Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयातर्फे स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारा मध्यप्रदेशात आयोजित केलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्र संघाने धमाका केला. मुला-मुलींच्या स्वतंत्र गटात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्‍या योगासनपटूंनी पश्‍चिम बंगाल, हरयाणा, तामीळनाडू व मध्यप्रदेशच्या संघांशी एकतर्फी लढत देत उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर ही स्पर्धा गाजवली. या संपूर्ण स्पर्धेत योगासनांमध्ये वर्चस्व राखणार्‍या महाराष्ट्र संघाने पुन्हा एकदा दोन्ही गटाच्या अजिंक्यपदाचा किताबही पटकाविला. उज्जैन येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या पारंपरिक प्रकारात महाराष्ट्राच्या सुमित बंडाळे याने सुवर्ण तर स्वराज फिस्के याने कांस्य पदक मिळवले. याच प्रकारात मुलींच्या गटात निरल वाडेकरने रौप्य पदक प्राप्त केले. कलात्मक प्रकारात स्वराज फिस्केने सुवर्ण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ऊस तोडणी मजुराच्या नऊ वर्षाच्या मुलाचा प्रवरा डावा कालव्यामध्ये पाय घसरून पडल्याने कालव्याच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे रविवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. रितेश संदीप राठोड (रा. जळगाव) असे कालव्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. प्रवरा नगरच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस तोडणी सध्या सुरू आहे. ऊस तोडणी साठी या कारखान्याकडे जळगाव जिल्ह्यातील करगाव येथून काही ऊस तोडणी मजूर आलेले आहेत. ते आश्वी बुद्रुक येथील प्रवरा डाव्या कालव्याजवळील महादेव पुलाजवळ शेळके वस्तीवर हे मजूर कोप्या टाकून राहत आहे. रविवारी यातील संदीप राठोड आणि त्यांची पत्नी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तब्बल 32 आरोपींनी संगणमत करून बँकेचा विश्वासघात करत सुमारे 69 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकेच्या गोल्ड व्हॅल्युवरसह 32 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरातील नामांकित बँकेमधील गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. संगमनेर, अकोले, राहता येथील तब्बल 32 जणांचा आरोपी मध्ये समावेश असल्याने बँकिंग क्षेत्रात व ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सोनेतारण करताना आरोपींनी बनावट सोने गहाण ठेवत त्या बदल्यात तब्बल 68 लाख 94 हजार रुपयांचे कर्ज उचलले आहे. बँकेच्या लेखापरीक्षणामध्ये बनावट सोनेतारण प्रकरणाची काही पाकिटे सापडल्याने ही खाती बनावट…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महावितरण कंपनीने ग्राहकांच्या माथी दरवाढ लादण्याचा प्रयत्न चालविला आहे. असे झाल्यास मोठ्या प्रमाणात ग्राहकांना वीज वापराबद्दल भुर्दंड बसेल. याचा विरोध करण्यासाठी ग्राहकांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी संभाव्य वीज दरवाढी संदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पत्र पाठवत हरकत नोंदवण्याचे आवाहन शिर्डी काँग्रेसचे नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी केले आहे. संभाव्य दरवाढी संदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने १५ फेब्रुवारीपर्यंत वीज ग्राहकांकडून हरकती मागविल्या आहेत. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना पगारे म्हणाले, सध्या विजेचा दर प्रति युनिट ३.३६ रुपये असून येत्या दोन वर्षात तो ४.५० ते ५.१० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सदर दरवाढ झाल्यास याचा वीज ग्राहकांना मोठा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क २० लाख रुपयांनी तोट्यात असलेला व्यवसाय वार्षिक १०० कोटींचा होतो. आपत्ती आली तरी आपण सकारात्मक वृत्तीने सामोरे गेल्यास ही प्रगती होते. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पहा, भावना जपून व्यवसाय करण्याऐवजी बुध्दी चातुर्याने करा, प्रत्येक संधीचा लाभ घ्या, आपला इगो शून्य करा, पैशांसाठी व्यवसाय करण्यापेक्षा उद्दिष्टांसाठी व्यवसाय करा असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य व साई ऍक्युम्युलेटर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड संगमनेरचे व्यवस्थापकीय संचालक निलेश चव्हाण यांनी केले. सिन्नर येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या भिकुसा हायस्कूल येथे करियर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत ‘ उद्योजक आपल्या भेटीला ‘ या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील खंडोबा देवस्थानच्या परीसर विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास योजनेतून २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रतिजेजूरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील देवगड येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानचा यात्रा उत्सव माघी पोर्णीमेला सुरू झाला. यात्रेच्या पहील्याच दिवशी मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते श्री खंडोबाची महाआरती करण्यात आली. देवस्थानच्यावतीने स्मृतिचिन्ह देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धर्मदाय आयुक्त उषा पाटील, संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख, देवस्थानचे अध्यक्ष सगाजी पावसे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, गुलाबराव सांगळे, काशिनाथ पावसे, भिमराज चत्तर, जावेद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिकलेल्या पदवीधर आणि राज्यातील शिक्षकांनी कोणाला निवडून दिले हे आपण निकालातून बघितले आहे. शिकलेल्या मतदाराने दिलेला कौल कशा प्रकारचा आहे हे आपण बघितले पाहिजे. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांच्या बाबतीत आमची चूक झाली त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. पवार शनिवारी रात्री बारामती येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. सभेतच पवारांनी तांबे यांच्या बद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करत त्यांच्या पाठीशी असल्याचे सुचित केले. शुक्रवारी सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी…

Read More

रविवार विशेष | प्रवीण पुरो काही लोकांच्या जिभेलाच हाड नसतं, असं म्हणतात. स्वत:चं महत्व वाढवण्याकरता समाजासाठी काही करण्याऐवजी ते दुसर्‍याला कमी लेखण्यात आणि दोष देण्यात धन्यता मानतात. राज्य भाजपचे प्रदेश प्रमुख झाल्यापासून चंद्रशेखर बावनकुळे असंच काही बाही बडबडू लागले आहेत. प्रदेश प्रमुख झालं की असंच बोलावं लागतं अशी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची बोली बनली आहे. याआधी कोल्हापूरचे चंद्रकांत पाटीलही असंच काही बोलायचे. त्यांच्याही जिभेला टेकू नव्हता. त्यात राष्ट्रवादीवर टीका केली की पक्षात बक्षिसी मिळते आणि पवारांवर टीका केली की प्रमोशन. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे भाजपच्या नेत्यांसाठी सोपं टार्गेट असतं. केवळ जीभ आहे म्हणून अशिष शेलार, नितेश राणेंसारखे नेतेही पवारांवर टीका…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या आरोपांना उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ज्यांच्या व्हाट्सअपचे स्क्रीन शॉट माध्यमांना पत्रकार परिषदेत दाखविले त्या सचिन गुंजाळ यांनी आपली भूमिका एका पत्राद्वारे ट्विटरवर व्यक्त केली आहे. ‘महाराष्ट्र संवाद’च्या वाचकांसाठी या पत्राचा तपशील आणि अधिक माहिती देत आहोत. सन्माननीय अतुल लोंढेजी, आपण प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आहात. आपण माहिती घेऊन बोलले पाहिजे. अगदीच पत्रकार परिषद घेण्या अगोदर आपण माझ्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला असता, तरीही मी वास्तविकता सांगितली असती. आपण चुकीची माहिती देऊ नये ही अपेक्षा आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ एबी फॉर्म वाटपासंदर्भात जे घडले ते आपणास सांगतो. सर्वात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले जलजीवन मिशन हे एक क्रांतीकारी पाऊल असून तालुक्यात या योजनेसाठी ७५१ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. जलजीवन मिशन अंतर्गत आश्वी बुद्रुक येथील सुमारे १ कोटी ९९ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कैलास तांबे, भगवानराव इलग, पोपटराव वाणी, दिनकर गायकवाड, मच्छिंद्र थेटे, रोहीणी निघुते, कांचन मांढरे, गुलाबराव…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज सत्यजित तांबेंची बंडखोरी, तांबे भाजपच्या वाटेवर आदी प्रकारच्या अनेक बातम्यांनी गेल्या महिनाभरातील वातावरण ढवळून निघाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी शनिवारी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर पक्षांतर्गत वादाचा माध्यमांनी फुगवलेला फुगा अखेरीस फुटला आहे. पत्रकार परिषदेत तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षातील नेत्यांवर टीका करत थोरात तांबे परिवारा विरोधात पक्षातूनच षडयंत्र रचल्याचे सांगत आपण अपक्ष म्हणून यापुढे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी अखेरीस शनिवारी सर्वच राजकीय घडामोडींवर शनिवारी आपली भूमिका स्पष्ट करत सर्वच वादांवर पडदा टाकला आहे. तांबे यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे ते भाजप…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक पदवीधर निवडणुकीत निवडून आलेल्या सत्यजित तांबे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शुभांगी पाटील यांनी शनिवारी अधिकृतरित्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. याचबरोबर त्यांनी आपला धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केल्यानंतर शिवसेनेने पाटील यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला. तांबे यांच्या विरोधात कडवे झुंज देताना पाटील यांनी या मतदारसंघात सुमारे 40 हजार मते मिळविली. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या पाटील यांना भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी मातोश्रीचे दरवाजे ठोठावत शिवसेनेचा पाठिंबा मिळविला होता. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरमध्ये गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून चोऱ्या, घरफोड्या, हाणामाऱ्या ही नित्याची बाब झाली आहे. गुन्हेगारीचा बिमोड करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे संगमनेर व्यापारी असोसिएशनने पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. संगमनेरचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांना या पार्श्वभूमीवर निवेदन देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात स्थानिक पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला असून गुन्हेगारांनी संगमनेरात आपले हातपाय पसरले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या खून प्रकरणाचा आणि त्या पाठोपाठ शहरात व परिसरात झालेल्या दरोडेच्या घटना चोऱ्या यांची उकल करण्यात पोलीस अयशस्वी ठरले आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे हैराण झालेल्या संगमनेरकरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क रात्रीच्या वेळी घराच्या पडवीमध्ये जेवण करत असताना घराचे छत अंगावर पडल्याने चुलत्याचा व पुतणीचा मृत्यू झाला आहे. याशिवाय वृद्ध महिला गंभीर जखमी झाले असून तिच्यावर रुग्णालयात उच्चार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. लक्ष्मण चंद्रभान सोनवणे (वय 42 वर्ष) व सानिका एकनाथ सोनवणे (वय 8 वर्ष) असे मृत झालेल्या चुलत्या-पुतणीचे नाव आहे. तर मृत लक्ष्मण सोनवणे यांची आई वैजयंतीबाई चंद्रकांत सोनवणे (वय 65 वर्ष) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.वेल्हाळे येथे शुक्रवारी रात्री सोनवणे कुटुंबीय आपल्या बंगल्याशेजारी असलेल्या पत्र्याच्या पडवीमध्ये रात्री जेवण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत सत्यजीत तांबे विजयी झाले आहेत. कॉग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विजयानंतर त्यांची पुढील वाटचाल कशी असेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतांनाच एकीकडे भारतीय जनता पक्षाने त्यांना थेट पक्षात येण्याची ऑफर दिली असतांनाच दुसरीकडे कॉग्रेसचेही दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सत्यजीत तांबेंना एक महत्वाचा राजकीय सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले, इतके दिवस चेंडू कॉग्रेसच्या कोर्टात होता. सत्यजीत अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्याला कॉग्रेस, भाजपा त्यांच्याकडे बोलाविण्याचा प्रयत्न करणार. आता पुढे त्याला बरीच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवीन आमदार म्हणून निवडून आले आहेत. या मतदारसंघावर सलग चौथ्या निवडणुकीतही तांबे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. सत्यजित तांबे यांनी अपेक्षित मतांचा कोठा पूर्ण केला. त्यांनी महाविकास आघाडीने परस्पर केलेल्या शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे. राजकीय घडामोडींमुळे रंगतदार ठरलेल्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात कोण गुलाल उधळणार याविषयी आता राजकीय चर्चांना जोर आला होता. महाविकास आघाडीची उमेदवारी मिळून देखील आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजित तांबे याचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुदतीत एबी फॉर्म न मिळाल्याने तांबे यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विधान परिषदेच्या औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचा निकाल जाहीर झाला असून या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांचा विजय झाला आहे. त्यामुळे औरंगाबादवर राष्ट्रवादी काँग्रेसने तर नागपूरवर काँग्रेसने विजय मिळवत आपले खाते उघडले आहे. भाजपला कोकणातून विजय मिळाला आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या निकालामध्ये महाविकास आघाडीला दोन जागा तर भारतीय जनता पार्टीला एक जागा मिळाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी एकेका जागेवर विजय मिळविला असून चुरशीच्या ठरलेल्या नाशिकच्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे दुसऱ्या फेरी अखेर आघाडी घेऊन असले तरी अद्याप तीन फेऱ्या बाकी आहेत. औरंगाबादच्या लढतीकडे राज्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिक पदवीधर मतदार संघाची मतमोजणी सुरू असून दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे दुसऱ्या फेरी अखेर 15000 पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहे. दुसऱ्या फेरीनंतर तांबे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केले असल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मतमोजणी परिसरात मोठा जल्लोष सुरू केला आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत दिसत आहे. असे असले तरी या पदवीधर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पदवीधरांनी आपली मते बाद केली आहेत. बाद मतांचे प्रमाण लक्षात घेता पदवीधरांनी असे का केले असावे अशी शंका निर्माण होते. दुसऱ्या फेरी अखेर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कोकण शिक्षक मतदार संघातून भाजपने विजयी सलामी दिल्यानंतर त्या पाठोपाठ सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वपूर्ण असलेला फडणवीस-गडकरी यांचा बालेकिल्ला नागपूरचा गड मात्र महाविकास आघाडीने आपल्या ताब्यात घेतला आहे. नागपूर शिक्षक मतदार संघातून काँग्रेसचे सुधाकर आडबाले मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करणाऱ्या सुधाकर आडबाले यांच्या विजयाची घोषणा करण्यात आले असून महाविकास आघाडीचा पहिला विजयी उमेदवार जाहीर झाला आहे. सुधाकर आडबाले यांनी भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार नागो गाणार यांचा पराभव केला. नागपूर मतदार संघ हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हक्काचा बालेकिल्ला मानला जातो या बालेकिल्लातून काँग्रेसचा पर्यायाने महाविकास आघाडीचा उमेदवार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी महसूल मंत्री, लोकनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (5 फेब्रुवारी) सायंकाळी साडेसात वाजता जाणता राजा मैदान येथे आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शिंदेशाही बाणा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हे गोरगरीब व सर्वसामान्यांचे नेते असून महाराष्ट्रातील सुसंस्कृत नेतृत्व म्हणून लोकप्रिय आहेत. महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक सलग आठ वेळा निवडून येत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण ,पाटबंधारे ,रोजगार हमी योजना, खारजमीन, राजशिष्टाचार, जलसंधारण या विभागांची खाती सांभाळली आहेत. महसूल विभागाला हायटेक बनवताना लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून शालेय शिक्षण विभाग…

Read More