Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार राऊत यांनी नाशिक मध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी आक्षेप घेण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बेलदार यांच्या तक्रारीवरून खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणून त्यांची बदनामी केल्याचा आरोप…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पुण्यासारख्या मोठ्या शहरात होणारी महसूल परिषद यावर्षी पुण्यामध्ये न होता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून पहिल्यांदाच ग्रामीण भागात लोणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये होत आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांना नवीन कायदे आणि सरकारी धोरणाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी दरवर्षी महसूल परिषद घेतली जात असते. यावर्षी येत्या 22 आणि 23 फेब्रुवारी असे दोन दिवस ही परिषद होत असून या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल. महसूल विभागाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दोन्ही दिवस या परिषदेला उपस्थित राहणार आहे. याशिवाय…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी चोरी करताना शिक्षिकेला मारहाण करत सोन्याचे दागिने आणि रोकड रकमेसह ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेत पोबारा केल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील बोटा गावामध्ये समोर आला आहे. याशिवाय चोरट्यांनी आजूबाजूच्या तीन-चार घरांमध्ये देखील चोरीचा प्रयत्न केला. संगमनेर शहर व तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. चोरटे, गुन्हेगारांनी तालुक्यात उच्छाद मांडला असून गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवर असलेला वचक संपला असून त्यामुळे पोलीस यंत्रणा नेमके काय करते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंगलबाई पांडुरंग फटांगरे असे मारहाण झालेल्या शिक्षिकेचे नाव असून त्या विद्यानगर (बोटा) येथे राहतात. शनिवारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी ‘दैनिक लोकआवाज’चे विठ्ठल लांडगे यांची, तर ‘नगर स्वतंत्र’चे सुभाष मुदळ यांची सरचिटणीसपदी एकमताने निवड करण्यात आले असून कार्यकारिणीमध्ये 13 जणांचा समावेश करण्यात आला आहे. प्रेस क्लब अहमदनगर (नोंदणी क्र. एफ/२०८७/९२) या नोंदणीकृत संस्थेची कार्यकारिणी रविवारी (१९ फेब्रुवारी) २०२३ झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने निवडण्यात आली. अहमदनगर प्रेस क्लबचे संस्थापक उपाध्यक्ष सतीश डेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला व्यासपिठावर अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषशेठ गुंदेचा, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी उपस्थित होते. तर, सभेला सुमारे ९० सभासद उपस्थित होते. सुमारे ३० वर्षानंतर अहमदनगर प्रेस क्लब अहमदनगर (नोंदणी क्र. एफ/२०८७/९२)…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारी संगमनेर नगर परिषदेमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक देखील काढण्यात आली होती. शहरातील बाजारपेठ, तेलीखुंट चौक, सय्यद बाबा चौक, मेन रोड, चावडी, अशोक चौक या प्रमुख मार्गावरुन ही मिरवणूक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापाशी आली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सांगता झाली. प्रारंभी संगमनेर नगर परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या एका व्यासपीठावर संगमनेर नगर परिषदेचे प्रशासक डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याधिकारी राहुल वाघ, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव, शहर अभियंता…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरच्या मालपाणी परिवाने गेली कित्येक वर्ष यशस्वी उद्योगासह लोकहिताचे विविध उपक्रम राबविण्याची परंपरा जोपासली आहे. आपल्या औद्योगिक विस्ताराच्या माध्यमातून हजारों परिवारांना रोजगार मिळवून दिला आहे. औद्योगिक, शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या व्यापक विस्तारातून पदोपदी प्रभू श्रीरामाच्या कार्याचे दर्शन घडते, असे गौरवोद्गार विश्वविख्यात रामकथा मर्मज्ञ, युगवक्ता डॉ. कुमार विश्वास यांनी काढले. उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मालपाणी परिवाराने त्यांच्या दोन दिवशीय रामकथेचे संगमनेरात आयोजन केले आहे. या कार्यक्रमा वेळी विश्वास बोलत होते. यावेळी विधानसभेचे माजी सभापती, आमदार दिलीप वळसे पाटील, माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, भाजपचे नेते श्याम जाजू, माजी नगराध्यक्षा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भाजपाचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेल्या दोन दिवसांपासून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी आणि रविवारी त्यांच्या उपस्थितीत दोन कार्यक्रम झाले. या दौऱ्या दरम्यान त्यांनी पोट निवडणूक प्रचारात सहभाग घेतला नाही यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रदेश भाजपविरोधातील असंतोष आणि संभाव्य ‘निकाल’ त्यांनीही हेरला असावा, असे ट्विट करत शहा आणि भाजपला कोपरखळी मारली. पुढच्या रविवारी पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे, आपल्या दौऱ्या दरम्यान अमित शहा यांनी निवडणूक प्रचारात सहभाग घेतला नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेलं ‘हे खूप काही सांगून जाणारं आहे,’ ट्वीट चर्चेत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढला असून आता शिंदे गटातील मंत्र्यानेच उद्धव आणि आदित्य ठाकरेंना शिवसेना प्रवेशाची खोचक ऑफर दिली आहे. खऱ्या खोट्या शिवसेनेतील वाद वाढीस लागला असतानाच पक्षात आता फक्त बापलेकच शिल्लक राहिल्याची टीका करत उद्धव ठाकरे गटाच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. ज्यांच्या विरोधात बंड केलं, त्यांनाच आता आपल्या गटाकडे म्हणजेच शिवसेनेकडे बोलावत शिवसेनेचे शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे यांनी ठाकरे यांना ही ऑफर दिली आहे. शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांवर सातत्याने टीका केली जात आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला…
रविवार विशेष ॥ प्रवीण पुरो अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचा निकाल लागला. निवडणूक आयोगाने शिवसेनेची मालकी एकनाथ शिंदेंकडे असल्याचा निर्णय दिला आणि धनुष्यबाण ही निशाणीही शिंदेंच्या पारड्यात टाकत आपला विवेकही विकून टाकला. खरी सेना कोणाची, हे निवडणूक आयुक्त जाणत नसतील तर ते आयुक्त कसले? शिवसेनेला दिलेल्या मान्यतेविषयी आयोग अनभिज्ञ असेल तर गंभीरच म्हटलं पाहिजे. टी.एन.शेषन होते तोवर आयोग विवेकाने काम करत होता. ते निवृत्त झाले आणि आयोगाची गरीमा लयाला गेली. आता तर हा आयोग भाजपच्या रखेलीचं काम करू लागला आहे. आयोगाने काहीही निर्णय दिला असला तरी शिवसेनेचे खरे वारसदार कोण, शिवसेना कोणाची, हे सुर्य प्रकाशाइतकं स्पष्ट आहे. पण या निमित्ताने लोकशाहीवर निष्ठा व्यक्त…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात सहकार क्षेत्राची ताकद मोठी आहे. महाराष्ट्रातून सहकार क्षेत्र देशभरात पोहोचण्यास मदत झाली. पुढील दशकामध्ये सहकार क्षेत्र मोलाची भूमिका बजावणार आहे. सहकार क्षेत्रावर अन्याय होतो अशी तक्रार नेहमी केली जाते. मात्र आम्ही कर कमी केले असून या तक्रारीत तथ्य नसल्याचा दावा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केला. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा पुण्यामध्ये आयोजित सहकार परिषदेत बोलत होते. शहा म्हणाले, सहकारासाठी विद्यापीठाची निर्मिती करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने सहकार क्षेत्राचे मजबुतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी सहकार मल्टीपर्पज युनिव्हर्सिटी (सहकार विद्यापीठ) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात त्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर देश हिताचा व लोकशाही वाचवण्यासाठीचा काँग्रेसचा विचार असून तो प्रत्येकापर्यंत पोहोचवा, असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित हाथसे हाथ जोडो अभियानाचा शुभारंभ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार लहू कानडे होते. तर व्यासपीठावर श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, दुर्गाताई तांबे, शहराध्यक्ष किरण काळे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते, हेमंत ओगले, ज्ञानदेव वाफारे, सचिन गुजर, करण ससाने, ज्ञानेश्वर मुरकुटे, संपतराव म्हस्के, सचिन गुंजाळ, संगमनेरचे शहराध्यक्ष…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर लहान मुलांचा बहारदार गायन अविष्कार, रामभक्तीच्या साद घालणार्या रचना, गीत गायन-निवेदनातून उलगडणारे रामचरित्र आणि भावभक्तीच्या या सोहळ्यात देहभान हरपून तल्लीन झालेला हजारोंच्या संख्येतील रसिक प्रेक्षक असा माहोल शुक्रवारी संगमनेरच्या जाणता राजा मैदानाने अनुभवला. झी वाहिनीवरील सारेगमप फेम सारंग भालके आणि ध्रुव ग्लोबल स्कूलच्या बाल वाद्यवृंदाचा कलाविष्कार आणि शब्दस्वरांचा अनमोल नजराणा रसिकांसाठी वेगळी आनंदानुभूती देणारा ठरला. उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त संगमनेरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी लिटिलचॅम्प सारंग भालके याच्यासह ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ग. दी. माडगूळकर लिखित व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणातील 56 गीतांमधील आठ…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर शहर व तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी (ता.१९ फेब्रुवारी) बस स्थानक प्रवेशद्वाराजवळ संगमनेर वकील संघाच्या सहकार्यातून मोफत नेत्र तपासणी व सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने संगमनेरमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा रविवारी साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी सर्व शिवप्रेमी सकाळी आठ वाजता शिवस्मारकाजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यानंतर संगमनेर बस स्थानक येथे रोटरी आय केअर ट्रस्ट संचलित दर्शन रोटरी नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सकाळी दहा ते एक या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीला घातक ठरणारा आहे. ठाकरे आणि शिवसेना हे एक समीकरण आहे शिवसेना ठाकरेंपासून वेगळी असू शकत नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात माध्यमांशी बोलत होते. https://twitter.com/bb_thorat/status/1626587873351979014?t=gSOG3tK_PeGjS6b5R03gqg&s=19 थोरात म्हणाले, जो निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे तो लोकशाहीला घातक अशा प्रकारचा आहे. शिवसेना ठाकरेंपासून वेगळी काढू शकत नाही. ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे. ठाकरेंनी पूर्ण आयुष्य शिवसेना संघटना वाढविण्याकरिता घातलेले आहे. कदाचित आयोगाने असा निर्णय दिला असला तरी जनता…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचिन्ह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेतील बंडानंतर भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतर मुख्यमंत्री पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे शिंदे यांनी शिवसेना या नावासोबतच धनुष्यबाण या पक्ष चिन्हावर दावा केला होता. यासंबंधीचे निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्यानंतर निवडणूक आयोगाचा हा मोठा निर्णय समोर आला आहे. https://twitter.com/ANI/status/1626572341814919168?t=lKl5K36Bfrbi–PvKwY62A&s=19 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलच्या सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतर निवडणूक आयोग आपला…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डी, अहमदनगर जिल्ह्याच्या सहलीवर असलेल्या दर्यापूर (जि. अमरावती) येथील अन्नातून विषबाधा झालेल्या ९४ मुले व ५ शिक्षकांना शिर्डीच्या साईनाथ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एकाच व्हिडिओ कॉलद्वारे मुले व शिक्षकांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. या रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नाही. असे रूग्णालय अधीक्षकांनी कळविले आहे. मुले व शिक्षकांच्या प्रकृतीची सर्वातोपरी काळजी घेण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रितम वडगावे व प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिल्या आहेत. यावेळी तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते. दर्यापूर (जि.अमरावती) येथील आदर्श हायस्कूल मधील २२७ मुले-मुली व १५…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्षाकडे मात्र नेत्यांची फळी असताना देखील प्रकृती अस्वस्थ असताना देखील खासदार गिरीश बापट यांना गुरुवारी कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराकरिता बोलाविण्यात आले होते. त्यामुळे रासने यांच्या प्रचारासाठी व्हीलचेअरवर केसरी वाड्यात उपस्थित राहिलेल्या बापट यांना शुक्रवारी प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे वजनदार नेते पक्षाकडे असतानाही कसबा पेठ पोटनिवडणुक भाजपसाठी अवघड बनल्याने गुरुवारी प्रकृती अस्वस्थ असतानाही खासदार गिरीश बापट यांना प्रचार करण्यासाठी बोलविण्यात आले. गुरुवारी व्हीलचेअरवर केसरी वाडा येथे कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात 1995 मध्ये सामाजिक न्याय आणि क्रीडा मंत्री पद भुषविणार्या शिवसेनेच्या उत्तम प्रकाश खंदारे यांच्यासह महादेव भोसले आणि आणखी एका महिलेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर पुण्यातील शासकीय विश्रामगृहात अत्याचार करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवत व मुलांचा सांभाळ करण्याचे वचन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे 37 वर्षीय महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 2012 पासून बिबेवाडीतील बी रेस्ट हाउस, पोकळे वस्ती येथील जाधव निवास या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी भा.द.वि. 376, 377, 406, 420, 506…
नव्या राज्यपालांचा शनिवारी शपथविधी; कोश्यारी यांच्याप्रमाणेच बैस यांची झारखंडमधील कारकीर्द वादग्रस्त
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये होत आहे. या समारंभात रमेश बैस आपली राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारतील. दरम्यान नव्या राज्यपालांकडून महाराष्ट्राचा व महापुरुषांचा सन्मान राखला जावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कोश्यारी यांच्याप्रमाणे नव्या राज्यपालांनी दिल्ली सरकारच्या तालावर नाचणारे कळसूत्री बाहुली म्हणून काम पाहू नये, अशी राज्यातील जनतेची अपेक्षा आहे. त्यांची झारखंड मधील कारकीर्द भगतसिंग कोश्यारी यांच्याप्रमाणेच वादग्रस्त राहिली आहे. 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये बैस केंद्रीय राज्य मंत्री होते. 1999 ते 2004 या काळात त्यांनी केंद्रात माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री तसेच रसायने व खते राज्यमंत्री, 2003 मध्ये केंद्रीय खाण मंत्रालयात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्य विद्युत लाईनच्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जोराचा धक्का बसल्याने एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील साकुर येथे घडली आहे. मोहन भिवाजी मोरे असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास साकुरमधील वनवे नगर येथे हा प्रकार घडला. यासंदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, जावेद अब्दुल शेख यांच्या घरापासून वीज वितरण कंपनीचे मुख्य प्रवाह असलेले विजेची तार गेलेली आहे. शेख यांच्या घराच्या गच्चीवर मोहन भिवाजी मोरे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास काम करत असताना अचानक त्यांचा या तारेला स्पर्श झाला. त्यामुळे…
