Author: अनंत पांगारकर
मंगळवार, २५ जून जिल्ह्यातील पोलीस आणि पोलिसांच्या विविध पथकांच्या हप्तेखोरीला कंटाळून संगमनेरातील मटका धंदा बंद करण्याची राळ उठवणाऱ्या मटका किंग मंडळींकडून शहरात मटका जोमात सुरु ठेवण्यात आला आहे. नगर एलसीबीने शनिवारी शहरातील दिल्ली नाका या ठिकाणी कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकत एकाला पकडल्याने शहरातील मटका काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी सुरूच असल्याचे समोर आले आहे. बशीर इसाक शेख, (वय ३० वर्षे, रा. मोमीनपुरा, संगमनेर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस चौकशीत त्याने मटका मालक आपणच असल्याची कबुली पोलिसांना दिली असली तरी मूळ मालक मात्र कारवाईतून बचावले असल्याचे बोलले जाते. दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाच्या पाठामागे बोळीमध्ये…
मंगळवार, २५ जून लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी राज्य सरकार मोर्चेबांधणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात गरीब महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबवण्याच्या हालचाली सुरू आहेत. याअंतर्गत गरीब महिलांना दरमहा १२०० ते १५०० रुपये दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक १५ ते २० हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ ही योजना आणली. त्या निवडणुकीत सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपने राज्यात पुन्हा बहुमत मिळविले. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मध्यप्रदेशने २९ पैकी २९…
मंगळवार, २५ जून नगरजवळ पाथर्डी परिसरात ओडिशा राज्यातून आणण्यात आलेला दोन कोटी रुपयांचा गांजा पकडण्यात व गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात अमली पदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) यश आले आहे. ओडिसा राज्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गांजाची तस्करी होत असल्याची माहिती ‘एनसीबी’ला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर ‘एनसीबी’ने तस्करांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. माहितीच्या आधारे एनसीबी आरोपींचा शोध घेत होती. पण आरोपी लपण्याचे ठिकाण, मार्ग, मोबाईल क्रमांक वारंवार बदलत होते. त्यांची कार्यपद्धती लक्षात घेऊन त्यांच्यावर पाळत ठेवून एनसीबीने आरोपींबाबत मोठ्या प्रमाणात माहिती गोळा केली. त्या माहितीच्या आधारे नगर येथील पाथर्डीजवळ सापळा रचण्यात आला होता. या कारवाईत १११ किलो गांजा जप्त करण्यात…
सोमवार, २४ जून नगर अर्बन बँकेच्या २९१ कोटीच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे नगर मधील प्रतिष्ठित डॉक्टर निलेश शेळके याला सोमवारी दुपारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. उद्या मंगळवारी शेळके याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली आहे. नगर अर्बन बँकेच्या कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत संचालक, बँकेचे अधिकारी, कर्जदार यांना अटक करण्यात आली आहे. यातच कर्ज फसवणूक केल्या प्रकरणी प्रतिष्ठित डॉक्टर शेळके याला सोमवारी अटक करण्यात आली. बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी माझी संचालक राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, अच्युत पिंगळे आदींनी या संदर्भात सातत्याने आवाज उठवत पाठपुरावा केला आहे. राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून…
सोमवार, २४ जून अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातून अज्ञात महिलेने ११ महिन्याच्या अपहरण झालेल्या चिमुकल्याची संगमनेर पोलिसांच्या मदतीने रविवारी रात्री सुटका करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला पुढील चौकशीसाठी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अपहरण झालेल्या बालकाला संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी येथून ताब्यात घेत त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले. अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातील एका महिलेने स्वानंद आकाश खडसे या ११ महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण केले होते. या संदर्भात नगर रेल्वे पोलिसांकडे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरचे अपहरण झालेले बालक संगमनेरमध्ये असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. नगर रेल्वे पोलीसचे उपनिरीक्षक एस. जी. लोणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संगमनेर शहर…
सोमवार, २४ जून १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरवात झाली असून खासदारांना शपथ दिली जात आहे. बघा लोकसभा अधिवेशनाचे लाईव्ह (live) कामकाज.. https://www.youtube.com/live/aQZwbc7cHww?si=Nha-iRFq19_FL2Zm https://www.youtube.com/live/YAcRXrrEFZQ?si=v1yDk9KKfrDNj0Kw
सोमवार, २४ जून दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामुळे १० वर्षानंतर त्या पुन्हा स्वगृही परततील. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपला नांदेड जिल्ह्यात मोठा धक्का बसू शकतो. नांदेड जिल्ह्यात सूर्यकांता पाटील यांची डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे. १० वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेल्या पाटील यांच्यावर पक्षाने कोणती जबाबदारी दिलेली नव्हती. दोन दिवसांपूर्वी त्यांनी भाजपा पक्ष सदस्यत्वाचा आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला होता. भारतीय जनता पक्षावर नाराज असलेल्या पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आज त्या मुंबईत पक्ष प्रवेश करण्याची…
सोमवार, २४ जून आरक्षण या विषयाकडे राज्य सरकारने अतिशय संवेदनशीलपणे बघण्याची गरज आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाचा विषय असू दे, सरकारने त्यावर लवकर निर्णय घ्यायला हवा. केंद्रात ३०० खासदार असताना देखील महाराष्ट्राच्या आरक्षणाची चर्चा का होत नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस आमच्या घरापाशी येऊन म्हणाले होते, पहिल्या पंधरा दिवसात धनगर समाजाला आरक्षण देऊ. पण खरं तर आरक्षण या विषयाकडे महाराष्ट्र सरकारने अतिशय संवेदनशीलपणे बघितलं पाहिजे. हे सरकार उपोषणाला दहा-पंधरा दिवसांपर्यंत का खेचते? मराठा असो, धनगर, लिंगायत, मुस्लिम कोणत्याही…
सोमवार, २४ जून अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सकाळी ११ वाजता सुरू होत आहे. आज पहिले दोन दिवस नव्या खासदारांचा शपथविधी होणार आहे. हंगामी अध्यक्षांच्या नियुक्तीशिवाय NEET-UGC पेपर लीक आणि इतर स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्याप्रकरणीही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे, त्यामुळे पहिल्याच दिवशी गदारोळ होण्याची शक्यता आहे. अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. ३ जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवशी नव्या खासदारांचा शपथविधी होणार आहे. नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड बुधवारी होणार आहे, तर गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सातवेळा खासदार भर्तृहरी महताब यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती…
रविवार, २३ जून नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने फेर परीक्षा झाली. यावर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी गोलमाल है भाई, सब गोलमाल है! अशी प्रतिक्रिया एक्स (X) वर व्यक्त केली आहे. तांबे म्हणाले, आज नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या १५६३ विद्यार्थ्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने फेर परीक्षा घेण्यात आली, ह्या परीक्षेला १५६३ पैकी ८१३ विद्यार्थीच हजर राहिले म्हणजेच ७५० विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा टाळली, ह्यातूनच नीटमध्ये गोलमाल झाल्याचे सिध्द होते. तांबे यांनी नीट परिक्षेबद्दल भाष्य करत या विषयाला तोंड फोडलं आहे. जवळपास निम्म्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचे टाळले असल्याने तांबे यांनी गोलमाल है भाई,…
