Author: Annant Ppangarkar
संगमनेर, प्रतिनिधी – शहरातील प्रलंबित विकासकामे आणि म्हाळुंगी नदीच्या स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दाद देत नसल्याने अखेर संगमनेर नगरपालिकेत लोकप्रतिनिधींचा संयम सुटला. बुधवारी सकाळी सत्ताधारी गटाचे नगरसेवक शैलेश कलंत्री आणि योगेश जाजू यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या दालनातच जोरदार ठिय्या आंदोलन केले. तर दुसरीकडे, विरोधी शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तातडीने कामाला सुरुवात केल्याने, ‘आंदोलनाशिवाय प्रशासन हलत नाही का?’ असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. शहरातील प्रलंबित कामे आणि म्हाळुंगी नदीच्या किनाऱ्यावर साचलेली प्रचंड अस्वच्छता यामुळे नागरिक त्रस्त आहेत. वारंवार निवेदने देऊनही मुख्याधिकारी दाद देत नसल्याचा आरोप करत नगरसेवक कलंत्री आणि जाजू आक्रमक झाले. “अधिकारी…
संगमनेर, प्रतिनिधी- राज्यभरात सध्या घरगुती गॅसचा संभाव्य तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी होताना दिसत असून, यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता आमदार सत्यजित तांबे यांनी तातडीने पुढाकार घेत राज्य शासनाकडे विशेष उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. या संदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. गॅस वितरणातील विस्कळीतपणा आणि एजन्सीबाहेर उसळणारी गर्दी यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, संतापलेल्या जनतेमुळे सार्वजनिक शांतता भंग…
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली संगमनेर परिसरात ६.६५ कोटींचा गंडा; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
संगमनेर, प्रतिनिधी- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १० ते ११ टक्क्यांपर्यंत भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून संगमनेर तालुक्यातील सुमारे ६० ते ६२ नागरिकांची ६ कोटी ६५ लाख ३९ हजार ८३७ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील फिर्यादी योगेश रामदास जऱ्हाड (रा. आश्वी बु।।, ता. संगमनेर) यांना त्यांचे मित्र राहुल शिंदे आणि ओळखीचे विजय काळे यांनी डिसेंबर २०२४ मध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले होते. ‘अदमास डेप्ट कन्सल्टन्सी प्रा.लि.’ आणि ‘प्रथम वेल्थ मॅनेजमेंट’ या कंपन्यांच्या माध्यमातून चांगला परतावा मिळेल, असे…
संगमनेर: विशेष प्रतिनिधी संगमनेर शहर, तालुका ग्रामीण, घारगाव आणि आश्वी या चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत होणाऱ्या अमली पदार्थ तस्करीच्या तपासात मोठे गौडबंगाल असल्याचे बोलले जात असून, तपासाच्या नावाखाली केवळ धूळफेक सुरू आहे की काय, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीने तरुणाईला विळखा घातला असतानाच, आता या संपूर्ण काळ्या धंद्यात चक्क खाकीचाच वरदहस्त असल्याचे समोर आले आहे. यातून जिल्हा पोलीस दलातील एलसीबीच्या एका कर्मचाऱ्याला तुरुंगात जाऊन निलंबनाला तर दोघांना गुटखा प्रकरणी बदलीला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे, विधानसभेत आमदार अमोल खताळ व काशिनाथ दाते यांनी अहिल्या नगर जिल्ह्याशी संबंधित हा प्रश्न लावून धरल्यानंतर पोलीस…
संगमनेर, प्रतिनिधी – मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील पाणी प्रश्नावर आमदार अमोल खताळ यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. निळवंडे धरण आणि भोजापूर पूरचारी योजनेचा लाभ न मिळालेल्या गावांच्या व्यथा त्यांनी सभागृहात मांडल्या. विशेषतः सायखिंडी, चिकणी आणि परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून सिंचना अभावी शेतीचेही मोठे नुकसान होत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. आमदार खताळ यांनी या भागासाठी उपसा सिंचन योजना मंजूर करण्याची आग्रही मागणी केली आहे. ग्रामीण भागातील ही तीव्र पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या योजनेमुळे केवळ शेतीलाच नव्हे, तर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करणाऱ्या नागरिकांनाही मोठा दिलासा…
आजचे सविस्तर राशिभविष्य: गुरुवार, १२ मार्च २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. घरात मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. प्रिय व्यक्तीशी…
संगमनेर, प्रतिनिधी – मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहरात ‘मराठी भाषा भवन’ स्थापन करण्याची मागणी विधानसभेत केली. मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी संगमनेर येथे स्वतंत्र मराठी भाषा भवन उभारण्यात यावे आणि त्यासाठी राज्य शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून देत सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी सभागृहातून केली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे हे संगमनेर मतदारसंघातील असल्याचा अभिमान असल्याचेही आमदार खताळ यांनी यावेळी नमूद केले. मराठी भाषा आणि साहित्याच्या समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेल्या संगमनेर…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एकूण ३१ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये विविध रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटी रुपये आणि वेल्हाळे ते राजापूर दरम्यान म्हाळुंगी नदीवर उभारल्या जाणाऱ्या पुलासाठी ६ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले रस्त्यांचे प्रश्न सुटणार असून, नागरिकांना मोठा दिलासा…
आश्वी | वार्ताहर संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द–हनुमानवाडी–दाढ खुर्द या सुमारे ३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आश्वी खुर्द ग्रामपंचायतीला यश आले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गुदमरलेला हा रस्ता आता मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून रस्त्यावरील झाडांची छाटणी केली, खड्डे बुजवले आणि बंद असलेले पथदिवे पुन्हा सुरू केल्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला होता. झाडांच्या फांद्यांमध्ये पथदिव्यांच्या तारा अडकल्याने संपूर्ण रस्ता अंधारात असायचा. त्यातच परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत…
शिर्डी: उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष सांस्कृतिक आणि निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून अविस्मरणीय करण्यासाठी एक सर्वंकष कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. विधान भवनात या आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे, स्वप्नील काळे यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष हा एक ऐतिहासिक टप्पा असून, या निमित्ताने राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विशेष समितीची स्थापना केली आहे. या महोत्सवांतर्गत जलाशय परिसराचे सुशोभीकरण करणे,…
आजचे सविस्तर राशिभविष्य: बुधवार, ११ मार्च २०२६ मेष आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल असून धनलाभाचे योग आहेत. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ आज आपल्याला कामाच्या ठिकाणी संयम ठेवावा लागेल. सहकाऱ्यांशी विनाकारण वाद घालणे टाळा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. नवीन वस्तू खरेदी करण्याचे बेत आखले जातील. व्यापारात मध्यम फळ मिळेल. मान-सन्मानात वृद्धी होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मिथुन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आज आपण कठीण कामे सहज पूर्ण…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील चिखली गावच्या शिवारात महार वतन इनाम जमिनीवर कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता अनधिकृतपणे सिमेंट रस्ता आणि भूमिगत गटाराचे बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिन्नर तालुक्यातील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन ठेकेदारांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या आईच्या पश्चात चिखली येथील महार वतन जमीन वारसा हक्काने त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असून, ती त्यांच्या सामायिक ताब्यात आहे. दरम्यानच्या काळात, चिखली ग्रामपंचायतीने अनुसूचित जाती वस्ती विकास योजनेअंतर्गत सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांसाठी रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटार बांधकामाचा निधी मंजूर करून घेतला होता. या…
संगमनेर | अनंत पांगारकर शहराला शिस्त लावण्याच्या नावाखाली संगमनेर नगरपरिषदेने राबवलेली अतिक्रमण हटाव मोहीम आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नवीन नगर रस्त्यावरील ज्या जागांवरून गरिबांच्या हातगाड्या आणि छोटी दुकाने हटवण्यात आली, तिथे आता चक्क आलिशान चारचाकी गाड्यांनी तळ ठोकला आहे. यामुळे ही मोहीम नेमकी शहर सुशोभीकरणासाठी होती की श्रीमंतांच्या बेकायदेशीर पार्किंगला रान मोकळे करून देण्यासाठी, त्यांचे पार्किंगचे चोचले पुरविण्यासाठी असा संतप्त सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांच्या नेतृत्वाखाली मोठा गाजावाजा करत, फौजफाटा घेऊन शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली. वाहतुकीला अडथळा होतो, शहराचे विद्रूपीकरण होते असे कारण देत अनेक हातावर…
श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी – अल्पवधीत अवाढव्य परताव्याचे आमिष दाखवून सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या ‘ग्रो-इन्व्हेस्टर’ कंपनीवर श्रीरामपूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भोकर परिसरात बेकायदेशीरपणे गुंतवणूक स्वीकारून लोकांची लूट केली जात होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी कोणतीही अधिकृत तक्रार येण्याची वाट न पाहता स्वतःहून पुढाकार घेऊन हा घोटाळा उघडकीस आणला आहे. या कारवाईसाठी पोलीस पथकाने २६ डिसेंबर २०२५ रोजी भोकर शिवारातील संदिपराज मोहिणीबाई कपाटे (वय ३६) याच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी संशयिताकडून कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे निष्पन्न केले. झडतीदरम्यान ९ पासबुक, १० चेकबुक, हिशोबाची वही, लॅपटॉप, संगणक, रोख रक्कम…
संगमनेर, प्रतिनिधी – मक्याच्या उधारी पोटी दिलेला धनादेश न वटल्याच्या कारणावरून संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर दाखल करण्यात आलेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. भेंडे यांनी दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात फिर्यादी पक्षाला आपला दावा कायदेशीर रित्या सिद्ध करता आला नाही. वावी (ता. सिन्नर) येथील महावीर ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर मिलिंद रमेश गंगवाल यांनी कोपरगाव तालुक्यातील डांगेवाडी येथील नितीन माधव कांडेकर आणि नारायण माधव कांडेकर यांच्याविरुद्ध संगमनेर न्यायालयात ७ लाख ७० हजार रुपयांच्या धनादेश अनादराबाबत ही तक्रार दाखल केली होती. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी पोल्ट्री व्यवसायासाठी घेतलेल्या मक्याच्या उधारीपोटी नोव्हेंबर २०१९ मध्ये ७ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश…
संगमनेर, प्रतिनिधी- पिंपरी-चिंचवड येथील एका व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण करून पसार होणाऱ्या उत्तर प्रदेशातील पाच अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या संगमनेर पोलिसांनी हिवरगाव पावसा टोलनाका येथे मोठ्या शिताफीने आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी व्यापाऱ्याची सुटका करत आरोपींकडून दोन गावठी बनावटीचे कट्टे, सहा जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ११ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड येथील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून आरोपी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारने (क्रमांक UP-70-HR-9272) आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने येत असल्याची माहिती श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला दिली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयत्याचा धाक दाखवून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने तपास करत या दोघा सराईतांना सांगली जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. साहिल विजय देवरे आणि अनिल काथे (दोघेही राहणार नवघर गल्ली, संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होते. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी दहशत माजवली होती, मात्र पोलीस त्यांच्या मागावर असतानाही ते सातत्याने गुंगारा देत होते. या आरोपींचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. शहर…
आजचे राशीभविष्य: मंगळवार, १० मार्च २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकता आणि ऊर्जेचे कौतुक होईल, ज्यामुळे कामाचा वेग वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम राखणे आवश्यक आहे, अन्यथा विनाकारण मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल असून जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असून विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ: आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमची जिद्द आणि चिकाटी यामुळे कठीण कामेही सहज पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य असून अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यातील ओलावा वाढेल. सामाजिक कार्यात सहभागी…
संगमनेर, प्रतिनिधी – रंगपंचमीच्या उत्सवाच्या दिवशीच कॅनलच्या पाण्यात पडून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे रविवारी (८ मार्च) सायंकाळी ही घटना घडली. वाजिद मोहसीन शेख असे या मृत मुलाचे नाव आहे. कुरण परिसरातील कॅनलजवळ असताना पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली आणि त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. यानंतर कायदेशीर कार्यवाहीसाठी मृतदेह संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. वाजिदच्या अशा अकाली जाण्याने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.…
अहिल्यानगर: जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. गॅस पुरवठ्याबाबत आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्यासह विविध गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी आणि वितरक उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला गॅस पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे कडक निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील गॅस गोदामांची विशेष पथकांमार्फत अचानक तपासणी करण्यात येणार असून, जर कोणी जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. गॅस वितरकांनी ग्राहकांना वेळेत सेवा द्यावी…
