Author: Annant Ppangarkar
नाशिक – नाशिकच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वाची ओळख असलेल्या ‘तपोवन’ परिसराला अधिकृतपणे ‘वन’ म्हणून घोषित करण्याबाबत राज्याचे वनमंत्री तथा नवी मुंबईचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तपोवन वाचवा आंदोलनाचे नेतृत्व करणारे रोहन देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी मुंबई येथे वनमंत्र्यांची भेट घेऊन नाशिकमधील पर्यावरणविषयक प्रश्नांवर चर्चा केली. या बैठकीत नाईक यांनी आंदोलकांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत तपोवनाचे संवर्धन करण्याला प्राधान्य दिले. या चर्चेदरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले की, माझ्यासाठी राजधर्मापेक्षा नीतिधर्म नेहमीच श्रेष्ठ असतो आणि त्याचे मी प्रामाणिकपणे पालन करतो. प्रभू श्रीरामांचे हे वन अबाधित राहणे काळाची गरज असून, या संदर्भात त्यांनी यापूर्वीच…
संगमनेर – संगमनेर शहरात चॉपरने हल्ला करून एका तरुणाचा हात निकामी केल्याच्या गंभीर प्रकरणात, संशयित आरोपी वैष्णव संजय आव्हाड याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी हा निर्णय दिला असून, केवळ घटनास्थळी उपस्थित असल्याच्या कारणावरून अटक करणे आवश्यक नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. घटनेचा पार्श्वभूमी आणि पोलिसांचा आरोप संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर १०२५/२०२५ नुसार, निशांत उर्फ बंटी नंदू आरगडे आणि वैष्णव आव्हाड यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपी बंटी आरगडे याने पीडिताच्या हातावर चॉपरने जोरदार वार केला होता, ज्यामध्ये पीडिताने आपल्या डाव्या हाताचा पंजा गमावला.…
संगमनेर: पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची वज्रमुठ बांधली असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही देत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावलेली हजेरी महत्त्वाची ठरली. हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संगमनेर येथे आयोजित अभिवादन सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख कोते बोलत होते. या सोहळ्याला महाविकास आघाडीचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित राहून शिवसेनाप्रमुखांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. नवीन…
संगमनेर, प्रतिनिधी – शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कर्तृत्वावर विश्वास टाकला. त्यांच्याच विचारांची पुण्याई आहे की, एक सामान्य रिक्षाचालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आमदार होते. हाच वारसा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थपणे पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संगमनेर बस स्थानक येथे भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या जयघोषाने बस स्थानक परिसर दणाणून गेला होता. संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने…
श्रीरामपूर – अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिसांनी नवीन भारतीय न्याय संहितेचा (BNS) प्रभावी वापर करत वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शिर्डीच्या पिंपळवाडी रोडवरील हॉटेल साई सहारा येथे सुरू असलेल्या अनैतिक मानवी व्यापार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर आता ‘संघटित गुन्हेगारी’चे कलम १११ लावण्यात आले आहे. वेश्याव्यवसायासारख्या गुन्ह्यासाठी जिल्ह्यात अशा प्रकारचे कडक कलम लावण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यांना हा एक कडक इशारा मानला जात आहे. “पिटा” कायद्यासोबतच भारतीय न्याय संहितेचे कलम १११ लावून पोलिसांनी हे स्पष्ट केले आहे की, आता संघटितपणे अशा अनैतिक व्यवसायात…
मुंबई (वडाळा): मुंबईतील वडाळा पूर्व येथील आनंदवाडी परिसरात वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादाने हिंसक वळण घेतले आहे. एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला तिच्याच नातेवाईक असलेल्या चार महिलांनी घरात घुसून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मध्यस्थी करणाऱ्या वृद्धेच्या मुलीलाही आरोपींनी सोडले नाही. याप्रकरणी वडाळा पोलिस ठाण्यात चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्योत्सना राजेंद्र जाधव (४३) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे आई-वडील आणि चुलत भाऊ किशोर दादू वाघमारे यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संपत्तीचा वाद सुरू आहे. हा वाद प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील शेतजमिनीशी संबंधित वाद न्यायालयात सुरू आहे. तसेच मुंबईतील वडाळा येथील घराशी संबंधितही हा वाद…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या अवैध गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाच्या मदतीने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३३ लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये ६ हजार किलो गोमांस, जिवंत जनावरे आणि दोन पिकअप वाहनांचा समावेश आहे. या धाडसी कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार बाळासाहेब अशोक गुंजाळ यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, संगमनेरमधील जुना जोर्वे रोडवरील जमजम कॉलनीतील गल्ली नंबर ७ मध्ये असलेल्या न्यू सेवा सॉ मिलच्या समोरील एका…
संगमनेर, प्रतिनिधी – शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्या एका तरुणावर संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. इंदिरानगर मैदान परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपीकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवादार बाबासाहेब यशवंत सातपुते यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (२३ जानेवारी) रात्री साधारण ११ वाजेच्या सुमारास संगमनेर येथील इंदिरानगर मैदानात आरोपी पप्पू ऊर्फ आकाश अर्जुन गोडगे हा संशयास्पदरित्या वावरताना आढळला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे अंदाजे ५०० रुपये किमतीची ३ फूट लांबीची ॲल्युमिनियमची बेसबॉल स्टिक…
संगमनेर, प्रतिनिधी – शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख आणि संगमनेरमधील साळी समाजाचे मार्गदर्शक, जेष्ठ शिवसैनिक कैलास उर्फ आप्पासाहेब मुरलीधर केसेकर (वय ६१) यांचे शुक्रवारी, २३ जानेवारी रोजी रात्री १० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. एक निष्ठावान शिवसैनिक आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती, त्यांच्या जाण्याने संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आप्पाशेठ हक्काचा आधार होते. त्यामुळे अनेकांचे हॉटेल ओंकारेश्वर हे न्याय मागण्यासाठी हक्काचे ठिकाण होते. सर्व समाज घटकातील नागरिकांशी त्यांचा मोठा स्नेह होता. धर्मवीर, हिंदू हृदय सम्राट अशा पदव्या त्यांना संगमनेरकरांनी दिल्या होत्या. त्यांच्या निधनाने केवळ साळी समाजाच्याच नव्हे तर संगमनेर करांचे मोठे नुकसान…
दैनिक राशीभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीचा ठरेल, मात्र ही धावपळ फलदायी असेल. नोकरीमध्ये पदोन्नतीचे किंवा नवीन जबाबदारीचे संकेत मिळत आहेत. आर्थिक बाजू भक्कम राहील, पण घरातील सुशोभीकरणावर खर्च होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी असलेले जुने मतभेद आज संपुष्टात येतील. संध्याकाळी कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. वृषभ – व्यावसायिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अतिशय लाभदायक आहे. प्रलंबित देणी परत मिळतील. तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; विशेषतः पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ असून घरातील मोठ्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. मिथुन – आज मनामध्ये थोडी अस्वस्थता जाणवू शकते. महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळून…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अमली पदार्थ व अंमली द्रव्य कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्ह्यातील फरार दोघा आरोपींना पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना दि. २१ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एक गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी साद शेख हा सध्या संगमनेर येथील भारतनगर भागात असल्याची खात्री झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने भारतनगर परिसरात सापळा रचला आणि…
संगमनेर, प्रतिनिधी – तालुक्यातील कोल्हेवाडी परिसरात एका बंद घराचे खिडकीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी दत्तात्रय रघुनाथ कोल्हे (वय ७२, रा. ठाणे पच्छिम, मूळ रा. कोल्हेवाडी, संगमनेर) यांचे कोल्हेवाडी येथे घर आहे. दि. १३ जानेवारी ते दि. १८ जानेवारी दरम्यान ही चोरीची घटना घडली. कोल्हे कुटुंबीय घरी नसताना अज्ञात चोरट्याने घराभोवतीच्या तार कंपाउंडची तार तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने घराच्या बाजूच्या पोर्चमधील खिडकीचे गज कशाच्या तरी साहाय्याने तोडून व वाकवून खिडकीवाटे…
संगमनेर, प्रतिनिधी – जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौण खनिजाचे विनापरवाना उत्खनन करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध आता जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची गय न करता त्यांच्यावर ‘मोक्का’ (MCOCA) किंवा ‘एमपीडीए’ सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला दिले आहेत. संगमनेर तालुका दौऱ्यादरम्यान आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज संगमनेर तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांचा आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी…
संगमनेर, प्रतिनिधी – साकूरमधील नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि ग्रामपंचायतीचे नेटके नियोजन पाहून जिल्हाधिकारी अक्षरशः भारावून गेले होते. यावेळी त्यांनी साकूर ग्रामपंचायतीच्या कामांचे तोंडभरून कौतुक केले आणि साकूरला पुन्हा एकदा भेट देण्यासाठी नक्की येईल, असा शब्दही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांना दिला. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यभर राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील साकूर ग्रामपंचायतीने केलेल्या लोकाभिमुख कामांची अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गुरुवारी (दि. २२ जानेवारी) प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी साकूर शिवारातील खंडोबा डोंगराच्या पायथ्याशी ग्रामपंचायतीने विकसित केलेल्या नक्षत्र घनवन उद्यान व तुलसी वृंदावनाची बारकाईने पाहणी केली. विशेषतः महर्षि पराषर व…
शाळा परिसरातील तंबाखू विक्री बंद करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा; ‘Team-RGSS’चे संगमनेर पोलिसांना निवेदन
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० यार्ड परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेली तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा आणि सिगारेटची विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, या मागणीसाठी राहुल गांधी समर्थक संघाच्या वतीने (Team-RGSS) संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, तंबाखू नियंत्रण कायदा (COTPA) २००३ नुसार शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर सक्त मनाई असतानाही संगमनेरमध्ये अनेक ठिकाणी शाळांच्या अगदी जवळ पानटपऱ्या आणि दुकानांमधून सर्रास गुटखा व सिगारेट विक्री सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य व भविष्य धोक्यात येत असून, हा…
अहिल्यानगर – जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली असून, स्थानिक गुन्हे शाखेने मिरजगाव आणि खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडक कारवाई केली आहे. या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी दोन जेसीबी, चार ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण ८२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अनेक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे व अमोल कोतकर यांच्या पथकाने ही…
मुंबई (वडाळा) – शेतजमीन आणि घराच्या वादातून दोन नातेवाईकांनी एका महिलेला शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याची घटना वडाळा येथे घडली आहे. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी संगमनेर आणि बारागाव नांदूर येथील दोन व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सुमन रामदास वाघमारे आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यामध्ये मूळ गावी असलेली शेतजमीन आणि मुंबईतील घरावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. हा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. गुरुवारी (२२ जानेवारी २०२६) सकाळी १० वाजेच्या सुमारास, तक्रारदार महिला त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या अजय नावाच्या व्यक्तीच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या किशोर दादू वाघमारे (वय ४६) आणि कैलास बाबूराव…
संगमनेर, प्रतिनिधी – बोटा येथील स्व. शेखर शेळके यांनी क्रिकेट खेळाप्रती दाखवलेली निष्ठा आणि त्यांचे योगदान आजही पठार भागात स्मरणात आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर यांनी ‘स्व. शेखर शेळके चषक २०२६’ आयोजित करून त्यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव केला असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले. घारगाव येथे स्व. म्हातारबा लक्ष्मण आहेर प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीने या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ आणि स्व. शेखर शेळके यांच्या मातोश्री नंदा शेळके यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख…
दैनिक राशीभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाची प्रशंसा होईल आणि प्रलंबित कामे मार्गी लागतील. आर्थिक आघाडीवर काही सकारात्मक घडामोडी घडतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ – आज तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे संयमाने काम घेणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना शब्द जपून वापरा. शक्य असल्यास आज कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक आहे. मित्रांच्या सहकार्याने एखादे अवघड काम सहज पूर्ण होईल. व्यापारात…
संगमनेर | अनंत पांगारकर – संगमनेर तालुक्यातील सुमारे १० हजार कामगारांसाठी संजीवनी ठरणारा ‘ESIC’ (राज्य विमा प्रतिष्ठान) सेवा दवाखाना मंजूर झाला असून, या निर्णयावरून आता तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने ४ जून २०२५ रोजी काढलेल्या या आदेशाचे श्रेय घेण्यासाठी महायुतीचे आमदार अमोल खताळ आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यात जबरदस्त चढाओढ पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांनी हा दवाखाना आपल्याच पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केल्याने नक्की कामाचा धनी कोण? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला असून ज्या दिवशी दवाखाना कृतीत येईल तो संगमनेरकरांसाठी सुदिन असेल. आमदार अमोल खताळ यांनी या यशाचे श्रेय महायुती सरकार आणि पालकमंत्री राधाकृष्ण…
