Author: अनंत पांगारकर

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पडत असलेल्या निवडणुकीनंतर राजकीय पक्षांना सत्तेचा किती हव्यास आहे, याचं चित्र दिवसगणिक पहायला मिळत आहे. विशेषत: सत्ताधार्‍यांना पडलेला हव्यास इतका विकृत आहे, की कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्या पक्षाकडेच एकवटली पाहिजे, असा पण या पक्षांचा दिसतो आहे. यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी त्या पक्षांची आहे. यात कोणाही राजकीय पक्षाची मागे राहायची तयारी नाही. जो तो सत्तेसाठी हपापलेला आहे. हे हपापलेपण पाहून मतदारही आपण यांना निवडून देऊन गैर तर केलं नाही ना, असा प्रश्‍न स्वत:लाच विचारू लागला आहे. विशेषत: महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर सत्तेच्या हव्यासाची विकृती अधिकच डोकं वर काढू लागली आहे. महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या थराला पोहोचलंय…

Read More

आजचे राशीभविष्य:  मेष –  आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल, मात्र सहकाऱ्यांशी संवाद साधताना नम्रता ठेवा. आर्थिक बाबतीत थोडे नियोजन आवश्यक आहे, विनाकारण खर्च टाळल्यास भविष्यात फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. वृषभ –  आज तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ एकांतात घालवणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात नवीन गुंतवणुकीचे विचार करत असाल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर ताबा ठेवा. दुपारनंतर काही चांगली बातमी मिळण्याची…

Read More

नाशिक – नाशिकच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वाची ओळख असलेल्या ‘तपोवन’ परिसराला अधिकृतपणे ‘वन’ म्हणून घोषित करण्याबाबत राज्याचे वनमंत्री तथा नवी मुंबईचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तपोवन वाचवा आंदोलनाचे नेतृत्व करणारे रोहन देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी मुंबई येथे वनमंत्र्यांची भेट घेऊन नाशिकमधील पर्यावरणविषयक प्रश्नांवर चर्चा केली. या बैठकीत नाईक यांनी आंदोलकांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत तपोवनाचे संवर्धन करण्याला प्राधान्य दिले. या चर्चेदरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले की, माझ्यासाठी राजधर्मापेक्षा नीतिधर्म नेहमीच श्रेष्ठ असतो आणि त्याचे मी प्रामाणिकपणे पालन करतो. प्रभू श्रीरामांचे हे वन अबाधित राहणे काळाची गरज असून, या संदर्भात त्यांनी यापूर्वीच…

Read More

संगमनेर – संगमनेर शहरात चॉपरने हल्ला करून एका तरुणाचा हात निकामी केल्याच्या गंभीर प्रकरणात, संशयित आरोपी वैष्णव संजय आव्हाड याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी हा निर्णय दिला असून, केवळ घटनास्थळी उपस्थित असल्याच्या कारणावरून अटक करणे आवश्यक नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. घटनेचा पार्श्वभूमी आणि पोलिसांचा आरोप संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर १०२५/२०२५ नुसार, निशांत उर्फ बंटी नंदू आरगडे आणि वैष्णव आव्हाड यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपी बंटी आरगडे याने पीडिताच्या हातावर चॉपरने जोरदार वार केला होता, ज्यामध्ये पीडिताने आपल्या डाव्या हाताचा पंजा गमावला.…

Read More

संगमनेर: पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची वज्रमुठ बांधली असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही देत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावलेली हजेरी महत्त्वाची ठरली. हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संगमनेर येथे आयोजित अभिवादन सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख कोते बोलत होते. या सोहळ्याला महाविकास आघाडीचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित राहून शिवसेनाप्रमुखांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.  नवीन…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कर्तृत्वावर विश्वास टाकला. त्यांच्याच विचारांची पुण्याई आहे की, एक सामान्य रिक्षाचालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आमदार होते. हाच वारसा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थपणे पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संगमनेर बस स्थानक येथे भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या जयघोषाने बस स्थानक परिसर दणाणून गेला होता. संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने…

Read More

श्रीरामपूर –  अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिसांनी नवीन भारतीय न्याय संहितेचा (BNS) प्रभावी वापर करत वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शिर्डीच्या पिंपळवाडी रोडवरील हॉटेल साई सहारा येथे सुरू असलेल्या अनैतिक मानवी व्यापार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर आता ‘संघटित गुन्हेगारी’चे कलम १११ लावण्यात आले आहे. वेश्याव्यवसायासारख्या गुन्ह्यासाठी जिल्ह्यात अशा प्रकारचे कडक कलम लावण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यांना हा एक कडक इशारा मानला जात आहे. “पिटा” कायद्यासोबतच भारतीय न्याय संहितेचे कलम १११ लावून पोलिसांनी हे स्पष्ट केले आहे की, आता संघटितपणे अशा अनैतिक व्यवसायात…

Read More

मुंबई (वडाळा): मुंबईतील वडाळा पूर्व येथील आनंदवाडी परिसरात वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादाने हिंसक वळण घेतले आहे. एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला तिच्याच नातेवाईक असलेल्या चार महिलांनी घरात घुसून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मध्यस्थी करणाऱ्या वृद्धेच्या मुलीलाही आरोपींनी सोडले नाही. याप्रकरणी वडाळा पोलिस ठाण्यात चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्योत्सना राजेंद्र जाधव (४३) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे आई-वडील आणि चुलत भाऊ किशोर दादू वाघमारे यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संपत्तीचा वाद सुरू आहे. हा वाद प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील शेतजमिनीशी संबंधित वाद न्यायालयात सुरू आहे. तसेच मुंबईतील वडाळा येथील घराशी संबंधितही हा वाद…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या अवैध गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाच्या मदतीने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३३ लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये ६ हजार किलो गोमांस, जिवंत जनावरे आणि दोन पिकअप वाहनांचा समावेश आहे. या धाडसी कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार बाळासाहेब अशोक गुंजाळ यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, संगमनेरमधील जुना जोर्वे रोडवरील जमजम कॉलनीतील गल्ली नंबर ७ मध्ये असलेल्या न्यू सेवा सॉ मिलच्या समोरील एका…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्या एका तरुणावर संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. इंदिरानगर मैदान परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपीकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवादार बाबासाहेब यशवंत सातपुते यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (२३ जानेवारी) रात्री साधारण ११ वाजेच्या सुमारास संगमनेर येथील इंदिरानगर मैदानात आरोपी पप्पू ऊर्फ आकाश अर्जुन गोडगे हा संशयास्पदरित्या वावरताना आढळला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे अंदाजे ५०० रुपये किमतीची ३ फूट लांबीची ॲल्युमिनियमची बेसबॉल स्टिक…

Read More