Author: Annant Ppangarkar
संगमनेर, दि. १८ मे – आजचा दिवस संगमनेरकरांसाठी अभिमानाचा, गर्वाचा आणि निष्ठेचा ठरला. ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी सैनिकी कारवाईस मानवंदना देण्यासाठी आज संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. संगमनेर नगरपालिकेपासून सुरू झालेली ही तिरंगा यात्रा शहरातील विविध मार्गावरून नवीन नगर रोडपर्यंत गेली. यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारती समोर या यात्रेचा समारोप झाला. या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या नागरिकाच्या चेहऱ्यावर आपल्या देशाबद्दलचा विश्वास आणि अभिमान दिसत होता. यात्रेच्या मार्गावर नागरिकांनी भारत मातेच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. महिला, तरुण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ…
नवी दिल्ली – संसदरत्न पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील खासदारांनी उत्कृष्ट कामगिरी करत बाजी मारली आहे. राज्यातील तब्बल सात खासदारांना प्रतिष्ठित ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांच्यासह सात जणांचा समावेश आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या शैक्षणिक कार्यापासून प्रेरणा घेत, उत्कृष्ट संसद सदस्यांचा सन्मान करण्यासाठी 2010 मध्ये ‘संसदरत्न’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारासाठी खासदारांच्या वर्षभराच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी एक विशेष समिती गठित केली जाते. संसदेच्या तीनही अधिवेशनांमधील खासदारांचा सहभाग, विचारलेले प्रश्न आणि एकूण सक्रियता यांसारख्या विविध निकषांवर आधारित ही निवड प्रक्रिया…
रविवार, दि. १८ मे – संगमनेर प्रत्येकाच्या आयुष्यात एक अनमोल कथा दडलेली असते आणि जीवनात मागे वळून सिंहावलोकन करणे महत्त्वाचे आहे. प्रकाशवाट हे पुस्तक कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. या पुस्तकाचे लेखक संतोष खेडलेकर संगमनेरच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी यांच्या जीवनप्रवासावर आधारित डॉ. संतोष खेडलेकर लिखित ‘प्रकाशवाट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. मालपाणी लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमात आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, संजीवनी जोशी, श्रीमती प्रभावती जोशी, डॉ. जयश्री थोरात आणि माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर घुलेवाडीतील विकासकामांच्या श्रेयवादावरून राजकारण चांगलेच तापले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केलेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या कामांचा शुभारंभ नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी केल्याने गावात तीव्र नाराजी पसरली आहे. एक रुपयाचाही नवीन निधी न आणता थोरातांच्या कामांवर हक्क सांगणे योग्य नाही, असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी केला आहे. यामुळे घुलेवाडीत राजकीय वादंग पेटले आहे. काय आहे नेमके प्रकरण – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घुलेवाडीसाठी 2024-25 या आर्थिक वर्षात विविध विकासकामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाने 1 ऑक्टोबर 2024 रोजी या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठा निधी आणण्यात यश आले आहे. या निधीतून सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये घुलेवाडी येथील सव्वादोन कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे उच्च दर्जाची झाली पाहिजेत, याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले. कामाचा दर्जा चांगला राखल्यास ठेकेदार या तालुक्यात मोठ्या प्रमाणात काम करू शकतील, अन्यथा त्यांनी इतरत्र कामे शोधावी लागतील, असा सज्जड दमही त्यांनी दिला. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकासांतर्गत मंजूर झालेल्या सव्वादोन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते…
आपल्या लोकशाही संविधानातील राष्ट्रपतींची देश प्रमुखपदाची गरीमा पूरती तळाला गेली आहे. मोदी सरकारच्या काळात या पदाची अवस्था रबर स्टॅम्पसारखी झाली आहे. अगदी इंदिरा गांधींच्या सरकारपासून चालत आलेली ही परंपरा नरेंद्र मोदींच्या सत्तेने त्याहून खाली आणली आणि देशाच्या प्रमुखाला कणाहीन बनवलं. इतकं की एका मंदिरातला पुजारीही राष्ट्रपतींना ते आदिवासी आणि मागास असल्याच्या कारणास्तव मंदिर प्रवेश नाकारतात. अशा परिस्थितीत सरकारच्या निर्णयांना रोखण्याची हिंमत कोण दाखवेल? राजेंद्र प्रसादांपासून ग्यानी झैलसिंग, के. आर. नारायणन, एपीजे अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी अशा काही मोजक्याच राष्ट्रपतींनी केंद्र सरकारला आरसा दाखवला. के. आर. नारायणन यांनी तर गुतरातच्या दंगलीवेळी अटलबिहारींच्या सरकारला खडेबोल सुनावले होते. यानंतर अटलबिहारींनी मोदींना राजधर्म पाळण्याचा…
संगमनेर – प्रतिनिधी संपूर्ण देश सध्या लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी मोहिमेमुळे एकत्रितपणे राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावलेला आहे. याच पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात नागरिकांच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी विजयी तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली उद्या, (रविवार दि. १८ मे) सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीद्वारे नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा व लष्कराच्या योगदानाबाबत जनजागृती घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या भव्य तिरंगा रॅलीमध्ये शहरातील युवक, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. रॅलीचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल – शास्त्री चौक, मेनरोड, विठ्ठल मंदिर, बस स्टँड (अकोले रोड), पेटीट कॉलेज, श्रमिक कार्यालय, चैतन्य नगर, गणेश नगर, नाशिक-पुणे…
छत्रपती संभाजीनगर: जमिनीच्या नोंदीतील दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या अपर तहसीलदारासह दोन खासगी व्यक्तींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बेड्या ठोकल्या आहेत. अपर तहसीलदार नितीन गर्जे (वय ४५) आणि त्यांचे कथित मध्यस्थ नितीन धुमा चव्हाण (वय ३८) व सोहेल जुबेर बहाशवान (वय २९) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका ५० वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीचे सापळा अधिकारी वाल्मिक कोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलाच्या आणि नातेवाईकांच्या मालकीच्या मिटमिटा येथील भूखंडाच्या क्षेत्र दुरुस्तीसंबंधी पाच प्रकरणे डिसेंबर २०२४ पासून अपर तहसीलदार कार्यालयात प्रलंबित होती. तक्रारदार एप्रिल २०२५ मध्ये सुनावणीसाठी हजर झाले असता, निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी अपर तहसीलदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे वाघोली येथील दहा एकर जमिनीच्या मालकी हक्कासाठी झालेल्या घोटाळ्यात चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीतील सुमारे दहा एकर जमीन हडपण्याच्या उद्देशाने आरोपींनी संगनमत केले. त्यांनी एका बनावट महिलेला मूळ मालक म्हणून उभे केले आणि या महिलेच्या माध्यमातून जमिनीच्या व्यवहारातून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला, असा आरोप आहे. या प्रकरणी आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, राजेंद्र लांडगे आणि अपर्णा यशपाल वर्मा यांच्या विरोधात चंदननगर…
अहिल्यानगर, दि. १६ – शेती अधिक शास्त्रशुद्ध, फायदेशीर व पर्यावरणपूरक बनावी यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. शेतीसाठी उपयुक्त माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठकीत पालकमंत्री विखे बोलत होते. बैठकीस आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून संगमनेर तालुक्यातील एका व्यापाऱ्याला जामखेडमध्ये बोलावून लुटणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या दरोड्यात व्यापाऱ्याकडून दहा लाख रुपये आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. पोलिसांनी तत्पर कारवाई करत या टोळीतील तीन सदस्यांना बेड्या ठोकल्या असून, उर्वरित सात आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दिलीप मैड (वय ३५, रा. आश्वी, ता. संगमनेर) यांना अश्विनी नावाच्या महिलेने १५० ग्रॅम सोने १० लाख रुपयांना देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार मैड हे जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे गेले असता, अश्विनी आणि तिच्या ८ ते १० साथीदारांनी त्यांना मारहाण…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेर शहर गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीच्या बेड्यांमध्ये जखडले आहे. विकासकामांची चाके जाम झाली आहेत आणि नागरी समस्यांचा डोंगर वाढतच चालला आहे. या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या संगमनेरकरांनी आता आरपारची लढाई पुकारली आहे. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नागरिकांच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक मारली. शहरातील प्रलंबित प्रश्नांची जंत्री त्यांच्यासमोर मांडत, येत्या १५ दिवसांत या समस्यांवर ठोस तोडगा काढण्याचा अल्टिमेटम दिला. अन्यथा, नगरपरिषदेला हादरवून सोडणारे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. शहरातील नागरिक अनेक दिवसांपासून मूलभूत नागरी सुविधांसाठी तरसत आहेत. पावसाळा तोंडावर असताना गटारे तुंबलेली आहेत, रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत,…
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कौठे मलकापूर आणि कर्जुले पठार भागातील दगडखाणींवर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत काम करत असलेल्या ३८ वेठबिगार आणि ३१ बालकामगारांची प्रशासनाने आज (गुरुवारी) यशस्वीरित्या सुटका केली. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सकाळी मिळालेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने आणि प्रभावीपणे ही कारवाई केली. मुक्त करण्यात आलेल्या ३८ वेठबिगार कामगारांमध्ये २२ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. या गंभीर प्रकरणी संबंधित ठेकेदारावर घारगाव पोलीस ठाण्यात वेठबिगार प्रतिबंधक कायद्यासह कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार, संगमनेरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, राज्याच्या सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एका प्रशासकीय समितीची नियुक्ती केली आहे. यासंबंधी गुरुवारी (१५ फेब्रुवारी २०२४) विशेष आदेश जारी करण्यात आला. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे विद्यमान पालकमंत्री आणि स्थानिक आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशासकीय समितीमध्ये प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असून जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख असलेले जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी यांचाही समितीत समावेश आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ, कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत १३ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपये किमतीचा तब्बल ४०८ किलो वजनाचा अल्प्राझोलम या अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका टेम्पो चालकाला अटक केली असून पुणे जिल्ह्यातील एका रसायन अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मिनीनाथ विष्णू राशिनकर (वय ३८, रा. धनगरवाडी, राहाता, अहिल्यानगर) या टेम्पो चालकाला अटक केली आहे. तर, विश्वनाथ कारभारी शिपणकर (रा. दौंड, पुणे) याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात…
शिर्डी: मुंबईतील सोने व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी यांना शिर्डीत मोठा गंडा घालण्यात आला आहे. त्यांच्या हॉटेलच्या खोलीतून तब्बल ३ कोटी २६ लाख रुपये किंमतीचे सुमारे साडेतीन किलो सोन्याचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. या प्रकरणी खिशी यांनी त्यांचा चालक सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित याच्यावर संशय व्यक्त केला असून शिर्डी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजयसिंह खिशी हे मुंबईतील त्यांच्या फर्ममधून सोन्याचे दागिने घेऊन ७ मे रोजी शिर्डीत आले होते. त्यांच्यासोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेश कुमार होते. त्यांनी हॉटेल साई सुनीतामध्ये खोली क्रमांक २०१ मध्ये मुक्काम केला होता. खिशी हे परिसरातील सराफा दुकानांमध्ये सोने…
भाग – २ संगमनेर | अनंत पांगारकर अधिकृत गर्भपात केंद्र नसताना देखील रुग्णालयातील डॉक्टरने गर्भपातासंदर्भातील कायदा आणि नियम बाजूला ठेवत महिलेचा गर्भपात करण्याचे धाडस कसे दाखविले. महिलेची प्रकृती हाताबाहेर गेल्यानंतर तिला थेट दुसऱ्या तालुक्यातील रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर तेथे या महिलेच्या मृत्यू झाला. याची माहिती शहरात कानोकानी बहुतांश ठिकाणी पसरली. त्यामुळे आता या दुर्दैवी घटनेनंतर संगमनेर शहरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी ‘ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या माध्यमातून घडलेल्या प्रकरणावर आवाज उठवला आहे. त्यांनी सलग चार ते पाच दिवस या घटनेची सखोल माहिती मिळवली आणि २ मे २०२५ रोजी अहमदनगर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे एक विस्तृत तक्रार अर्ज दाखल केला. या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – राहाता: शेतात खत टाकण्याचे काम आटोपून जवळच्या ओढ्यावर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांनाही प्राण गमवावे लागले. ही हृदयद्रावक घटना राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे घडली. मृत पावलेल्या मुलांची नावे साहिल दत्तात्रय चौधरी (वय १८) आणि किरण नारायण चौधरी (वय १५) असून दोघेही गोगलगावचे रहिवासी होते. किरणने नुकतीच ९ वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती, तर साहिल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, किसन तुकाराम तनपुरे (वय ६०) हे बुधवारी सायंकाळी त्यांच्या शेतात पिकांना पाणी देत होते. त्याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारे साहिल आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विट व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तयार करण्यासाठी ठेवलेल्या कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने विट उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी विट उत्पादकांनी शासनाकडे अनेक वर्षांपासून मागणी केली आहे, परंतु शासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. शेतमालाला अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास जशी विमा योजना लागू आहे, त्याच धर्तीवर विट व्यवसायासाठी देखील विमा योजना लागू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विट उत्पादकांनी विमा कंपन्यांकडे विमा पॉलिसीनुसार कच्च्या विटांचा विमा उतरवण्याची विचारणा केली असता, विमा कंपन्यांनी मात्र विट व्यवसायासाठी त्यांच्याकडे कोणतेही विशिष्ट धोरण…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात राजशिष्टाचार आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. या प्रकरणी दोन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सहाय्यक महसूल अधिकारी एस. पी. हांगे आणि ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे या दोन तलाठ्यांनी मुख्यालयात थांबण्याचे आदेश असूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला, ज्यामुळे राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाले. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केल्याचा आरोप…
