Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज औरंगाबाद – अतिक्रमणासंदर्भातील एका जनहित याचिकेमध्ये कारवाईचा अहवाल न दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच दंडाची रक्कम त्यांच्या पगारातून कपात करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले. अहमदनगरच्या शहापूर-केकती, वडारवाडी, बाराबाभळी या ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी या ग्रामपंचायतीकडे बांधकाम व्यावसायिकांच्या परवान याबाबत माहिती मागितली होती. ग्रामपंचायतीने अनेक बांधकाम व्यावसायिकांना कोणतीही बांधकाम परवानगी दिली नसल्याची माहिती दिली होती, त्यामुळे विनापरवाना अनधिकृत व्यावसायिक बांधकामावर कारवाईसाठी त्यांनी वेळोवेळी ग्रामसेवक, जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला होता. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिकारीच्या शोधात पहाटेच्यावेळी रस्त्याच्या कडेला झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने वृद्धावर हल्ला केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी संगमनेर तालुक्यात समोर आला. बिबट्याच्या आल्यात जखमी झालेल्या वृद्धाला उपचारासाठी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द गावाच्या शिवारात असलेल्या शिंगोरे वस्ती जवळ शुक्रवारी पहाटे सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून चाललेल्या पोपट उर्फ रामा कारभारी पर्बत (वय 65 वर्ष) यांच्यावर बिबट्याने अनपेक्षित रित्या हल्ला चढविला. हल्लेखोर बिबट्याने त्यांना जवळच्या झुडपात ओढण्याचा प्रयत्न केला मात्र पर्बत यांचा आरडाओरडा ऐकून जवळच असलेल्या दोघांनी त्यांच्या मदतीसाठी येत बिबट्याला हुसकावून लावले. ऐनवेळी उद्भवलेल्या प्रसंगात हे दोघे वृद्धाच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातासंबंधी धक्कादायक माहिती संसदेत लेखी उत्तरात दिली आहे. हे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकार विविध पावले उचलत असल्याचे ते म्हणाले. भारतात दर तासाला सरासरी अठरा लोकांचा मृत्यू होत आहे. रस्ते अपघातात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर तर मृत्यूच्या आकडेवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले. नितीन गडकरी यांनी संसदेत माहिती देताना सांगितले की, 2021 मध्ये देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमधून मिळालेल्या माहितीनुसार देशात दीड लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 2021 मध्ये देशात रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात लोकांनी आपला जीव गमविला आहे. भारतातील रस्ते अपघाताच्या अहवालानुसार हा…

Read More

चौकशी करून कंपन्यांना समज देण्याचं कृषिमंत्री मुंडेंकडून आश्वासन! महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : खरीप हंगामाला सुरुवात झाली असून खते खरेदी करताना शेतकऱ्यांना खतांसोबत जोडखते खरेदी करावी लागतात. त्यामुळे खाजगी, सरकारी आणि सहकारी कंपन्यांकडूनच विक्रेत्यांना मुख्य खताबरोबर जोडखते सक्तीने दिली जात आहेत. शेतकरी आणि संस्था वाचवण्यासाठी सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केली. राज्यात जोडखतांचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांना मुख्य खताबरोबर जोडखते घ्यावी लागत आहेत. मात्र सरकारी, खाजगी आणि सहकारी कंपन्या सक्तीने दुकानदारांना युरिया बरोबर इतर खरेदी खते खरेदी करायला सांगतात व सदर खते दुकानदारही शेतकरी बांधवांना देतो. त्यामुळे ही खतांची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज औरंगाबाद – 54 वर्षानंतरही निळवंडे धरण प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने सरकारला अवमान नोटीस बजावली आहे. याशिवाय या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या जलसंपदा विभागाचे आर्थिक अधिकारही गोठविले आहेत. वर्षानुवर्षाला काढलेल्या या प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश घुगे व न्यायाधीश खोब्रागडे यांनी हे आदेश दिले. नोटीसला उत्तर देण्यासाठी 28 जुलै ही अंतिम तारीख असून त्यानंतर 3 ऑगस्टला यासंबंधी सुनावणी होणार असल्याची माहिती कालवा कृती समितीचे वकील अँड. अजित काळे यांनी दिली उत्तर नगर जिल्ह्यातील आवर्षणग्रस्त 182 गावांना वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्प व कालवे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार च्या झालेल्या अपघातात श्रीरामपूर मधील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्याचा समावेश आहे. अपघातग्रस्त कारमध्ये एक लाख साठ हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे. श्रीरामपूर रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी श्रीकांत थोरात हे एम.एच. १४ ई.वाय- ७१९८ या क्रमांकाच्या स्विफ्ट कार मधून चालक हर्षल भोसले यांच्यासोबत इगतपुरी येथील भरवीर इंटरचेंज वरून समृद्धी महामार्गावर शिर्डीच्या दिशेने येत होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने या कारला अपघात झाला. किलोमीटर क्रमांक ५६० वर आल्यानंतर या कारने तीन-चार पलट्या खात कार दुभाजकाच्या…

Read More

लाच लुचपतची कारवाई; एसीबीचे उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांची माहिती या संदर्भात सन 2017 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर कार्यालयाकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. या तक्रार अर्जाच्या चौकशीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – अधिकार नसताना महार वतनाच्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारास परवानगी देऊन, बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या फेरफार नोंदी व दस्तावेज करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूलच्या 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 32 खासगी अशा एकूण 38 जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांसह महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या “व्यावसायिक व्यवस्थापन आणि व्यावसायिक कायदे” या अभ्यास मंडळावर निवड झाली. कुलगुरूंकडून गायकवाड यांच्या नावाचे नामनिर्देशन करण्यात आले. प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड हे ३३ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करत असून वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख म्हणुन कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बिझनेस ला बोर्डाचे अध्यक्ष, व्होकेशनल कॉमर्स अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, विद्या परीषद सदस्य, अकौंटन्सी अभ्यास मंडळ सदस्य, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा सदस्य आदी अधिकार मंडळामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडल्या असून इतर विद्यापीठात व स्वायत्त महाविद्यालयाच्या विविध अभ्यासमंडळावर काम पहात आहेत. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील अनेक चर्चासत्रात…

Read More

हप्ते वसुली करणाऱ्या सरकारी टोळ्यांवर काय कारवाई केली?  बोगस बियाणे आणि खतांचा मुद्दा विधानसभेत गाजला काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे सत्ताधाऱ्यांची भंबेरी महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती कमी झालेल्या असतानाही केंद्र सरकारकडून खतांच्या बाबतीमध्ये नफेखोरी सुरू आहे, शेतकऱ्याला मदत करायची सोडून हा कसला प्रकार सुरू आहे आणि कृषिमंत्री केंद्र सरकारची ही नफेखोरी कबूल करायला का तयार नाही? आपण कोणाला घाबरता? असा सवाल करून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना चांगलेच कोंडीत पकडले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. प्रश्नोत्तराच्या तासात बोगस बी बियाणे आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ‘तुला घरी सोडतो’, असे सांगत साडेबारा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपी विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र पसार झाला आहे. पंकज शरद डुबे (रा. पेमगिरी, ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर) असे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात भारतीय दंडविधान कलम 376(3), 363, 366(अ) व बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातील परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने पुढील तपास…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  पुणे – मंगळवारी पहाटेच्या सुमारास कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीत बेट मार्शल पेट्रोलिंग पथकातील दोघा कर्मचाऱ्यांनी तीन संशयित दुचाकी चोरांना पकडले. त्यांना घर झडतीसाठी नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातील दोघांना पकडण्यात पोलीस पथक यशस्वी झाले. तर एक जण पळून गेला. आरोपींच्या घर झडतीमध्ये पोलिसांना एक जिवंत राऊंड चार मोबाईल आणि लॅपटॉप आढळून आला. पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटू लागल्याने त्यांनी याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला दिली आणि तपासा दरम्यान यातून मोठा उलगडा होऊ लागला. पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन या दोघांनी मोटर सायकल चोरीत पकडलेले संशयित चक्क मोस्ट वॉन्टेड आणि एनआयएच्या रडारवर असल्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – अहमदनगर जिल्ह्याचे चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर ओसरला असला तरी ओढून आले प्रवाहित असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात ३५ मिलिमीटर पावसाचे नोंद झाल्याने धरणाचा पाणीसाठा ७७२४ दलघफु म्हणजेच ६९.९७ टक्क्यांवर तर निळवंडे धरणाचा पाणीसाठा २७६७ दलघफु म्हणजेच ३३.२६ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणांच्या लाभक्षेत्रासाठी ही समाधानाची बाब आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. उत्तर नगर जिल्ह्याला ही धरणे वरदान ठरले आहे. नव्यानेच कालव्यांच्या चाचणी झालेल्या निळवंडे धरणाच्या पाण्याचा फायदा दुष्काळी १८२ गावांना होणार असल्याने हे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – अमली पदार्थाच्या व्यापारास आणि प्रसारास आळा घालण्यासाठी आता राज्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच अमली पदार्थ बाळगणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी ते पदार्थ जवळ बाळगण्याची मर्यादा देखील कमी करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1681240110568980480?s=19 फडणवीस म्हणाले अमली पदार्थाच्या व्यापार आणि प्रसाराचा आळा घालण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे. दहशतवाद विरोधी पथकाला समन्वय एजन्सी म्हणून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – तक्रारदाराच्या मित्राला पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. पाच लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती तीन लाखाची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह पोलीस नाईक आणि एका खासगी इसमाला अँटी करप्शन च्या पथकाने रंगेहाथ पकडले. राहुल बाबासाहेब गायकवाड (पोलीस निरीक्षक बाजारपेठ पोलीस ठाणे, भुसावळ, जि. जळगाव) पोलीस नाईक तुषार पाटील आणि खासगी इसम ऋषी दुर्गादास शुक्ला (हनुमान वाडी, भुसावळ, जिल्हा जळगाव) अशी तिघा लाचखोरांची नावे आहेत ही कारवाई नाशिक लाचलुचपच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अभिषेक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून सरकारने कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा निर्णय रद्द करून तातडीने राज्यात शिक्षक भरती करावी अशी आग्रही मागणी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. तातडीने भरती न केल्यास राज्यभरात मोठा उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून दिला आहे. या पत्रात डॉ. तांबे यांनी म्हटले आहे की, राज्यभरात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. मध्यंतरी शासनाने विनाअनुदानित शाळांना टप्पा अनुदान देण्याचा चांगला निर्णय घेतला.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी माजी मंत्री काँग्रेस गटनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज मंत्र्यांचीच शाळा घेतली. विरोधी आमदारांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी द्यावे हे सभागृहाला शोभत नसल्याचा खोचक टोला लावताना थोरात चांगलेच संतापले असल्याचे दिसून आले. विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आज सभागृहात आक्रमक झाले. मंत्री गांभीर्यपूर्वक प्रश्नांचा अभ्यास करत नाही, बिना तयारीचेच सभागृहात येतात, असा संताप थोरात यांनी व्यक्त केला. थोरात म्हणाले, सभागृहाच्या कामकाजाच्या सुरुवातीचा तास हा प्रश्नोत्तराचा राहील हे आपण सर्वानुमते ठरविले. सभागृहातील सदस्य अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर प्रश्नांना वाचा फोडत असतात. मात्र संबंधित विभागाचे मंत्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांचे वस्त्रहरण करणाऱ्या भाजप नेता किरीट सोमय्या यांचे कथित अश्लील व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यात राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी दुपारी संगमनेरमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील बस स्थानक चौकात किरीट सोमय्याच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केले. तसेच सोमय्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लोकशाही वृत्तवाहिनीने किरीट सोमय्यांच्या लंपटपणाचा आपल्या वाहिनीच्या माध्यमातून पर्दाफाश केला आहे. राजकीय नेत्यांवर चिखल फेक करणारच चिखलात लोळत पडल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. सोमय्यांचे चाळे समोर येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. संगमनेरमध्ये मंगळवारी दुपारी बस स्थानक चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुजीब शेख, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या अंकुश चत्तरचे हत्याकांड मंगळवारी विधिमंडळात पोहोचले. आरोपींमध्ये भाजपच्या नगरसेवकासह दहा जणांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगाराचा जात, धर्म आणि पक्ष न पाहता कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळात केली. अहमदनगर शहरात नुकतेच घडलेले अंकुश चत्तर हत्याकांड काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळात स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केले. गुन्हेगारीवर हल्लाबोल करताना आमदार थोरात म्हणाले, अहमदनगर शहरातील गुन्हेगारी चिंता वाढवणारी आहे. राज्य तुमचे आहे, गृहमंत्री तुमचे आहे, खासदार सत्ताधारी पक्षाचे आहे, आमदारही सत्ताधारी पक्षाकडे आलेले आहे आणि गुन्हेगारही सत्ताधारी पक्षाचाच आहे. त्यामुळे हे सर्व चिंता वाढविणारे आहे. जनतेला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सद्यस्थितीच्या देश व राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका व पुढील धोरण जाहीर करण्यासाठी भाकपचे राष्ट्रीय नेते कॉ. डॉ. भालचंद्र कांगो यांच्या व्याख्यानाचे शनिवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता संगमनेर येथे दुर्वे नाना सभागृहात आयोजन केले असल्याची माहिती भाकपचे संगमनेर सेक्रेटरी कॉ. प्रताप सहाणे यांनी दिली आहे. ‘महाराष्ट्रातील बदलती राजकीय परिस्थिती व पक्षाची भुमिका’ या विषयासंबंधी कॉ. कांगो बोलणार असून याप्रसंगी राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य कॉ. तुकाराम भस्मे, राज्य सचिव कॉ. अॅड. सुभाष लांडे, सहसचिव प्रा. राम बाहेती आदी पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. संगमनेर-अकोले तालुक्यातील पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – देशातील पहिल्या दहा अभियांत्रिकी महाविद्यालयात समावेश असलेल्या संगमनेरच्या अग्रमानांकित अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागातील 76 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यूद्वारे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या पगारावर निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली. व्यंकटेश म्हणाले, माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला ए प्लस दर्जा असून सर्व विभागांचे मानांकन झालेले आहेत. महाविद्यालयातील गुणवत्तेचे शैक्षणिक कामकाज पाहून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या सातत्याने कॅम्पस इंटरव्यूसाठी महाविद्यालयात येत असतात. यावर्षी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्यावतीने जे. एन. के. इंडिया, मुंबई कॅम्प, टावर दिल्ली, ध्रुव…

Read More