Author: Annant Ppangarkar
संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद सोहळ्यात होत असलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यात शंभुराजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बुद्धीचातुर्य, पराक्रम आणि तेजापुढे कावेबाज अनाजीपंत निष्प्रभ ठरले. तर महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी प्राण्यांची आहुती देणाऱ्या छत्रपती शंभूराजाचा स्फूर्तीदायी इतिहास जिवंत झाला. जाणता राजा मैदानावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महाराष्ट्राला संगमनेर करांचा परिसरातील नागरिकांची दररोज पन्नास हजारावर उपस्थिती लाभत असल्याने जाणता राजा मैदान या महानाट्यामुळे प्रथमत:च हाउसफुल्ल बघायला मिळत आहे. महानाट्याच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह संगमनेर…
अहमदनगर : राज्याच्या गृह विभागाने पोलीस दलात केलेल्या मोठ्या फेरबदलानंतर अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेला नवे डीवायएसपी मिळाले होते. मात्र या बदल्यांच्या आदेशात पुन्हा नव्याने फेरबदल करण्यात आले असून आता नगर जिल्ह्यातून नाशिकला बदलून गेलेले पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना पुन्हा जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेरमधील बहुचर्चित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील चेअरमन भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या अपहार प्रकरणाचा, जिल्ह्यातील बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार प्रकरण यासह अन्य आर्थिक गुन्ह्यांचा तपास नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. गेल्या अनेक दिवसात या तपासात कोणतीही प्रगती झाली नाही. न्यायालयाने दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील आरोपींचे अटकपूर्व…
संगमनेर – तब्बल वर्षाचा कालावधी होत आला तरी देखील तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वृद्धाच्या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. मात्र याच प्रकरणात तपासाच्या अनुषंगाने विविध चर्चा देखील सुरू असून यातील वस्तुस्थिती पोलीस प्रशासनाने समोर आणण्याची मागणी होत आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केळेवाडी, वडदरा (बोटा) या ठिकाणी उत्तम बाळाजी कुऱ्हाडे (वय ६३) यांची त्यांच्या राहत्या घराच्या पडवीत धारदार हत्याराने छातीवर व पाठीवर गंभीर वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना एप्रिल २०२३ मध्ये घडली. सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्याने सदर व्यक्तीच्या मृत्यू झाला असावा, अशी अफवा उठवण्यात आली होती. अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर…
निळवंडेच्या कामात ज्यांनी सातत्याने अडचणी आणल्या तेच आज श्रेय घेण्यासाठी पुढे -आमदार बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सातत्याने केलेल्या पाठपुरावामुळे निळवंडे धरण आणि धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाले. लाभक्षेत्रात पाणी पोहोचले. मात्र या कामात कोणत्याही प्रकारची मदत न करता केवळ सातत्याने अडचणी आणण्याचे काम ज्यांनी केले, तेच आज निळवंडे धरण आणि कालव्याच्या कामाचे श्रेय घेत असल्याची टीका निळवंडे धरण आणि कालव्याचे जनक जननायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. नांदुरी दुमाला येथे उजव्या कालव्याचे जलपूजन आमदार थोरात यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी थोरात यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नाट्य जागर उपक्रमांतर्गत झालेल्या जिल्हा नाट्यछटा स्पर्धेत संगमनेरच्या स्पर्धकांनी बाजी मारली. स्पर्धा गाजविणाऱ्या चारही स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड झाल्याची माहिती देण्यात आली. अहमदनगर केंद्राच्या स्पर्धा संगमनेरमधील दिगंबर गणेश सराफ महाविद्यालयात पार पडल्या. या स्पर्धेत श्रुती प्रमोद मैड हिने प्रथम, नमिता मंगेश सांगळे हिने द्वितीय, राजसी प्रसाद भणगे हिने तृतीय तर प्रज्ञा सनातन तायडे हिने चतुर्थ क्रमांक मिळविला. या स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड झाली. याशिवाय सर्वज्ञा अविनाश कराळे, मनस्वी प्रकाश लगड, पुष्कर पंडित दशरथ, ईशीता ऊगले व दीशिता नेहुलकर यांनी देखील गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पहिल्याच दिवशी तब्बल पन्नास हजारावर नागरिकांची उपस्थिती आणि नागरिकांच्या गर्दीने फुललेल्या जाणता राजा मैदानावर संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहासाचा अविस्मरणीय थरार “शिवपुत्र संभाजी” महानाट्याच्या रूपाने रविवारी संध्याकाळी संगमनेरकरांना अनुभवण्यास मिळाला. निमित्त होते लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे. बुधवारी ७ फेब्रुवारीला थोरात यांचा वाढदिवस. या निमित्ताने ४ ते ७ फेब्रुवारी या चार दिवसां दरम्यान जाणता राजा मैदानावर खासदार अमोल कोल्हे यांचे प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी अपेक्षा अधिक गर्दी झाल्याने अनेकांनी तब्बल चार तासाहून अधिक वेळ उभे राहून महानाट्याचा थरार अनुभवला तर मैदानावर जागाच शिल्लक नसल्याने अनेक नागरिकांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ॲड. श्रेयस देशमुख (LL.M) आर्थिक गुन्ह्यांमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेच्या स्थिरतेला आणि अखंडतेला मोठा धोका निर्माण होतो, त्यासाठी मजबूत कायदेशीर चौकट आणि प्रतिबंधात्मक उपायांची आवश्यकता असते. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), भारतीय दंड संहिता (आयपीसी), सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कायदा, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) आणि महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स कायदा (MPID), बेनामी व्यवहार (Prohibition), परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) यासारख्या अनेक कायदे यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात या सर्व कायद्यांचा मूळ उद्देश आर्थिक गुन्ह्यांना संबोधित करणे आणि प्रतिबंध करणे असा आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) हा मनी लाँडरिंग आणि संबंधित गुन्ह्यांच्या विरोधात…
महाराष्ट्र संवाद न्यूज अनंत पांगारकर @ ७५८८६००९५० दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवीदारांच्या ठेवींचा गैरवापर करत तब्बल ८१ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करणाऱ्या भाऊसाहेब कुटेचा नवा कारनामा समोर आला आहे. पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या औरंगाबादच्या चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांच्या सोबत मोठे आर्थिक व्यवहार असल्याचे समोर येत आहे. चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांचा ‘श्रीकृष्ण आश्रम ट्रस्ट’ या नावाने पैठण औरंगाबाद येथे आश्रम आहे. कुटे याच्या अधिपत्याखाली असलेल्या दूधगंगा पतसंस्थेकडून सुदर्शन महाराज यांच्या या ट्रस्टला धर्मप्रसार करण्यासाठी २४० कोटी रुपये देणगी रूपाने देण्याचे ठरले. या संबंधीचा २४ नोव्हेंबर २०१८ रोजी एक करारनामा देखील झाला.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमधील जाणता राजा मैदानावर आजपासून (ता. ४ फेब्रुवारी) खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे प्रमुख भूमिका असलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सुरू होत आहे. ते बुधवारपर्यंत (ता. ७ फेब्रुवारी) होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त चार दिवस विनामूल्य सादर होणाऱ्या या महानाट्याची उत्सुकता संगमनेरकरांसह लगतच्या तालुक्यातील जनतेला गेल्या अनेक दिवसांपासून लागली होती. थोरात दरवर्षी आपला वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने करत असतात. यावर्षी मात्र थोरात समर्थक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मराठ्यांचा ज्वलंत इतिहास साकारणारे शिवपुत्र संभाजी महानाट्य संगमनेरात होत आहे. यासाठी जाणता राजा मैदानावर…
आनंदोत्सव साजरा करत धांदरफळ, नांदुरी दुमाला, मिर्झापूर, निमजमध्ये जलपूजन महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरणाचा ४० वर्ष स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना महायुती सरकारने उघडे पाडले. गेली अनेक वर्ष चातकाप्रमाणे निळवंडे कालव्यामधून पाण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर महायुती सरकारने पाणी मिळवून दिल्याचे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी केले. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे निळवंडे धरणाच्या डाव्या, उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला. उजव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नांदुरी दुमाला, मिर्झापूर, धांदरफळ खुर्द, निमज येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी केलेल्या विनंतीवरून उजव्या कालव्याच्या जलपूजनासाठी अमोल…
प्रवीण पुरो | मो. 8169135253 देशातील लोकसभा निवडणुका जसजशा पुढे येत आहेत तसतसं देशातील राजकारण कोणतंही वळण घेऊ शकतं. विरोधकांच्या इंडिया आघाडीचे प्रवर्तक नितीश कुमारच आघाडी सोडून भाजपला जाऊन मिळत असतील, तर इतर कोणत्याही गोष्टींची चर्चा ही खूजीच. देशाच्या या विचित्र राजकीय परिस्थितीपासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी विरोधी पक्षांनी प्रामाणिक हालचाली सुरू ठेवल्या असल्या आणि या प्रयत्नाला अनेकांनी वरकरणी पाठिंबा तसंच आघाडीत सामील होण्याचा प्रयत्न केला तरी शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. महाराष्ट्र हे देशाला वळण देणारं राज्य मानलं जातं. सर्वार्थाने देश आपल्या राज्याकडे आदर्श म्हणून पहात असे. पण गेल्या काही वर्षांपासून विशेषत: राज्यात भाजपप्रणित राज्यसत्ता निर्माण झाल्यापासून…
थोरातांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदोत्सवात उजव्या कालव्याचे जलपूजन महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरणाचे डाव्या आणि उजव्या कालव्यातून येणारे पाणी पुढील अनेक पिढ्या समृद्ध करणारे ठरणार आहे. धरण आणि कालव्याच्या कामासाठी आपल्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा करत सरकारकडून निधी मिळविला. अनेक अडचणींवर मात करून हे धरण पूर्णत्वास गेले. आता धरणातून पाणी आपल्यापर्यंत पोहोचले असल्याने या कामाचा मोठा आनंद आणि समाधान असल्याचे प्रतिपादन निळवंडे धरण आणि कालव्याचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. हिवरगाव पावसा येथे उजव्या कालव्याचे जलपूजन आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माधवराव कानवडे, आर. बी. राहणे, उत्तमराव…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – लग्नामध्ये हुंडा दिला नाही म्हणून घर बांधण्यासाठी माहेरच्यांकडून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेरमध्ये समोर आला असून या संदर्भात विवाहितेच्या तक्रारीवरून पती सासू-सासर्यांसह चार जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, हल्ली संगमनेर शहरातील मालदाड रोड येथे असलेल्या सुवर्णा संजय भुसारी (वय ३४ वर्ष) हिचा विवाह वीरगाव येथील संजय यशवंत भुसारी याच्यासोबत झाला होता. मात्र विवाहितेच्या माहेरच्यांनी लग्न व्यवस्थित केले नाही, लग्नात हुंडा दिला नाही तसेच विवाहितेला शेती काम करता येत नाही अशी कारणे पुढे करत तिने माहेरच्यांकडून घर बांधण्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात ‘रामलीला’ नाटक सादर करणे अंगाशी आले आहे. सादर करण्यात आलेल्या या नाटकात श्रीराम आणि सीता यांच्या तोंडी शिव्या आणि आक्षेपार्ह संवाद वापरण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे नाटक बंद पाडले होते. दरम्यान या प्रकरणी पुण्याच्या चतु:शृंगी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या या नाटकात सीतेचे आक्षेपार्ह पात्र दाखविण्यात आल्याने या नाटकावरून मोठा गदारोळ उडाला होता. नाटकातील संवादाच्या काही क्लिप्स देखील समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने त्याचे देखील पडसाद उमटल्याचे दिसून आले. पोलिसांनी सावित्रीबाई फुले पुणे…
महाराष्ट्र संवाद न्यूज सिन्नर (नाशिक) – शुक्रवारी दुपारी सिन्नर औद्योगिक वसाहतीतील आदिमा ऑरगॅनिक या केमिकल कंपनीला शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी अग्निशामक बंबाच्या सहाय्याने शर्तीचे प्रयत्न सुरू होते. सिन्नरच्या मुसळगाव एमआयडीसीत हा प्रकार घडला. दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या या भीषण आगीमुळे आकाशात सर्वदूर अनेक किलोमीटर पर्यंत आगीचे तसेच धुराचे लोळ दिसत होते. कंपनीमध्ये पंधरा ते वीस कामगार काम करत मात्र आग लागल्याचे दिसताच ते बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. आगीमुळे स्फोटाचे आवाजही येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे एमआयडीसी परिसरात एकच घबराट उडाली. आगीचे नेमके कारण उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही. दरम्यान आगीची माहिती…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरणासह डाव्या आणि उजव्या कालव्याची कामे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमधूनच पूर्ण झाली आहेत. निळवंडे धरणाच्या माध्यमातून डाव्या व उजव्या कालव्यातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविणारे थोरातच खरे ‘जलनायक’ असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. तालुक्यातील निमगाव खुर्द येथे उजव्या कालव्यातून आलेल्या पाण्याचे पूजन ढोल ताशाच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत माजी आमदार डॉ. तांबे, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तांबे बोलत होते. तांबे म्हणाले, आमदार थोरात यांनी १९९९ मध्ये प्रथमताच राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबरोबर निळवंडे धरणाच्या कामाला चालना दिली. त्यानंतर त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – कार्यारंभ आदेश निघूनही प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात होत नसल्याने रखडलेल्या म्हाळूंगी नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात यावी, घोडेकर मळ्याकडे जाणारा पूल भरभक्कम करावा या मागणीसाठी शुक्रवारपासून म्हाळूंगी पूल बनाव कृती समितीच्यावतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते गंगामाई घाटाकडे जाणारा म्हाळूंगी नदीवरील पूल तुटून दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. नव्याने या पुलाची उभारणी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा कारणावरून हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. तसेच पुलावरील शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तातडीने शिफ्ट करण्यासंदर्भात देखील पाहणी केली. सुरुवातीला घोडेकर मळ्याकडे जाणाऱ्या पुलाची दुरुस्ती…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दुष्काळी परिस्थिती असतानाही सन २०२४-२४ या हंगामात सहा लाख मेट्रिक टन उस गाळपाचा टप्पा पार केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली. चालू हंगाम हा अत्यंत अडचणीचा व दुष्काळजन्य परिस्थितीचा आहे. कारखान्यावर सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक यांचा मोठा विश्वास आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही चालू हंगामात ६ लाख मेट्रिक टनाचे गाळप करण्याचा टप्पा कारखान्याने पार केला. हे वर्ष थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज सिन्नर -चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये भारताच्या प्रगतीची प्रशंशा करताना फुदान विद्यापीठातील सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीचे संचालक झांग जियाडोंग यांनी भारताचा जगात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असा उल्लेख करत ‘भारत खरंच एक मोठी शक्ती’ असं म्हटलंय. वेगाने विकसित होणाऱ्या या भारतातील म्युच्युअल फंड उद्योगानेही ५० लाख कोटींचा टप्पा नुकताच पार केला असून या उद्योगाची भविष्यकालीन वाटचाल येत्या तीन ते चार वर्षात शंभर लाख कोटींची होईल, असा आशावाद कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांनी व्यक्त केला. निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे व मानद सचिव राजेंद्र अहिरे यांच्या पुढाकाराने नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) सिन्नर आयोजित “नव्या युगाचे आर्थिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते गंगामाई घाटाकडे जाणारा म्हाळूंगी नदीवरील पूल तुटून दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. नव्याने या पुलाची उभारणी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून तिरंगा होत असल्याचा कारणावरून शुक्रवारपासून (ता. २ फेब्रुवारी) स्वामी समर्थ मंदिरापाशी नागरिक साखळी उपोषणास प्रारंभ करणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला या पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तत्कालीन एका कामाच्या चुकीमुळे म्हाळूंगी नदीवरील पूल कोसळला होता. संगमनेर शहरातील अनेक विभागांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने या पुलाची बांधणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी होती. पूल कोसळल्याने अनेकांची मोठी गैरसोय निर्माण झाली. मात्र पालिकेमध्ये प्रशासकीय राज सुरू असल्याने या पुलाच्या…
