Author: अनंत पांगारकर
रविवार, २० ऑक्टोबर मुंबई – भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपले पहिले उमेदवार यादी जाहीर केले असून या यादीत राज्यभरातून ९९ जणांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच जणांना पहिल्या यादीत संधी मिळाली आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव पाथर्डी मतदार संघातून विद्यमान आमदार मोनिका राजळे, कर्जत जामखेड मतदार संघातून आमदार राम शिंदे यांच्यासह राहुरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले आणि पाथर्डी मतदारसंघातून प्रतिभा पाचपुते यांना संधी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात संगमनेर विधानसभा मतदारसंघाबाबत मोठी चर्चा सुरू आहे. नगर दक्षिणमधून पराभूत झालेले माजी खासदार सुजय विखे माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात…
रविवार, २० ऑक्टोंबर राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बार उडतो असं दिसताच सत्ताधारी युती सरकारने जणू महाराष्ट्रच विकायला काढलाय असे निर्णय घेऊन टाकले आहेत. यापूर्वी विधानसभा वा लोकसभेच्या निवडणुकीआधी असे निर्णय घेतले गेले. पण यावेळचे निर्णय म्हणजे अतिरेकाचा कळस म्हणता येईल. महाराष्ट्र कंगाल झाला तरी चालेल पण सत्ता मिळालीच पाहिजे, ही मनिषा बाळगलेल्या महायुतीतील तिन्ही पक्षांनी महाराष्ट्र विकायला काढलाय, अशीच ही परिस्थिती आहे. जो मागेल त्याला रमणा वाटायचा असा खेळ सरकारने खेळला आणि राज्याला रिकामं खोकं बनवून टाकलं. हा सारा तात्पुरता मामला असावा, असं वाटत असताना या योजना कायम सुरू राहतील, असं जाहीर करत मुख्यमंत्र्यांनी राज्य विक्रीचा परवानाच मिळवलाय, असंच जणू सांगून…
रविवार, २० ऑक्टोबर २०२४ मेष – आपल्या महत्वाच्या कामांना क्रमवारी द्या, त्याप्रमाणे कार्य करा. कुठल्याही कामाला विलंब होत नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कामाचा वेग वाढणार आहे. आपणास सामाजिक कामे मिळतील. वृषभ – आपणास भरपूर काम आहे. मनाची तशी तयारी ठेवा, मात्र काम करताना मन शांत राहील याची दक्षता घेणे आवश्यक आहे. नाहीतर कामामध्ये चुका होऊ शकतील. पेंडिंग कामे करून घ्या. मिथुन – आपणास आजचे ग्रहमान चांगले आहे. दैनंदिन व्यवहार चालू राहतील. आर्थिक व्यापार व्यवसाय चांगल्या प्रकारे होतील. काम जास्त असल्यामुळे जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. कर्क – आजचा आपला दिवस नोकरदारांसाठी खूपच चांगला आहे. नोकरीमध्ये आपल्या कामाचे कौतुक होणार…
शनिवार, १९ ऑक्टोबर संगमनेर बस स्थानकाच्या गाळ्यात असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संपर्क कार्यालयाचा नाम फलक ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वृत्तानंतर काढण्यात आला आहे. कापडाने झाकलेला नाम फलक वाऱ्यामुळे उघडा पडला होता तो काढून टाकल्याची माहिती प्रांताधिकारी तथा संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे आणि खासदारांचे स्वीय सहाय्यक प्रमोद कुलट यांनी दिली. २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात १५ ऑक्टोंबरपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे संगमनेरमधील राजकीय पक्षाच्या कार्यालयांवर लावण्यात आलेले नामफलक कापडाने तात्पुरत्या स्वरूपात झाकण्यात आले आहेत. मात्र बस स्थानकाच्या मालकीच्या गाळ्यात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाचा नामफलकदेखील कापडाने…
शनिवार, १९ ऑक्टोबर विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे कठोरपणे पालन केले जात असल्याचे भासविले जात असल्याचे समोर आले आहे. संगमनेर बस स्थानकाच्या गाळ्यात शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदारांचे संपर्क कार्यालय असून या संपर्क कार्यालयाचा नामफलक मात्र आचारसंहितेतून वगळला गेला की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरला आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यासह संगमनेर मतदार संघात २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. राजकीय पक्षांचे फलक आचारसंहिता लागू होतात तातडीने काढण्यात आले असले तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संपर्क कार्यालयाचा नामफलक मात्र अद्यापही दर्शनी भागावर आहे त्या स्थितीत आहे. हा…
शनिवार, १९ ऑक्टोबर शिर्डी – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आहिल्यानगर जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते शिर्डीत करण्यात आले. माध्यम प्रतिनिधींना निवडणूक विषयक संदर्भांसाठी पुस्तिका उपयुक्त असल्याचे श्रीमती सौनिक यावेळी म्हणाल्या.याप्रसंगी महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदी उपस्थित होते. आहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयाने माध्यम प्रतिनिधींच्या सुलभ संदर्भासाठी या पुस्तिकेची निर्मिती केली आहे. निवडणूक आचारसंहितेबाबत तरतुदी, निवडणूक…
शनिवार, १९ ऑक्टोबर संगमनेर – रोटरी क्लब संगमनेर व इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्यावतीने आयोजित फुलझडी एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १८) आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनिष मालपाणी, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, तसेच या एक्स्पोला आर्थिक रुपाने सहकार्य करणारे महालक्ष्मी नेक्सा शोरुमचे मॅनेजर तेजस पवार, कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनिल कडलग, ओम मयूर ज्वेलर्सचे संचालक महेश मयूर आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. रविवारपर्यंत (२० ऑक्टोबर) मालपाणी लॉन्स येथे फुलझडीचे आयोजन केलेले आहे. पार पडलेल्या अनोख्या फुलझडी प्रकल्पाला संगमनेरकरांनी पसंतीची मोहर उमटवली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या या प्रकल्पात महिला, पुरुष व लहान मुलांचा विचार करुन…
शनिवार, १९ ऑक्टोंबर संगमनेर – इनरव्हील व रोटरी क्लब ऑफ संगमनेर आयोजित फुलझडी दीपावली उत्सवात कडलग इन्व्हेस्टमेंटच्या दालनास संगमनेरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे फुलझडीमध्ये कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या दालनाचा बोलबाला दिसून येत आहे. मालपाणी लॉन्स येथे दि. १८ ते २० पर्यंत फुलझडी दीपावली उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धम्माल, मस्ती, मनोरंजनाबरोबरच संगमनेरकरांनी मुलांचे शिक्षण, लग्न, पेन्शनसारख्या काही अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करण्याकरिता कडलग इन्व्हेस्टमेंटच्या प्रतिनिधींशी चर्चा केली व भविष्यकालीन उपायोजनांकरिता क्यू आर कोड स्कॅन करून आपले नाव नोंदविले. संपत्ती निर्माणाची २८ वर्षांची विश्वासार्ह व समृद्ध परंपरा असलेल्या व अर्थ, आरोग्य आणि अध्यात्म ही मूल्ये जपणाऱ्या कडलग इन्व्हेस्टमेंटचा…
शनिवार, १९ ऑक्टोबर संगमनेर – संगमनेरची बाजारपेठ हे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी नगर परिषदेने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी संगमनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. खरेदीच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या नागरिकांना पार्किंगची व्यवस्था व्हावी, घनकचऱ्याचे व्यवस्थापन व्हावे, शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात यावे तसेच शहरातील सर्व स्ट्रीट लाईट सुरू असाव्यात आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे. दिवटे यांच्यासह माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड व विश्वास मुर्तडक, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री,…
शनिवार, १९ ऑक्टोबर २०२४ मेष – आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने महत्त्वाची कामे हातावेगळी करण्याचा प्रयत्न कराल. आपल्याला परदेशातून अपेक्षित असलेले संदेश येतील. वृषभ – दैनंदिन कामे सातत्याने पूर्ण करावी लागणार आहेत. मानसिक तणाव किंवा प्रकृती अस्वस्थ यामुळे काम करण्यास उत्साह नसेल. एखादी महत्त्वाची बातमी समजण्याची शक्यता आहे. मिथुन – आजचा दिवस आपल्याला सावधतेने घालवावा लागणार आहे. आपला कामाचा वेग चांगला राहणार आहे. आर्थिक व्यवहार होतील, मात्र दुसऱ्यावर जास्त विश्वास ठेवू नका. कर्क – नवीन कामे मिळतील, पण त्याचा पूर्णपणे आधी आपण अभ्यास करून घ्यावा. अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, चिकाटी आणि सातत्य यांनी तुमची काम…
