Author: Annant Ppangarkar

संगमनेर, प्रतिनिधी –  शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयातील घंटागाडीची दुरावस्था आणि महापुरुषांच्या प्रतिमा गोदामात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर, याविरोधात कायदेशीर लढा देणारे तक्रारदार संजय तबाजी मंतोडे यांना अखेर मोठे यश मिळाले आहे. सुरुवातीला तक्रारदारालाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाने अखेर लेखी माफीनामा सादर करत आपली चूक मान्य केली आहे. या निर्णयामुळे सत्य समोर आले असून परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान होत असल्याची आणि शासकीय मालमत्तेची हेळसांड होत असल्याची तक्रार संजय मंतोडे यांनी प्रशासनाकडे केली होती. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वस्तुस्थिती मांडणारी बातमी प्रसिद्ध केली होती. मात्र, ही बातमी समोर…

Read More

दैनिक राशीभविष्य:  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकता आणि धाडसाचे कौतुक होईल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची साथ उत्तम असल्याने तुम्ही अधिक कार्यक्षमतेने काम कराल. वृषभ – आज तुम्हाला आर्थिक नियोजनावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने दिवस चांगला असला तरी घाईने निर्णय घेणे टाळावे. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या मदतीमुळे एखादा कठीण प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. प्रवासाचे योग येतील, मात्र प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे गरजेचे आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन – तुमच्या संवादकौशल्यामुळे आज अनेक…

Read More

संगमनेर/जळगाव – महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सध्या प्रचंड गोंधळाची स्थिती असून भाजपच्या खेळीमुळे राज्याच्या सुसंस्कृत राजकारणाचे मोठे नुकसान होत आहे. गटातटाचे राजकारण राज्यासाठी दुर्दैवी असून सरकारने आता तरी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि त्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांची कर्जमाफी आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या दौऱ्यादरम्यान जळगाव जामोद येथे माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘सातपुडा कृषी प्रदर्शना’चे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी बोलताना त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर…

Read More

सिन्नर – नाशिक-पुणे जलदगती रेल्वेचा मूळ आराखडा बदलून तो शिर्डीमार्गे वळवण्याच्या निर्णयामुळे सिन्नर तालुक्यातील शेतकरी आणि रेल्वे कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्गावर एकाच वेळी ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक-पुणे रेल्वेचा मूळ मार्ग नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर–नारायणगाव–चाकण असा निश्चित करण्यात आला होता. मात्र, नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’ (GMRT) या आंतरराष्ट्रीय खगोल निरीक्षण प्रकल्पाच्या कामात रेल्वेमुळे अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन, प्रशासनाने नवीन पर्यायी मार्ग पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक असा प्रस्तावित केला आहे. या बदलाची माहिती समोर आल्यापासून मूळ मार्गावरील भागात तीव्र अस्वस्थता असून, हा बदल…

Read More

संगमनेर | अनंत पांगारकर –  संगमनेर नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी काल (सोमवारी) पार पडल्या असून, यामध्ये एका महिला नगरसेविकेची कामगिरी सध्या संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सत्तेत असलेल्या नगरसेवकांना देखील ज्या समित्यांवर स्थान मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, तिथे विरोधी पक्षाच्या एकमेव महिला नगरसेविकेने सर्वच समित्यांवर आपले स्थान निश्चित करून एक नवा राजकीय विक्रम प्रस्थापित केला आहे. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे तसेच उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विशेष सभेत या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. संगमनेर पालिकेत आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील सेवा समितीचे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सध्या सुरू असलेल्या काँक्रिटिकरणाच्या कामाबाबत ‘RGSS’ टीमने आक्रमक पवित्रा घेतला असून, थेट मैदानावर उतरून कामाची गुणवत्ता तपासली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिंदे यांनी तात्काळ आपल्या तज्ज्ञ टीमला पाचारण केले आणि प्रत्यक्ष घटनास्थळी तपासणीचे आदेश दिले. मालपाणी ट्रक टर्मिनसपाशी असलेल्या उड्डाणपुलावर करण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रिट अस्तरीकरणाच्या जाडीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, RGSS टीमने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाची सखोल चौकशी करत पाहणी केली. नाशिक पुणे महामार्गावर मालपाणी इंडस्ट्रीज लगत असलेल्या उड्डाणपुलावर सुरू असलेल्या काँक्रिटिकरणाची जाडी काही ठिकाणी ठरवून दिलेल्या निकषांपेक्षा कमी असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. यासंदर्भात RGSS कडे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  राजकारणापलीकडे जाऊन जेव्हा समाजकारण केले जाते, तेव्हा सामान्यांचे प्रश्न कसे मार्गी लागतात, याचा प्रत्यय संगमनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये आला आहे. नगरसेवक योगेश (चिकू) जाजू यांच्या तत्परतेमुळे परदेशपुरा आणि जुम्मा मशीद परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ड्रेनेजचा प्रश्न निकाली निघाला असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. संगमनेरमधील परदेशपुरा आणि जुम्मा मशीद हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेजची मोठी समस्या निर्माण झाली होती. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत होती, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत होता. अनेकदा मागणी करूनही तांत्रिक कारणांमुळे हे काम रखडलेले होते. ३-४ दिवसांपूर्वी नगरसेवक…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  विषय समित्या हा खऱ्या अर्थाने नगरपालिकेचा आत्मा असून, गेल्या काही काळातील त्यांची मरगळ झटकून या समित्यांना अधिक शक्तिशाली आणि लोकाभिमुख करण्यावर आपला भर असेल, अशी ग्वाही आमदार सत्यजीत तांबे यांनी देत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संगमनेर शहराच्या आगामी विकासाची आणि प्रशासकीय शिस्तीची एक व्यापक दिशा स्पष्ट केली. संगमनेर नगरपालिकेच्या विशेष विषय समित्यांच्या सदस्य, सभापती निवडीचा कार्यक्रम सोमवारी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडला. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे उपस्थित होत्या. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या स्वागत समारंभावेळी आमदार तांबे बोलत होते. तांबे यांनी विषय समित्यांच्या घसरलेल्या प्रभावावर भाष्य केले. बजेट आणि अधिकारांच्या मर्यादांमुळे या समित्यांकडे दुर्लक्ष झाले होते,…

Read More

दैनिक राशीभविष्य:  मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जावान आणि उत्साहाचा असेल. तुमच्या प्रलंबित कामांना गती मिळेल आणि नियोजित उद्दिष्टे वेळेत पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक होईल, मात्र घाईघाईत निर्णय घेणे टाळावे. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. आरोग्याच्या दृष्टीने आज दिवस चांगला असला तरी डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणे आवश्यक आहे. वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अत्यंत फलदायी ठरेल. गुंतवणुकीचे जुने व्यवहार आज तुम्हाला नफा मिळवून देऊ शकतात. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील आणि व्यापारात वाढ होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवल्याने घरातील वातावरण आनंदी राहील. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे…

Read More

संगमनेर: प्रतिनिधी संगमनेर शहराची जीवनवाहिनी असलेल्या प्रवरा-म्हाळुंगी नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली. शांतीघाट परिसरात वाळू तस्करी सुरू असताना पथकाने छापा टाकला. यावेळी पळून जाणाऱ्या तस्करांचा थरारक पाठलाग करत दोघांना रंगेहात पकडण्यात आले, तर अन्य आठ जण उसाच्या शेतातून निसटले. या कारवाईत वाळूसह रिक्षा जप्त करण्यात आली असून १० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संगमनेरमधील शांतीघाट परिसरात रिक्षाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत तहसीलदारांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार महसूल आणि पोलीस विभागाचे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  थेट पालकमंत्र्यांनीच वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर महसूल प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. संगमनेर तालुक्यातील रायते शिवारात प्रवरा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या विरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत सुमारे २० लाख रुपये किमतीचे पोकलंड मशीन जप्त करण्यात आले असून, शासकीय कामात अडथळा आणून पळून गेलेल्या एका आरोपीविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध गौण खनिज चोरी रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष पथकातील ग्राम महसूल अधिकारी अविष्कार विश्वनाथ थोरात हे १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पथकासह गस्तीवर होते. तहसीलदार मांजरे साहेब यांच्या आदेशानुसार हे…

Read More

संगमनेर – अनंत पांगारकर संगमनेर नगरपालिकेचा कारभार संगमनेर सेवा समितीच्या हाती गेल्यानंतर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे आणि उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांनी पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये सत्ताधारी सेवा समितीच्या नगरसेवकांना सभापती पदाची संधी देतानाच, दोन अपक्ष आणि शिवसेनेच्या महिला उमेदवारालाही समित्यांमध्ये स्थान देऊन सर्वसमावेशक कारभाराचे संकेत देण्यात आले आहेत. सोमवारी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते. या बैठकीत सर्व निवडी बिनविरोध करण्यात…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील जोर्वे-रहिमपूर रस्त्यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास एक थरारक अपघात घडला. कोंबडी खताने भरलेला एक भरधाव आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीत जाऊन कोसळला. सुदैवाने, हा टेम्पो महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला न धडकल्यामुळे एक मोठी वीज दुर्घटना टळली असून, टेम्पोमधील चौघेही जण बालंबाल बचावले आहेत. ​​सटाणा तालुक्यातील देवळाभोर येथील आयशर टेम्पो (क्रमांक MH 41 AV 6183) कोंबडी खताच्या गोण्या घेऊन संगमनेर तालुक्यातील खांबा येथे आला होता. तेथे काही माल उतरवल्यानंतर, उर्वरित खत घेऊन टेम्पो आश्वी-रहिमपूर फाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होता. शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जोर्वे-रहिमपूर रस्त्यावरील जाधव वस्तीनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि…

Read More

​संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहर आणि तालुक्याच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या ‘अत्याधुनिक ट्रक टर्मिनस’चे काम सध्या प्रगतीपथावर आहे. संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल ७.५ कोटी रुपयांच्या निधीतून हे भव्य टर्मिनस साकारले जात असून, अशा प्रकारच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा असणारे हे महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्यातील पहिलेच ट्रक टर्मिनस ठरणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी दिली. ​आज आमदार सत्यजीत तांबे यांच्यासोबत या ट्रक टर्मिनसच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकारी, परिसरातील ग्रामस्थ, ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील नामवंत व्यावसायिक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून संगमनेरच्या व्यापार आणि दळणवळण क्षेत्राला एक नवी ओळख मिळणार आहे. ​यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ.…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ३७ वर्षीय तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी प्रवरा नदीपात्रात आढळून आल्याने संगमनेर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अभिजीत बाळासाहेब पाटील असे या मृत व्यक्तीचे नाव असून, ते एका खासगी एनजीओ संस्थेत प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. या घटनेत मृताची स्कुटी एका ठिकाणी आणि मृतदेह दुसऱ्या ठिकाणी आढळल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, हा प्रकार घातपात आहे की आत्महत्या, अशा दोन्ही बाजूंनी संगमनेर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत पाटील हे गुरुवारी (दि. १५) नेहमीप्रमाणे आपल्या ज्युपीटर स्कुटीवरून (क्र. एम.एच. १८. बी.वाय. ०७७६) कामावर गेले होते. मात्र, दुपारी जेवणासाठी ते घरी परतले…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील पठार भागातील शेळकेवाडी-अकलापूर परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री तब्बल सहा शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पंपांच्या केबल चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी घारगाव पोलिसांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ​या संदर्भात दीपक प्रताप भोर (वय ४८, रा. शेळकेवाडी अकलापूर) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोर हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या गट नंबर २३ मधील विहिरीवर सहा वर्षांपूर्वी त्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी पानबुडी इलेक्ट्रिक मोटार बसवली होती. गुरुवारी १५ तारखेला त्यांनी मोटार चालवून संध्याकाळी बंद केली होती. मात्र,…

Read More

अहिल्यानगर: शेवगाव तालुक्यातील ढाकणेवस्ती येथे चाकूचा धाक दाखवून करण्यात आलेल्या धाडसी दरोड्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या दोन दिवसांत छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह चार जणांना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील तब्बल १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. विशेष म्हणजे, पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण कोठेवाडी येथील गाजलेल्या खून प्रकरणातील शिक्षा भोगून आलेला गुन्हेगार आहे. ​१५ जानेवारी २०२६ रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास शेवगाव येथील ढाकणेवस्तीत राहणाऱ्या विमल बबन ढाकणे यांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी हल्ला केला होता. चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील महिलांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम…

Read More

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जावान ठरेल. नोकरीमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. रखडलेले प्रकल्प आज गतीने पुढे सरकतील. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस मध्यम असून डोळ्यांची जळजळ किंवा थकवा जाणवू शकतो. आर्थिक नियोजनासाठी आजचा काळ योग्य आहे. ​वृषभ: आर्थिक प्रगतीसाठी आजचा दिवस उत्तम राहील. व्यवसायात नवीन संधी चालून येतील आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील आणि जोडीदाराशी असलेले जुने मतभेद संपुष्टात येतील. नवीन वाहन किंवा वास्तू खरेदीचे विचार आज प्रबळ होतील. ​मिथुन: आज तुम्हाला बोलताना सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा शब्दांमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढल्यामुळे मानसिक…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द या रस्त्याच्या चौपदरीकरणासह विद्युतीकरण आणि पादचारी मार्गाचे काम माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मंजूर झाले आहे. ७ फेब्रुवारी २०२३ रोजीच या कामासाठी २ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असताना, नवीन लोकप्रतिनिधी मात्र खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, असा घणाघाती आरोप संगमनेर खुर्दचे उपसरपंच गणेश शिंदे यांनी केला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गणेश शिंदे यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी ९ किलोमीटरचा बायपास आणि इंजिनिअरिंग कॉलेज ते रायतेवाडी फाटा या ‘हॅपी हायवे’चे काम मंजूर करून घेतले. यातील बस स्थानकापर्यंतचे आणि…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर नगरपरिषदेने लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा नवा टप्पा गाठला असून, शहरातील भूमिगत गटारी आणि ड्रेनेजच्या स्वच्छतेसाठी राज्यात प्रथमच एका अत्याधुनिक जेटिंग मशीनचे लोकार्पण करण्यात आले आहे. संगमनेर नगरपरिषदेचे हे कार्य संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत ठरेल, असा विश्वास माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात ५ हजार लिटर क्षमतेच्या या अत्याधुनिक मशीनचे लोकार्पण माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद गोरे यांच्यासह पालिकेचे विविध पदाधिकारी आणि…

Read More