Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप सिद्ध झाल्याने संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. बाळासाहेब जगन्नाथ रोकडे (वय ३२ वर्ष रा. श्रीरामनगर संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्या न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मंगळवारी निर्णय जाहीर करत आरोपीला खटल्यात दोषी ठरविले. १७ मार्च २०१९ रोजी पीडित अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणी मैत्रिणीचे बँकेत काम असल्याचे कारण सांगून तिच्यासोबत संगमनेर मधील युनियन बँकेत गेली होती. मात्र ही घरी न परतल्याने मैत्रिणीकडे चौकशी केली असता…
महाराष्ट्र सह्याद्री न्यूज ऑनलाईन अकोले: उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायनी म्हणून ओळखले जाणारे भंडारदरा धरण अखेर पूर्णपणे भरले आहे. आज पहाटे ३ वाजता धरणातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू – सकाळी ६ वाजल्यापासून धरणाच्या स्पीलवेमधून ११,४०६ क्युसेक आणि वीज निर्मितीसाठी ८५० क्युसेक, असा एकूण १२,२३१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पाण्याच्या आवकेनुसार, सकाळी ८ वाजता विसर्ग वाढवून २०,७६३ क्युसेक इतका करण्यात आला आहे. भंडारदरा धरणाची पूर्ण साठवण क्षमता १०,७६३ द.ल.घ.फू. आहे. धरण भरल्यानंतर, येणारे अतिरिक्त…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अकोले: अकोले शहरात सुरू असलेल्या ऑनलाईन बिंगो, मटका आणि डॉलर जुगाराच्या अड्ड्यावर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून ४ लाख ९८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोले शहरातील बसस्थानकासमोरील नवले कॉम्प्लेक्समध्ये ऑनलाईन जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या छाप्यात बिंगो, मटका आणि डॉलर या जुगारांचे साहित्य आणि साधने जप्त करण्यात आली. या प्रकरणी नितीन निवृत्ती गायकवाड, अमोल मारुती मोहिते, वैभव राजेंद्र गायकवाड,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. वृषभ: काही कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे, पण संयम ठेवल्यास यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमच्या करिअरला गती मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल आणि तुमचा मान-सन्मान वाढेल. कर्क: तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद टाळा. सिंह: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील. वैवाहिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये गुरुवारी (२१ ऑगस्ट) एक भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संगमनेरमधील सकल हिंदू समाज, विविध पुरोगामी संघटना, वारकरी संप्रदाय आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाची माहिती देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी सांगितले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे वारसदार आहेत. त्यांनी आपल्या कामातून संगमनेर तालुक्याचा विकास केला आहे. ‘एक तालुका, एक परिवार’ ही त्यांची संकल्पना राज्यात आदर्श मानली जाते. अशा संयमी आणि सर्वधर्म समभाव जपणाऱ्या नेत्याला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे माजी महसूलमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तथाकथित महाराजाच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. आपण तत्वासाठी आणि विचारांसाठी जगणारे असून, नथुराम गोडसेसारख्या व्यक्तीकडून मारले जाण्याची धमकी मिळाली, तर असे बलिदान मी आनंदाने स्वीकारेल, असे विधान थोरात यांनी केले. मी महात्मा गांधी नाही, मात्र विचारांसाठी बलिदान देण्यास तयार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे एका कीर्तनाच्या कार्यक्रमात झालेल्या वादानंतर गेल्या दोन दिवसांपासून संगमनेर राजकीय वादाने धुमसत आहे. संगमनेरमधील शांततेला गालबोट लागण्याची चिन्ह निर्माण झाली असतानाच कीर्तनकार म्हणविणाऱ्या आणि वादाला कारणीभूत ठरलेल्या संदेश भंडारे या महाराजाकडून माजी मंत्री थोरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गंभीर घटनेनंतर संगमनेरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तांबे यांनी समाज माध्यमांवर एक सविस्तर पोस्ट लिहून ही धमकी संगमनेरची सामाजिक घडी आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. संगमनेरची स्वाभिमानी जनता असल्या विकृत मानसिकतेचा निषेध करते, असेही त्यांनी म्हटले आहे. राजकीय टीका करताना विरोधकही जपून शब्द वापरतात- आपल्या पोस्टमध्ये सत्यजीत तांबे म्हणतात, ‘संत-महात्म्यांच्या परंपरेने समृद्ध असलेल्या महाराष्ट्रात, बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यावर टीका करताना विरोधकही जपून शब्द वापरतात. पण स्वतःला कीर्तनकार म्हणवणाऱ्या एका उद्धट व्यक्तीने त्यांच्याविषयी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: महाराष्ट्राचे सुसंस्कृत आणि ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका व्हिडिओमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे याने ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल’ असे म्हणत थोरात यांना थेट धमकी दिली. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट पसरली आहे. नेमकं प्रकरण काय? संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे एका कीर्तनात संग्राम भंडारे राजकीय विषयांवर बोलत असताना काही गावकऱ्यांनी त्याला विरोध केला आणि अभंग शिकवण्याची विनंती केली. यानंतर काही धार्मिक संघटनांनी राजकारण करत गोंधळ निर्माण केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी शांततेचं आवाहन केलं.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: न्यायालयाच्या निर्देशानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीचे प्रक्रिया सुरू होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार असून त्यासाठीच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा सोमवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यात सर्वाधिक प्रभाग श्रीरामपूर आणि त्या पाठोपाठ संगमनेर, कोपरगाव नगर परिषदेमध्ये राहणार आहे. श्रीरामपूरमध्ये 17 प्रभागांमधून 34 सदस्य, संगमनेर व कोपरगावमधून 15 प्रभागातून प्रत्येकी 30 सदस्य असतील. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि त्यांच्या सीमांचे प्रारूप खालील प्रमाणे प्रभाग क्रमांक १ * श्रमिक नगर, गोविंद नगर आणि गणेश नगर या भागांचा समावेश आहे. * एकूण लोकसंख्या ४१३६…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई, दि. १८ ऑगस्ट: पुण्यात पोलिसांचे ‘जंगलराज’ सुरू आहे का, असा संतप्त सवाल विचारत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. कोथरूड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार असूनही, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याऐवजी उलट पीडित तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केल्याने हा ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टीका सपकाळ यांनी केली आहे. १ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेनंतर पीडित तरुणींनी कोथरूड पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नेवासा फाटा येथील एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. नेवासा फाटा परिसरातील ‘कालिका फर्निचर’ या दुकानाला रविवारी रात्री उशिरा आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, दुकानाच्या मागील बाजूला राहत असलेल्या कुटुंबाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मयूर अरुण रासने (वय ३६), त्यांची पत्नी पायल (वय ३०), मुले अंश (वय ११) आणि चैतन्य (वय ६) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय ८५) यांचा समावेश आहे. सुदैवाने, मयूर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या संगमनेर तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये विनायक वाडेकर यांची तालुका अध्यक्षपदी, तर प्रज्ञा शिंदे यांची महिला अध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राहाणे, जिल्हा सचिव दिनेश थोरात, जिल्हा कोषाध्यक्ष अप्पासाहेब नरोटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भगवान गायकवाड आणि जिल्हा ग्राहक मार्गदर्शन आयाम प्रमुख हरिभाऊ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. नव्याने जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी अशी, विनायक वाडेकर (अध्यक्ष), प्रज्ञा शिंदे (महिला अध्यक्ष), रोशन कोथमिरे, प्रदीप रहाणे (उपाध्यक्ष), प्रशांत राऊत (सचिव), सर्जेराव वाघ, माधव वाळे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. तुमची कामे सहज पूर्ण होतील आणि तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज तुम्हाला थोडे शांत राहावे लागेल. महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होऊ शकतात, त्यामुळे संयम बाळगा. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल. मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. जुनी अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा चांगल्या संधी मिळू शकतात. नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल. कर्क: आज तुम्ही भावनिक राहाल, पण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: पद्मशाली महिला संघमच्या अध्यक्षपदी लक्ष्मी दत्तात्रय इटप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. येथील मार्कंडेय मंदिरात आयोजित महिला मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्षपदी वनिता शांताराम आडेप, साईसुधा विलास वनम, सेक्रेटरीपदी गिता शंकर अन्नलदास, रोहिणी भारत शंकरपल्ली, तर खजिनदारपदी वैशाली अंबादास आडेप यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर शितल सुनिल मादास, तुळजा राजेंद्र श्रीराम, सुरेखा शंकर चन्ना, देविका लिंगमुर्ती चिंता, रेखा गणेश मादास, सुनिता सतिश आडेप, वनिता नारायण इटप, वैशाली काशिनाथ आडेप, मिनाक्षी अजय श्रीपतवाड, आशा विनय राम, इंदिरा विलास श्रीराम, पुनम सागर शिरसुल्ला, स्वाती संतोष अंकारम, स्मिता विनोद झुंजुर, वैशाली गणेश पगडाल,…
असंगाशी संग केल्यावर काय होतं याचं चांगलं उदाहरण निवडणूक आयोगाच्या रुपाने देशवासीयांसमोर उभं राहिलं आहे. आपलं स्वत्व भाजपला विकणार्या अधिकार्यांनी आयोगाला आरोपीच्या पिंजर्यात उभं केलं आहे. समृध्द लोकशाहीची वासलात लागली आहे. जे स्वत:च विकले गेले ते नामेनिराळे झाले. संजीवकुमार नावाचा अधिकारी देशाबाहेर मजा मारतो आहे. अशा असंख्य अधिकार्यांची सोय भाजपच्या सत्तेने विविध ठिकाणी करून ठेवली आणि त्यांना चोर्या करायला भाग पाडलं. मूळ संस्थेत चोर्या केल्यावर गेले तिथेही चोर्या करायचे मार्ग मोकळे झाले. अशी लबाडी अनंत काळ पचत नसते. ती कधी तरी बाहेर येणारच. विरोधी पक्षनेता निडर असेल तर कोणत्याही परिणामांची तमा तो ठेवत नाही. जे काम आज राहुल गांधी यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष : आज तुम्हाला कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन आनंदी राहील. वृषभ : काही जुने वाद मिटतील. आरोग्याची काळजी घ्या. जास्त खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. मिथुन : नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. मित्रांचे सहकार्य मिळेल. कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. सिंह : पैशांची गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रवासाचे योग आहेत. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कन्या : काही आव्हानांना तोंड द्यावे लागेल, पण तुम्ही त्यावर सहज मात कराल. मेहनत केल्यास नक्कीच यश मिळेल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन शिर्डी: पत्नी माहेरी निघून गेल्याच्या कौटुंबिक वादातून एका बापाने आपल्या चार चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शिर्डीजवळ घडली आहे. राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारात एका विहिरीत पाच मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण काळे (वय ३०) याने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही जीवन संपवलं. अरुण काळे हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव येथे राहत होता. त्याला तीन मुले आणि एक मुलगी होती. गेल्या काही दिवसांपासून घरात सुरू असलेल्या वादामुळे त्याची पत्नी आठ दिवसांपूर्वी त्याला सोडून माहेरी येवला तालुक्यात गेली होती. याच कारणातून अरुणने दारूच्या नशेत हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी – स्वातंत्र्यसेनानी व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यासह मागील पिढीतील व्यक्तींनी तालुक्याच्या विकासाचा पाया रचला आहे. याच योगदानातून, संगमनेरच्या वैभवात भर टाकणारी थोरात कारखान्याची नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिली असल्याचा गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या इमारतीचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी चेअरमन बाळासाहेब पाटील गुंजाळ, बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे आणि बाबा ओहोळ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. कारखान्याने तालुक्याचे हृदय म्हणून काम केले- यावेळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल आणि नवीन संधीही मिळतील. गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे आणि नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा पगारवाढ मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कोर्टातील जुन्या प्रकरणांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. वृषभ : आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावध राहावं लागेल आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. कौटुंबिक संपत्तीच्या बाबतीत शहाणपणाने काम करा. आर्थिक लाभाची शक्यता आहे आणि नोकरीमध्ये शुभ बातम्या मिळू शकतात. आज तुम्ही सामाजिक कार्यक्रमात भाग घ्याल. मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा तणावपूर्ण असू शकतो. कोणतेही महत्त्वाचे निर्णय…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर/संगमनेर: संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसा घरफोड्या करणाऱ्या एका सराईत आरोपीला आणि त्याच्या महिला साथीदाराला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ४८ तासांत जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला ११,७९,१४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कौठे कमळेश्वर येथील रहिवासी सोमनाथ शिवाजी भडांगे हे एका कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील ९,९२,२८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे,…
