Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली: महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यामुळे राज्यात निवडणुका लवकर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीसंदर्भात दाखल केलेल्या दोन याचिका फेटाळून लावल्या आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होतील आणि यामध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षण लागू करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्य सरकारला प्रभाग रचना करण्याचा अधिकार न्यायालयाने प्रभाग रचना करण्याचा अधिकार हा पूर्णपणे राज्य सरकारचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्य सरकारने निश्चित केलेल्या नवीन प्रभाग रचनेनुसारच होणार आहेत. लातूर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर मध्ये सातत्याने चर्चेत असलेल्या महाराणा प्रताप गणेशोत्सव मंडळाची महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. स्वाती संतोष अंकाराम यांची अध्यक्षपदी तर आरती पवन पासकंटी व गीतांजली शैलेंद्र शेरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या आणि गणेशोत्सवामध्ये सामाजिक देखाव्यातून प्रबोधन करणाऱ्या महाराणा प्रताप मंडळाच्या देखाव्याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागलेले असते. याशिवाय वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. या पार्श्वभूमीवर महिला मंडळाचे नवे कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. कार्यकारिणीमध्ये यांचा आहे समावेश… वैशाली काशिनाथ आडेप व साईसुधा विलास वन्नम (कार्याध्यक्ष), ललिता हिरालाल दुस्सा व लता किसन कोम्पेल्ली (सहकार्याध्यक्ष), वैशाली अंबादास आडेप (खजिनदार), जयश्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: राष्ट्र उभारणीसाठी समर्पित असलेल्या माजी विद्यार्थी व स्काऊट्स सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी नारायण इटप यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली. या सभेमध्ये उपाध्यक्षपदी संभाजी कानवडे आणि दिगंबर बंदावणे, तर सचिवपदी नारायण उगले आणि खजिनदारपदी डॉ. संजय गुंजाळ यांची निवड झाली. कायदेशीर सल्लागार म्हणून भाऊसाहेब हांडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राधेशाम गुंजाळ हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या विश्वस्त मंडळातही फेरबदल करण्यात आले असून, शिवाजी डेंगळे, लक्ष्मण डांगे, याह्याखान पठाण, मुरलीधर बारेकर, विश्वनाथ वर्पे आणि भरत कुटे यांचीही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पारनेर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीच्या अपघाती निधनामुळे नैराश्य आलेल्या एका महिलेने आपल्या एकुलत्या एक मुलीसह शेताजवळील तलावात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना १ ऑगस्ट रोजी पहाटे १:३० च्या सुमारास पारनेर तालुक्यातील कन्हेर ओहळ परिसरात उघडकीस आली. सुरेखा दत्तात्रेय औटी (वय ४२) आणि शिवांजली दत्तात्रेय औटी (वय २१) अशी आत्महत्या केलेल्या माय-लेकींची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी, पारनेर रस्त्यावर झालेल्या एका अपघातात सुरेखा यांचे पती दत्तात्रेय औटी यांचे निधन झाले होते. पतीच्या अकाली निधनामुळे सुरेखा नैराश्यात होत्या. पारनेर शहरात राहणाऱ्या सुरेखा आणि त्यांची मुलगी शिवांजली,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: भोजापूर चारीद्वारे दुष्काळी भागाला पाणी मिळाल्यानंतर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल आणि पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सातत्यपूर्ण काम आणि निसर्गाच्या मदतीमुळे पाणी आले. यात तुमचं योगदान काय? तुम्ही आठ महिन्यात चारी केली का? असा परखड सवाल थोरात यांनी विखे पाटलांना विचारला आहे. थोरात यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले आहे की, निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले. तसेच, कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी पोहोचावे यासाठीही आपला कायम प्रयत्न राहिला आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर / शिर्डी: भोजापूर चारीच्या विस्तारीकरणासाठी ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात या चारीचा समावेश झाल्याने या भागातील पाणीप्रश्न लवकरच कायमस्वरूपी सुटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या चाळीस वर्षांपासून रखडलेल्या भोजापूर चारीला अखेर पाणी मिळाले असून, यानिमित्ताने संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे जलपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जलसंधारण विभागाचे अभियंता हरीभाऊ गीते, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तसेच परिसरातील…
मुख्यमंत्र्यांसह सर्वांशी चांगले संबंध, त्यामुळे कोणतीही विकासकामे थांबणार नाहीत: आमदार सत्यजित तांबे महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: भारताची खरी ओळख एकता आणि विविधतेमध्ये आहे. विविध जाती-धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात, आणि तिरंगा ध्वज, देश, आणि संविधान हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी भगवा, हिरवा किंवा निळा ध्वज घेऊन समाजात जातीभेद निर्माण करत आहेत. अशा शक्तींना रोखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. राजकारण हे नेहमीच तत्त्व आणि विकासावर आधारित असावे, असेही ते म्हणाले. आज (रविवारी) संगमनेर खुर्द येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर देवस्थान, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, लोकशाहीर…
सत्ताधारी केवळ मोदी आणि शहा यांचीच लाळ घोटत होते. तथापि हल्ल्याची जबाबदारी ही सर्वार्थाने मोदी-शहा यांच्यावरच असल्याने या दोघांना मर्यादा पडल्या होत्या. त्यात दिल्लीत संसदेचं अधिवेशन असताना पंतप्रधान देश सोडून जातो, आणि संसदभवनात असताना सभागृहात अनुपस्थित राहतो हे मोदींनीच देशाला दाखवून दिलंय. पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत पार पडत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाने सरकारची कधी नव्हे इतकी बेईज्जत झाली. इभ्रत जावी अशा प्रकारे हल्ल्यावर हल्ले सोसण्याची आफत सरकारवर आली. गेल्या 11 वर्षात मोदी सरकारची संसदेत इतकी फजिती प्रथमच झाली. मोदी.. मोदी…च्या घोषणा देणारे मौनी बनले होते. विरोधकांच्या भाषणात अडथळे आणणार्यांना आता कळून चुकलं होतं. या चर्चेत सत्तेपुढे विरोधकच सरस ठरले. नको…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, पुणे: हडपसर परिसरात मित्राच्या खुनाची खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीदरम्यान, त्यानेच रागाच्या भरात आपल्या मित्राचा खून केल्याची कबुली दिली. आज पहाटे किसन राजमंगल सहा (वय २०, मूळचा बिहार) याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले की, त्याच्या मित्राला, रविकुमार शिवशंकर यादव (वय ३३), तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. हडपसर येथील उंड्री-हांडेवाडी भागात ही घटना घडली असून, रविकुमार रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. या माहितीनंतर तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी रविकुमारला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनेची माहिती देणाऱ्या किसनकडे अधिक चौकशी केली. सुरुवातीला त्याने…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: जे लोक स्वतः काहीही काम करत नाहीत, तेच चांगल्या कामांना विरोध करून जनतेची दिशाभूल करत आहेत, त्यांनी किती झाडे लावली अशी टीका करत सोशल मीडियाचा वापर करून इतरांबद्दल खोट्या गोष्टी पसरवून स्वतःची स्तुती केली जात आहे. देशभर काही पक्षांकडून असाच कार्यक्रम राबवला जात असल्याचे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. मालदाड (संगमनेर) मायंबा डोंगर येथील श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिर परिसरात जयहिंद लोकचळवळ आणि अमृत उद्योग समूहातर्फे आयोजित २० व्या ‘दंडकारण्य अभियाना’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सरपंच गोरख नवले, अजय फटांगरे, रामहरी कातोरे,…
मुंबई, विशेष प्रतिनिधी: मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या अभय योजनेच्या अंमलबजावणीत निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणींबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शुक्रवारी घेतलेल्या या भेटीत त्यांनी योजनेचा लाभ राज्यातील नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना वेळेत मिळत नसल्याचे त्यांनी शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले आणि प्रणालीतील तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर करण्याची मागणी केली. योजनेच्या अंमलबजावणीत नेमके काय अडथळे? राज्य सरकारने 50% शास्ती माफीसाठी अनेक नगरपरिषदांना परवानगी दिली आहे. संगमनेर नगरपरिषदेला 28 जुलै 2025 रोजी परवानगी मिळाल्यानंतरही IWBP सॉफ्टवेअर प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे ही योजना प्रभावीपणे लागू करता येत नाहीये. या अडचणींमुळे नागरिकांमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील निमोण येथील भूमिपुत्र आणि सध्या येवला येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संदीप पुंजा मंडलिक यांना त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी तिसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांच्या हस्ते त्यांना हे प्रतिष्ठित पदक प्रदान करण्यात आले. पोलीस निरीक्षक मंडलिक यांनी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. २०१३ ते २०२४ या काळात ते गडचिरोली येथे कार्यरत असताना, त्यांनी खोब्रामेंढा गावाजवळच्या घनदाट जंगलात झालेल्या एका मोठ्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भंडारदरा धरणाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे मुख्य सचिव, तसेच जलसंपदा आणि वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीचा मुख्य उद्देश शताब्दी महोत्सवाचे नियोजन करणे, धरणाच्या संवर्धनासाठी उपाययोजना सुचवणे, आणि परिसरातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधणे हा आहे. भंडारदरा धरण, ज्याला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय असेही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त नाशिक: नाशिकमधील एसएमबीटी हॉस्पिटलने आयोजित केलेल्या ‘आरोग्यसाधना’ शिबिराचा नुकताच यशस्वी समारोप झाला आहे. गेल्या १० वर्षांपासून ग्रामीण भागातील लोकांसाठी हे शिबिर आयोजित केले जाते. यावर्षीच्या शिबिराने अनेक विक्रम मोडत यशाची नवीन उंची गाठली आहे. शिबिराची लक्षवेधी आकडेवारी गेल्या ३० दिवसांच्या कालावधीत, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्यातील १४ जिल्ह्यांतील ३० हजारांहून अधिक रुग्णांना या शिबिराचा लाभ झाला आहे. दररोज सरासरी १००० रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे फक्त आकडे नाहीत, तर हजारो रुग्णांना मिळालेल्या उपचारांचे आणि आशेचे हे प्रतीक आहे, असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. अत्याधुनिक उपचार आणि सेवा या शिबिरात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना (MJPJAY), प्रधानमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त पुणे: पुणे शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी ‘कोकेन’ म्हणून जप्त केलेला पदार्थ प्रत्यक्षात कोकेन नव्हता. या दाव्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेमकं प्रकरण काय? 27 जुलै रोजी पहाटे खराडी येथील ‘स्टे बर्ड अझुर सूट’ हॉटेलमध्ये पुणे पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 5 पुरुष आणि 2 महिलांना अटक केली. अटकेत असलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, अहिल्यानगर: अहिल्यानगर तालुका पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ८८ लाख २० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये बनावट नोटा, त्यांना तयार करण्यासाठी वापरली जाणारी मशिनरी आणि एक वाहन यांचा समावेश आहे. या प्रकरणी अहिल्यानगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते आपल्या पथकासह हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना आंबिलवाडी शिवारात दोन संशयित व्यक्ती काळ्या रंगाच्या महिंद्रा थार गाडीतून फिरत असून, ते पान टपरीवर ५०० रुपयांच्या बनावट नोटा देऊन सिगारेट…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्याची जोरदार मागणी केली. तसेच, राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करत सर्वांनी एकत्रित येऊन याविरोधात आवाज उठवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त संगमनेर बसस्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात थोरात बोलत होते. यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनाही अभिवादन करण्यात आले. बाळासाहेब थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या संतांना आणि समाजसुधारकांना त्रास देणारी धर्मांध शक्ती आजही समाजात कार्यरत आहे. याच शक्तींनी महात्मा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, शिर्डी: महसूल विभागाने अधिक संवेदनशीलतेने काम करत सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. राहाता येथे ‘महसूल सप्ताह – २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, तहसीलदार अमोल मोरे, राहाता नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी त्यांच्या महसूल मंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही उपक्रमांची आठवण करून दिली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. या योजनेचा लाभ सरकारी सेवानिवृत्त महिलांसह हजारो पुरुषांनी घेतल्याचं उघड झालं आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेत सुमारे ४ हजार ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावरून विरोधक सरकारवर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेवर सविस्तर चर्चा झाली. ज्या पुरुषांनी योजनेचा चुकीचा फायदा घेतला आहे, त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून पैसे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, जळगाव: एका महिला तलाठ्याला 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील जुन्या नोंदी कमी करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही कारवाई केली असून, या प्रकरणी तलाठ्यासह एका रोजगार सेवक आणि एका मध्यस्थालाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या सात भावंडांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर काही जुन्या नोंदी होत्या. त्या कमी करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी अर्ज केला होता. तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहिम हिने अर्ज स्वीकारला, मात्र पोचपावती दिली नाही. नंतर पाठपुरावा केला असता, तिने कामासाठी 25 हजार रुपयांची मागणी…
