Author: अनंत पांगारकर
बुधवार, १९ जून नगर जिल्ह्यात कॅफेंचे पेव फुटले आहे. या कॅफे हाऊसमध्ये जोडप्यांना अश्लील जाळे करण्यासाठी प्रायव्हसी मिळत असल्याने हे कॅफे अश्लील चाळ्यांच्या उद्योगाचे केंद्र बनले आहे. नगर पोलिसांनी उपनगरातील दोन केंद्रांवर छापे टाकत कॅफे चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. नगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या कॅफेमध्ये शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सोमवारी सावेडी उपनगरातील डौले रुग्णालयाजवळील स्टेला कॅफेवर टाकलेल्या छाप्यात कॅफेच्या नावाखाली प्लायवुडचे कम्पार्टमेंट करून, पडदे लावून अंधार करून मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे आढळून आले. तसेच तेथे अश्लील चाळे करताना काही मुला-मुलींना पकडण्यात…
मंगळवार, १८ जून २०२४ मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता असून संघर्षातून पुढे आलो आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपली लढाई बलाढ्य शक्तीशी होती. अशा या लक्षवेधी ठरलेल्या लढाईत आमदार बाळासाहेब थोरात यांचा आपल्या विजयात सिंहाचा वाटा असून त्यांनी आपल्या विजयात ‘श्रीकृष्णाची’ भूमिका बजावली असल्याचे गौरवोद्गार नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी काढले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अमृत उद्योग समूहाच्यावतीने खासदार लंके यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, प्रभावतीताई घोगरे, युवक काँग्रेस अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ.…
मंगळवार, १८ जून २०२४ जिल्हयात दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या अनुषंगाने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात १०४ एकर क्षेत्रावर हिरव्या चाऱ्याची लागवड करण्यात आली होती. ज्या पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची आवश्यकता आहे, त्यांनी विद्यापीठातून चारा घेऊन जाण्याचे आवाहन अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. विद्यापीठात लागवड करण्यात आलेला हिरवा चारा सद्यस्थितीत कापणीच्या अवस्थेमध्ये आहे. ज्या पशुपालकांना चाऱ्याची आवश्यकता असेल अशा पशुपालकांनी प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे), बियाणे विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याशी संपर्क साधावा. पशुपालकांनी हिरव्या चाऱ्याची स्वत: कापणी करुन व प्रती टन १ हजार २०० रुपये रक्कम विद्यापीठाकडे जमा करुन चारा घेऊन जाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
मंगळवार, १८ जून २०२४ प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडल प्रकरणात समोर आलेल्या नव्या खुलासामुळे खळबळ उडाली आहे. रेवन्ना याची आई भवानी रेवन्ना देखील त्याच्या पापात सहभागी असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. कर्नाटकात लैंगिक प्रकरण उघडकीस आल्यानंतर रेवन्ना भारतातून फरार झाला होता. त्यानंतर त्याच्यावर जेडीएस पक्षाने निलंबनाची कारवाई केली. पण त्याने काही दिवसांनी भारतात येत सरेंडर केले. आता या प्रकरणी समोर आलेल्या नव्या खुलाश्यामुळे खळबळ उडाली आहे. कारण प्रज्वल रेवण्णा हा ज्या कोणा महिलेवर अत्याचार करत होता, त्यामधील जी कोणी महिला रेवण्णा विरोधात तक्रार करण्यास जात असायची, अशा महिलांचे प्रज्वल रेवण्णाची आई भवानी रेवण्णा ही अपहरण करत होती, अशी माहिती…
विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाल २७ जुलै रोजी संपत असल्याकारणाने या जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. तर त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी पार पडणार आहे. विधानसभेच्या आमदारांकडून विधान परिषदेच्या सदस्यांसाठी मतदान होणार असल्याने आणि हे मतदान गुप्त पद्धतीने होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षात या निवडणुकीची चुरस रंगणार आहे. या ११ जणांमध्ये शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचाही समावेश आहे. विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाल २७ जुलै रोजी संपत असल्याने या जागांसाठी निवडणूक कधी लागते याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं. विधानसभेतून निवडून द्यायच्या या जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान…
मंगळवार, १८ जून २०२४ राज्यभरातून २८ विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास सहलीसाठी निवड करण्यात आली आहे. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये १५० पैकी १३६ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या साई घुगे याचादेखील यात समावेश आहे. एज्यूमिट अकॅडमी महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने घेण्यात आलेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षा (बीटीएस) २०२४ चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. राज्यस्तरीय असणारी ही परीक्षा राज्यात सुमारे २५० पेक्षा अधिक केंद्रांवर घेण्यात आली. इयत्ता पहिली ते आठवीचे २० हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सदर परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. साई सध्या नामांकित अशा सातारा सैनिक स्कूल येथे शिक्षण घेत असून त्याने आतापर्यंत शिष्यवृत्ती परीक्षा राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक, मंथन, नवोदय तसेच बऱ्याच स्पर्धा…
तरुणांच्या भवितव्याशी सरकारचा पुन्हा खेळ; पोलीस भरतीची शारिरीक परिक्षा पावसाळ्यात घेऊ नका, सरकारने फेरविचार करावा. बोगस बियाणे व खतांचा राज्यात सुळसुळात, शेतकऱ्यांची फसवणूक व लूट, पण सरकारकडून मात्र दुर्लक्ष. काँग्रेसच्या यशामुळे घाबरलेल्या विरोधकांकडून माझ्या बदनामीचा प्रयत्न मंगळवार, दि. १८ जून राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसवून पाप केले आहे. ॲड. उज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदाच्या नियुक्तीस काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून सरकारने त्याचा…
मंगळवार, १८ जून २०२४ आपल्या १९ वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळात वीसपेक्षा अधिक बदल्यांना सामोरे जाणाऱ्या व प्रशासनातील धडाकेबाज अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची राज्य शासनाने पुन्हा एकदा बदली केली आहे. मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी मंगळवारी मुंढे यांच्या बदलीचे आदेश काढले आहे. या बदलीमुळे मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंढे यांच्या रिक्त जागी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे देखील या आदेशात म्हटले आहे. मुंढे यांच्याकडे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन या खात्याच्या सचिवपदाचा पदभार होता. या पदावरून त्यांची बदली आता कमी महत्त्वाच्या असलेल्या विकास आयुक्त (असंघटित कामगार) मुंबई या पदावर करण्यात आली आहे. प्रशासकीय सेवेत धडाकेबाज…
मंगळवार, १८ जून २०२४ शुक्रवारी (१४ जून) रात्री संगमनेर शहरालगत असलेल्या नाशिक पुणे बाह्यवळण मार्गावरील कासारवाडी गावच्या शिवारात एका महिलेचा संशयस्पदरित्या मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटविण्यापाठोपाठ खून प्रकरण समोर आणण्यात संगमनेर पोलिसांना यश आले आहे. या विवाहितेचा काटा तिच्या प्रियकरानेच काढल्याचे समोर आले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बाळासाहेब बिरू हळणर (रा. आंभोरे ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव असून त्याला ताब्यात घेतल्यानंतर या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. रंजना शिवाजी खेमनर (वय ३५ वर्ष, रा. अंभोरे तालुका संगमनेर) ही विवाहिता आपल्या सासूसोबत शुक्रवारी संगमनेरमधील रुग्णालयात सासूच्या डोळ्याच्या उपचारासाठी आली होती. सायंकाळी डबा आणण्याच्या निमित्ताने…
सोमवार, १७ जून २०२४ लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या मोठ्या पराभवानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये फेरबदलाचे संकेत मिळत असतानाच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र राज्याच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि सहकारी म्हणून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून सोमवारी (ता. १७) भाजपकडून महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर विधानसभेसाठी प्रभारी व सह प्रभारींच्या नियुक्ती केली आहे. संघटनात्मक पातळीवर देखील निवडणुकानंतर फेरबदलाचे संकेत मिळत होते. नव्या प्रभारींच्या नियुक्तीमुळे फेरबदलास प्रारंभ झाला असल्याचे बोलले जाते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष देखील बदलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.…
