तर पुरता कार्यक्रम करू हे दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे…

Read More

आजच्या दिवसाचे राशिभविष्य  मेष – तुमचे जागेचे प्रश्न सुटतील. काहींना जुन्या मालमत्तेपासून फायदा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कधी आपण जास्तच बोलून जाता, त्याकडे लक्ष द्या त्यातून गैरसमज निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्या. वृषभ – पती-पत्नीमधील संबंध सुधारतील, कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल, मुलांना पण घरची ओढ वाटेल. कोणाचाही अपमान होणार नाही, याची मात्र दक्षता घेणे आवश्यक. नोकरीत स्थिती चांगली राहील. मिथुन – मनाला दिलासा देणाऱ्या घटना घडू शकतात. आपल्या व्यवसायात व्यापारात अपेक्षित सुधारणा दृष्टिपथात येतील. शांतचित्ताने महत्त्वाचे निर्णय घ्या. मित्रपरिवारात स्वतःची प्रशंसा होईल. कर्क – व्यापार-व्यवसायात मोठ्या उलाढाली करताना विचारपूर्वक निर्णय घ्या, मात्र आपण आत्मविश्वासपूर्वक काम करणार आहात. कामाचा आनंद आणि…

Read More

सोमवार, ०४ नोव्हेंबर  संगमनेर, अकोले या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील निवडणूक निरीक्षक हौलनलाल गौईटे यांनी सोमवारी संगमनेर मतदार संघातील मतदान केंद्रांची पाहणी केली. तसेच काही उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची संवाद देखील साधला असल्याची माहिती संगमनेरचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिली आहे. निवडणूक निरीक्षक हौलनलाल गौईटे यांचा मुक्काम संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहात असून त्यांचा ८७८८४९१६४१ हा संपर्क क्रमांकदेखील जाहीर करण्यात आला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याच्या आवाहनाबरोबरच आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून कामकाज करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी निवडणुकीशी संबंधित यंत्रणांना दिल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंमलबजावणीवर…

Read More

सोमवार, ०४ नोव्हेंबर  देवळाली – माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी देवळाली विधानसभा मतदार संघातून भावाविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या मुलीला कायदेशीर नोटीस पाठविल्यानंतर सोमवारी या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तनुजा घोलप यांनी माघार घेतली आहे. माघार घेतली असली तरी या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश घोलप यांना भाऊ म्हणून शुभेच्छा देत प्रचार मात्र भावाऐवजी महायुतीच्या उमेदवाराचा करणार असल्याचे घोलप यांनी म्हटले आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने माजी समाज कल्याण मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांच्या मुलाला म्हणजेच योगेश घोलप यांना महाविकास आघाडीचे उमेदवारी दिल्यानंतर बबनराव घोलप स्वतः पुन्हा स्वगृही ठाकरेंच्या…

Read More

सोमवार, ०४ नोव्हेंबर  उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या बंडखोरासह रासपच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. दोघांनी निवडणुकीचे मैदान सोडल्याने आता निवडणुकीत १३ उमेदवार उरले आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विठ्ठल घोरपडे आणि रासपचे उमेदवार रभाजी खेमनर अशी माघार घेतलेल्या दोघा उमेदवारांची नाव आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघ बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश आले आहे. या मतदारसंघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे समर्थक अमोल खताळ यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर भाजपाचे खताळ सलग आठ टर्म आमदार राहिलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना लढत देणार आहे. याशिवाय मनसे आणि वंचितचे उमेदवारही निवडणुकीच्या मैदानात आहे. या दोन्ही उमेदवारांच्या…

Read More

सोमवार, ०४ नोव्हेंबर संगमनेर – छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष उमेदवाराचे रविवारी दुपारी संगमनेरमधून अपहरण झाल्याची तक्रार करण्यात आल्याने शहर पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाचे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा शून्य क्रमांकाने शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. राजू धर्माजी शिंदे असे अपहरण झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. ते छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून अपक्ष उमेदवार असून निवडणूक लढवत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवाराच्या अपहरणामुळे राजकीय वर्तुळात कळवळ माजली आहे. अपक्ष उमेदवार असलेले राजू धर्माजी शिंदे हे शिर्डी येथे आपल्या परिवारासह साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. रविवारी शिर्डी विमानतळ मार्गे ते संगमनेरकडे येत असताना शहरानजीकच्या…

Read More

सोमवार, ०४ नोव्हेंबर नाशिक – राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघातून मुलगी तनुजा उर्फ दिपाली हिने अपक्ष उमेदवारी करताना माहेरचे आडनाव वापरू नये यासाठी नोटीस बजावली आहे. भाऊबीजेच्या दिवशीच घोलप कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. घोलप यांनी मुलीला बजावलेल्या नोटीसचे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून योगेश घोलप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा देत पुन्हा ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. घोलप मुलगा योगेश यांच्या प्रचारासाठी सरसावले आहे. तर घोलप यांच्या कन्या तनुजा उर्फ…

Read More

आजच्या दिवसाचे राशिभविष्य  मेष – आरोग्यात लाभ होईल, प्रवासाचे योग आहेत. मानसिक तणाव दूर होईल, कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद संभवतात. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या, एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटाल. वृषभ – तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेने सर्वांची मने जिंकाल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल आणि कर्तबगार व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. आत्मविश्वास वाढेल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मिथुन – कौटुंबिक समस्या सर्वांसमोर मांडू नका. घरगुती गोष्टी घरी सोडा आणि वडिलांच्या सल्ल्याचे पालन करा. तुमच्या उधळपट्टीवर नियंत्रण ठेवा, कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. नोकरीत वाद होण्याची शक्यता आहे. कर्क – दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपतील. तुमच्या वागण्यामुळे लोक तुम्हाला मदत करतील आणि व्यवसायात प्रगती होईल. धार्मिक…

Read More

रविवार, ०३ नोव्हेंबर  विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्याचा (०४ नोव्हेंबर) अखेरचा दिवस आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी आपापल्या पक्षातील बंडोबांना शांत करण्यासाठी एकवटले असतानाच आता मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी वाढविणारा निर्णय घेतला आहे. जरांगे यांचे राज्यभरात उमेदवार नसल्याने काहीसा सुटकेचा निश्वास या महायुती आणि महाविकास आघाडीने सोडला आहे. जरांगे पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीत कुणाला पाडणार आणि कुणाविरोधात लढणार या मतदारसंघाची थेट नावं जाहीर केली आहे. पाटील यांनी दिलेल्या यादीत काही ठिकाणी महायुतीचे तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यानं दोन्ही आघाड्यांची धाकधूक वाढली आहे. राज्यात विधानसभा…

Read More

रविवार, ०३ नोव्हेंबर  संगमनेर – शनिवारी बलिप्रतिपदेच्या दिवशी संगमनेरमध्ये एका सजविलेल्या बैलगाडीत महात्मा बळीराजाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी बळीराजाची पूजा तसेच पुष्पवर्षाव करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बळीराजाच्या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली होती. राजाभाऊ अवसक, सिताराम राऊत यांच्या हस्ते मिरवणूक मार्गावर पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकी दरम्यान अनिकेत घुले, राहुल जऱ्हाड, दत्ता ढगे, संदीप काकड, लोकपंचायतचे अध्यक्ष थोरात, शाहीर तुळशीराम जाधव यांनी चळवळीतील गाणी म्हटली. मिरवणुकीमध्ये राष्ट्रसेवा दल, छात्र भारती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लोकपंचायत, भारत ज्ञान विज्ञान समूह आदी क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता.…

Read More