Author: Annant Ppangarkar
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सुखद राहील, मात्र जोडीदारासोबत बोलताना संयम ठेवा. वृषभ: आज तुम्हाला भाग्याची खंबीर साथ मिळेल. प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान लाभेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यातून भविष्यात चांगला नफा मिळू शकतो. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन: आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीसाठी वेळ काढा. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांशी संवाद साधताना वादाचे प्रसंग टाळा. गुंतवणूक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक भोंदू कॅप्टन अशोक खरात याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याला पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर उभे करण्यात आले. अवतार पूजेच्या नावाखाली व्यावसायिकाला एक कोटीहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या अशोक खरातला न्यायालयाने चार मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. व्यवसाय जगभरात विस्तारण्याच्या इच्छेचा गैरफायदा घेत आरोपी खरातने एका व्यावसायिकाला १ कोटी ११ लाख रुपयांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले. आहे. आरोपीने फिर्यादीला ‘अवतार पूजा’ करण्याचे आमिष दाखवून ईशान्येश्वर मंदिर परिसरात बोलावले आणि तिथे बनावट साप दाखवून मृत्यूची भीती घातली. ही पूजा पूर्ण करण्यासाठी २१ देशांत जावे लागेल, अन्यथा नागदंश होऊन मृत्यू होईल, अशी भीती…
नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसतो न बसतो, तोच केंद्र सरकारने सामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे आपले क्रूर धोरण पुन्हा एकदा राबवण्यास सुरुवात केली आहे. निवडणुका संपताच महागाईचा भडका उडाला असून, १ मेपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिक, छोटे दुकानदार आणि रेस्टॉरंट चालकांचे कंबरडे मोडले असून, ऐन उन्हाळ्यात महागाईची ही झळ जनतेला सोसावी लागणार आहे. व्यावसायिक सिलेंडर मध्ये झालेल्या दरवाढीचा फटका आता सामान्य कुटुंबाच्या हॉटेल आतील खाद्यपदार्थांना बसणार आहे. नव्या दरवाढीनुसार, राजधानी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता ३०७१.५० रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईतही हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, पुणे: पुण्यातील चंदननगर भागात एका तरुणाने प्रेमप्रकरणातील वादातून २२ वर्षीय तरुणीचा ब्लेडने गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे असे जखमी तरुणीचे नाव असून, तिची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे. याप्रकरणी तरुणीचा भाऊ भगतसिंग दोहरे याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही नगर रस्त्यावरील एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. त्यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते, मात्र अलीकडे त्यांच्यात खटके उडत होते. बुधवारी, २९ एप्रिल रोजी तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने पठारे वस्ती येथील…
मुंबई: राज्य सरकारने जून २०२४ मध्ये सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पडताळणी प्रक्रियेचा टप्पा ३० एप्रिल रोजी पूर्ण झाला असून, आतापर्यंत राज्यातील १ कोटी ८९ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली शेवटची मुदत संपल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. सुरुवातीला या योजनेसाठी एकूण २ कोटी ४३ लाख बहिणींनी नोंदणी केली होती, मात्र सखोल पडताळणीनंतर तब्बल ५४ लाख अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. योजनेच्या पारदर्शकतेसाठी गेल्या दीड वर्षांपासून विविध मार्गांनी निकषांची तपासणी केली जात आहे. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, निकषात बसत नसतानाही काही महिलांनी लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः…
मुंबई, विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करत २१ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमनाथ घार्गे यांची मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पदी रवानगी झाली आहे, तर चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आता अहिल्यानगर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतील. या बदल्यांच्या सत्रात जालना येथून अजय के. बन्सल यांची महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा पोलीस अधीक्षक पदी, अमरावती ग्रामीणचे सिगुरी विशाल आनंद यांची धुळे पोलीस अधीक्षक पदी आणि नाशिक ग्रामीणचे बाळासाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: महाराष्ट्रात ‘दैवी शक्ती’ आणि ‘चमत्काराच्या’ नावाखाली सुरू असलेला अंधश्रद्धेचा बाजार पोलिसांनी उखडून टाकण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमधील कुख्यात भोंदू अशोक खरात याच्या अटकेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून, गेल्या ३० दिवसांत पोलिसांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतून एकूण १४ भोंदू बाबांना गजाआड केले आहे. गजाआड केलेल्या या भोंदूंचे अनेक प्रताप पोलीस तपासात समोर येत आहे. या भोंदूनी महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाशिकच्या अशोक खरातवर आतापर्यंत १० गुन्हे दाखल झाले आहेत. त्याने महिलांचे शोषण करण्यासाठी गुंगीकारक पदार्थांचा वापर केल्याची कबुली दिली असून, सध्या SIT (विशेष तपास पथक) या प्रकरणाचा सखोल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कायद्याची पायमल्ली करून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा लोणी पोलीस आणि अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात सुरू असलेल्या या काळ्या धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून एका बीएएमएस डॉक्टरसह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, रोख रक्कम आणि तीन आलिशान कारसह तब्बल २४ लाख ९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना पिंपरी निर्मळ…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: राज्यात सध्या सर्वत्र उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढत असून, येत्या काही दिवसांत हा तडाखा अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प्रख्यात कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे. यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक असून अहिल्यानगर जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचे सावट असून, संगमनेर परिसरातही ही तीव्रता वाढण्याची…
प्रतिनिधी / उरण उरण तालुका रिक्षा युनियनचे संस्थापक, विद्यमान अध्यक्ष तथा नागाव-म्हातवलीतील ज्येष्ठ समाज कार्यकर्ते प्रफुल्ल किशोर पुरो यांचे सोमवारी दीर्घ आजाराने देहावसान झाले. मृत्यू समयी ते 75 वर्षांचे होते. वरीष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. प्रफुल यांच्या दुःखद निधनावर शोक व्यक्त करण्यासाठी उरणमधील रिक्षा वाहतूक दुपारनंतर बंद ठेवण्यात आली होती. प्रफुल पुरो यांच्या निधनाने रिक्षा चालक-मालकांचा आधार हरपला असून नागाव आणि म्हातवली क्षेत्रातील सामाजिक कार्यक्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. प्रफुल यांनी दीर्घकाळ समाजसेवा केली, असंख्य गरजू व्यक्तींना मदत केली आणि आपल्या सकारात्मक वृत्तीने त्यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले. त्यांचं साधं राहणीमान, प्रामाणिकपणा आणि समाजहितासाठी…
मोहसीन शेख, संगमनेर – शहरातील दिल्ली नाका परिसरात मध्यरात्री एक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. आयशर ट्रकचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकून रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या भेळीच्या हातगाडीला जोरदार धडक बसली. या अपघातात हातगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला. छत्रपती संभाजीनगरवरून येणाऱ्या आयशर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटल्याने ट्रक थेट हातगाडीवर जाऊन धडकला. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक तत्काळ बाहेर आले. घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातात भेळीच्या हातगाडीचे व आयशर ट्रॅकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून…
भोंदू बाबा राजेंद्र गडगेच्या पोलीस कोठडीत वाढ; अन्य आरोपी अद्याप फरारच! तपासात २०० हून अधिक व्हिडिओ…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: तालुक्यातील वडगाव पान येथील ‘दत्तधाम सरकार’चा स्वयंघोषित भोंदू बाबा राजेंद्र बापू गडगे याच्या पोलीस कोठडीत संगमनेर न्यायालयाने आणखी दोन दिवसांची वाढ केली असून आता तो २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून आणि असाध्य आजार बरे करण्याचे खोटे आमिष दाखवून अनेक निष्पाप नागरिकांची आर्थिक व मानसिक फसवणूक केल्याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने देण्यात आलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे या प्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी गडगे याच्या आश्रम आणि निवासस्थानी दोनदा झाडाझडती घेतली असून, त्यातून पोलिसांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास आणि त्यांचे सर्वसमावेशक विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. संगमनेरच्या सय्यद बाबा चौकात कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला, मात्र याचवेळी आंदोलकांनी गायकवाड यांचे उपरोधिक आभार मानल्याने या विषयाची शहरात मोठी चर्चा रंगली आहे. वंचित बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने सोमवारी सायंकाळी संगमनेर येथील बहुचर्चित ठरलेल्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या वाचन चळवळीतून इतिहासाचा जागर करण्यात आला. सय्यद बाबा चौकात आयोजित…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यासह राज्यभरात सध्या जंगलांना लागणाऱ्या आगींचे सत्र सुरू असून, यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. या गंभीर घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही ठोस किंवा समाधानकारक उपाययोजना केल्या जात नसल्याचा थेट आरोप माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केला आहे. मालदाड परिसरात नुकत्याच लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे केवळ झाडेच जळून खाक होत नसून वन्यजीवांचेही अतोनात नुकसान होत आहे. या परिस्थितीमुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य पसरले आहे. आपण ‘दंडकारण्य अभियाना’च्या माध्यमातून वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनासाठी रात्रंदिवस कष्ट घेत आहोत. मात्र, जर अशाच प्रकारे मानवनिर्मित किंवा नैसर्गिक…
मुंबई, विशेष प्रतिनिधी: राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या अटी व शर्ती निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या प्रवीण परदेशी समितीचा अहवाल आता प्राप्त झाला असून, हा अहवाल तातडीने चर्चेसाठी सार्वजनिक करावा, अशी आग्रही मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे. या समितीने केलेल्या शिफारसी आणि अभ्यासावर व्यापक चर्चा होणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. शेतकऱ्यांना वारंवार कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी या समितीने नेमक्या कोणत्या शिफारसी केल्या आहेत, हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. सध्या अशी चर्चा आहे की, समितीच्या अटींमुळे असंतोष निर्माण होऊ नये म्हणून सरकार २०१७ आणि २०१९ च्या जुन्याच निकषांवर कर्जमाफी देण्याचा विचार करत आहे. जर सरकारला जुनेच निकष राबवायचे होते, तर नवीन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संगमनेर येथे रविवारी एक विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील तसेच उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय कागदपत्रांचे मार्गदर्शन व नोंदणी शिबिर अलकानगर येथे उत्साहात पार पडले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन आवश्यक कागदपत्रांची नोंदणी करण्यात आली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन आयोजित केलेल्या या उपक्रमात नागरिकांसाठी विनामूल्य ओळखपत्र दुरुस्ती, ई-श्रम कार्ड, आभा कार्ड,…
डॉ. मैथिली सत्यजीत तांबे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे संवेदनशीलता आणि शिस्त. यांचा संगम लाभलेले हे नेतृत्व संगमनेरच्या विकासाला नवी दिशा देत आहे. चेन्नईच्या मातीत जन्म झाला असला तरी, सांगलीच्या खानापूर तालुक्यातील मातीची ओढ त्यांच्या रक्तात आहे. तामिळ, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा भाषांच्या संगमातून त्यांना जे बहुभाषिक व्यक्तिमत्व लाभले त्यामुळेच त्यांना समाजाच्या विविध स्तरांतील लोकांशी संवाद साधणे सहज शक्य झाले. पण हा केवळ संवाद नव्हता तर ती नाती जोडण्याची एक कला होती. डॉक्टर (BDS) म्हणून रुग्णांच्या वेदना समजून घेण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले. मात्र, केवळ क्लिनिकपुरते मर्यादित न…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: तालुक्यातील एका मोठ्या गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून तिचे भविष्य पणाला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणावरून संपूर्ण तालुका ढवळून निघाला असून, चाईल्ड हेल्पलाईनने दिलेली तक्रार आणि लग्नाचे समोर आलेले स्पष्ट छायाचित्रांचे पुरावे असतानाही, स्थानिक प्रशासन मात्र संशयास्पद मौन बाळगून आहे. या ‘आंधळ्या दळणामुळे’ यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, या विवाहामागे नेमका कुणाचा वरदहस्त आहे, अशी संतप्त विचारणा जनतेतून होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अवघ्या १६ वर्षांच्या मुलीच्या विवाहाची माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईनने तातडीने तक्रार दाखल केली होती. महिला व बालविकास विभागाचे अधिकारी संजय कदम यांनी या…
महाराष्ट्र सर्वात न्युज ऑनलाईन, संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये आज जनक्षोभ पाहायला मिळाला. तथाकथित महाराज धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा आणि शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानांचा तीव्र निषेध करत, शहरातील हजारो नागरिकांनी आणि सर्व पुरोगामी संघटनांनी एकत्र येत ‘जोडे मारो’ आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दोन्ही नेत्यांच्या पुतळ्याचे दहन करून जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या निषेध सभेची सुरुवात झाली. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, स्वतःला कितीही मोठे महाराज म्हणवून घेणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असू शकत नाहीत. उत्तर भारतातून येऊन महाराष्ट्राची संस्कृती दूषित करण्याचा प्रयत्न केला जात असून,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त आयोजित गोदा ते नर्मदा जलयात्रा शनिवारी रात्री संगमनेरमध्ये दाखल झाली असताना, एका दुर्दैवी प्रकाराने या जलयात्रेला गालबोट लागले आहे. भाजपच्या काही युवा पदाधिकाऱ्यांनी सत्तेच्या धुंदीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोरच महिला पोलीस कर्मचारी आणि बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांशी अरेरावी करत त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राज्याचे जलसंपदा तथा अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपत्ती जलपूजा केल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथून प्रारंभ झालेली ही जलयात्रा शनिवारी रात्री संगमनेरमधील प्रवरा नदीकाठच्या जाजू इंग्लिश मीडियम स्कूलच्या पटांगणात विसावली होती. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…
