Author: Annant Ppangarkar

संगमनेर, प्रतिनिधी – मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपली संस्कृती असल्याचे सांगत, तिच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन करत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यिक व कवींना सोबत घेऊन आपण एक ‘संगमनेर पॅटर्न’ तयार करू, असा विश्वास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्याचे माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालयात संगमनेरमधील नामवंत कवी आणि साहित्यिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी काव्यसंमेलन व मराठी भाषा समृद्धीसाठी विशेष चर्चा झाली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सुधीर तांबे पुढे म्हणाले की, कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त आपण हा उत्सव साजरा करतो, मात्र…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाचा वारसा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही संगमनेर शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी ‘शिवजयंती उत्सव युवक समिती’ सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर समितीच्या नवनिर्वाचित नूतन पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, अध्यक्षपदी विनायक गरूडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ‘आपली समिती, आपली ताकद’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून या युवक समितीने आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला आहे. समितीच्या या नूतन कार्यकारिणीत अनुभवी आणि उत्साही तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. उपाध्यक्ष म्हणून हर्षल जेधे आणि विजय चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असून, किरण वर्पे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. समितीच्या कामात गती आणण्यासाठी…

Read More

आजचे राशीभविष्य: शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ ​मेष ​आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन ऊर्जेचा राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. ​वृषभ ​आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. धनलाभाचे योग असून जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरासाठी नवीन वस्तूची खरेदी करण्याचे बेत आखाल. ​मिथुन ​आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होऊ शकते. व्यवसायात सावधानता…

Read More

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करत सरकारकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी विशेषतः शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, शेतकऱ्यांचा हमीभाव, बिबट्यांचा वाढता प्रादुर्भाव आणि शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर आपली भूमिका मांडली. शेती क्षेत्राबद्दल बोलताना आमदार तांबे म्हणाले की, सरकारने ‘एआय फॉर ॲग्री’ सारख्या उपक्रमांतून तंत्रज्ञानावर भर दिला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे औषधे आणि पाण्याचा वापर ३० ते ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो, ज्यामुळे उत्पादन खर्च घटेल. मात्र, तंत्रज्ञानापेक्षाही शेतकऱ्यांसाठी ‘हमीभाव’ हा अधिक महत्त्वाचा विषय आहे. अमेरिकेसोबत झालेल्या ट्रेड डीलचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी गेल्या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि शासकीय विभागांमधील अनागोंदी कारभारावरून आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळात राज्य सरकारला धारेवर धरले. प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी विशेषतः अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि आरोग्य विभागातील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधत प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. संगमनेर तालुक्यातील सामान्य जनता, शेतकरी आणि रुग्णांच्या हितासाठी त्यांनी विधिमंडळात आक्रमक पवित्रा घेतला. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कामकाजावर बोलताना आमदार खताळ यांनी स्पष्ट केले की, हा विभाग थेट गोरगरीब आणि कष्टकऱ्यांशी जोडलेला असतानाही तिथे अनेक अडचणींचा डोंगर उभा आहे. अनेक अन्न योजना स्थगित किंवा मर्यादित केल्यामुळे स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असून, गरजू…

Read More

अहिल्यानगर: सोशल मीडियावर सध्या ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने एक पत्रक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून हे पत्रक पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहे. या पत्रकाद्वारे असा दावा केला जात आहे की, १ मार्च २०२० नंतर ज्या मुलांच्या एका किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा १८ वर्षांखालील मुलांना दरमहा ४ हजार रुपयांची मदत दिली जाईल. या अफवेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुका स्तरावरील शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत असून शासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासनाने यासंदर्भात महिला व बाल विकास विभाग तसेच समाज कल्याण विभागाकडून अधिकृत माहिती घेतली असता, राज्यात अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचे…

Read More

कारवाईमुळे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड झाले असून पोलीस आता या प्रकरणाच्या अधिक मुळाशी जात आहेत. मालेगाव: येथील छावणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बनावट नोटांच्या प्रकरणाचा छडा लावण्यात मालेगाव परिमंडळ पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी थेट छत्रपती संभाजीनगर येथील बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार संतोष उत्तमराव केळसकर याला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी पाचशे रुपयांच्या २०० बनावट नोटांसह नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण २ लाख ३६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाची सुरुवात २३ जानेवारी २०२६ रोजी झाली, जेव्हा सटाणा नाका येथील एचडीएफसी बँकेत एका फायनान्स कंपनीचे…

Read More

आजचे राशिभविष्य ​मेष ​मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात आपल्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ आपल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करतील. व्यापारात नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मात्र जीवनसाथीसोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करावा जेणेकरून विनाकारण वाद होणार नाहीत. ​वृषभ ​वृषभ राशीच्या लोकांसाठी आज धनलाभ होण्याचे संकेत आहेत. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांना नवीन संधी चालून येतील. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस सामान्य आहे, पण बाहेरचे अन्न खाणे टाळावे. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत मजेत जाईल, ज्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. ​मिथुन ​मिथुन राशीच्या व्यक्तींना आज संमिश्र फळे मिळतील. घाईघाईत…

Read More

संगमनेर: अखिल भारतीय किसान सभा आणि ‘सिटू’च्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेला ‘लॉग मार्च’ आता अत्यंत आक्रमक वळणावर पोहोचला असून, अहिल्यानगर लांब आहे, आता लोणी हेच आंदोलनाचे केंद्र असेल, अशी गर्जना डॉ. अजित नवले यांनी केली आहे. गुरुवारी हा मोर्चा संगमनेर येथून निझर्णेश्वरच्या दिशेने रवाना झाला असून, शुक्रवारी (दि. २७) मागण्या मान्य होईपर्यंत थेट पालकमंत्र्यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर (वाडा) मुक्काम ठोकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे एकेकाळी पुणतांब्यातून ऐतिहासिक शेतकरी संप सुरू झाला होता, त्याच धर्तीवर आता आहार कर्मचारी आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप लोणीतूनच सुरू केला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. रेल्वेचे प्रश्न, ग्रामपंचायत कर्मचारी, बांधकाम…

Read More

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत ऐतिहासिक फेरबदल करण्यात आले असून, राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी सुनेत्रा पवार यांची निवड होणे निश्चित मानले जात होते. वरळी डोम येथील सभागृहात पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने आणि हात उंचावून पाठिंबा दर्शवला. या निवडीनंतर प्रफुल पटेल यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना त्यांना एका खऱ्या सेनापतीची उपमा दिली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेरच्या तहसील कार्यालयातील लिपिक कैलास विठ्ठल खाडे (रा. अकोले) याला १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी रंगेहात पकडले. अवघ्या आठवडाभरात महसूल विभागात झालेली ही दुसरी मोठी कारवाई असल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. समजलेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराला त्यांच्या मालमत्तेचा वाटप पत्राचा आदेश करून हवा होता. यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर कागदपत्रे पूर्ण असतानाही, लिपिक कैलास खाडे याने या कामासाठी १३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने वारंवार विनंती करूनही खाडे लाचेच्या मागणीवर ठाम होता. अखेर कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, गुरुवारी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – प्रशासकीय राजवटीच्या कालखंडानंतर नव्याने पदभार स्वीकारताच संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात अनेक दिवसांपासून रखडलेल्या सुमारे १५०० दाखल्यांचे विशेष मोहीम राबवून तातडीने वितरण करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शहरातून आणि बाहेरगावावरून येणाऱ्या अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासकीय कामकाजाला गती मिळाली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीच्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शहरवासीयांना दर्जेदार सुविधा देण्याचे धोरण आखले आहे. प्रशासकीय काळात विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त…

Read More

आजचे राशिभविष्य ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला वाव मिळेल, मात्र घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, पण संवादात स्पष्टता ठेवा. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात. ​वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस उत्तम आहे. व्यवसायात नवीन गुंतवणुकीचे विचार मनात येतील, मात्र अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय पाऊल उचलू नका. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभेल. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ​मिथुन: आजचा दिवस धावपळीचा राहण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल, परंतु सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळावे. मुलांच्या प्रगतीमुळे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – नाशिक-पुणे रेल्वे सर्व मार्गे होण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे मात्र बदल करण्यात आलेला प्रकल्पाच्या माध्यमातून पालकमंत्री संगमनेर आणि अकोले या दोन तालुक्यांमध्ये वादाची ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप करत पालकमंत्र्यांनी या मार्गामध्ये मोडता घालण्याचे काम करू नये असा घणाघात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. बुधवारी (२५ फेब्रुवारी) सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेली रेल्वेची आखणी तांत्रिकदृष्ट्या योग्य होती. पालकमंत्र्यांनी या प्रश्नावर जनतेची दिशाभूल करणे थांबवावे आणि हा प्रकल्प मूळच्या सरळ मार्गानेच…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत व्यक्तिमत्त्वांच्या स्मृती जतन करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांना स्व. राधावल्लभ कासट, स्व. कुंदनसिंग परदेशी आणि स्व. कैलास (आप्पा) केसेकर यांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे.  यासंदर्भातील मागणीचे निवेदन पालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या एकमेव नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आज (बुधवारी) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना दिले आहे. निवेदनानुसार, या तिन्ही नेत्यांनी संगमनेरच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी आणि सार्वजनिक क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी राबविलेले विविध उपक्रम आणि सामाजिक कार्याचा ठसा आजही जनमानसात उमटलेला आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श नवीन पिढीसमोर राहावा आणि त्यांच्या…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीच्या कोट्यातून ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत थोरात यांच्या नावावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, त्यांच्या नावामुळे अहिल्यानगर जिल्ह्याला दिल्लीच्या राजकारणात मोठी संधी मिळण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया २६ मार्चपासून सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत खलबतं सुरू आहेत. या जागेसाठी सुरुवातीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाची चर्चा झाली होती, तर शिवसेनेनेही या जागेवर आपला दावा सांगितला आहे. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसने आपला उमेदवार देण्याचा विचार सुरू…

Read More

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अलाईनमेंटवरून (मार्ग निश्चिती) सुरू असलेला तांत्रिक पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. हा रेल्वे प्रकल्प कोणत्याही अनावश्यक वळणाशिवाय मूळ आराखड्यानुसार सरळ मार्गानेच व्हावा, या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अधिवेशनात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आणि तांत्रिक बाजू तपासण्यासाठी केंद्रातील तज्ज्ञ सल्लागारांची एक विशेष उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे. ही समिती पुढील ३ ते ४ महिन्यांत आपला सविस्तर अभ्यास अहवाल सरकारला सादर करेल. पुणे आणि नाशिक या दोन प्रमुख औद्योगिक शहरांना जोडणारा हा प्रकल्प…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  साखर कारखानदारी हा राज्याच्या आणि केंद्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वाचा स्तंभ आहे. या माध्यमातून सरकारला दरवर्षी हजारो कोटींचा महसूल मिळतो. मात्र, बदलत्या परिस्थितीनुसार या क्षेत्राला दर दहा वर्षांनी नैसर्गिक किंवा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा कठीण काळात सरकारने कारखानदारीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. सरकारने साखर कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे, एमएसपी (आधारभूत किंमत) ४ हजार रुपये करावी, बिगरव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि पेट्रोलला सक्षम पर्याय असलेल्या इथेनॉलला योग्य भाव द्यावा, अशा विविध प्रोत्साहनपर योजना तातडीने राबवाव्यात, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  बालरंगभूमीच्या माध्यमातून संगमनेर येथे आगामी काळात विविध कार्यशाळा आणि उपक्रम आयोजित करण्यात येणार असून, हे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिले जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा बालरंगभूमीच्या अध्यक्षा तथा ख्यातनाम अभिनेत्री ॲड. नीलम शिर्के-सामंत यांनी केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संगमनेर शाखेतर्फे दि. ग. सराफ विद्यालयातील बंडूलाल बाफना सभागृहात आयोजित १७ व्या कला स्पर्धा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. बाल शिक्षण मंडळाच्या सचिव नीलाताई जोशी आणि संगमनेर नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजयकुमार दळवी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना नीलम शिर्के यांनी कलेच्या माध्यमातून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर : पाथर्डी शहरातील माणिकदौंडी चौक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गावठी कट्ट्याचा धाक दाखवून एका युवकाला मारहाण करत त्याची दुचाकी आणि रोकड लुटणाऱ्या दरोडेखोरांना पाथर्डी पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. या धाडसी कारवाईत पोलिसांनी पाचपैकी तिघा आरोपींना अटक केली असून, यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, माणिकदौंडी चौक परिसरातील फ्लेक्स व्यावसायिक अमिर हबिब शेख हे २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बॅनर लावण्यासाठी घराबाहेर पडले असता, त्यांच्या दुचाकीची वायर तोडत असलेल्या पाच संशयितांना त्यांनी हटकले. यावेळी आरोपींनी शेख यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…

Read More