Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील ८ रस्त्यांसाठी मंजूर केलेली ४० कोटी रुपयांची कामे रद्द करण्यात आल्याने तालुक्यात संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय केवळ संगमनेर तालुक्यासाठीच घेण्यात आला असून जिल्ह्यातील इतर कोणत्याही तालुक्यांची कामे रद्द झालेली नाहीत. शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने अपूर्ण माहितीवर आधारित पत्रकबाजी केल्याचा आरोप शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे यांनी केला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ४०.७३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून एकूण ३०.५७० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे होणार होती. यात डिग्रस ते रणखांबवाडी, चिखली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तसेच जनजागृती कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जिल्हा पर्यावरण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या समितीत पर्यावरण क्षेत्रात भरीव काम करणारे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांची अशासकीय सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या १ सप्टेंबर २०१५ च्या निर्णयानुसार या समितीची स्थापना झाली असून, जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. या समितीत विविध शासकीय विभागांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. या समितीत खालील प्रमुख सदस्यांचा समावेश आहे: शासकीय अधिकारी:…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून संगमनेर तालुक्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर या निर्णयावरून आमदार अमोल खताळ यांची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप केला आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक दोन संशोधन व विकास अंतर्गत ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने केवळ संगमनेर तालुक्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमध्येही असाच निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: देशातील सहकार क्षेत्रासाठी एक आदर्श ठरलेल्या संगमनेरच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच गुरुवारी (१४ ऑगस्ट) होणार आहे. या कार्यक्रमाला माजी महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आणि आमदार सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने कायमच शेतकरी, कामगार आणि ऊस उत्पादकांचे हित जपले आहे. तसेच, कारखान्याने ५५०० मेट्रिक टन गाळप क्षमता आणि ३० मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प यशस्वीपणे राबवून राज्यासाठी एक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही घेतलेल्या मेहनतीला यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ : आज तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्या. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. प्रवासाचे योग आहेत. मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. तुमचे काही जुने मित्र भेटतील. व्यावसायिक जीवनात प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कर्क : आज तुम्ही थोडं भावनिक होऊ शकता. कामावर लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक विचार टाळा. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. संध्याकाळी चांगली बातमी मिळू शकते. सिंह…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. निवडणुका ईव्हीएमवर असोत किंवा बॅलेट पेपरवर, जनता पुन्हा एकदा विरोधकांना घरी बसवेल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. संगमनेर येथील कुंभार गल्लीमध्ये शिवसेना शाखेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार खताळ यांनी कार्यकर्त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं. यावेळी शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खताळ म्हणाले, शिवसेना पक्षात कार्यकर्ता हे पद सर्वात महत्त्वाचे आहे. मी या मतदारसंघाचा आमदार असलो तरी, सर्वप्रथम एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी कार्यकर्ता म्हणूनच…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी : राज्यात भाकड जनावरे आणि वासरांचा प्रश्न गंभीर बनल्याने, शिव आर्मी शेतकरी संघटनेने आज (मंगळवारी,१३ ऑगस्ट) संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात शेतकरी आपली भाकड जनावरे घेऊन सहभागी झाले होते. आंदोलकांनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आणि नंतर थेट प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांनी भाकड जनावरे आणि वासरांच्या सरकारी खरेदीची मागणी केली आहे. सध्या अशा जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे थांबली आहे, त्यामुळे ती शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक बोजा बनली आहेत. या जनावरांचे योग्य संगोपन करण्यासाठी सरकारने गोशाळा किंवा शासकीय केंद्र स्थापन करावीत, अशीही मागणी आंदोलकांनी केली. तसेच, शासनाकडे जमा केलेल्या जनावरांच्या बदल्यात शेतकऱ्यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ संगमनेरने जालना येथे झालेल्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्लबने तब्बल सात मानाचे पुरस्कार पटकावत जिल्ह्यामध्ये आपली छाप पाडली. या सोहळ्यात क्लबचे अध्यक्ष साईनाथ साबळे यांना ‘बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पीडीजी मोहन पालेशा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. सुरेशजी साबू, निर्मला साबू, डीजी सुधीर लातूरे, रो. जयेशभाई पटेल, रो. क्षितिज झावरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण ९२ क्लबमधून रोटरी क्लब ऑफ संगमनेरची निवड झाली. क्लबला बेस्ट डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट सीपीआर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सायटेशन अवॉर्ड,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका हा राज्यात अग्रेसर बनवला. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. या तालुक्यातील विविध 8 रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 40 कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर करून घेतला होता. मात्र नवीन लोकप्रतिनिधीने आठ महिन्यात एक रुपयाचा निधी न आणता राजकारणासाठी मंजूर रस्त्यांची कामे रद्द करून दुर्दैवी राजकारण केले असल्याची टीका संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर यांनी केली असून मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी केलेल्या या उद्योगाने तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अकोले: आपल्याच मित्राच्या गळ्यातील सोन्याची चेन पाहून त्याची नियत फिरली आणि त्याने वेशांतर करून चोरी केली. मात्र, राजूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तपास करून आरोपी मित्राला अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या सुमारे साडेचार लाख रुपयांच्या दोन सोन्याच्या चेन जप्त करण्यात आल्या आहेत. मौजमजा करण्यासाठी ही चोरी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सागर दिगंबर पवार (रा. राजूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याचा मित्र विष्णू रामभाऊ हेकरे यांच्याच घरात रविवारी मध्यरात्री चोरी केली होती. पहाटेच्या सुमारास विष्णू हेकरे रात्री झोपले असताना, त्यांच्या दरवाजावर थाप मारण्यात आली. त्यांनी दरवाजा उघडताच तोंडाला रुमाल बांधलेला एक तरुण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पाच अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले असून, २७ वर्षीय मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील काळाचौकी येथे पोलीस ठाण्यात या संदर्भात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी सुमारे १४ वर्षे नऊ महिन्यांची आहे. गेल्या वर्षी १ ऑक्टोबर रोजी १७ वर्षांच्या एका अल्पवयीन आरोपीने पीडित मुलीसोबत जवळीक साधली. त्यानंतर तो तिला २७ वर्षीय आरोपीच्या घरी घेऊन गेला, जिथे दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे व्हिडिओ चित्रीकरणही केले. नंतर या आरोपींनी पीडितेला धमकावून अश्लील व्हिडिओ…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: अवघ्या दोनशे रुपयांच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना संगमनेरच्या आश्वी बुद्रुक येथे समोर आल्याचे वृत्त समोर येऊन काही तास उलटत नाही तोच तालुक्यातील जाखुरी येथे महिलेची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे. संगीता भारत मोरे (वय ४०, रा. नादनठाण, ता. वैजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती भारत मोरे याला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. संगीता मोरे, त्यांचे पती भारत मोरे आणि त्यांच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती जाखुरी येथील जावई सोमनाथ सुरशे यांच्या घरी मुक्कामी आले होते. रविवारी रात्री सर्व कुटुंबियांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त (२७ सप्टेंबर) ‘आय लव्ह संगमनेर’ संस्थेने पोलीस भरती, आर्मी भरतीसह इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष अभियानाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात तरुणांना मार्गदर्शन, सराव परीक्षा आणि शारीरिक चाचण्यांची तयारी करून घेतली जाईल. या माध्यमातून संगमनेर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आमदार सत्यजीत तांबे हे तरुणांना प्रोत्साहन देणारे आणि त्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या याच कार्याचा एक भाग म्हणून ‘आय लव्ह संगमनेर’ या संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. यासंदर्भात माहिती देताना स्पर्धा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर, प्रतिनिधी: घुलेवाडी (संगमनेर) येथील रहिवासी राजू मनोहर थोरात यांनी १५ ऑगस्टला प्रांताधिकारी कार्यालयासमोर कुटुंबीयासह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ट्रक चालकाने घरात झोपेत असताना कुटुंबाला चिरडून मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. या घटनेत थोरात यांच्या कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले असून घराचेही मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर थोरात यांनी याप्रकरणी प्रशासनाकडे वारंवार मदतीची मागणी करूनही अद्याप कोणतीही चौकशी न झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकाराला कंटाळून थोरात यांनी हा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासन यापासून काय पावले उचलते याकडे लक्ष लागले आहे. राजू मनोहर थोरात, (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन माहेराहून २० लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून स्नेहा विशाल झेंडगे (वय २७) या विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आल्याने आमदार रोहित पवार यांनी समाजाने यातून कोणताही धडा घेतला नसल्याची खंत व्यक्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा झेंडगे आणि विशाल यांचा विवाह गेल्या वर्षी २ मे २०२४ रोजी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी स्नेहाकडे कंपनी चालवण्यासाठी माहेरहून २० लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. या पैशांसाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. https://x.com/RRPSpeaks/status/1954558051442434467?t=uA3sdevQQ7sWZSaRCYw82A&s=19 छळाला कंटाळून स्नेहाने याआधीही पोलिसांत तक्रार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: जे काम पन्नास वर्षांत सर्व सत्तास्थानांवर असूनही तुम्हाला जमलं नाही, ते पोरं-बाळांनीच करून दाखवलं आणि पाणी आणल्याचं सिद्ध केलं, असा टोला लगावत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर नाव न घेता जोरदार टीका केली. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या निळवंडे डाव्या कालव्याचं पाणी अखेर संगमनेर तालुक्यातील गोरक्षवाडी येथे पोहोचलं आणि त्याचा जलपूजन सोहळा नुकताच पार पडला. या ऐतिहासिक क्षणी डॉ. विखे बोलत होते. डॉ. विखे म्हणाले की, निळवंडे डावा कालवा योजना गेल्या ३०-४० वर्षांपासून केवळ कागदावर होती. या काळात अनेक बैठका झाल्या, आश्वासनं दिली गेली, पण पाण्याचा एक थेंबही गोरक्षवाडी किंवा संगमनेरमध्ये पोहोचला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पोलीस असल्याचे भासवून दोघा अज्ञात भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाचे ५५ हजार रुपये लुटल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. रवींद्र नारायण राजहंस (वय ७४ वर्ष, रा. भिंगारदिवे मळा, सावेडी, अहिल्यानगर) असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. राजहंस यांच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात दोघा भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी राजहंस जॉगिंग पार्क जवळ दुचाकीवर थांबले होते त्यावेळी डोक्यावर हेल्मेट घातलेला एक इसम दुचाकीवरून आणि दुसरा पायी त्यांच्या जवळ आला. या दोघांनी आपण पोलीस असल्याचे राजहंस यांना सांगितले. त्यापैकी एकाने पोलिसाचे ओळखपत्र दाखवत…
दोनशे रुपयांच्या वादातून तरुणाचा खून, चार जणांवर गुन्हा दाखल एक ताब्यात; संगमनेरच्या या गावातील घटना
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर – आश्वी, प्रतिनिधी अवघ्या दोनशे रुपयांच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे घडली आहे. मतीन मेहबूब शेख (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आश्वी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, इतर तिघांचा शोध सुरू आहे. ही घटना शुक्रवारी, (८ ऑगस्ट) रात्री ८:४५ वाजताच्या सुमारास घडली. मतीन शेख याने आसीफ शेख याला उसने दिलेले दोनशे रुपये त्यांच्या वडीलाकडे मागीतल्याचा राग आल्याने याच रागातून आरोपी आसिफ शेख, सोहेल आंधळे, पप्पू भांड, आणि गौतम गायकवाड यांनी मतीनला प्रतापपूर शिवारातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पुणे: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत महाराष्ट्रातील महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे रूपवते यांनी म्हटले आहे. ज्या तत्परतेने पुणे रेव्ह पार्टी आणि प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ठोस भूमिका घेतली, त्याच तत्परतेने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा आरोप करणाऱ्या पीडित दलित मुलीला न्याय मिळवण्यासाठी दोन मिनिटांचा वेळ दिला नाही. आयोगाच्या अध्यक्षा पुण्यामध्येच वास्तव्यास असताना, पीडित मुली तीन दिवस सातत्याने पोलीस स्टेशनबाहेर आंदोलनात बसल्या होत्या, तरीही त्यांना भेटायला अध्यक्ष गेल्या नाहीत, असे आयोगाच्या माजी सदस्या आणि वंचित बहुजन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नाशिक: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतचोरी आणि घोटाळे झाल्याचा दावा करत, जर निवडणूक आयोगाने निवडणुकीसंदर्भात डिजिटल माहिती सार्वजनिक केली, तर सर्व घोटाळे समोर येतील, असे थोरात म्हणाले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी हे मत व्यक्त केले. त्यांनी राहुल गांधी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सादर केलेल्या पुराव्यांचा संदर्भ देत, भाजप लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. निवडणुका चुकीच्या पद्धतीने आणि घोटाळे करून जिंकल्या जात आहेत, असे ते म्हणाले. थोरात यांनी जनतेला…
